Category: ठाणे

Thane news

ना दरवाढ, ना करवाढ असललेला अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर सादर

ना दरवाढ, ना करवाढ असललेला अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर सादर मिरा -भाईंदर : महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी आज स्थायी समितीसमोर वर्षं २०२५-२६ चा सुधारीत आणि सन २०२६-२७ चा मूळ अर्थसंकल्प मांडला.  कोणतीही दरवाढ आणि करवाढ नसलेला हा अर्थसंकल्प असल्याचं त्यांनी त्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हटलं. स्वच्छ सर्वेक्षणात मिळालेल्या देशात प्रथम स्थानानंतर आता आमचे ध्येय ‘ स्वच्छ शहरातून शाश्वत शहराकडे ’ असल्याचं ते पुढे म्हणाले. आर्थिक शिस्त,  पायाभूत सुविधा आणि भविष्यासाठी तरतूद या तीन गीष्टींवर विचार करून त्यावर आधारित हा अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. करवसुली वाढविण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न, बायो मायनिंग,  घनकचरा व्यवस्थापन, सोलर व्यवस्था तसेच डिजिटल व्यवस्था वाढविण्यावर भर देणार असल्याचे आयुक्तानी सांगितले. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी एकूण १४३९.०२ कोटीचे अर्थसंकल्पीय अंदाज त्यांनी स्थायी समिती समोर सादर केले. या समितीच्या पुढील बैठीकीत यावर निर्णय होईल.

गर्भशमुखाच्या कर्करोगपासून बचाव करण्याऱ्या लसीकरणाला मिरा भाईंदर शहरात सुरुवात

गर्भशमुखाच्या कर्करोगपासून बचाव करण्याऱ्या लसीकरणाला मिरा भाईंदर शहरात सुरुवात मिरा – भाईंदर भारतात महिलांमध्ये कर्करोगामुळे होणा-या मृत्यूंचे एक प्रमुख कारण गर्भाशय मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) हे आहे. गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची जवळजवळ सर्व प्रकरणे ह्युमन  पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही) या विषाणूच्या संसर्गामुळे होतात आणि वेळेवर लसीकरण करून हा कर्करोग प्रभावीपणे रोखता येतो. महाराष्ट्र राज्यामध्ये सदर एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ ८ मार्चला झाला आहे. त्या अनुषंगाने मिरा भाईंदर महानगरपालिकेने १४ ते १५ वर्षे वयोगटातील (१४ वर्षे पूर्ण मात्र अद्याप १५ वर्षे पूर्ण नाही अशा) मुलींसाठी एचपीव्ही लसीकरण मोहीम सुरू केली आहे. सदर एचपीव्ही मोहिमेचे उद्घाटन महापौर डिंपल मेहता, उप-महापौर ध्रुवकिशोर पाटील, सभापती, महिला व बाल कल्याण समिती अनिता पाटील तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.नंदकिशोर लहाने यांच्या उपस्थितीत नवघर आरोग्य केंद्रात करण्यात आले.  या मोहिमेदरम्यान एचपीव्ही लस (गार्डासिल -४) सर्व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे (यूपीएचसी) आणि महानगरपालिका / शासकिय रुग्णालयांमध्ये मोफत दिली जाईल. एचपीव्ही लस जगभरात जवळजवळ २० वर्षांपासून वापरली जात आहे, आणि जगभरात सदर लसीचे करोडो डोस दिले गेले आहेत. व्यापक वैज्ञानिक अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे, की ही लस सुरक्षित आहे. इंजेक्शनच्या जागी वेदना, लालसरपणा किंवा सूज, ताप, डोकेदुखी, थकवा जाणवणे, मळमळ, चक्कर येणे इ. किरकोळ त्रास वगळता सदर लसीचे कुठलेही मोठे दुष्परिणाम नाहीत. त्यामुळे अर्धवट माहितीच्या आधारे सदर लसीच्या दुष्परिणामाबाबत अपप्रचार करणारे व्हिडीओज् समाजमाध्यमावर फिरत आहेत, त्याकडे कृपया दुर्लक्ष करुन सर्व पालकांनी आपापल्या मुलींना सदर लस द्यावी असे मिरा भाईंदर महानरगपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे.

