Category: रायगड

raigad news and updates

मतदार जनजागृतीसाठी ‘उत्सव लोकशाहीचा’ बाईक रॅली

अशोक गायकवाड अलिबाग : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ निमित्ताने जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने आयोजित “उत्सव लोकशाहीचा बाईक रॅली” साठी मतदार, युवक, महिला अधिकारी -कर्मचाऱ्यांसह उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रॅलीचा शुभारंभ जिल्हाधिकारी…

संजोग वाघेरे यांची शोभायात्रेला भेट

अशोक गायकवाड पनवेल : कामोठे रहिवासी सामाजिक संस्था,ओम शिव शंकर सेवा मंडळ जय हरी महिला मंडळ आयोजित मराठी नाव वर्ष ,गुढीपाढवा निमित्त काढलेल्या शोभा यात्रेत मावळ लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी उपस्थिती दर्शवली. कामोठे वासियांनी संजोग वाघेरे याना उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वागत केले अनेकांनी उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या सोबत सेल्फी काढून शुभेच्छा दिल्या यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील ,पनवेल महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे , शिवसेना जिल्हा प्रमुख शिरीष घरत, राष्ट्रवादीचे नेते सूरदास गोवारी, माजी नगरसेवक प्रमोद भगत आदी जण उपस्थित होते . मराठी नाव वर्षानिम्मित ठिकठिकाणी शोभा यात्रा काढण्यात आल्या होत्या त्या त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे याना निमंत्रण देण्यात आले होते त्या त्या ठिकाणी धावती भेट घेत वाघेरे यांनी उपस्थिती लावली ,कामोठ्यातील कामोठे रहिवासी सामाजिक संस्था ,ओम शिव शंकर सेवा मंडळ जय हरी महिला मंडळ आयोजित शोभा यात्रेत शिव शंकर मंदिरात शंकराचे दर्शन घेऊन शोभा यात्रेत सामील झालेल्या वाघेरे यांचे नागरिकांकडून ढोल ताशाच्या गजरात स्वागत केले ,अनेकांनी आपल्या लाडक्या नेत्यांसोबत सेल्फी काढून शुभेच्छा दिल्या ,यावेळी संजोग वाघेरे यांनी मावळ मतदार संघातील सर्व नागिरकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊन शोभा यात्रेतील कला प्रकार पाहून कलाकारांचे कौतुक केले. यावेळी कामोठे आदिवासी संघाचे सदस्य , महाविकास आघाडीचे पदाधिकारी ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकसभा निवडणूक, आयपीएलमुळे माथेरानच्या पर्यटनावर विपरीत परिणामाची शक्यता

माथेरान : उन्हाच्या झळा वाढत असताना माथेरानचे पर्यटन बहरत असते परंतु यावर्षी अजूनही माथेरानकडे पर्यटकांनी पाठ फिरवल्याने येथील व्यवसायिकांमध्ये चिंता पसरली असून सध्या सुरू असलेल्या आयपीएल, लोकसभा निवडणूक व रमजान…

मतदान यंत्र असलेल्या ठिकाणी २४ तास पोलीस बंदोबस्त ठेवा-किसन जावळे

अशोक गायकवाड रायगड : मतदान यंत्रे ठेवण्यासाठीची व्यवस्था, सीसीटिव्ही यंत्रणा, अग्निशमन व्यवस्था यांची बारकाईने चाचणी करण्यात यावी, तसेच त्याठिकाणी २४ तास आवश्यक पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था करावी तसेच या स्ट्राँग रूमच्या सुरक्षेची योग्य खबरदारी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिले. रायगड लोकसभा मतदारसंघा अंतर्गत महाड, दापोली आणि गुहागर विधानसभा मतदार संघातील स्ट्राँग रुमला भेट देऊन जिल्हाधिकाऱी किसन जावळे यांनी पाहणी केली. जावळे यांनी महाड, दापोली, गुहागर, पेण या विधानसभा मतदार संघात विविध मतदान केंद्रभेटी देऊन पाहणी केली. तसेच मतदान साहित्य वाटप व स्वीकृती केंद्र आणि महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रूमची पाहणी केली. तसेच स्टाँगरूम व्यवस्थापन, नियोजनाबाबत आढावा घेतला.मतदान यंत्रे ठेवण्यासाठीची व्यवस्था, सीसीटिव्ही यंत्रणा, अग्निशमन व्यवस्था यांची बारकाईने चाचणी करण्यात यावी, तसेच त्याठिकाणी २४ तास आवश्यक पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था करावी निवडणुकीसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा पुरविण्याकडे लक्ष द्यावे. कायदा व सुव्यवस्था व पोलीस बंदोबस्त आराखडा निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार करण्यात यावा. मतदान जनजागृती, अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाबाबतही निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी महाड डॉ. ज्ञानेश्वर बाणापुरे, माणगाव तहसीलदार विकास गारुडकर, महेश शितोळे, पोलीस निरीक्षक तडवी यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

