Category: ठाणे

Thane news

महापरिनिर्वाण दिनानिमित्त ठाणे महापालिकेच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोर्ट नाका येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अभिवादन केले. त्यावेळी, अतिरिक्त आयुक्त…

बदलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात क्षयरोग चाचणीचा शुभारंभ

ठाणे :  प्राथमिक आरोग्य केंद्र, बदलापूर येथे जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, ठाणे व राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम जिल्हा क्षयरोग केंद्र, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने  ४ डिसेंबर रोजी  Cy TB चाचणीचा शुभारंभ कार्यक्रम…

कॅडबरी जंक्शनवर कंटेनर उलटला

ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गावरील कॅडबरी जंक्शन परिसरात बुधवारी सायंकाळी कंटेनर उलटल्याने अपघात झाला. या अपघातात कंटेनर चालक कमलेश कुमार (२७) जखमी झाले असून त्यांच्या दोन्ही पायांना दुखापत झाली आहे. चालकाने रुग्णालयात जाण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर…

रविवार ८ डिसेंबर रोजी `एक दिवस कायस्थांचा’ सोहळा साजरा होणार

 एकविरा देवी उत्सवाला सीकेपी बांधवांचा भरभरुन प्रतिसाद ठाणे : गेली काही वर्षे सीकेपी समाजात लोकप्रिय ठरलेला कार्ला एकविरा गडावरील `एक दिवस कायस्थांचा’ उत्सव रविवार दि. ८ डिसेंबर रोजी होणार आहे. या उत्सवासाठी राज्य व देशातून समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. गेली ८/९ वर्षे `एक दिवस कायस्थांचा’ एकविरा गडावर साजरा केला जातो. दरवर्षी उत्सवाची चढती कमान असते. यावर्षीही एक दिवस कायस्थांच्या सोहळ्यात विविध कार्यव्रâमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने एकविरा देवीचा होम करण्यात येणार असून या होमासाठी ज्ञातीतील जोडप्यांचा सहभाग असणार आहे. शिवाय महाआरती, पालखी, स्मरणिका प्रकाशन, भजन-किर्तन, भारुड इत्यांदी अनेक कार्यव्रâमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी होणारा कार्यव्रâम एकविरा गडाच्या पायथ्याशी असलेल्या स्वप्नपूर्ती बंगला परिसरात करण्यात येणार आहे. कार्ला येथील एकविरा देवी प्रामुख्याने सीकेपी, आगरी, कोळी व दैवज्ञ सोनार समाजाची म्हणून ओळखली जाते. नवसाला पावणारी देवी अशी श्रध्दा या समाजाची आहे. पूर्वी म्हणजे १८व्या शतकात एकविरा गडावर सीकेपी समाजाची धर्मशाळा होती. तसेच समाजातील मंडळींचा मोठा राबता होता. परंतु काळाच्या ओघात हे सर्व मागे पडले म्हणूनच सीकेपी संस्थेने `एक दिवस कायस्थांचा’ हा अभिनव कार्यव्रâम सुरु केला आणि देशभरातील सीकेपी बांधवांनी या कार्यव्रâमाला उत्स्फूर्त पाठींबा दिला. यावर्षी म्हणजे ८ डिसेंबर रोजी होणार्‍या कार्यव्रâमास ज्ञाती बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. यावर्षीचा कार्यव्रâम सीकेपी समाजातील चार संस्था एकत्र येवून करीत आहेत. सीकेपी संस्था, कायस्थ प्रभू उत्कर्ष संस्था, पुणे सीकेपी फॅमेली ट्रस्ट, धर्मवीर आनंद दिघे विचार मंच इत्यांदीं संस्थांचा पुढाकार आहे. `एक दिवस कायस्थांच्या कार्यव्रâमाला कायमस्वरुपी भव्य स्वरुप यावे म्हणून देवीच्या नावाने विश्वस्त संस्था स्थापन करुन आगामी वर्षापासून उत्सव सोहळा होणार असल्याची माहिती देण्यात आली. उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन सीकेपी ज्ञातीतील विविध संस्थांतर्पेâ विकास देशमुख, स्वप्निल प्रधान, मिलिंद मथुरे, जयदिप कोरडे, निलेश गुप्ते, तुषार राजे इत्यांदींनी केले आहे.

राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा – २०२४

चिन्मय केवलरमानी, प्रणिता सोमन महाराष्ट्र संघाचे कर्णधार   पुणे, दि. ५ डिसेंबर – पुरी, ओडिसा येथे ७ ते १0 डिसेंबर २०२४ दरम्यान २९वी सिनीअर, ज्युनिअर आणि सब ज्युनीअर राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेत सहभागी होणा-या महराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी पुरुषांमध्ये पुण्याचा राष्ट्रीय पदक विजेता सायकलपट्टू चिन्मय केवलरमानी आणि महिलांमध्ये अहिल्यानगरची आंतरराष्ट्रीय पदक विजेती सायकलपट्टू प्रणिता सोमन यांची निवड करण्यात आली आहे. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे निरीक्षक आणि आंतरराष्ट्रीय पंच सुदाम रोकडे यांच्या अध्यक्षतेखालील सी एफ आय चे उपाध्यक्ष प्रताप जाधव, कॅमचे सचिव प्रा. संजय साठे, धरमेंदर लांबा आणि शिवछत्रपती पारितोषिक सन्मानित मीनाक्षी चौधरी – शिंदे यांच्या समितीने महाराष्ट्राचा २३ पुरुष १९ महिला असा एकूण ४२ सायकलपट्टूंचा संघ निवडला. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा प्रबोधिनीच्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्रीमती दिपाली पाटील यांनी निमंत्रक म्हणून काम पाहिले. महाराष्ट्राचा संघ पुढीलप्रमाणे: पुरुष: मेन ईलीट: चिन्मय केवलरमानी (कर्णधार), सूर्या थात्तू सुदर्शन देवर्डेकर, श्रीकांत खडतरे (सर्व पुणे), सिध्देश पाटील (कोल्हापूर), यश थोरात (मुंबई),  महिला – वुमेन ईलीट: प्रणिता सोमन (कर्णधार), अपूर्वा गोरे (दोघी  अहिल्यानगर), ऋतिका गायकवाड (नासिक),मनाली रत्नोजी (पुणे), योगेश्वरी कदम (सांगली), पुरुष: मेन अंडर २३ –  मुस्तफा पत्रावाला, विवान सप्रु (दोघे मुंबई), वीरेंद्रसिंह पाटील (क्रीडा प्रबोधिनी पुणे),  अमन तांबोळी (सांगली) ज्युनिअर बॉईज: निहाल नदाफ (सांगली),  विपलव  मालपुते (पुणे), समर्जित थोरबोले, हरीश डोंबाळे (दोघे क्रीडा प्रबोधिनी पुणे), वुमेन ज्युनिअर: जुई नारकर (मुंबई) ,आकांक्षा म्हेत्रे (जळगाव) स्नेहल माळी (रायगड), सिद्धी शिर्के(पुणे), आसावरी राजमाने (क्रीडा प्रबोधिनी पुणे), बॉईज सब ज्युनिअर: मोक्ष सोनवणे(नासिक), राज कारंडे (अहिल्यानगर),  ओंकार गांधले, श्रीनिवास जाधव (दोघे क्रीडा प्रबोधिनी पुणे), गर्ल्स सब ज्युनिअर: श्रावणी परीट (पुणे), निम शुक्ला (मुंबई),आभा सोमन (पुणे), प्राजक्ता सूर्यवंशी (सांगली), युथ बॉईज दानिश जमादार, संस्कार घोरपडे (दोघे सांगली), अर्नव गौंड, अनुज गौंड (दोघे पुणे), युथ गर्ल्स् : गायत्री तांबवेकर (पुणे), राजनंदिनी सोमवंशी (क्रीडा प्रबोधिनी पुणे), अर्णवी सावंत (कोरेगोव-सातारा), प्रचिती खताळ (पुणे) महिला प्रशिक्षक / व्यवस्थापक: श्रीमती  दिपाली शिलदणकर प्रक्षिक: दर्शन बारगुजे व्यवस्थापक / मेकॅनिक :स्वप्निल माने 0000

ठाण्याचे देशस्थ ॠग्वेदी  कार्यालय नियमित सुरु

ठाणे : देशस्थ ॠग्वेदी ब्राह्मण संस्था, ठाणे यांचे कार्यालय आता सकाळ व संध्याकाळ या दोन्ही वेळात संस्थेच्या सर्व सभासदांसाठी दररोज सुरु झाले आहे. कार्यालयात टीव्ही, इंटरनेट, कॅरम बोर्ड, बुद्धिबळपट यांचीही…