उल्हासनगरात कोणार्कच्या सफाई कामगाराची निर्घृण हत्या

उल्हासनगरात कोणार्कच्या सफाई कामगाराची निर्घृण हत्या शरीरावर जवळपास ३२ हून अधिक वार उल्हासनगर दि ९ ( सुनिल इंगळे  ) : उल्हासनगरातील मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नशेखोर तरुणाने ऑन ड्युटी सफाई कामगारावर धारदार चाकूने जवळपास ३२ हून अधिक त्याच्या शरीरावर वार करून त्याची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केल्याची खळबजनक घटना सोमवारी घडली. या घटनेमुळे शहरातील सफाई कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार चाकूने भोसकून हत्या करण्यात आलेल्या त्या सफाई कामगाराचे नाव महादू उर्फ महादेव जगताप (३५) असे आहे. तो उल्हासनगरातील कॅम्प नंबर एक मधील शहाड गावठाण परिसरात राहत होता. महादू हा कोणार्क ग्रीन एन्व्हायरो या कंपनीमध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत होता. सोमवारी सकाळी तो शहरातील पॅनल क्रमांक ११ मध्ये बॅरेग क्रमांक ८९६, माजी नगरसेविका इंदिरा उदासी यांच्या घरासमोर त्या ठिकाणी लोकांच्या घरातून कचरा डब्यामध्ये टाकण्याचे काम करीत होता. सकाळी साडे अकराच्या सुमारास त्या ठिकाणी एका नशेखोर तरुणाने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून महादू याच्याशी भांडण काढून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्या तरुणाने त्याच्या जवळील धारदार चाकूने महादू जगताप यांच्या शरीरावर जवळपास ३२ हून अधिक चाकूचे सपासप वार केले. महादू हा रक्ताच्या थरोळात त्या ठिकाणी पडला. हा प्रकार घडून येतात त्या तरुणाने त्या ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण परिसरातील नागरिकांनी त्याला पकडून डांबून ठेवले. या घटनेची खबर मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांना मिळताच त्यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. जखमी महादू जगताप याला त्वरित उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले. पोलिसांनी त्या तरुणाला महादू जगताप यांच्या हत्या प्रकरणी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये एकच संतापाचे वातावरण पसरले असून त्यांनी उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात धाव घेऊन त्या ठिकाणी गर्दी केली होती. ज्या ठिकाणी ही घटना घडली होती त्या हत्याची थरारक दृश्य सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाली आहेत. मध्यवर्ती पोलिसांनी या घटने प्रकरणी तपास सुरू केला असून ताब्यात घेतलेल्या त्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. मध्यवर्ती पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव दुर्गेश गुप्त असल्याचे सांगितले आहे. कोणार्क कंपनीच्या सफाई कामगारांनी या घटनेचा निषेध केला. नशेखोर तरुणाकडून हा हात्याचा प्रकार घडून आल्याने शहरातील सफाई कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता शहरातील सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा कोण पुरवणार. निर्घृण हत्या करण्यात आलेल्या महादू जगताप याचे कुटुंब उघड्यावर पडले असून त्याला दोन लहान मुले आणि पत्नी असा परिवार आहे. या घटनेबाबत लढा संघटनेचे संदीप गायकवाड यांनी सांगितले महानगरपालिकेने व कोणार्क कंपनीच्या प्रशासनाने महादू जगताप यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देण्यात यावी जेणेकरून त्याच्या मुलांच्या भवितव्याचे तजबीज करता येईल, त्याच्या कुटुंबाला आधार होईल आणि ज्या आरोपीने हे कृत्य केले या घटनेच्या निषेधार्थ उद्या आम्ही काम बंद आंदोलन करणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. त्या तरुणाने महादू जगताप यांच्यावर इतक्या भयानक प्रमाणे चाकूने सपासप वार का केले. याचीही माहिती पोलीस काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. या घटनेमुळे उल्हासनगर शहरात एकच खळबळ उडाली असून शहरातील मोकाट फिरणाऱ्या नशेखोर व गांजाडी तरुणाविरुद्ध पोलिसांनी त्वरित काहीतरी उपयोजना करावी अशी मागणी सर्वत्र केली जात आहे.

