Category: ठाणे

Thane news

ठाण्यातील बी केबिनमधील गौतमवाडी भीम अनुयायांनी केला अमित शहा यांचा जाहीर निषेध

ठाणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाच्या विरोधात ठाण्यातील बी कॅबिन विभागात असणाऱ्या नवतरुण मित्र मंडळातर्फे रस्त्यावर उतरून जाहीर  निषेध करण्यात आला. यावेळी अध्यक्ष भानुदास…

वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाची लगबग

१३५ सार्वजनिक वाचनालय सज्ज ठाणे : शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या माध्यमातून वाचनसंस्कृतीला चालना देण्यासाठी नववर्षाच्या मुहूर्तावर ” वाचन संकल्प महाराष्ट्राचा ” व्यापक उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी ठाणे जिल्ह्यातील १०० आणि पालघरमधील ३५ सार्वजनिक वाचनालय सज्ज झाली असून सर्व ग्रंथसंपदा एकत्रित करणे, वाचनालयाचे सुशोभीकरण करणे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग करून घेणे याची तयारी सर्व जिल्हा ग्रंथालय विभागाच्या माध्यमातून सुरु करण्यात आली आहे. तर ठाणे आणि पालघर येथील १०० वर्षाहून अधिक जुने असलेल्या ६ सार्वजनिक ग्रंथालयांचा यात सर्वाधिक प्रचार – प्रसार करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी दोन्ही जिल्ह्यातील वाचकांना तब्बल २ लाखांहून अधिक पूस्तके वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ठाणे जिल्ह्याला मोठी साहित्यसंपदा लाभली आहे. अनेक नामवंत लेखक, साहित्यिक, शास्त्रज्ञ, सिने दिग्दर्शक यांची मोठी मांदियाळी ठाणे तसेच जवळच्या पालघर जिल्ह्यात आहे. यामध्ये सर्वात मोठा येथील सार्वजनिक ग्रंथालयांचा आणि येथील ग्रंथसंपदेचा देखील आहे. याच वाचन संस्कृतीचा प्रचार – प्रसार करण्यासाठी जिल्ह्यातील विविध सार्वजनिक ग्रंथालयांच्या माध्यमातून नियमित स्वरूपात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. या उपक्रमांना सर्वच वयोगटातील वाचकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद ही लाभतो. याच पार्श्वभूमीवर आता शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार नववर्षाच्या मुहूर्तावर १ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत ” वाचन संकल्प महाराष्ट्राचा ” व्यापक उपक्रम राबविण्यात येत असून यामध्ये ठाणे आणि पालघर येथील १३५ सार्वजनिक वाचनालये सज्ज झाली आहेत. ‘‘शतायू” वाचनालयांचा सहभाग मोलाचा ठाणे जिल्ह्यात ठाणे नगर वाचन मंदिर ठाणे, सार्वजनिक वाचनालय, कल्याण, मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे, वाचन मंदिर, भिवंडी तर पालघर जिल्ह्यातील महात्मागांधी सार्वजनिक वाचनालय, वाडा आणि यशवंत राजे सार्वजनिक वाचनालय, जवाहर या वाचनालयांना शंभरहुन अधिक वर्षांचा सुवर्ण इतिहास आहे. अनेक दुर्मिळ आणि वाचनीय ग्रंथसंपदा याठिकाणी उपलब्ध आहे. वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाच्या माध्यमातून येथील ग्रंथसंपदा वाचकांना उपलब्ध होणार आहे. यामुळे या सुवर्ण इतिहास लाभलेल्या शतायू ग्रंथालयाची माहिती देखील वाचकांपर्यत पोहचणार आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात शासनमान्य १३५ सार्वजनिक वाचनालय आहेत. येथे दोन लाखांहून अधिक ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. तर २ लाखांहून अधिक नियमित वाचक नोंदणी आहे. या उपक्रमाअंतर्गत ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना परिपत्रक देण्यात आले असून याअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या नजीकच्या वाचनालयात त्यांच्या आवडीची पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. तर विद्यार्थ्यांना या पुस्तकांचे परीक्षण करण्याची स्पर्धा देखील ठेवण्यात आली आहे. यातील उत्तम परीक्षण लेखनाला २६ जानेवारी रोजी पारितोषिक देखील देण्यात येणार आहे. तसेच निबंध स्पर्धा, सामूहिक वाचन, वाचन संवाद, वाचन कौशल्य कार्यशाळा यांसारखे अनेक उपक्रम या दरम्यान संपूर्ण जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येणार आहे. कोट वाचन संस्कृती वाढावी यासाठी राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना आणि वाचकांना अनेक दुर्मिळ आणि त्यांच्या आवडीच्या पुस्तकांची उपलब्धता करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा ग्रंथालय विभाग आणि सर्व सार्वजनिक वाचनालयांमध्ये तयारी सुरु आहे. सर्व वाचकांनी याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दर्शवावा. – प्रशांत पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, ठाणे

