Category: ठाणे

Thane news

3७ लाख महिलांना लखपती दीदी योजनेत जोडून घेणार – देवेंद्र फडणवीस

3७ लाख महिलांना लखपती दीदी योजनेत जोडून घेणार – देवेंद्र फडणवीस मिरा – भाईंदर: महिला या अर्थव्यवस्थेचे दुसरं चाक आहेत हे विकसित देशात दिसून आला आहे आणि म्हणूनच पंतप्रधान मोदींनी नारिकेंद्रित विकासाला प्राधान्य दिलं आहे त्यामुळे आपली अर्थव्यवस्था जगात चौथी अर्थव्यवस्था झाली आहे. बेटी बचाव आणि बेटी पढाव पासून सुरू असलेली हे अभियान लखपती दीदी पर्यंत येऊन पोहोचले आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. श्रीमती मु्थूलक्समि रेड्डी यांच्या विधान मंडळ सदस्य शताब्दी आणि महिला दीनानिमित्त आयोजित केलेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या कार्यक्रमात ‘विकसित नारी शक्ती संगम’ या दोन दिवसांच्या परिषदेत ते बोलत होते. पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, २०२९ मध्ये तेहतीस टक्के महिला खासदार असणार आहेत आणि त्या देशाचं नेतृत्व करणार आहेत. महिलांना दिलेल्या ९९ टक्के कर्जाची परतफेड होते त्यामुळे नवीन उद्योगपती महिला तयार होतं आहेत.  यावेळी मंचावर ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे, पद्मश्री पोपटराव पवार,  राज्यसभा सदस्य रेखा महाजन,  तसेच मिरा – भाईंदरच्या प्रथम नागरिक डिंपल मेहता उपस्थित होत्या. यावेळी बोलताना पद्मश्री पोपटराव पवार म्हणले, ग्रामपंचायत महिलांनी स्वतः काम करावं, स्वतः निर्णय घ्यावेत हे उद्दिष्ट ठेवाव.  राज्यसभा सदस्य तसेच रामभाऊ म्हाळगी चे उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले की तीस वर्षांपूर्वी महिला राजकारणाचा अहवाल म्हाळगीने तयार केला होता आणि आता महिलाची राजकीय प्राशिक्षणाची जबाबदारीही म्हाळगी घेईल.  आताच्या महिला या न देवी न दासी आहेत त्यां आता भारताला नेतृत्व देणाऱ्या आहेत असं त्यांनी पुढे सांगितलं. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेनी महिला लोकप्रतिनिधी ना प्रशिक्षित करणं, स्वयंभू करणं हा उपक्रम राबविल्याच तसेच महिला बचत गटाच्या वस्तुंना तेरा जिल्ह्यात बाराही महिने बाजारपेठ उपलब्ध करून दिल्याचं सांगितलं. उमेद मॉल ही संकल्पना राबवून महिला उद्यागाच सक्षमीकरण करणार असल्याचं ते म्हणाले.  दोन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाना राज्यातील पाचशे ग्रामपंचायत सदस्य तसेच अनेक महिला प्रतिनिधिनी उपस्थिती लावली. याठिकाणी बऱ्याच गोष्टी शिकायला मिळणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दिवामधल्या नागरिकांच्या समस्येला मिळणार दिलासा

दिवामधल्या नागरिकांच्या समस्येला मिळणार दिलासा पश्चिमेतील मातोश्री नगरात नवीन गटार कामाचा शुभारंभ दिवा : दिवा पश्चिमेतील मातोश्री नगर परिसरातील अचला, मातोश्री अपार्टमेंटसह सात ते आठ इमारतींमधील नागरिकांना गटाराच्या समस्येमुळे मोठा त्रास सहन करावा लागत होता. या भागात योग्य गटार व्यवस्था नसल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात घाण पाणी साचत होते. त्यामुळे नागरिकांना ये- जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी नगरसेवकांकडे वारंवार तक्रारी केल्यानंतर त्याची दखल घेण्यात आली. त्यानुसार या ठिकाणी नवीन गटार बांधकामाच्या कामाचे भूमीपूजन आज करण्यात आले. या भूमीपूजन प्रसंगी नगरसेवक शैलेश पाटील, नगरसेविका स्नेहा अमर पाटील, माजी नगरसेवक अमर पाटील, विभाग प्रमुख भालचंद्र भगत, शाखा प्रमुख अश्विन चौधरी यांच्यासह शिवसैनिक, महिला कार्यकर्त्या आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन गटार बांधकाम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील पावसाळ्यातील पाणी साचण्याची समस्या दूर होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