राज्याचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी सोहळा आज लोकभवन येथे पार पडला. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या…

मुंबई विद्यापीठाला कांस्यपदक

पश्चिम विभाग आंतर-विद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धा मुंबई विद्यापीठाला कांस्यपदक कल्याण: एच.एस.एन.सी. विद्यापीठ, मुंबई यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी पश्चिम विभाग आंतर-विद्यापीठ बुद्धिबळ (पुरुष) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रतिष्ठित स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत कांस्यपदक पटकावले असून संघाची अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या बुद्धिबळ संघात एसएसटी कला व वाणिज्य महाविद्यालयाचा विद्यार्थी अनिकेत पोटावाड याने प्रतिनिधित्व केले. अनिकेतने संघासाठी उत्कृष्ट खेळ करत उल्लेखनीय कामगिरी बजावली. मुंबई विद्यापीठाच्या संघाने संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट रणनीती, संयम आणि कौशल्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन केले. त्यामुळे संघाला पश्चिम विभागातील बलाढ्य विद्यापीठांमध्ये आपले स्थान सिद्ध करता आले. या कामगिरीमुळे आता मुंबई विद्यापीठाचा संघ अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी होणार असून देशभरातील विविध विद्यापीठांशी सामना करणार आहे. या संघासाठी मार्गदर्शक म्हणून अमित भोजने आणि मार्गदर्शक म्हणून उमेश सोनवणे यांची निवड झालेली आहे. अनिकेत पोटावाडच्या या उल्लेखनीय यशाबद्दल एसएसटी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग आणि क्रीडा विभागाने त्याचे अभिनंदन केले असून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्यासाठी प्रेरणा मिळत आहे.

पालकांनी आपली मुलगी कशी सक्षम होईल याकडे लक्ष द्यावे – हर्षाली चौधरी

पालकांनी आपली मुलगी कशी सक्षम होईल याकडे लक्ष द्यावे – हर्षाली चौधरी कल्याण: पालकांनी आपली मुलगी कशी सक्षम होईल याकडे लक्ष द्यावे आणि मुलीच्या करिअरला प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन महापौर हर्षाली चौधरी यांनी केले.   कल्याण (प.) येथील सिटी पार्कच्या निसर्गरम्य परिसरात कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि सिटी पार्क मॅनेजमेंट यांच्या सयुक्त विद्यमाने ‘अहिल्या-जागर-स्त्री शक्तिचा’ या उक्तीनुसार आयोजित करण्यात आलेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमात बोलतांना त्यांनी हे प्रतिपादन केले. महिलांचे योगदान सेलिब्रेट करण्यासाठी हा कार्यक्रम करित आहेात ,सर्व क्षेत्रात महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. महापालिका देखील महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवित आहे अशी माहिती महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमाची सुरवात सुमधुर उडत्या गाण्यांनी झाली. या सुरावटींवर तरुणाईने ठेका धरल्याने सर्व वातावरण या सुरांनी भारुन गेले. या कार्यक्रमात ‘स्टोरी ऑफ चेंज’ या आशयाखाली आज तक वृत्तवाहिनीच्या अनुजा धाक्रस, MD Miss India २०२० गजनंदीनी, ठाण्यातील पहिल्या स्टेशन मॅनेजर अपर्णा देवधर, पॉवर लिफटींग मध्ये गोल्ड मेडेल्स मिळवलेल्या गिरिजेश कुमारी, ठाणे जिल्ह्यातील नॅशनल कुस्ती पटू माधवी कुरले या महिलांचा सत्कार महापौर हर्षाली चौधरी, आयुक्त अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांचे हस्ते करण्यात आला. विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी बजावलेल्या या महिलांनी आपल्या मनोगतात उपस्थित सर्व महिलांना यशाचा अथक श्रमाने पाठपुरावा करणे बाबत संदेश दिला. या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावलेल्या आठ महिलांचा देखील सत्कार करण्यात आला, त्याचप्रमाणे बचत गटातील स्वच्छता मार्शल म्हणून नेमणूक केलेल्या महिलांचा तसेच दामिनी पथकातील पोलिस मार्शलचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महापालिका क्षेत्रातील निराधार महिलांना आणि बचत गटांना प्रातिनिधीक स्वरुपात अनुदानाचे वितरणही या वेळी करण्यात आले. यावेळी  करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सादरीकरणाने उपस्थित महिला प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी पालिका सदस्य रेश्मा निचळ, शितल मंडारी, अनघा देवळेकर, महापालिका सचिव किशोर शेळके, उपायुक्त कांचन गायकवाड, रामदास कोकरे, मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव, सहाय्यक आयुक्त सुषमा मांडगे, समाज विकास अधिकारी प्रशांत गवाणकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