९० हून अधिक लहान- मोठ्या नाल्यांमधील गाळ, माती, कचरा काढून सफाई – डॉ. पंकज पाटील

अशोक गायकवाड खोपोली : सर्व मोठी गटारे, जवळपास ९० हून अधिक लहान- मोठ्या नाल्यांमधील गाळ, माती, कचरा काढून सफाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी दिली.  अतिवृष्टीमुळे दरवर्षी शहरातील मुख्य गटारे, नाले तुडूंब भरत असल्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होत असते. यावर्षी अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नगर परिषदेमार्फत नालेसफाईच्या कामांना १ एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. सर्व मोठी गटारे, जवळपास ९० हून अधिक लहान- मोठ्या नाल्यांमधील गाळ, माती, कचरा काढून सफाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी दिली.नगर परिषदेच्या आरोग्य आणि बांधकाम विभागाच्या माध्यमातून विविध प्रभागातील लहान-मोठी गटारे, नाले यांच्या सफाईचे काम दरवर्षी हाती घेतले जाते. यंदाही भानवज-शास्त्रीनगर येथून येणाऱ्या नाल्यामुळे भाऊ कुंभार चाळ, गुलशन अपार्टमेंट, विणानगर परिसर, शिळफाटा येथील डीसीनगर आदी भागांमध्ये पावसाचे पाणी सखलभागात साचून पूरसदृश्य स्थिती निर्माण होते. या भागात असलेले नाले आणिमोठी गटारे यातील गाळ काडून पाण्याचा निचरा होण्यासाठी काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी ५० कर्मचारी काम करीत आहेत. छोटे नाल्यांच्या सफाईसाठी मनुष्यबळाचा,तर मोठ्या नाल्यांमध्ये जेसीबी, पोकलेन, डंपरचा वापर करून कचरा, गाळ उचलला जाणार आहे. साफसफाईच्या पाहणीनंतर मुख्याधिकारी डॉ. पाटील यांनी आरोग्य विभागाला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.मोठ्या नाल्यांमध्ये जेसीबी, पोकलेन,डंपरचा वापर करून कचरा, गाळ उचलला जाणार आहे. साफसफाईच्या पाहणीनंतर मुख्याधिकारी डॉ. पाटील यांनी आरोग्य विभागाला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.

हिंदू नववर्ष स्वागतची शोभयात्रा

तिकीट चेकिंग परिवार मुंबईतर्फे माथेरान : नेहमीच कामाच्या तणावातून सुद्धा आपली धार्मिक परंपरा कायमस्वरूप अबाधित ठेवून सण हा एखादा उत्सवाप्रमाणे साजरा करण्यासाठी मध्य रेल्वेत मुंबई येतील तिकीट चेकिंग परिवारतर्फे गुडीपाडव्याच्या…

निवडणुकीतील आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडा-किशन जावळे

अशोक गायकवाड अलिबाग : भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडावे असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी जावळे यांनी यावेळी केले. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत ३२-रायगड…

माथेरानच्या शिरपेचात मानाचा तुरा ; शुभम रांजाणे टॅटू स्पर्धेत द्वितीय !

