ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, जी.जी. गोदेपुरे, दिनेश तायडे, अनघा कदम, प्र. उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
कल्याण-डोंबिवलीत रात्री झाडांच्या आडोशाने बसणाऱ्या ८१ गांजा व्यसनींवर कारवाई
कल्याण : कल्याण-डोंबिवली परिसरातील गुन्हेगारी मोडून काढण्याचा चंग बांधलेल्या पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी आपल्या पोलीस ठाणे हद्दीतील स्थानिक पोलिसांना रात्रीच्या वेळेत झाडे, झुडपे, खाडी किनारा भागात गांजा, मद्य सेवन,…
लोणावळ्यातील संपर्क बाल ग्राम संस्था, अनाथ मुलांसाठी आशेचा किरण !
अनिल ठाणेकर लोणावळ्यातील संपर्क बाल ग्राम संस्थेला नुसीचे जनरल सेक्रेटरी मिलिंद कांदळगावकर यांनी आपल्या पत्नी समवेत नुकतीच भेट दिली. त्यांनी या सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे कौतुक करताना सांगितले की, ही एक उल्लेखनीय संस्था आहे. जी असुरक्षित मुलांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी समर्पित आहे. जवळपास तीन दशकांपासून, SAMPARC (सोशल ऍक्शन फॉर मॅनपॉवर क्रिएशन) संपूर्ण भारतातील अनाथ, वंचित, आदिवासी आणि उपेक्षित मुलांसाठी आशेचा किरण आहे, अशी माहिती मारुती विश्वासराव यांनी दिली. आमच्या भेटीदरम्यान, आम्हाला SAMPARC चे संस्थापक आणि संचालक अमितकुमार बॅनर्जी यांच्यासोबत दोन तास घालविण्याचा बहुमान मिळाला. त्याच्या संस्थेचा प्रभाव खोलवर आहे – गेल्या २९ वर्षांमध्ये, SAMPARC ने ११ हजारहून अधिक गरजू मुलांचे पालनपोषण आणि समर्थन केले आहे. त्यांच्या सर्वसमावेशक पध्दतीमध्ये केवळ निवाराच नाही तर दर्जेदार शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण आणि उच्च शिक्षणाच्या संधी यांचा समावेश आहे. प्रत्येक मुलाचे यशस्वीरित्या पुनर्वसन आणि स्वावलंबी होईपर्यंत संस्था आपली वचनबद्धता कायम ठेवते.संपर्कमधील पाच मुलींचे पुनर्वसन करून स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहण्यासाठी आम्ही NUSI च्या (नॅशनल युनियन ऑफ सीफेअरर्स ऑफ इंडिया) उपक्रमाबद्दल माहिती दिली, हा आमच्या भेटीतील एक महत्त्वपूर्ण उद्देश होता. या पाच तरुणींची गोव्यातील प्रतिष्ठित नुसी मेरीटाईम अकादमीमध्ये जीपी रेटिंग प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे, त्यांच्या शिक्षणाचा प्रत्येकी दोन लाख रुपये खर्च नुसी करणार असून, नोकरीची शाश्वती देखील देत आहे. आता सागरी क्षेत्रात अनेक करिअरच्या आशादायक संधी उपलब्ध झाल्या आहेत. वंचित मुलांच्या यशस्वी करिअरसाठी दोन्ही संस्था एकत्रितपणे कसे कार्य करू शकतात याचे हे चांगले उदाहरण आहे .संपर्कचे सर्वांगीण बाल विकास समर्पण आणि प्रत्येक मुलाच्या भविष्यासाठी त्यांची कायम वचनबद्धता खरोखरच प्रशंसनीय आहे. त्यांचे कार्य तरुणांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणने समर्पित सामाजिक कृतीच्या सामर्थ्याचा पुरावा आहे.
