Category: ठाणे

Thane news

स्टेम प्रकल्पाच्या शहाड येथील नवीन पंप हाऊसचे काम दीड वर्षात पूर्ण करा – सौरभ राव

अनिल ठाणेकर ठाणे, भिवंडी-निजामपूर आणि मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रास पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्रकल्पात ५०० दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन पंप हाऊस आणि बारा किलोमीटरची नवीन जलवाहिनी यांच्या कामाचा शुभारंभ महापालिका आयुक्त सौरभ…

विश्वनाथ पंडित यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर !

ठाणे : पाच दशकांहून अधिक काळ सामाजिक, विधायक कार्यात अग्रेसर राहणारे आणि लेखणीव्दारे वृत्तपत्रांतून समाजातील व्यथा, वेदना, समस्या आजही सातत्याने मांडत रहाणारे जेष्ठ वृतपत्र लेखक विश्वनाथ पंडित यांना मुंबईतील जॉय…

मुंबईसह ठाण्यातील पाणीकपात रद्द

मुंबई : मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील ‘न्यूमॅटिक गेट सिस्टीम’मधील तांत्रिक बिघाड दुरुस्त झाल्यामुळे लागू केलेली १० टक्के पाणीकपात शुक्रवारी मागे घेण्यात आली. मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे व भिवंडी परिसरातही पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणीकपात…

 भोसले सीएच्या विजयात अष्टपैलू अद्वैत चमकला

 एमसीसी 12 वर्षांखालील मुले टॅलेंट सर्च क्रिकेट लीग मुंबई: अद्वैत केकणच्या (3 विकेट आणि 25 धावा) प्रभावी अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भोसले सीए संघाने ज्वाला स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित मुंबई सीसी अकॅडमी 12 वर्षांखालील मुले टॅलेंट सर्च क्रिकेट लीगच्या दुसऱ्या फेरीत एमसीसी ठाणे संघाविरुद्ध 7 विकेट राखून विजय मिळवला. ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना एमसीसी, ठाणे संघाने 25 षटकांत 9 बाद 141 धावा केल्या. त्यात विराट निकुंभचे (64 चेंडूत 70 धावा) सर्वाधिक योगदान राहिले. अद्वैत केकणसह (20 धावांत 3 विकेट) क्रिस्टियानो बुथेलोने (३३ धावांत २ विकेट) छाप पाडली. भोसले सीएने 142 धावांचे विजयी लक्ष्य 20 षटकांत 3 विकेटच्या बदल्यात पार केले. कियान पी.याने ४८ चेंडूंत ६१ धावा करताना विजय सुकर केला. अद्वैतने २५ धावा आणि एडहास स्वेनने नाबाद २१ धावा काढताना त्याला चांगली साथ दिली. अन्य लढतीत, शिवसेवा संघाने स्पायडर सीसी संघावर ४२ धावांनी मात केली. सार्थक वसईकरचे (५० धावा) दमदार अर्धशतक त्यांच्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. संक्षिप्त धावफलक: एमसीसी, ठाणे – 25 षटकांत 9 बाद 141 (विराट निकुंभ 70 (64 चेंडू), क्रिश शर्मा 22; अद्वैत केकण 3/20, क्रिस्टियानो बुथेलो 2/33) वि. भोसले सीए – 20 षटकांत 3 बाद 142 (कियान पी. 61 (48 चेंडू), अद्वैत केकण 25, एडहास स्वेन 21*; शार्दुल जोशी 2/18). निकाल: भोसले सीए 7 विकेट राखून विजयी. सामनावीर: अद्वैत केकण. शिवसेवा – 25 षटकांत 9 बाद 156 (सार्थक वसईकर 50 (45 चेंडू); भूषण तुमाडे 2/19, आकाश मोरया 2/19) वि. स्पायडर सीसी – 25 षटकांत 5 बाद 114 (अनिल शर्मा 32, समर्थ जे. 24). निकाल : शिवसेवा ४२ धावांनी विजयी. सामनावीर: सार्थक वसईकर ५० धावा.