भविष्यातील पिढी वाचविण्यासाठी पालकांनी सतर्क राहावे

  – प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे आवाहन ठाणे : बदलत्या काळात नव्या पिढीवर आपल्या समृद्ध धार्मिक संस्कृती व विचारांचे संस्कार करण्यात पालक अयशस्वी होत आहेत, अशी खंत व्यक्त करीत प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी मोबाईलचा गैरवापर, दारू आणि जुगारात शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत, याकडे त्यांनी पालकांचे लक्ष वेधले. पालकांनी वेळीच सतर्क होऊन आपली भविष्यातील पिढी वाचवावी, असे आवाहन  इंदुरीकर यांनी केले. भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी तारामाऊली सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून कोपरी येथे सार्वजनिक सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञाचे आयोजन केले आहे. या महायज्ञाच्या सातव्या दिवशी  इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन झाले. या वेळी शेकडो भाविकांची उपस्थिती होती. या वेळी भाजपाचे आमदार संजय केळकर यांचा इंदुरीकर महाराजांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नवीन पिढी स्वार्थ व पैसा यामध्ये गुरफटली जात आहे. शाळांमधील ४० टक्के विद्यार्थी ऑनलाईन रमी खेळत आहेत. तर १० टक्के तरुण शेअर बाजाराच्या आहारी गेले आहेत. घरांघरांमधून शुभंकरोती व देवापुढे दिवा लावणे हे बंद झाले. परिणामी नव्या पिढीला संस्काराची ओळख होत नाही, हे दुर्देवी आहे, याकडे कीर्तनकार इंदुरीकर यांनी लक्ष वेधले. जगात वारकरी सांप्रदाय हा एकमेव असून, त्यात राव-रंक, वय, उंची किंवा आधारकार्ड-पॅनकार्ड असा फरक केला जात नाही. केवळ विठ्ठल नामस्मरण केल्यावर सर्व सुख मिळते. श्री विठ्ठलाचे स्मरण करतानाच आयुष्यातील वेळ न घालविता रात्रंदिवस कष्ट केल्यास तुम्ही सुखी व्हाल, असा सल्ला  इंदुरीकर यांनी दिला. उपवास करुन देव भेटत नाही. पण वैज्ञानिक दृष्टीने आठवड्यातील एक दिवस उपवास केल्यास पचनशक्तीला आराम मिळेल. आपण करीत असलेले कर्म हीज पूजा असे मानून प्रत्येक व्यक्तीने नीतीने वागावे. चांगले वागून समाजाला मदतीचा हात द्यावा, असे आवाहन इंदुरीकर यांनी केले. सध्या घराबाहेर हॉटेल-धाब्यांवर जेवण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरात ६० टक्के नागरिक घरी शिजविलेले अन्न खात नाहीत. आहार चांगला नसल्यामुळे मनुष्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे रोगराईचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येक व्यक्तीने काम, क्रोध आणि रोगावर नियंत्रण ठेवून जगावे, असा सल्ला श्री. इंदुरीकर यांनी दिला.