जिल्ह्यात ‘स्वच्छ माझे अंगण’ अभियान सुरू – रोहन घुगे
ठाणे : कुटूंबस्तरावर वैयक्तिक शौचालय, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन या बाबींची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन स्वच्छतेची सवय अंगीकृत करणे, नियमितपणे वापर करणाऱ्या कुटूंबांना प्रोत्साहन देणे, त्यांचे अनुकरण करण्याकरीता इतर ग्रामस्थांना, कुटूंबधारकांना…
जानेवारीत महाराष्ट्र निर्यात संमेलनाचे आयोजन
ठाणे : ठाणे जिल्हा उद्योग केंद्र यांच्यामार्फत 7 जानेवारी सकाळी 9 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, ठाणे येथे महाराष्ट्र निर्यात संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील लघु व…
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
ठाणे : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी…
अभिनेते-दिग्दर्शक सतीश पुळेकर यांचा ‘गौरव रंगभूमीचा’ पुरस्काराने होणार सन्मान
पनवेलमध्ये राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी पनवेल : दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला १ लाख रूपये आणि मानाचा ‘अटल करंडक’ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार तसेच सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक सतीश पुळेकर यांचा “गौरव रंगभूमीचा” पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक टीआयपीएल तर सहप्रायोजक निल ग्रुप आहेत. यंदा या स्पर्धेचे ११ वे वर्ष असून त्या संदर्भात विस्तृत माहिती देण्यासाठी खांदा कॉलनी येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेस रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष परेश ठाकूर, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे प्रमुख कार्यवाह श्यामनाथ पुंडे, कोषाध्यक्ष अमोल खेर, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, सांस्कृतिक समन्वयक गणेश जगताप, सदस्य चिन्मय समेळ, भाजपचे तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रसार माध्यमांना पुढे माहिती देताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले कि, मराठी रंगभूमीला गेली अनेक वर्ष अनेक चांगले कलाकार अभिनेते दिग्दर्शक लाभले. त्यांनी त्या काळात त्यांच्या मेहनतीवर मराठी रंगभूमी यशस्वीरित्या उभी केली, वारसा पुढे वाढवला. अशाच काही कलाकारांचा गुणगौरव हा अटल करंडकच्या रंगमंचावर करण्यात येतो. अटल करंडकच्या ८ व्या वर्षी पासून “गौरव रंगभूमीचा” या पुरस्काराने सन्मानित केले जाते. आतापर्यंत यामध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश बुद्धीसागर, ज्येष्ठ अभिनेते कै. जयंत सावरकर, प्रसिद्ध अभिनेते डॉ मोहन आगाशे यांना गौरविण्यात आले आहे. यंदा प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक सतीश पुळेकर यांचा “गौरव रंगभूमीचा” या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ व ५० हजार रुपये पन्नास हजार असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. गेली दहा वर्षे चाललेल्या अटल करंडक स्पर्धेने टप्प्याटप्याने उच्चांक गाठला आहे. कोरोना काळातही एवढ्या मोठ्या स्तरावर अटल करंडक ही एकमेव स्पर्धा होती जी संपूर्ण महाराष्ट्रात यशस्वीरीत्या संपन्न झाली, स्पर्धेच्या ८व्या वर्षी कोरोना चे सर्व निर्बंध पाळत कोरोना काळातही प्राथमिक फेरीसाठी जवळपास १०६ संघांनी सहभाग घेतला होता. यावर्षी देखील अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला प्राथमिक फेरीसाठी १०८ संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला १४ डिसेंबर २०२४ पासून विभागनिहाय प्रारंभ झाला, जळगाव व नागपूर केंद्र, पुणे सातारा केंद्र, कोल्हापूर केंद्र, रायगड (पनवेल) केंद्र, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या केंद्रांवर संपन्न झाली. प्राथमिक फेरीसाठी परीक्षक म्हणून