 एमआयजी क्रिकेट अकॅडमीला 143 धावांमध्ये रोखले

28 वी अजित नाईक स्मृती 14 वर्षांखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा फिरकीपटू निखिल गुरवच्या 6 विकेट   मुंबई: डावखुरा फिरकीपटू निखिल गुरवच्या (27 धावांत 6 विकेट) शानदार गोलंदाजीमुळे एम. व्ही. स्पोर्ट्स क्लबने एमआयजी सीसी मैदानावर खेळल्या जात असलेल्या 28व्या अजित नाईक स्मृती निवडचाचणी 14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेच्या दोन दिवसीय उपांत्य सामन्याच्या पहिल्या दिवशी एमआयजी क्रिकेट अकॅडमीला पहिल्या डावात 53.4 षटकात 143 धावांवर गुंडाळले. एमआयजी सीएच्या आघाडीच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली तरी निखिलच्या अचूक माऱ्यासमोर मधली फळी कोसळली. तरीही वेदांग मिश्रा (40 धावा), प्रदण्यांकुर भालेराव (34 धावा) आणि दर्शन ओझाने (30 धावा) थोडा संयम दाखवल्याने एमआयजी सीएने दीडशेच्या घरात झेप घेतली. एम. व्ही. स्पोर्ट्स क्लबने पहिल्या दिवसअखेर 28 षटकांत 4 बाद 107 धावा करताना आघाडी घेण्यादृष्टीने आश्वासक सुरुवात केली. त्यात हर्ष कदमचे (46 धावांवर खेळत आहे) सर्वाधिक योगदान आहे. सोव्हेनियर सीसी आणि इस्लाम जिमखाना यांच्यातील उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात सोव्हेनियर सीसीचा पहिला डाव 40 षटकांत 139 धावांत संपुष्टात आला. शिव त्रिपाठीने 39 धावा केल्या. अबरार शेखने 40 धावांत 4 आणि आदित्य पांडेने 35 धावांत 3 विकेट घेत छाप पाडली. पहिल्या डावात दिवसाचा खेळ संपला तेव्हा इस्लाम जिमखान्याच्या ११ षटकांत ३ बाद ३९ धावा झाल्या आहेत. तिन्ही विकेट शिव त्रिपाठीने घेतल्या. उपांत्य फेरी – संक्षिप्त धावफलक: सोव्हेनियर सीसी – पहिला डाव: 40 षटकांत सर्वबाद 139 (शिव त्रिपाठी 39; अबरार शेख 4/40, आदित्य पांडे 3/35) वि. इस्लाम जिमखाना – पहिला डाव: 11 षटकांत 3 बाद 39(शिव त्रिपाठी 3/11). एमआयजी क्रिकेट अकॅडमी – पहिला डाव: ५३.४ षटकांत सर्वबाद १४३(वेदांग मिश्रा ४०, प्रद्न्यांकुर भालेराव ३४, दर्शन ओझा ३०; निखिल गुरव ६/२७) वि. एम. व्ही. स्पोर्ट्स क्लब – पहिला डाव : 28 षटकांत 4 बाद 107(हर्ष कदम  खेळत आहे 46). 00000