दिव्यात रोटरी क्लबतर्फे रक्तदान शिबिर उत्साहात

दिव्यात रोटरी क्लबतर्फे रक्तदान शिबिर उत्साहात दिवा: रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणे यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून काल सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर दिव्यातील हनुमान मंदिर, दातिवली गाव येथे पार पडले. सामाजिक बांधिलकी जपत अनेक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून या उपक्रमाला प्रतिसाद दिला. या शिबिरात एकूण २५ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन रोटरी क्लबचे अध्यक्ष, किशोर पाटील, प्रकल्प प्रमुख, आदित्य पाटील आणि सचिव, स्वप्नील गायकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. समाजहिताच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले असून अशा उपक्रमांमुळे समाजात सेवा व सहकार्याची भावना अधिक बळकट होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

 ठाणे न्यायालयाचा रेल्वेला तात्पुरता ‘ब्रेक’

ठाणे न्यायालयाचा रेल्वेला तात्पुरता ‘ब्रेक’ दिव्यातील बांधकामांवरील कारवाईला स्थगिती दिवा: दिवा रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे स्वतःच्या जागेचा दावा करत असलेल्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या ३ ते ४ इमारतीं आणि व्यावसायिक गाळ्यांवरील तोडक कारवाई सध्या स्थगित झाली आहे. संबंधित जागा मालकांनी दाखल केलेल्या अपीलावर सुनावणी घेत ठाणे न्यायालयाने रेल्वे प्रशासनाच्या कारवाईला तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. दिवा रेल्वे स्थानकाजवळील जागा १९६२ साली रेल्वेने ताब्यात घेतली असून त्याबदल्यात जागा मालकांना मोबदला देण्यात आल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे. तरीही या जागेवर इमारती उभारण्यात आल्याने त्या अतिक्रमण करून उभारलेल्या अनधिकृत बांधकामांमध्ये गणल्या जात असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून संबंधित इमारतींना नोटीस बजावत त्या १५ दिवसांत रिकाम्या करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच त्यानंतर तोडक कारवाई करण्याचे नियोजनही करण्यात आले होते. नोटीस मिळाल्यानंतर रहिवासी आणि जागा मालकांनी रेल्वेला उत्तर सादर केले होते. त्यानंतर रेल्वेच्या मालमत्ता विभागाकडे याबाबत सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा या इमारती अनधिकृत असल्याचे नमूद करत १५ दिवसांत कारवाई करण्याचा निर्णय कायम ठेवला. दरम्यान, या निर्णयाविरोधात ऍड. निखिल वाडीकर आणि ऍड. कस्तूर पाटील यांनी ठाणे न्यायालयात अपील दाखल केले. या अपीलावर झालेल्या सुनावणीत ठाणे न्यायालयाने रेल्वेच्या कारवाईला स्थगिती दिली. त्यामुळे प्रस्तावित तोडक कारवाई तात्पुरती थांबली असून पुढील सुनावणीपर्यंत रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

ऑफ्रोहचे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

ऑफ्रोहचे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन ठाणे: सक्षम अधिकाऱ्याने संपूर्ण चौकशीअंती दिलेले जात प्रमाणपत्र लबाडीने रद्द केल्यामुळे अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना सेवकाळातील फायदे नाकारणाऱ्या आणि त्यांच्या सेवेत अडथळे आणण्याचे प्रयत्न करणाऱ्या शासकीय धोरणाच्या विरोधात ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन, महाराष्ट्र (ऑफ्रोह) संघटनेतर्फे सोमवार, ९ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती ऑफ्रोहचे ठाणे जिल्हा अध्यक्ष रोहित तरे यांनी दिली. यासंदर्भात ऑफ्रोहचे ठाणे जिल्हा अध्यक्ष रोहित तरे म्हणाले, जबाबदार अधिकाऱ्याने पूर्ण चौकशी करून दिलेले अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र हेतूपुरस्सर लबाडीने रद्द करण्यात आली. अशा रद्द झालेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना शासनाने अधिसंख्य पदावर वर्ग केले आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने २८.४.२५ रोजी नियमित आणि स्थायी झालेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करता येणार नसल्याचा निर्णय दिला. पण अधिसंख्य पदावर असलेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सेवेतील फायदे नाकारत त्यांना अडचणीत आणले जात आहे. शासनाकडून मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीचा निषेध म्हणून संघटनेच्या पुण्यात झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत ९ मार्च रोजी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.या राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. जात  प्रमाणपत्र बाबत खोटे आक्षेप घेऊन पदोन्नती साठी पात्र असलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना पदोन्नती नाकारली जात आहे. याशिवाय सेवकाळातील १०, २० आणि ३० वर्षानंतर मिळणारे आश्र्वासित प्रगती योजनेचे लाभ न देणे, मृत झालेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वारसांना सेवानिवृत्त वेतन नाकारणे, आंतर जिल्हा बदली न देणे, काल्पनिक वेतनवाढ गृहीत धरून वेतन लाभ नाकारणे,  सेवासमाप्ती कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्यात खाजगी शिक्षण संस्थाकडून  होत असलेली दिरंगाई, आणि इतर मागण्यांसाठी संपूर्ण राज्यात एकाच दिवशी हे आंदोलन होणार असल्याचे रोहित तरे यांनी सांगितले. या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन ऑफ्रोहच्या ठाणे जिल्हा शाखेचे अध्यक्ष रोहित तरे, ठाणे जिल्हा महिलाध्यक्षा निर्मला पाडळकर, सचिव हिरामण सोनावणे, कार्यकारिणी सदस्या प्रिया खापरे, दयानंद कोळी, नरेश खापरे, घनश्याम हेडाऊ, नंदनवार ,अजय कोळी,प्रकाश कोळी,अर्जुन मेस्त्री,राकेश डोलकर, स्मिता भोईर, रेखा पाटील, राजेंद्र दांडूक, सुरेश नाखवा,चंद्रशेखर ठाणेकर यांनी केले आहे.