आशीर्वाद मराठे आणि मानसी दोषी मराठे यांनी हि कामगिरी यशस्वीरित्या पार पाडत महाअंतिम फेरीसाठी सर्वोत्कृष्ट अशा २५ एकांकिकांची निवड केली आहे. निवड झालेल्या संघाची महाअंतिम फेरी १०,११ आणि १२ जानेवारी २०२५ रोजी पनवेलमधील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे, असून परीक्षक म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या मोने, प्रसिद्ध दिग्दर्शक देवेंद्र पेम, विराजस कुलकर्णी हे काम पाहणार आहेत. एकांकिका स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच कोणत्यातरी एकांकिका स्पर्धेचा “ब्रॅण्ड अॅम्बेसिडर” अशी एक नाविन्यपूर्ण संकल्पना सुरु करण्यात आली . अटल करंडक मधून जो कलाकार विजेता आहे आणि आज तो यशस्वीरित्या या क्षेत्रात कार्यरत आहे अशा एका कलाकाराला आम्ही ‘ब्रँड अॅम्बेसिडर” चा मान देण्याचे ठरविले होते त्यानुसार सुप्रसिद्ध अभिनेता “ओंकार भोजने” याची नियुक्ती बँड अॅम्बेसिडर म्हणून अटल करंडक च्या ८ व्या वर्षासाठी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे ९ व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेता, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम, निरागस विनोदीवीर “पृथ्वीक प्रताप” यांची, मागील वर्षी म्हणजेच १० व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेता सि के टी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आणि अटल करंडक आणि मल्हार करंडक मधील स्पर्धक अजिंक्य ननावारे यांची निवड करण्यात आली होती. या वर्षी सुप्रसिद्ध बिग बॉस फेम, माझ्या नवऱ्याची बायको फेम आणि अटल करंडक ची २०१८ ची स्पर्धक अभिनेत्री “रुचिरा जाधव” ‘ब्रँड अॅम्बेसिडर” आहेत. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना यंदाही भरघोस रक्कमेची पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे अटल करंडक एकांकीका स्पर्धेमध्ये एकूण रुपये २ लाख ७० हजाराची मुख्य पारितोषिके आणि ३८ हजार रुपयांची वैयक्तिक पारितोषिके देण्यात येतात. तसेच प्राथमिक फेरी आणि अंतिम फेरी अशी मिळून ४ लाखाची पारितोषिके देण्यात येतात. प्रथम पारितोषिक ०१ ;लाख रुपये प्रमाणपत्र व मानाचा अटल करंडक, द्वितीय पारितोषिक ७५ हजार रुपये प्रमाणपत्र व चषक, तृतीय पारितोषिक ५० हजार रुपये प्रमाणपत्र व चषक, चतुर्थ पारितोषिक २५ हजार रुपये प्रमाणपत्र व चषक तर उत्तेजनार्थ दोन पारितोषिकअसून त्यांना १० हजार रुपये प्रमाणपत्र व चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट विनोदी एकांकिकेला १५ हजार रुपये, तसेच वैयक्तिक गटात उत्कृष्ट अभिनेता, उत्कृष्ट अभिनेत्री, नेपथ्य, संगीत, लाईट, लेखक आणि दिग्दर्शक, विनोदी कलाकार, सर्वोत्कृष्ट बाल कलाकार यांनाही पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबरीने पनवेल मधील दिवंगत लोकप्रिय नाट्य कलावंत व वेशभूषाकार कै. किशोर जोशी यांच्या स्मरणार्थ सर्वोत्कृष्ट वेशभूषा विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे, अशीही माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. परेश ठाकूर यांनी बोलताना सांगितले कि, मल्हार महोत्सवाच्या निमित्ताने एकांकिका स्पर्धा सुरु झाली. ती गेल्या १० वर्षात अटल करंडकच्या रूपाने राज्यस्तरीय स्पर्धा झाली. कोरोनाच्या काळात आयोजन करणारी आणि यशस्वी अशी एकमेव स्पर्धा ठरली. कलाकारांना व्यासपीठ आणि सन्मान देण्याचे काम या स्पर्धेतून होत आहे, याचे आम्हाला आयोजक म्हणून समाधान आहे. सीकेटी महाविद्यालयाचे कला क्षेत्रात असलेले काम आणि सहभागामुळे स्पर्धा परिपूर्ण झाली असून त्याचबरोबरीने टीम अटल करंडक मेहनत घेऊन काम करत आहे. या स्पर्धेच्या नियोजनाचे नेहमीच कौतुक होत असून यशस्वीतेमुळे अटल करंडकला प्रतिष्ठा प्राप्त झाली. निल गुपचे विलास कोठारी व कल्पना कोठारी, पनवेल महापालिका, कलाकार आणि रसिकांचा नेहमीच पाठिंबा