पुणे येथे टॅटू स्पर्धा संपन्न माथेरान : पुणे येथील खर्डी याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या टॅटू स्पर्धेत माथेरानच्या शुभम गणपत रांजाणे याने द्वितीय क्रमांक पटकावला असून माथेरानच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला…

कर्जत मतदार संघाच्या विकासपुरुषास मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

माथेरान : कर्जत खालापूर मतदार संघातील असंख्य विकास कामे पूर्ण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आपल्या मतदार संघातील जनतेच्या प्रश्नांची उकल करणारा आमचा आवडता मित्र, आमदार महेंद्र थोरवे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना खरोखरच आनंद वाटत आहे असे गौरवोद्गार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. मुंबईत एका छोटेखानी कार्यक्रमात आज दि.६ रोजी कर्जत खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा देत या निष्ठावंत आमदारावर स्तुतीसुमने उधळली. एक धीरोदात्त असा हा लढवय्या आमदार आमचा सहकारी असल्याचा आम्हाला आनंद होत असून जवळपास एक हजार कोटी रुपयांची विकास कामे थोरवे यांच्या माध्यमातून पूर्णत्वास जात आहेत असेही शिंदेंनी स्पष्ट केले.यावेळी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत पालकमंत्री उदय सामंत, आमदार भरत गोगावले,मंगेश चिवटे आणि इत्तर आमदार  उपस्थित होते.

निवडणूक कामास सर्वांनी प्राधान्य द्यावे-जिल्हाधिकारी किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : निवडणूक काळात सर्व अधिकारी कर्मचारी यांनी दक्ष राहून काळजीपूर्वक सर्व जबाबदाऱ्या पार पाडव्यात. निवडणूक कामास सर्वांनी प्राधान्य द्यावे, अशा सूचनाजिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत. रायगड जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाची तयारी सुरु आहे. संपूर्ण जिल्ह्यात अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व विभागांनी कृती आराखडा तयार करून त्याची समन्वयाने प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृश्यप्रणालीद्वारे घेण्यात आली. या बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी स्वीप भरत वाघमारे, जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे, तहसिलदार उमाकांत कडनोर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी जावळे म्हणाले की, लोकशाहीचा उत्सव म्हणजे मतदान प्रक्रिया होय. या उत्सवात प्रत्येक मतदाराने आपला सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक मतदाराला मतदानासाठी प्रवृत्त करावे. जिल्ह्यातील सर्व मतदारांपर्यंत मतदान केंद्रांची माहिती पोहोचवावी. तसेच मतदान केंद्रांवर वीज, पाणी, मंडप यासह सर्व मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. जिल्ह्यातील सर्व घटकांच्या प्रबोधनासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले. मतदारांमध्ये जनजागृतीसाठी आवश्यक साहित्य पुरविण्यात यावे, असेही जिल्हाधिकारी जावळे यांनी सांगितले. रायगड जिल्ह्यातील आदिवासी, कातकरी समाजाचे मतदान वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जावळे यांनी दिले. आदिवासी पाडे, वाड्या,वस्ती येथे मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी. जे रोजंदारी जाणारे मतदार आहेत त्यांच्या आस्थापनाशी संपर्क साधून भर पगारी सुट्टी देणे शक्य आहे का हे तपासावे. तसेच जेथे सुट्टी देणे शक्य नसेल त्या ठिकाणी दोन तासाची सवलत देण्याबाबत सूचना द्याव्यात. तसेच या मतदारांचे पहिल्या सत्रात मतदान घेण्यासाठी ग्रामसेवक, तलाठी तसेच निवडणूक यंत्रणा यांनी दक्षता घ्यावी असे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले. जिल्ह्यातील अनेक मतदार नोकरीं धंद्या निमित्त बाहेरच्या जिल्ह्यात गेले आहेत. परंतु त्यांचे नाव मतदार यादीत आहे. त्या सर्व मतदारांना मतदार चिट्ठीचे वाटप करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जावळे यांनी दिले. निवडणूक काळात सर्व अधिकारी कर्मचारी यांनी दक्ष राहून काळजीपूर्वक सर्व जबाबदाऱ्या पार पाडव्यात. निवडणूक कामास सर्वांनी प्राधान्य द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जावळे यांनी सर्व यंत्रणेला दिल्या आहेत.