Category: ठाणे

Thane news

वी नीड यू सोसायटीचे २०२४ चे शिक्षण, समाज व कार्यव्रती पुरस्कार जाहीर

ठाणे : वी नीड यू सोसायटी संस्थेतर्फे समाजात ‘व्रत’ घेऊन कार्य करणार्या व्यक्तींच्या कामास प्रोत्साहन देण्यासाठी व विविध ठिकाणी सुरू असलेल्या सामाजिक व शैक्षणिक कामाच्या मागे उभे राहण्यासाठी गेली ७…

ठाण्यात ९०० हून अधिक महिला, युवा वर्गाकडून भाजपाचे सदस्यत्व – संजय वाघुले

अनिल ठाणेकर ठाणे : भाजपा सदस्यता अभियान अंतर्गत जिल्हाध्यक्ष व माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर आयोजित केलेल्या विशेष मोहिमेत ९०० हून अधिक तरुण, तरुणी आणि महिलांबरोबरच…

खेळाडू गौरवाने पुण्यात खाशाबांची १००वी जयंती साजरी

पुणे : भारताचे पहिले वयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते मल्ल खाशाबा जाधव यांची 100 वी जयंती बुधवारी (दि.१५) पुण्यात राष्ट्रीय क्राडापटूंचा गौरव करून साजरी करण्यात आली. वारजे येथिल आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इन्फीनिटी…

खासदार नरेश म्हस्के यांनी शिष्टमंडळासमवेत घेतली आयुक्त सौरभ राव यांची भेट

ठाणे : ठाणे शहरातील धोकादायक व अतिधोकादायक इमारतींचा पुनर्विकास जलद गतीने व्हावा व नागरिकांना मालकी हक्काची घरे उपलब्ध व्हावीत यासाठी ठाण्यातील काही विकासकांनी खासदार नरेश म्हस्के यांना निवेदन सादर केले…

वैश्य मेळावा, लक्ष्य 2025′ संपन्न

ठाणे : भव्य दिव्य असा `वैश्य मेळावा, लक्ष्य 2025′ हा 600 पेक्षा जास्त समाजबांधवांच्या उपस्थितीत उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला. अनेक मान्यवर पाहुण्यांनी उपस्थिती  लावून मार्गदर्शन केले. मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री व विद्यमान आमदार दिपक केसरकर, खासदार नरेश म्हस्के तसेच प्रसिद्ध उद्योगपती विवेक माणगांवकर, भाई कामेरकर, हनुमंत हेडे, अरुंधती भालेराव, कीर्ती गावडे, भाई शेटये, अशोक नर, संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष कामेरकर, दिपक मेजारी, रुपाली तेलवणे, संजय भाट, विष्णु सातवसे, मनोज आंग्रे, चंद्रकांत खाडये आदी मान्यवर उपस्थित होते. खासदार नरेश म्हस्के आणि माजी मंत्री विद्यमान आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते सर्व समाज संस्था आणि प्रतिष्ठित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. वैश्य उद्योजक समाज बांधवांसाठी वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट चांगले कार्य करीत आहे, त्याला आमचे सर्वतोपरी सहकार्य असेल. वैश्य समाजाच्या कार्याची तोंड भरून स्तुती केली आणि कोणत्याही प्रकारचे सहकार्य लागल्यास आम्ही सोबत असू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष कामेरकर यांनी समाज संपन्न, समृद्ध झाला तर देश संपन्न होईल असे सांगून मान्यवरांना पुरस्कार देताना पुरस्कारामुळे प्रेरणा मिळते आणि प्रेरणेने राष्ट्र मोठे होते असे सांगितले. सकाळी 8 ते  रात्री 7 पर्यंत मेळाव्याचे प्रत्येक सत्र अतिशय नीटनेटके आणि व्यवस्थित होत गेले. अनेकांचे मार्गदर्शन प्रेरणादायी ठरणारे  होते. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मोटिवेशनल स्पीच आणि मार्गदर्शन खूपच सुंदर झाले. संपूर्ण हॉल सकाळपासून शेवटपर्यंत भरगच्च भरलेला होता, यावरूनच या कार्यक्रमाची यशस्विता सांगता येते.…

