Category: ठाणे

Thane news

मनसेचे नगर अभियंत्याला दणका

मैदान अतिक्रमणमुक्त करण्यासाठी नगर अभियंत्यांच्या दालनाबाहेर फुटबॉल खेळून केलं अनोखे आंदोलन ठाणे –  ठाणे शहरातील मैदानावरील अतिक्रमण हटवण्यासाठी मनसेच्या कार्यकर्यांनी आज अनोखे आंदोलन केले. त्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या इमारतीतील नगर अभियंत्यांच्या दालनाबाहेर फुटबॉल खेळून मैदान अतिक्रमणमुक्त…

गणेश नाईकांचा शिंदेंवर निशाणा

ठाणे : नेताच जर चुकीचा असेल तर सगळी यंत्रणाच चुकीच्या मार्गाने जाते. हा माझा आजवरचा अनुभव आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कालखंडामध्ये त्यांची इच्छा नसतानाही काही गोष्टी चुकीच्या घडल्या आणि…

खाकी वर्दीतल्या माणुसकीचे दर्शन !

ठाणे : डॉ. अंजली गांगल, ६३ वर्षे, या खोपट बस डेपो येथे विद्यादान सहाय्यक मंडळाच्या मीटिंगसाठी आल्या होत्या. कार्यालय शोधत असताना त्या मैत्रिणीची वाट पाहत थोडा वेळ तेथील बाकावर बसल्या आणि काही कामासाठी पैशाची पर्स बाहेर काढली. तेवढ्यात दुसरा फोन आला आणि त्या लगबगिने आपली पर्स तेथेच सोडून पहिल्या मजल्यावर गेल्या. पर्समध्ये महत्त्वाची कागदपत्रे आणि वीस हजार रुपये होते. त्यांना आपली पर्स हरवल्याचे लक्षातही आले नव्हते, पण त्याच दरम्यान त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून दोन-तीन वेळा पाठोपाठ फोन आला. एसटी महामंडळाचे पोलीस कर्मचारी श्री विक्रम सुभाष जाधव यांना ती पर्स सापडली होती. त्यांनी पर्स तपासून त्यातील एलआयसीच्या पावतीवरील फोन नंबर पाहिला आणि संपर्क साधून डॉ. गांगल यांना त्यांच्या पर्सची माहिती दिली आणि न्यावयास येण्यास सांगितले. ओळख पटवल्यावर त्यांना त्यांची पर्स परत दिली. श्री. जाधव यांचा प्रामाणिकपणा आणि सेवाभाव समाजातील माणुसकीचे दर्शन घडवतो. अशा चांगल्या नागरिकांमुळे माणुसकीवरचा विश्वास पुन्हा दृढ होतो आणि समाजाला प्रेरणा मिळते

योगाभ्यासात सातत्य राखा – योगगुरू शेखर पेटकर

ठाणे : श्री अंबिका योग कुटीर आणि श्री आनंद भारती समाज यांच्या संयुक्त विद्यमाने दर रविवारी सकाळच्या सत्रात श्री आनंद भारती समाज सभागृहात गेली साडे तीन दशके त्रैमासिक विनामूल्य योगाभ्यासाचे…

ठामपाच्या महिला कल्याणकारी योजनांमधील उत्पन्न दाखल्याची अट शिथील करावी – नरेश म्हस्के

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागात सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी महापालिका क्षेत्रातील गरीब व गरजू महिलांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यामधील काही योजनांसाठी असलेली उत्पन्नाची अट रद्द…

कामगार कल्याण केंद्राच्या इमारतीसाठी 5 कोटींची तरतूद करावी

माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी कल्याण : राज्य शासनाकडून कल्याण पश्चिमेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या कामगार कल्याण केंद्राच्या इमारतीसाठी आगामी अर्थसंकल्पात 5 कोटींच्या निधीची तरतूद करण्याची मागणी भाजपचे माजी आमदार…

रस्ते विकासाशी निगडित सर्व विषय तातडीने मार्गी लावणार

ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली ग्वाही ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्र आणि परिसरातील वाहतुकीच्या स्थितीमध्ये आमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी एमएमआरडीए मार्फत रस्ते विकासाची विविध कामे सुरू आहेत. या…

आपल्या डोक्याचा ताबा दुसऱ्याला कधीही देवू नका – नम्रता कडू

ठाणे : जगातील मोठी लोकशाही असणाऱ्या भारतात पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आज शिल्लक राहिलेला दिसत नाही, ही एक शोकांतिका आहे. मात्र समाज माध्यमे ही पावरफुल आहेत. या माध्यमांचा वापर…

स्मार्ट मीटरसारखी अनेक धोरणं ही सरकारपुरस्कृत रक्तपिपासू शोषक-व्यवस्था होय – राजन राजे

अनिल ठाणेकर ठाणे : स्मार्ट मीटरसारखी अनेक धोरणं ही, सरकारपुरस्कृत रक्तपिपासू शोषक-व्यवस्था होय, असा जोरदार हल्लाबोल धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी राज्य शासनावर केला. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,…

१ एप्रिलपासून सर्व वाहनांसाठी फास्ट टॅग अनिवार्य – एकनाथ शिंदे

ठाणे : राज्यातील चार चाकी वाहन धारकांना १ एप्रिलपासून फास्ट टॅग अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीच्या अध्यक्षस्थानी…