 डॉ. आंबेडकर महाविद्यालय व महर्षी दयानंद महाविद्यालयाला विजेतेपद 

 ५१ वी आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरिय कब्बडी स्पर्धा मुंबई : ५१ वी आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरिय कब्बडी स्पर्धा. कै.  एम. एन. वर्मा फिरता चषक व कै. श्री. सुमती अंकूश मालकर फिरता चषक स्पर्धेसाठी झालेल्या अंतिम सामन्यात मुलांमध्ये डॉ. आंबेडकर महाविद्यालयाने व मुलींमध्ये महर्षी दयानंद महाविद्यालयाने (ब संघ) विजेतेपद मिळवले. मुलांच्या अंतिम सामन्यात डॉ. आंबेडकर महाविद्यालयाने एस.एस.टी. महाविद्यालयाचा २४-२० असा ४ गुणाने पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या सामन्यात आंबेडकरच्या आकाश साळवी, जितेंद्र यादव यांनी चढाई मध्ये चमकदार कामगिरी केली व सनी भगतने उत्कृष्ट पकड करत संघाला विजेतेपद मिळवून दिले. तर पराभूत एस.एस.टी. च्या चीन्मय गुरख, रोहन कनोजीया यांनी चढाई मध्ये व सिद्धेश पांचाळने छान पकड करत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी जोरदार संघर्ष केला मात्र ते यशस्वी होऊ शकले नाहीत. मुलींच्या अंतिम सामन्यात महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या ब संघाने त्यांच्याच म्हणजे महर्षी दयानंद महाविद्यालयाचा (अ संघ) २८-२६ असा दोन गुणांनी पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले. या सामन्यात महर्षी दयानंदच्या रिया मडकईकर, नेहा गुप्ता यांनी सामन्यात जोरदार कामगिरी करत विजय खेचून आणला तर उपविजेत्या महर्षी दयानंदच्या (अ संघ) रितीका फूलसुर्गे, अदिती शिंदे, उर्जा साळगावकर यांनी दिलेली लढत पराभवापासून वाचवू शकली नाही. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ संजय निकम (एसीपी, राज्य इंटेलिजेंट विभाग, मुंबई),  सचिन कदम (पी. आय. भोईवाडा पोलिस स्टेशन), माया आक्रे (कबड्डी -अर्जुन पुरस्कार), डॉ. हेमंत शर्मा (प्राचार्य, महर्षी दयानंद महाविद्यालय), जीवन पैलकर (राष्ट्रीय कबड्डीपटू, एन.आय.एस. प्रशिक्षक), श्री.मनोज पाटील (क्रीडा संचालक), प्रताप परब (क्रीडा भारती कार्यवाह, मुंबई), बाळ तोरसकर (सह सेक्रेटरी, महाराष्ट्र खो खो असो., सेक्रेटरी इनडोअर क्रिकेट असो.) डॉ. प्रताप कामठेकर (अकाऊंट विभाग पोदार महाविद्यालय), प्रा. बी. टी. निकम (महर्षी दयानंद महवियालय), मेजर अशोक कुवर, पंडित पाटील, प्रकाश भामरे, रमेश लांबे, वैशाली पाटील, राजेश पाडावे, डॉ. यू. सी. शुक्ला (उप प्राचार्य,  म. द.महा.), प्रा. अॅड. एम. कुराडे, प्रा. गणेश गव्हाणे आदी मान्यवरांच्या हस्ते पार पडला. मुंबई, महर्षी दयानंद महाविद्यालयातर्फे ४२ वी आंतर महाविद्यालयीन खो-खो स्पर्धा मनोरंजन मैदान, पेरू कंपाउंड, लालबाग येथे पार पडली. या स्पर्धेत मुलांचे विजेतेपद झुनझुनवाला महाविद्यालयाने तर मुलींचे विजेतेपद एस. एस. टी. महाविद्यालयाने मिळवले. या बक्षीस समारंभाचे सूत्रसंचलन प्रा. एन. माने यांनी तर मनोज पाटील प्रास्तविक आणि आभार प्रदर्शन केले.

महामानवाला अभिवादन, दादरच्या चैत्यभूमीवर भीमसागर लोटला!

मुंबई : भारतीय संविधानाचे जनक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून त्यांचे लाखो अनुयायी चैत्यभूमी (दादर, मुंबई) येथे येतात. त्यांची नीट व्यवस्था पाहिली जावी, त्यांची कुठेही कोणत्याही…

 ‘पुष्पा २’च्या शो दरम्यान भर थिएटरमध्ये अज्ञाताने फवारला विषारी गॅस;

मुंबई : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा यंदाच्या वर्षातील बहुप्रतिक्षित ‘पुष्पा २ द रुल’ हा चित्रपट ५ डिसेंबरला म्हणजेच गुरुवारी देशभरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला सर्वत्र जोरदार प्रतिसाद…