इनर व्हील क्लब ऑफ कल्याणतर्फे आयोजित “साडी वॉकाथॉन”ला महिलांचा उत्साह 

इनर व्हील क्लब ऑफ कल्याणतर्फे आयोजित “साडी वॉकाथॉन”ला महिलांचा उत्साह कल्याण: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त इनर व्हील क्लब ऑफ कल्याणतर्फे आयोजित करण्यात आलेली “साडी वॉकाथॉन” मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडली. महिलांच्या सशक्तीकरणाचा संदेश देत आरोग्य, एकता आणि आपल्या संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या वॉकाथॉनचे उद्घाटन महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान नवनिर्वाचित नगरसेवक विजया पोटे, ज्योती पाटील, गणेश जाधव, शालिनी वायले आणि डॉ. तनुजा वायले यांचा सत्कार करण्यात आला. या वॉकाथॉनमध्ये मोठ्या संख्येने महिलांनी साडी परिधान करून उत्साहाने सहभाग नोंदवला. विविध गटांमधील सहभागी महिलांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. सहभागींचा उत्साह आणि सकारात्मक प्रतिसाद यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इनर व्हील क्लब ऑफ कल्याणच्या अध्यक्षा दिप्ती दिवडकर, सचिव ॲड. सुषमा पटेल, माजी अध्यक्षा साची कदम, ॲड. नीता कदम, ॲड. अर्चना सबनीस, सविता जरपडे तसेच क्लबच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. साडी परिधान करून चालण्याच्या या अनोख्या संकल्पनेतून महिला सशक्तीकरणासोबतच भारतीय संस्कृतीचा अभिमान जपण्याचा सुंदर संदेश देण्यात आला.

किल्ले माऊली, नवतरुण, जय भारत महिलांत, तर छत्रपती शिवाजी, स्वामी विवेकानंद पुरुषांत तिसऱ्या फेरीत.

ठाणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी कबड्डी स्पर्धा – २०२६ किल्ले माऊली, नवतरुण, जय भारत महिलांत, तर छत्रपती शिवाजी, स्वामी विवेकानंद पुरुषांत तिसऱ्या फेरीत. ठाणे : ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनने ऍडव्होकेट पूजा राजा ठाकूर यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत किल्ले माऊली, नवतरुण, जय भारत यांनी महिलांत, तर छत्रपती शिवाजी, स्वामी विवेकानंद यांनी पुरुषांत तिसरी फेरी गाठली. कळवा, खारेगाव, ठाणे(प.) येथील  खारलँड मैदान, सह्याद्री हायस्कुलच्या समोरील मैदानात आज पासून सुरु झालेल्या महिलांच्या दुसऱ्या फेरीत किल्ले माऊली संघाने राहुल मंडळावर ५५-१८ अशी सहज मात केली. सुरुवातीलाच २ लोण देत किल्ले माऊलीने पूर्वार्धात २९-११ असे वर्चस्व राखले. उत्तरार्धात आणखी २ लोण देत गुणांचे अर्धशतक पार केले. मयुरी जोशी, मयुरी शेलार, संजना विशे यांच्या चढाई पकडीच्या झंझावाती खेळाला या विजयाचे श्रेय जाते. दुसऱ्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात नव तरुण मंडळाने मध्यंतरातील ०८-१३ अशा पीछाडीवरून शिवतेज संघाला २५-२४ असे चकवीत आगेकूच केली. वैभवी कासार, रिबीका गावीत यांनी आक्रमक खेळ करीत शिवतेजला विश्रांतीला आघाडी दिली होती. पण विश्रांतीनंतर नव तरुण संघाच्या संयमी यादव, भाविका यांनी तुफानी खेळ करीत संघाला तिसरी फेरी गाठवून दिली. महिलांच्या शेवटच्या सामन्यात जय भारतने स्व. राकेशदादा म्हात्रे संघाचा ४५-२० असा पराभव करीत तिसरी फेरी गाठली. पुरुषांच्या दुसऱ्या फेरीत छत्रपती शिवाजी महाराज संघाने नवरत्न मंडळाचा ३९-१३ असा पाडाव केला. पूर्वार्धात २५-०३ अशी आघाडी घेणाऱ्या छत्रपती शिवाजीने उत्तरार्धात सावध खेळ करीत आपला विजय साकारला. वेदान्त नायक, ओमकार मोरे, तन्मय परब यांच्या चतुरस्त्र खेळाला याचे श्रेय जाते. नवरत्नचा देवराज बने बरा खेळला. दुसऱ्या सामन्यात स्वामी विवेकानंदने राज मंडळाचा प्रतिकार २८-१२ असा संपविला. पहिल्या डावात १४-०४ अशी विवेकानंद संघाकडे आघाडी होती. यश पाटील, कुणाल पानसरे या विजयात चमकले. या स्पर्धेचे उदघाटन ऍडव्होकेट पूजा राजा ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.