दोन जणांना पोलीस कोठडी, तीन जण अद्यापही फरार

शहापूर बिबट्या शिकार प्रकरण दोन जणांना पोलीस कोठडी, तीन जण अद्यापही फरार १५ नखं हस्तगत अविनाश उबाळे ठाणे- शहापूर उपवनसंरक्षकांच्या कार्यक्षेत्रातील वाशाळा वनपरिक्षेत्रात गेल्या आठवड्यात झालेल्या  बिबट्याच्या शिकारी प्रकरणी टोळीतील दोन जणांना अटक करण्यात वनविभागाला यश आले आहे.तथापी बिबटयाच्या हत्येप्रकरणी टोळीतील आणखी तीन संशयित आरोपी हे फरार असून हत्या करण्यात आलेल्या बिबटयाची १५ नखं जंगलातून हस्तगत करण्यात आली असल्याचे वनविभागाच्या सुत्रांनी सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे बिबटयांची क्रूरपणे शिकार करुन नंतर मृत बिबट्यांच्या अवयवांची लाखो रुपयांना तस्करी करणारं हे एक भलं मोठं रॅकेट ठाणे जिल्हयात कार्यरत असल्याचा अंदाज या घटनेमुळे आता वर्तविण्यात येत आहे.गेल्या आठवड्यात वनकर्मचाऱ्यांना वाशाळा वनपरिक्षेत्रातील ढाकणे,चिंध्याचीवाडी,कळभोंडा येथे नदीच्या पात्रालगत एक मृत अवस्थेत बिबट्या आढळुन आला होता.शिकारी टोळीने या बिबट्याची अत्यंत क्रूरपणे हत्या करुन बिबट्याच्या पायाचे पंजे तोडून नखे काढून घेतली होती.अवयवांची तस्करी करण्यासाठी बिबट्याची अत्यंत क्रूरपणे ही हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. तथापि बिबट्याच्या शिकार प्रकरणी लागलीच शहापूर वनविभागाने गुन्हा दाखल करत वेगाने तपासाची सुरू हलविली असता या घटनेतील दोन संशयित आरोपींना चौवीस तासांच्या आत अटक करण्यात वनविभागाला यश आले.जेरबंद केलेल्या या दोन्ही आरोपींची सखोल चौकशी तपास पथकातील वनअधिकारी व वनकर्मचाऱ्यांनी केली असता बिबट्याच्या शिकारी मध्ये आणखी तीन जणांचा समावेश असल्याची कबूली पकडलेल्या दोन आरोपींनी दिली.व मृत बिबट्याची नखं जंगलात एका दगडाखाली लपवून ठेवल्याची माहिती त्यांनी चौकशी दरम्यान दिली दरम्यान ही माहिती मिळताच हत्या झालेल्या बिबट्याच्या पायांची एकूण १५ नखं जंगलातून तपास पथकातील वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हस्तगत केली आहेत.दरम्यान बिबट्याच्या हत्या प्रकरणातील दोन आरोपींना १६ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांची रवानगी कल्याण येथील आधारवाडी कारागृहात करण्यात आल्याचे तपास पथकातील वन अधिकाऱ्यांनी  माहिती देताना सांगितले.टोळीतील आणखी तीन फरार झालेल्या आरोपींचा कसून शोध सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.फरार झालेल्या आणखी तीन संशयित आरोपींना पकडल्यानंतर बिबट्याच्या हत्येचे खरे कारण आणि तस्करीचा संपूर्ण उलगडा होणार असल्याचे तपास पथकातील वन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

उल्हासनगर महापालिकेवर दिव्यांगांचा भव्य मोर्चा

उल्हासनगर महापालिकेवर दिव्यांगांचा भव्य मोर्चा आपल्या विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी दिव्यांग बांधवांना पालिकेत प्रवेश नकारल्याने तणावाचे वातावरण उल्हासनगर : महापालिकेला अनेक वेळा आपल्या विविध मागण्याचे निवेदन देऊनही पालिका या मागण्या…

नाट्य प्रशिक्षण शिबिराला सुरवात

नाट्य प्रशिक्षण शिबिराला सुरवात कल्याण : गुरुवार 5 मार्च ते 14 मार्च या कालावधीमध्ये सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई आणि अप्पा जोशी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने…

चंद्रसेन सोनावळे यांच्यावतीने मांडा-टिटवाळा येथे ‘अन्नदान सेवा’ उपक्रम

चंद्रसेन सोनावळे यांच्यावतीने मांडा-टिटवाळा येथे ‘अन्नदान सेवा’ उपक्रम कल्याण : समाजसेवेचा वारसा जपत आणि वाढदिवसाचे औचित्य साधून श्री सिद्धीविनायक अन्नछत्र मंडळ मांडा – टिटवाळा यांच्या माध्यमातून भव्य ‘अन्नदान सेवा’ उपक्रमाचे…

वाशी विभागात अनधिकृत झोपडपटटयांवर  तोडक कारवाई

वाशी विभागात अनधिकृत झोपडपटटयांवर  तोडक कारवाई नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने अनधिकृत झोपड्यांविरोधात वाशी विभाग नवी मुंबई महानगरपालिका यांचे मार्फत मा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व मा.…