मिळत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. कलाकारांना व्यासपीठ मिळावे यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न राहिला असून त्या अनुषंगाने कार्यशाळा तसेच प्रशिक्षण वर्गही यापूर्वी घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी श्यामनाथ पुंडे यांनी प्रास्ताविकात सांगितले कि, “रंगमंच आमचा कलाविष्कार तुमचा” हे ब्रीद वाक्य घेऊन गेली १८ वर्ष पनवेल मध्ये एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. आधी सात वर्ष ही स्पर्धा “मल्हार करंडक” या नावाने जिल्हास्तरीय स्वरूपात आयोजित केली जात होती. गेली १० वर्ष ही स्पर्धा “अटल करंडक” या नावाने राज्यस्तरीय स्वरूपात आयोजित केली जात आहे. यंदाचे ह्या स्पर्धेचे ११ वे वर्ष आहे. नाटय चळवळ वृद्धींगत व्हावी व नाटय रसिकांना आपले नाट्याविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वृद्धींगत व्हावा, यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे माजी सभागृहनेते व नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी ‘अटल करंडक एकांकीका’ या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. नामवंत, उमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात. स्पर्धेचे देखणे व निटनेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परिक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे ही स्पर्धा नाट्य रसिकांच्या गळयातील ताईत बनली. दरवर्षी या स्पर्धेला राज्यातील कलाकार आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत असतो, असेही त्यांनी सांगितले. ००००००
सायकल मोहिमेतून कॅन्सरविषयी जनजागृती आणि केशदान मोहीम
ठाणे : हिंदायान फाउंडेशनच्यावतीने दिल्ली – ठाणे – मुंबई – पुणे या मार्गे सायकल मोहीम आयोजित करण्यात आली असून या मोहिमेत हजारो सायकल प्रेमी सहभागी होणार आहेत. यावर्षी या मोहिमेची थीम…
राज्य क्रीडा दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यात विविध क्रीडा उपक्रम राबविण्याचे आवाहन
ठाणे : ऑलिम्पिकमधील पहिले पदक विजेते कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्म दिन 15 जानेवारी हा दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येणार असून या निमित्ताने जिल्ह्यातील विविध संस्था, संघटनांनी…
ठाणे महापालिका क्षेत्रात डिसेंबर महिन्यात हटवले ३८९१ अनधिकृत फलक
७६ प्रकरणात गुन्हे दाखल ठाणे : डिसेंबर-२०२४मध्ये ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व प्रभागांमधून ३८९१ अनधिकृत फलक, पोस्टर्स, बॅनर्स हटवण्यात आले. तर, ७६ प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनधिकृत फलक हटवण्याची मोहीम सातत्याने सुरू ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. ठाणे महापालिकेचा अतिक्रमण विभाग आणि प्रभाग समिती यांच्या मार्फत डिेसेंबर महिन्यात ३८९१ अनधिकृत फलक, पोस्टर्स, बॅनर्स हटवण्यात आले. ही कारवाई सहाय्यक आयुक्तांमार्फत सातत्याने सुरू आहे. एकूण ७६ प्रकरणात गुन्हेही दाखल करण्यात आल्याची माहिती उपायुक्त (अतिक्रमण) शंकर पाटोळे यांनी दिली. महापालिका क्षेत्राचे विद्रुपीकरण थांबवण्यासाठी दैनंदिन मोहीम राबवून अनधिकृत फलक हटवण्याची आवश्यकता आहे. त्याबाबत, मा. उच्च न्यायालयाचेही अतिशय काटेकोर आदेश आहेत. त्याचे पालन सगळ्यांनी करावे. अनधिकृत पोस्टर, बॅनर, फलक लावला की त्यावर नोटीस आणि गुन्हे दाखल करणे ही कारवाई अतिशय प्रभावीपणे करण्यात यावी, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. तसेच, ठाणे महापालिका हद्दीत अधिकृत फलक लावण्यासाठी जाहिरात विभागाने जागा निश्चित केल्या आहेत. त्याचे शुल्क भरून केवळ त्याच ठराविक भागात फलक लावता येणार आहेत. त्याबाबत संबंधितांनी सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त शंकर पाटोळे यांनी केले आहे. 00000