एनबीईई स्पोर्ट्स क्लबने पटकवलं विजेतेपद

एस ४ लीजेंड्स कप २०२६ एनबीईई स्पोर्ट्स क्लबने पटकवलं विजेतेपद ठाणे – ऍडव्होकेट रमाकांत ओवळेकर यांच्या स्मरणार्थ ४५ वर्षांवरील खेळाडूंसाठी क्रिकेटची स्पर्धा ठाणे येथील दादोजी कोंडदेव स्टेडीयम येथे सुर सुदान शौर्या स्वर संस्थेतर्फे आयोजित करण्यात आली होती. एस ४ लीजेंड्स कप २०२६ एनबीईई स्पोर्ट्स क्लबने पटकावला.  स्पर्धेत ठाणे थंडर्स, एनबीईई स्पोर्ट्स क्लब, ठाणे रोटरी टायटन्स, पीडब्लूडी, आम्ही मुलुंडकर, गरवारे क्लब, मिड सिटी सीसी डोंबिवली आणि रारा मास्टर्स असे एकूण आठ संघानी सहभाग घेतला. आयपीएल, रणजी, प्रथम श्रेणीतील खेळाडूंचा संघात समावेश होता. प्रवीण तांबे, संदीप दहाड, अमित दाणी, रॉबिन मॉरिस, अमित पागनीस, अमित वेलस्कर, मनोज जोगळेकर, आशिष महाडेश्वर, श्रेयस खानोलकर, विनोद राघवन व इतर दिग्गज खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतला. एनबीईई स्पोर्ट्स क्लबने विजेते पदाचा खिताब पटकाविला. तर ठाणे थंडर्स उपविजेता ठरला. तर दुसरा उपविजेता संघ गरवारे क्लब ठरला. सामनावीर म्हणून ओजस मेहता, उत्कृष्ट फलंदाज देवा मोरे, उत्कृष्ट गोलंदाज योगेश डिचोलकर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ओजस मेहता, उत्कृष्ट यष्टीरक्षक सागर जोशी यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.  विजेतेपदाची ट्रॉफी उषा मधुकर चांदुरकर यांनी मधुकर रामचंद्र चंद्रुकर यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केली. उद्योजक व शैक्षणिक क्षेत्रातून महान व्यक्ती अश्विन वसवडा, केंद्रीय मंत्रालय उपसचिव श्री किमबहुने, आदेश चांदुरकर, किरण राणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. समता ओवळेकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले.  महिला दिनाचे औचित्य साधून समाजसेविका प्रतिभा चांदूरकर, लीना जाधव, सविता साळुंखे, शुभांगी भोर, शैला सिंह यांचा सत्कार करण्यात आला. सामनाचे आयोजन व सूत्रसंचालन संस्थेच्या सचिव नम्रता ओवळेकर राणे यांनी केले.

महिला सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील- फडणवीस

ठाणे: जागतिक महिला दिन आणि समाजसुधारक डॉ.मुत्थुलक्ष्मी रेड्डी यांच्या विधानमंडळ सदस्यत्वाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित ‘विकसित भारत नारी शक्ती संगम’ ग्रामीण महिला नेतृत्व परिषदेत महिलांना अधिकाधिक संधी दिल्यास सक्षम नेतृत्व घडते, यासाठी…