अमित शहांच्या निषेधार्थ आनंद नगरमधील भीमसैनिकांनी व्यक्त केला रोष

ठाणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत संविधानाचे निर्माते भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात देशभरात पडसाद उमटले आहेत. बुधवारी कोपरी भागातील आनंदनगर मधील भीमसैनिकांनी…

किसान सभेच्या पुढाकाराने आज नाशिक येथे शेतकरी महिला परिषद

शेतकरी महिलांचे सर्व प्रश्न केंद्रस्थानी आणणार – डॉ. अशोक ढवळे अनिल ठाणेकर ठाणे: शेतकरी महिलांचे सर्व प्रश्न केंद्रस्थानी आणण्यासाठी किसान सभेने पुढाकार घेतला असून शेतकरी महिलांच्या हक्क व अधिकारांचा उद्घोष करण्यासाठी नाशिक येथे २६ डिसेंबरला राज्यस्तरीय शेतकरी महिलांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे या परिषदेचे उद्घाटन करणार असून महिला शेतकऱ्यांचे प्रश्न सातत्याने लावून धरणाऱ्या मकाम या संघटनेच्या नेत्या सीमा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे परिषदेला विशेष मार्गदर्शन करणार आहेत. किसान सभेचे माजी राज्य अध्यक्ष जे. पी. गावीत, सीटू संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, जनवादी महिला संघटनेच्या नेत्या नसीमा शेख, प्राची हातिवलेकर, शेतमजूर युनियनच्या सरिता शर्मा, एस.एफ.आय. विद्यार्थी संघटनेचे नेते रोहिदास जाधव, सोमनाथ निर्मळ, डी.वाय.एफ.आय. संघटनेचे नेते दत्ता चव्हाण, नंदू हाडळ परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत. शेतीमध्ये अपार कष्ट करणाऱ्या शेतकरी महिलांचे प्रश्न केंद्रस्थानी आणण्यासाठी किसान सभेच्या पुढाकाराने नाशिक येथे २६ डिसेंबर रोजी शेतकरी महिलांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. शेती प्रश्नांची चर्चा करत असताना सरकारच्या धोरणामुळे विदारक बनलेले कृषी अरिष्ट, शेतीमालाचा वाढता उत्पादन खर्च, शेतीमालाला रास्त भावाची मागणी, नैसर्गिक आपत्ती इत्यादी विषयांची नेहमीच चर्चा होते. मात्र शेतीमध्ये सर्वाधिक कष्ट करणाऱ्या शेतकरी महिलांच्या प्रश्नांवर फारशी चर्चा होत नाही. शेत जमिनीवर व राहत्या घरांवर महिला शेतकऱ्यांचा मालकी हक्क, महिला शेतकऱ्यांच्या कष्टाला रास्त दाम, मोफत श्रमाला श्रम म्हणून मान्यता व त्याचा रास्त मोबदला, महिलांवरील अन्याय व अत्याचार, महिला शेतकऱ्यांचे कष्ट कमी करण्यासाठी तंत्रज्ञान व संशोधनाची आवश्यकता, व्यसन, हुंडा, बालविवाह, धार्मिक व जातीय शोषण व भेदभाव, स्वच्छतागृहाचा हक्क इत्यादी अनेक प्रश्न दुर्लक्षित केले जातात.महिला शेतकऱ्यांच्या विविध समस्या, प्रश्न व हक्कांची या परिषदेत चर्चा होणार असून महिला शेतकऱ्यांच्या हक्क व मागण्यांची एक सनद या परिषदेमध्ये संमत करण्यात येणार आहे. परिषदेनंतर राज्यभर विविध जिल्ह्यांमध्ये या सनदेचे वाचन करणारे जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. किसान सभेच्या पुढाकाराने होत असलेल्या या परिषदेमध्ये ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या विविध संघटनांमधील महिला नेतृत्वांना आवर्जून आमंत्रित करण्यात आले आहे. या परिषदेसाठी जनवादी महिला संघटना, सीटू ही कामगार संघटना, शेतमजूर युनियन, एस.एफ.आय. व डी.वाय.एफ.आय. या विद्यार्थी व युवक संघटना सहकार्य करत असून या संघटनांचे ग्रामीण भागात कार्यरत असलेले महिला नेतृत्व या परिषदेमध्ये सहभागी होणार आहे, अशी माहिती किसान सभेचे डॉ. अशोक ढवळे, जे.पी.गावीत, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले यांनी दिली.