 शार्वी सावेची अष्टपैलू खेळी व्यर्थ

 अर्जुन मढवी महिला क्रिकेट स्पर्धा ठाणे : तीन बळीसह अर्ध शतकी खेळी करणाऱ्या शार्वी सावेचा अष्टपैलू खेळ पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशनचा पराभव टाळू शकला नाही. डॉ राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवज्ञ क्रिकेट क्लब आयोजित ४० षटकांच्या एकदिवसीय अर्जुन मढवी महिला क्रिकेट स्पर्धेत दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन संघाने डहाणू पालघर तालुका स्पोर्ट्स असोसिएशनचा ४३ धावांनी पराभव करत दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले. दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनच्या २२८ धावांचा पाठलाग करताना पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशनला ९ बाद १८५ धावा करता आल्या. प्रथम फलंदाजी करताना अनुभवी पूनम राऊतने संघाच्या द्विशतकी धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. पूनमने नऊ चौकारासह ७५ चेंडूत ७८ धावा बनवल्या. अनिशा शेट्टीने ३० आणि सारा सामंतने २८ धावांची खेळी केली. ययाती गावडने चार आणि शार्वी सावेने तीन फलंदाज  बाद केले. या आव्हानाला सामोरे जाताना शार्वीने ६७ चेंडूत एक षटकार आणि ११ चौकारासह ८१ धावांची खेळी करत संघाला विजयाची आस दाखवली. पण ती बाद झाल्यावर मात्र स्नेहलता धनगड आणि लिली दिपचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी मात्र सपशेल निराशा केली. स्नेहलता आणि लिलीने प्रत्येकी २६ धावांची खेळी केली. अदिती सुर्वे, सिद्धी पवार आणि क्रितिका क्रिष्णकुमारने प्रत्येकी दोन बळी मिळवले. संक्षिप्त धावफलक : दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन : ४० षटकात ९ बाद २२८(पूनम राऊत ७८, अनिशा शेट्टी ३०, सारा सामंत २८, ययाती गावड ८-५०-४, शार्वी सावे ८-३४-३, शुभ्रा राऊत ८-३०-१) विजयी विरुद्ध पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशन : ४० षटकात ९ बाद १८५ ( शार्वी सावे ८१, स्नेहलता धनगड २६, लिपी दिप २६, अदिती सुर्वे ८-१-२२-२, सिद्धी पवार ७-०-३१-२, क्रितिका क्रिष्णकुमार ८-१-४३-२) सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू : पूनम राऊत

ठाणे  केंद्रावरील राज्य नाटय स्पर्धेला आजपासून सुरुवात –  बिभीषण चवरे

अनिल ठाणेकर ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६३ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर मिनी नाट्यगृह येथे सुरू होत आहे. दिनांक ५ डिसेंबर ते १३ जानेवारी या दरम्यान या स्पर्धा होतील. या स्पर्धेत सकाळी ११.३० वा. व  संध्याकाळी ७ वाजता नाटकाचे प्रयोग सादर होणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी दिली. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी नमूद केलेले आहे. या स्पर्धेमध्ये एकूण २४ संघांचा सहभाग आहे. ठाणे शहरासह रायगड जिल्ह्यातील संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत.  राज्य नाट्य स्पर्धेतील नाटक पाहण्यासाठी नाममात्र रु- १५/- व १०/- तिकीट ठेवण्यात आलेलं आहे. राज्यनाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांना जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे आणि हौशी रंगकर्मींचा उत्साह वाढवावा असे आवाहन संचालक बिभीषण चवरे यांनी केलेले आहे.

कल्याणमधील आधारवाडी तुरुंगात न्यायबंदीला मारहाण

कल्याण – येथील आधारवाडी तुरुंगातील एका न्यायबंदीला इतर सात न्यायबंदींनी मंगळवारी सकाळी दगड आणि बादलीच्या साहाय्याने मारहाण केली. या मारहाणीत एका न्यायबंदीच्या डोळे, डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी एका…

ठाण्यात गावठी हात बाॅम्बचा साठा जप्त

ठाणे : ठाणे शहरात गावठी हात बाॅम्बचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी रायगड येथील माणगाव भागातील एका तरूणाला ताब्यात घेतले असून पोलिसांनी त्याच्याकडून १० हात बाॅम्ब जप्त केले…