 रक्तदानातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

 महावितरणचा उपक्रम; १०२ बाटल्या रक्त संकलन   कल्याण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महावितरणच्या उल्हासनगर एक, दोन व बदलापूर विभागाकडून आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. सलग दुसऱ्या वर्षी हा उपक्रम राबवताना १०२ अधिकारी, अभियंते व जनमित्रांनी रक्तदान करत महामानवाला अभिवादन केले. कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता चंद्रमणि मिश्रा यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन करण्यात आले. कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे तसेच कल्याण मंडल एकचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. अंबरनाथ तहसिल कार्यालयाशेजारील महावितरणच्या अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम उपविभागीय कार्यालयात रक्तदान आणि आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता महेश अंचिनमाने, उल्हासनगर विभाग दोनचे कार्यकारी अभियंता प्रवीण चकोले यांच्यासह १०२ अधिकारी, अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी या शिबिरात उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवत रक्तदान केले. सामाजिक बांधिलकीतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उल्हासनगर एक आणि दोन तसेच बदलापूर विभाग कार्यालय, विविध कामगार संघटना प्रतिनिधी, अभियंते, जनमित्र यांच्या पुढाकारातून आणि साई सिटी हॉस्पिटल तसेच अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या सहकार्यातून रक्तदान शिबिर यशस्वी करण्यात आले. 00000

 शिवकन्या मंडळाची उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली.

मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा मुंबई : जय शंकर चौकने द्वितीय श्रेणीत, तर शिवकन्या मंडळाने कुमारी गटात मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या पूर्व विभागात उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली.मुंबई उपनगर कबड्डी असो.ने संयोजन संस्था, चारकोप यांच्या सहकार्याने संचालिका नम्रता भोसले यांच्या सौजन्याने कांदिवली, सेक्टर – २ येथील दादोजी कोंडदेव क्रीडांगणावर या स्पर्धेचे आयोजन केले आहे. जय शंकरने अश्वमेध प्रतिष्ठानचा दुबळा प्रतिकार ३४-१२ असा परतवून लावला. पहिल्या डावात १४-०८ अशी आघाडी घेणाऱ्या जय शंकरने दुसऱ्या डावात आणखी जोषपूर्ण खेळ करीत २४ गुणांच्या फरकाने सामना खिशात टाकला. सचिन जाधव, रोहित आरोटे या विजयाचे शिल्पकार ठरले. अश्वमेधच्या ओंकार मोरेची लढत दुसऱ्या डावात दुबळी ठरली. शिवकन्या मंडळाने कुमारी गटात चेंबूर क्रीडा केंद्राला २४-१५ असे नमवित या गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली. पूर्वार्धात ०९-११अशा पिछाडीवर पडलेल्या शिवकन्याने उत्तरार्धात आक्रमक खेळ करीत ९ गुणांनी सामना आपल्या बाजूने झुकविला. परी कोरी, मेहजबीन शेख यांच्या चढाई पकडीच्या चतुरस्त्र खेळाला याचे श्रेय जाते. चेंबूरच्या देवयानी नवले, गुंजन सुवर्णा यांच्या प्रतिकार उत्तरार्धात कमी पडला. महिला गटात वंदे मातरम् ने आकाश स्पोर्टस् चा २२-०८ असा पाडाव करीत तिसरी फेरी गाठली. प्रसिता पन्हाळकर, रिया निंबाळकर यांच्या झंझावाती खेळाने हा विजय सोपा केला. आकाशाची तनिष्का बद्रिके चमकली. प्रथम श्रेणी पुरुषात शितलादेवी संघाने गुरुकृपा संघावर २५-१४ अशी मात करीत दुसरी फेरी गाठली. पुरुष द्वितीय श्रेणी गटात शिवरदेवने शिव मराठाचा १७-१५ असा, तर संघर्षाने के.आर. टी. चा २०-०९ असा पराभव करीत तिसरी फेरी गाठली. ००००