विनोद कांबळी यांना ३० लाखांची मदत;

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती ठाणे : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून जमा झालेली ३० लाख रुपयांची मदत त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात पाठविण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. विनोद कांबळी यांच्या भेटीसाठी प्रताप सरनाईक गेले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच, यापुढे त्यांच्यावर ठाण्यातील तीन रुग्णालयात मोफत उपचार केले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी हे मागील काही दिवसांपासून आजारी आहेत. १५ दिवसांपूर्वी भिवंडी येथील आकृती रुग्णालयातील डाॅक्टरांचे पथक वांद्रे येथील कांबळी यांच्या निवासस्थानी त्यांच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी कांबळी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन शक्य झाल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार, कांबळी यांच्या कुटुंबियांनी शनिवारी त्यांना भिवंडी आकृती रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील डॉक्टरांचे पथक कांबळी यांच्यावर उपचार करत आहेत. कांबळी हे डॉक्टर आणि माध्यमांसोबत संवादही साधताना दिसतात. कांबळी यांना चालताना त्रास होत होता. तसेच इतरही अनेक आजार त्यांना होते. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांना माहिती मिळताच त्यांच्या आदेशानुसार त्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी भेट त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. तसेच डॉ.  श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. त्यानंतर बुधवारी दुपारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. विनोद कांबळी यांना जेव्हा-जेव्हा उपचाराची गरज पडेल. त्यावेळेस, गंगुबाई संभाजी शिंदे, इंदिराबाई बाबूराव सरनाईक आणि आकृती रुग्णालय हे तीन रुग्णालय विनोद कांबळी यांच्या वैद्यकीय सेवेसाठी मोफत उपलब्ध असतील. एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार विनोद कांबळी यांची भेट घेतली. डॉ.  श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून पाच लाखांची मदत जाहीर झाली आहे. त्यांच्या बँक खात्यात चार ते पाच लाख जमा झाले आहेत आणि आणखी २० लाख असे एकूण ३० लाख रुपये विनोद कांबळी यांच्या पत्नीच्या बँक खात्यात जमा केले जातील. आम्ही अजूनही मदतीसाठी आवाहन केले आहे. ते देखील त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात जमा होतील असे सरनाईक यांनी सांगितले.

‘मेकिंग द डिफरन्स’ संस्थेच्या संजीवनी प्रकल्पाद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्राला विविध वस्तू

ठाणे : ठाणे ग्रामीण भागातील आदिवासी, ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी व्यवस्थित व्हावी यासाठी ‘मेकिंग द डिफरन्स’ एनजीओ आणि पीपीएफएएस म्यूचुअल फंड कंपनीच्या सीएसआर फंड द्वारे मेकिंग द डिफरन्स संस्थेच्या मदतीतून संजीवनी…

