स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय शाळेचं सक्षमिकरण
व्हिझिबल अल्फा कंपनीने दिला मदतीचा हात कर्जत : अशोक गायकवाड व्हिझिबल अल्फा कंपनी च्या मदतीने लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट च्या अंतर्गत असलेल्या स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय, गौरकामत शाळेचे नूतनीकरण करण्यात आले. शाळेचे अध्यक्ष प्रमोद पाटील आणि मुख्याध्यापक प्रमोद किरंगे यांनी लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट आणि व्हिजिबल अल्फा यांनी दिलेल्या सुविधांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि दिलेल्या सुविधांचा वापर यापुढे केला जाईल अशी ग्वाही दिली. २८ मार्चला स्वामी विवेकानंद माध्यमिक शाळेत अल्फा व्हिसिबल च्या मदतीने नूतनिकरणाचे काम झाले आहे…आनंदो शाळा सक्षमीकरण प्रकल्पाचा उद्देश शाळांना सक्षम करण्यासाठी तसेच शाळांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे हे गौरकामत शाळेतील व्हिसिबल अल्फा डोनर च्या सपोर्ट मुळे साध्य झाले आहे. व्हिसिबल अल्फा ने शाळेसाठी शालेय विज्ञान प्रयोग शालेसाठी स्वतंत्र वर्गखोली , सौर ऊर्जा सुविधा , पाणी फिल्टर, शौचालये आणि स्नानगृहांचे नूतनीकरण तसेच ७० लाकडी बेंच , ग्रंथालय आणि एक स्वतंत्र वर्ग उपलब्ध करून दिले आहे . या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य व सामूहिक नृत्य सादर करून पाहुण्यांचे स्वागत केले. लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश दासवानी यांनी लाईट ऑफ लाईफ ट्रस्टसोबत भागीदारी करून शाळेला पाठिंबा दिल्याबद्दल व्हिजिबल अल्फा टीमचे आभार मानले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कांचन थोरवे यांनी शाळा सक्षमीकरण प्रकल्पाचा उद्देश सांगून शाळेची सक्षमीकरण प्रकल्पाची गरज स्पष्ट केली. शाळेचे अध्यक्ष पाटील आणि मुख्याध्यापक किरंगे यांनी लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट आणि व्हिजिबल अल्फा यांनी दिलेल्या सुविधांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि दिलेल्या सुविधांचा वापर यापुढेही केला जाईल अशी ग्वाही दिली. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना आमच्या शाळेत सर्व सुविधा असल्याने इतर विद्यार्थीही या शाळेत प्रवेश घेतील असे मत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक समन्वयक प्रिया सोनावळे यांनी केले. ह्या कार्यक्रमासाठी विशेषाधिकारी पाहुणे म्हणून श्रीमती पद्म प्रिया सरस्वतुला हेड ऑफ व्हिसिबल अल्फा भारत , अरुल, आयटी विभाग व्हिसिबल अल्फा, श्रीमती सीमा, प्रशासकीय व्हिसिबल अल्फा लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचे सीईओ दासवानी तसेच लाईफ ट्रस्ट मार्केटिंग टीम सदस्य हरपाल सिंग, कार्यक्रम व्यवस्थापक कांचन थोरवे, गौरकामत शाळेचे अध्यक्ष पाटील , चेअरमन राणे आणि गौरकामत गावचे सरपंच योगेश देशमुख उपस्थित होते.