 अप्पा शिंदे अमृतपर्व नागरी सत्कार नियोजन समिती कार्यालयाचे उद्घाटन

29 जानेवारी रोजी अप्पा शिंदे यांचा कल्याणकरांच्या वतीने नागरी सत्कार   कल्याण : 29 जानेवारी रोजी ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांचा अमृतमहोत्सवी म्हणजेच 75 वा वाढदिवस असून तो कल्याण पूर्वेतील पोटे मैदानात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात दिगग्ज नेत्यांच्या उपस्थित साजरा होणार आहे. याकरिता कल्याण पूर्वेतील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची नियोजन समिती तयार करण्यात आली आहे. आप्पासाहेब अमृतपर्व नागरी सत्कार नियोजन समिती असे या समितीचे नाव असून या समितीच्या कार्यालयाचा उदघाटन सोहळा मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज कॉलनी रोड परिसरात पार पडला. यावेळी माजी महापौर रमेश जाधव, माजी नगरसेवक सचिन पोटे, नीलेश शिंदे, प्रशांत काळे, हर्षवर्धन पालांडे, संजय मोरे, माधुरी काळे, नरेंद्र सूर्यवंशी, अर्जुन नायर, सुभाष म्हस्के, विष्णु जाधव, संदीप तांबे, संदीप माने, उमाकांत चौधरी, रुपेश गायकवाड, विजय भोसले, मनोज नायर आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. २९ जानेवारी रोजी संपूर्ण कल्याण करांच्या माध्यमातुन अप्पा शिंदे यांचा अमृतपर्व नागरी सत्कार केला जाणार आहे. याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व काही मंत्री मंडळींसह आणखीन काही दिगग्ज नेत्यांची देखील उपस्थित लाभणार आहे. या संपूर्ण सोहळ्याकरिता समिती नेमण्यात आली असून कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे हे या समितीचे अध्यक्ष तर कल्याण पूर्व आमदार सुलभा गायकवाड या स्वागत अध्यक्षा असणार आहेत. तसेच या समितीत निलेश शिंदे, प्रशांत काळे, सचिन पोटे, नाना सूर्यवंशी, रमेश जाधव, हर्षवर्धन पालांडे, संजय मोरे यांसह कल्याण पूर्वेतील अनेक सर्वपक्षीय नेत्यांचे योगदान असणार आहे. यात प्रामुख्याने 21 पदाधिकाऱ्यांची मुख्य नियोजन समिती असून १०१ पदाधिकारी संयोजन समितीवर असणार आहेत. त्यामुळे पार पडत असणाऱ्या या भव्य दिव्य नागरी सत्कार सोहळ्याला कल्याण पूर्वेतील तमाम जनतेने उपस्थित रहावे असे आवाहन यावेळी समितीच्या वतीने प्रशांत काळे यांनी नागरिकांना  केले आहे. 00000

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य प्रवक्तेपदी आनंद परांजपे – सुनील तटकरे

अनिल ठाणेकर ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्तेपदी माजी खासदार आनंद परांजपे यांची नियुक्ती करण्यात येत आहे, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी केली. मुख्य प्रवक्ते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका व विचार हे माजी खासदार आनंद परांजपे हे मांडतील, भाष्य करतील. घटक पक्षांविषयीची भूमिका, इतर राजकीय भूमिका यांवर पक्षाचे इतर सर्व प्रवक्ते, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांच्याशी चर्चा करुनच पक्षाची भूमिका मांडतील. तर आनंद परांजपे हे, सखोल अभ्यास व माहिती घेऊनच, पक्षाची धेय्य धोरणे व भूमिका, प्रसार माध्यमांसमोर मांडतील, वक्तव्य करताना आपल्या पक्षाबद्दल गैरसमज व वाद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असा सल्लाही मुख्य प्रवक्ते म्हणून आनंद परांजपे यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करताना प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिला आहे.

नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्नशील –

ठाणे : घोडबंदर रोडवरील नागरिकांना भेडसावत असलेल्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने महापालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. या ठिकाणची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने अवजड…

२७ जानेवारीपर्यंत ऑनलाइन आरटीई’ प्रवेश – रोहन घुगे

अनिल ठाणेकर ठाणे : आरटीई’ अंतर्गत २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रियेत १४ जानेवारीपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आले आहे. बालकांच्या पालकांना २७ जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार असून पालकांनी प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र असणाऱ्या जास्तीत जास्त बालकांच्या अर्जाची नोंदणी करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार(आरटीई) कायद्या अंतर्गत वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिले जातात. ठाणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती व महानगर पालिका अंतर्गत एकूण ६२७ पात्र शाळा असून एकूण ११ हजार ३२० रिक्त जागा उपलब्ध आहेत. ‘आरटीई’ अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत बालकांच्या अर्ज नोंदणीसाठी महाराष्ट्र शासनाकडून  https://student.maharashtra.gov.in/adm_Portal या वेबसाईटवर दि. १४ जानेवारीपासून ते २७ जानेवारीपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पालकांसाठी मदत केंद्रांची यादी (Help Centers), ऑनलाईन प्रक्रियेत अर्ज नोंदणी बाबत मार्गदर्शक पुस्तिका (User Manual), आवश्यक कागदपत्रे इत्यादी बाबत सर्व माहिती शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याची सर्व संबधितांनी नोंद घ्यावी, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी दिली आहे. ०००००

खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार –  प्रताप सरनाईक

ठाणे : ओला , उबेर, रॅपिडो सारख्या खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या पुरवठादारांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. प्रवासी सुरक्षा, कार पुलींग, लायसन्स, ट्रॅफिक समस्या यासंदर्भातील…