Heading- जहाजावरील क्षेपणास्त्राच्या हल्ल्यातील सागरी कामगार सुरक्षितपणे मुंबईत

– सागरी कामगारांना  सुरक्षितपणे परत आणणे ही सर्वोच्च प्राधान्याची बाब – मिलिंद कांदळगावकर अनिल ठाणेकर ठाणे : यमनजवळ यंदा झालेल्या एका भीषण घटनेनंतर एसा स्टार जहाजावरील सर्व भारतीय सागरी कामगार सुरक्षितपणे मुंबईत परतले आहेत.आपल्या सागरी कामगारांना  सुरक्षितपणे परत आणणे ही नुसीसाठी सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे, असे नॅशनल युनियन सिफेरर्स ऑफ इंडिया (नूसी)चे  जनरल सेक्रेटरी व खजिनदार मिलिंद कांदळगावकर यांनी सांगितले, अशी माहिती कामगार नेते मारुती विश्वासराव यांनी दिली. ५ डिसेंबर २०२४ रोजी या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला झाला होता, ज्यामुळे रेड सी प्रदेशातील तणाव वाढल्याचे दिसून आले. सागरी कामगारांना यशस्वीरीत्या  सुरक्षितपणे आणल्याचे  श्रेय नॅशनल युनियन सिफेरर्स ऑफ इंडिया (नूसी) आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक कामगार महासंघ (आयटीएफ) यांच्या नेतृत्वाखालील धाडसी व्यवस्थापकीय प्रयत्नांना जाते. या संस्थांनी सागरी कामगारांना त्यांच्या कुटुंबियांपर्यंत सुरक्षित पोहोचवण्यासाठी अहोरात्र काम केले.  आपल्या सागरी कामगारांना  सुरक्षितपणे परत आणले, ही नुसीसाठी सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे,” असे  नुसीचे जनरल सेक्रेटरी व खजिनदार मिलिंद कांदळगावकर यांनी सांगितले.आंतरराष्ट्रीय समुद्री सहकार्याच्या प्रभावीपणे केलेल्या कार्याचे हे यशस्वी उदाहरण आहे. यमन किनाऱ्याजवळील जहाज वाहतुकीच्या मार्गांवर वाढत्या हल्ल्यांपैकी एसा स्टारवरील   हा एक भीषण हल्ला होता. या घटनेमुळे व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसंबंधीचा धोका निर्माण झाला आहे..मुंबईच्या आंतरराष्ट्रीय टर्मिनलवर परतणाऱ्या सागरी कामगारांचे त्यांच्या कुटुंबियांनी भावनिक स्वागत केले. त्याठिकाणी वैद्यकीय पथक तत्पर होते, परंतु प्राथमिक अहवालांनुसार  सर्व कामगारांची प्रकृती चांगली असून ते सुरक्षित  आहेत. सागरी कामगार संघटनां  आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे  सागरी कामगारांना मुंबईत सुरक्षितपणे  परत आणून कामगारांच्या हक्कांचे व सुरक्षिततेचे रक्षण करण्यामध्ये  महत्त्वपूर्ण योगदान आहे. तसेच, संकटग्रस्त समुद्री मार्गांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सावधगिरी व आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज अधोरेखित केली आहे.  किनाऱ्यावर सुरक्षित आलेल्या सागरी कामगारांच्या कुटुंबियांनी परत आणण्यासाठी  सहभागी झालेल्या सर्व संस्थांचे आभार मानले.आमच्या प्रिय व्यक्तींना सुरक्षितपणे घरी परत आणले. हा आमच्यासाठी मोठा दिलासा आहे, असे एका कुटुंबीयाने सांगितले. या कठीण काळात नुसी व आयटीएफ कडून मिळालेला पाठिंबा अनमोल होता.या घटनेनंतर, विशेषत: समुद्री संघर्षग्रस्त भागांमध्ये  सुरक्षा उपाय अधिक प्रभावी करण्यासाठी पुन्हा एकदा सुरक्षेची मागणी वाढली आहे. व्यापारी जहाजांच्या सुरक्षिततेसाठी समुद्री प्राधिकरणे सद्यपरिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती मिलिंद कांदळगावकर यांनी दिली.

राज्य परिवहन मंडळाचे उत्पन्न वाढवणे व एसटी कर्मचाऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे यावर भर – प्रताप सरनाईक

अनिल ठाणेकर ठाणे : पर्यावरणपूरक वाहतुकीचा अवलंब वाढवणे यावर लक्ष केंद्रित केले जाईल. राज्य परिवहन मंडळाचे उत्पन्न वाढवणे व एसटी कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे याकडे प्रामुख्याने भर राहणार आहे, असे मत महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले आहे. शिवसेनेचे मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही जबाबदारी दिले त्यांचे मी आभार व्यक्त करतो. राज्याच्या जनतेला अधिक चांगल्या आणि सोयीस्कर परिवहन सेवा देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार आहे. वाहतुकीच्या सुरक्षिततेला अधिक मजबूती देणे, सार्वजनिक परिवहन व्यवस्था अधिक सुलभ आणि आधुनिक बनवणे.  तसेच पर्यावरणपूरक वाहतुकीचा अवलंब वाढवणे यावर लक्ष केंद्रित केले जाईल. राज्य परिवहन मंडळाचे उत्पन्न वाढवणे व एसटी कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे याकडे प्रामुख्याने भर राहणार आहे. आपल्या सर्वांच्या पाठिंब्याने आणि सहकार्याने परिवहन क्षेत्रात नवनवीन प्रकल्प राबवत राज्याचा विकास अधिक वेगाने करूया. आपला विश्वास हीच माझी ऊर्जा आहे आणि त्याचा योग्य वापर करून जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन, असे मत महाराष्ट्र राज्याचा परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी पदभार स्वीकारताना व्यक्त केले.यावेळी. मंत्रालयात पदभार स्वीकारताना येथील अपर मुख्य सचिव संजय सेठी व परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्या सह इतर अधिकारी व कर्मचारी वर्गाने सरनाईक यांचे स्वागत केले.

ठाण्यातील काही भागात दोन दिवस पाणी पुरवठा बंद

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा- मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा केला जातो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी…