Category: ठाणे

Thane news

कल्याणच्या जी प्लस हार्ट रुग्णालयात झाली अत्याधुनिक ‘मिनीमल इनव्हेसिव्ह हार्ट सर्जरी’

यशस्वी सर्जरी करणारे ठाणेपलिकडील पहिलेच रुग्णालय कल्याण  : कल्याणच्या वैद्यकीय क्षेत्रात अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीत आपला वेगळा ठसा उमटवलेल्या जी प्लस हार्ट सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये अतिशय परिणामकारक आणि अत्याधुनिक समजली…

कर्नाटक राज्य परिवहनच्या प्रतिष्ठित सेवेचा प्रयोग महाराष्ट्र देखील करणार –  प्रताप सरनाईक

अनिल ठाणेकर ठाणे : कर्नाटक राज्य परिवहन सेवेची लांब पल्ल्याची “प्रतिष्ठित सेवा” अतिशय लोकप्रिय असून आदरातिथ्य व्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या सेवेला प्रवाशांची चांगली पसंती आहे. अशाच प्रकारचा प्रयोग महाराष्ट्र देखील करणे शक्य आहे! असे कौतुकोद्गार  राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काढले ते कर्नाटक दौऱ्यावर असताना बंगळुरू येथील कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाच्या भेटी दरम्यान बोलत होते. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे १ व २ फेब्रुवारी रोजी दोन दिवसाच्या कर्नाटक दौऱ्यावर होते. आज बंगळुरू येथे त्यांनी कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाला भेट दिली, त्यावेळी  त्यांच्यासोबत *कर्नाटक राज्याचे परिवहन मंत्री डॉ . रामलिंगा रेड्डी* यांच्या सह राज्याचे  परिवहन सचिव डॉ.एन.व्ही. प्रसाद व कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष रिझवान नवाब तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, नितीन मैद (महाव्यवस्थापक वाहतूक) व श्री . नंदकुमार कोलारकर (महाव्यवस्थापक  यंत्र ) हे अधिकारी उपस्थित होते. या वेळी मंत्री सरनाईक यांनी कर्नाटक राज्य परिवहन सेवेद्वारे चालवल्या जाणाऱ्या अंबारी, ऐरावत, राजहंस यासारख्या प्रीमियम सेवेच्या बसेस बरोबर इतर बसेस ची पहाणी केली, तसेच या बसेस कशा पद्धतीने चालवल्या जातात याची माहिती घेतली. “आदरातिथ्य व्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या बस सेवेला प्रवाशांची चांगली पसंती आहे. खाजगी बसेसच्या तुलनेमध्ये सुरक्षित आणि वेळेवर सेवा देण्यासाठी या बस सेवा अतिशय प्रसिद्ध आहे.” अशा प्रकारे बस सेवेचे  कौतुक केले . या वेळी कर्नाटक परिवहन सेवेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या राज्यात सध्या चालवल्या जात असलेल्या सर्व प्रकारच्या बसेस  मंत्री सरनाईक यांना दाखविल्या. त्यामध्ये ९ मीटर पासून १५ मीटर पर्यंतच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बसेस उभ्या करण्यात आल्या होत्या. अगदी डोंगरी भागापासून हम रस्त्यावर धावतील अशा वेगवेगळ्या इंजिन आणि आसन क्षमतेच्या,  विविध सोयी -सुविधा असलेल्या बसेस कशाप्रकारे गरजेनुसार प्रवाशांसाठी उपलब्ध केले जातात, याची माहिती यावेळी त्यांना देण्यात आली. तसेच लांब पल्ल्याची सेवा देणाऱ्या बसेस मध्ये  “वायफाय ” पासून ” युरिनल ” पर्यंत सोयीसुविधा प्रवाशांसाठी कशा प्राप्त करून दिले जातात. तसेच ई-तिकीट आणि ऑनलाईन तिकीट बुकिंग ची  सेवा देखील प्रवाशांना उपलब्ध करून दिली आहे, हे देखील यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी मंत्री सरनाईक यांना सांगितले. दरम्यान परिवहन सेवेच्या सादरीकरणात माहिती देताना,संपूर्ण राज्याचे व्यवस्थापन वेगवेगळ्या चार प्रादेशिक विभागांमध्ये विभागण्यात आले असून त्यासाठी प्रत्येक विभागाला आय.ए.एस.(I.A.S.) दर्जाचे एक अधिकारी नेमण्यात आलेले आहेत. तसेच  राज्यस्तरावर या सर्वांचे संचालन करण्यासाठी वरिष्ठ आय.ए.एस. दर्जाचे अधिकारी नेमण्यात आले आहेत .त्यामुळे एकूण राज्याच्या परिवहन सेवेमध्ये सुसूत्रता आणणे आणि प्रवाशांना चांगल्या सुविधा प्राप्त करून देणे यासाठी प्रशासकीय रचनेमध्ये केलेले सकारात्मक बदल महत्वाची भूमिका बजावतात यांची माहिती देखील मंत्री महोदयांच्या  देण्यात आली.आपल्या मनोगतात मंत्री सरनाईक पुढे म्हणाले की, सन्माननीय पंतप्रधान ‌नरेंद्र मोदी यांनी सर्व लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करताना सांगितले होते की, इतर राज्यात ज्या चांगल्या गोष्टी घडत आहेत, त्यांना भेट देऊन त्या आपल्या राज्यात कशा अमलात आणता येतील याचा अभ्यास करावा! जेणेकरून विविध ठिकाणच्या नाविन्यपूर्ण योजना आपल्या राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होतील. याचाच एक भाग म्हणून कर्नाटक राज्य मार्ग परिवहन सेवेमार्फत चालवल्या जाणाऱ्या  ऐरावत, अंबारी, राजहंस यासारख्या प्रतिष्ठित लांब पल्ल्याच्या सेवेची माहिती करून घेणे, तसेच त्यांच्या प्रादेशिक परिवहन व्यवस्थापनाचा अभ्यास करणे, त्याबरोबर त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी राबवत असलेल्या प्रोत्साहन योजना जाणून घेण्यासाठी या दौऱ्याची आखणी केली होती.  यावेळी बंगळुरू येथील कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्यालयात कर्नाटक परिवहन सेवेचे सादरीकरण करण्यात आले. या निमित्ताने कर्नाटक राज्यातील परिवहन सेवांचा अभ्यास करून त्यांच्या चांगल्या कल्पना, नाविन्यपूर्ण योजना आपल्या एसटी महामंडळामध्ये राबवणे शक्य आहे का, याची देखील चाचपणी या दौऱ्याच्या निमित्ताने करण्यात आली.

श्री उद्यानगणेश मंदिर चषक जिंकण्यासाठी शालेय ३६ कॅरमपटूंमध्ये आज चुरस 

ठाणे : श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समिती मुंबई व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री उद्यानगणेश मंदिर चषक कॅरम स्पर्धा जिंकण्यासाठी मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी…

विहंग, सरस्वती, महात्मा गांधी व ग्रिफिन जिमखाना उपांत्य फेरीत

श्री मावळी मंडळ संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त प्रथम विभागीय पुरुष व महिला गटाच्या खो-खो स्पर्धेत पुरुषांच्या उपांत्य गटात विहंग क्रीडा केंद्र (ठाणे), शिर्सेकर्ल महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडेमी  (मुंबई उपनगर), सरस्वती…

सेहचाळीस किलोच्या गांजासह सहा आरोपी अटकेत

मिरा – भाईंदर  येथील नवघर पोलिसांच्या धडक  कारवाईत सहा आरोपीना अटक करण्यात आली आहे. नवघर पोलीसांची गस्त सुरु असताना हे सहा आरोपी संशयास्पद स्थितीत फिरताना आढळले. यांच्या कडच्या तीन मोठ्या बॅगेत तपासणी केली असता त्यात सेहचाळीस किलो गांजा सापडला. या गांजाची बाजारातील किंमत सहा लाख नव्वद हजार रुपये आहे. या आरोपीमध्ये दोन जण गुजरातचे असून चोघे ओडिसाचे असल्याचे कळले. या सगळ्यांना अटक करून त्यांची पोलीस कस्टडी घेतल्याचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी सांगितले. हे अट्टल गुन्हेगार आहेत का? हा गांजा ते कोणाला देणार होते ? हा गांजा त्यांनी कुठून आणला? याबद्दलची चौकशी सुरु असल्याचे ते म्हणाले. पोलिसांची टीम त्यांच्या राज्यात जाऊन अधिक चौकशी करेल असं ते पुढे म्हणाले. आजच्या तरुणांना तसेच या पिढीला अशा व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी पोलिसांनी अशीच मोहीम राबवावी अशी अपेक्षा इथले नागरिक व्यक्त करत आहेत.

सह्याद्री, ओम साईश्वर,  समर्थ, राजर्षी शाहू महाराजची विजयी सलामी

मावळी मंडळाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विभागीय पुरुष व महिला खो-खो स्पर्धा ठाणे: महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने व द अमॅच्युअर खो-खो असोसिएशन ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली  मावळी मंडळाने शतक महोत्सवी वर्षानिमित्त प्रथमच विभागीय…

अमृत महोत्सवानिमित्त जगन्नाथ शिंदे यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नागरी सत्कार

कल्याण : अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रॅगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांचा अमृत महोत्सवी सत्कार सोहळा कल्याण पूर्वेतील पोटे मैदानात संपन्न झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी जगन्नाथ शिंदे यांच्या आयुष्यावरील रथ जगन्नाथाचा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तर एकाच दिवशी 80 हजारहून अधिक रक्तदान केल्याबद्दल गिनीज वर्ल्ड रेकॉर्डबूक मध्ये नोंद करण्यात आली असून त्याचे प्रमाणपत्र देखील देण्यात आले. जगन्नाथ शिंदे केमिस्ट रत्न म्हणून संपूर्ण देशात परिचित आहेत. ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट महासंघाचे अध्यक्ष आहेत. तुमचा शतकमहोत्सवी सोहळा साजरा करण्याची संधी आम्हाला मिळावी एवढीच इच्छा याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी बोलताना व्यक्त केली. कोरोना काळात अप्पा शिंदे यांनी केलेलं काम कधीही विसरता येणार नाही. रेमडेसिवीर यांसारखी त्यावेळी दुर्मीळ झालेली औषधे त्यांनी उपलब्ध करून दिली. सर्वसामान्यांच्या जीवन मरणात महत्त्व असलेल्या औषधांचा पुरवठा करूनही त्यांची नाळ कायमच सर्वसामान्य नागरिकांशी जोडलेली आहे. एका दिवसात ८० हजार बाटल्या रक्त त्यांनी जमा करून दाखवले होते. त्यामुळे आप्पा तुम्ही यापुढेही कायम दवा देत रहा आणि दुवा घेत रहा असे सांगत एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार राजेश मोरे, आमदार सुलभा गायकवाड, आमदार किसन कथोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रमोद हिंदुराव, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त इंदूराणी जाखड आदींसह इतर अनेक मान्यवर  उपस्थित होते.

अखेर डोंबिवली पश्चिमेकडील पाणी प्रश्नावर निघाला तोडगा

वृन्दावनच्या संप पंपाच्या अडसर दूर आमदार रवींद्र चव्हाण यांच्या सुचनेनंतर मनपाने हटवले अतिक्रमण कल्याण :  भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीत डोंबिवली पश्चिम भागातील पाणी पुरवठा बाबत चर्चा करण्यात आली होती. त्यावेळी चव्हाण यांनी डोंबिवली पश्चिम वृंदावन येथील संपपंपच्या जागी असलेले अतिक्रमण हटवून संपपंपची उभारण्याचे काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या होत्या.  त्याची अंमलबजावणी त्वरित झाली असून आता तो अडसर दूर झाला आहे. चव्हाण यांच्या सूचनानंतर महानगरपालिका प्रशासनाने संप पंपाच्या कामात अडथळा ठरणारे अतिक्रमण हटवलेले असून पाणीपुरवठा करणाऱ्या संप पंपाचे काम वेगाने सुरू करण्यात आलेले आहे.  वृंदावन येथील जलकुंभातून होणारा पाणीपुरवठा व जलवाहिन्यांच्या आराखड्यासाठी आयआयटी मुंबईचे तज्ञ डॉक्टर अनुज कुमार घोरपडे यांनी विकसित केलेल्या शाफ्ट आणि मॅनिफोल्ड टेक्नॉलॉजी चा वापर करण्यात येणार असून या टेक्नॉलॉजी मुळे उंच सखल भागात एकसमान दाबाने पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे त्यामुळे राजू नगर व कुंभारखाण पाडा परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत होऊन नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटणार असल्याचा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी 30 जानेवारीला संपूर्ण देशभर दोन मिनिटे मौन पाळण्यात येते. ठाणे महापालिकेच्या विद्यमाने कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात मान पाळून हुतात्म्यांचे स्मरण करण्यात आले यावेळी अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, जी.जी. गोदेपुरे, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

सरगम संगीत अकॅडमीचा वर्धापन दिन सोहळा संपन्न

शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांची उपस्थिती पनवेल : पनवेल मधील कलाक्षेत्रातील सरगम संगीत अकॅडमीच्या ७ व्या वर्धापन दिन सोहळ्याला शेकापचे नेते प्रीतम जे एम म्हात्रे यांनी भेट दिली. शास्त्रीय रागांवर आधारित सुमधुर कार्यक्रम “राग एक-रंग अनेक” याची गाण्यांची खूप सुंदर मैफिल होती. अल्पावधीतच नरेश पाटील यांनी १०० पेक्षा जास्त कलाकारांमधील गायनाचे गुण ओळखून त्यांना एक सुमधुर गायक बनवून आपले चांगले शिष्य निर्माण केले आहे. यावेळी प्रितम म्हात्रे यांच्या सोबत संजीवनी जाधव (सुप्रसिद्ध सिने – नाट्य अभिनेत्री), गणेश पाटील (माजी उपनगराध्यक्ष पनवेल), प्रीती जॉर्ज (माजी नगरसेविका पनवेल), माधुरी गोसावी,  करुणा ढोरे यांच्या सह समस्त विद्यार्थीवृंद उपस्थित होते.