Category: ठाणे

Thane news

शासनाकडून मानधन घेणाऱ्या वृध्द साहित्यिक, कलावंतांनी आधारकार्ड अपडेट करावे – रोहन घुगे

ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा, पर्यटन विशेष सहाय्यक विभागातर्फे राजर्षी शाहू महाराज वृध्द साहित्यिक, कलावंत मानधन योजना राबविली जाते. १९५४-५५ या वर्षापासून संपूर्ण राज्यात राबविण्यात येणाऱ्या…

गोदी कामगार वेतन करार अंमलबजावणीसाठी आज निदर्शने – सुधाकर अपराज

अनिल ठाणेकर ठाणे : गोदी कामगार वेतन करार अंमलबजावणीसाठी, मुंबई पोर्ट प्राधिकरणातील सर्व कामगार संघटना व  लोकाधिकार समिती आणि  मुंबई पोर्ट ट्रस्ट एससी एसटी वेल्फेअर असोसिएशन यांच्या सहभागाने गुरुवारी ५ डिसेंबरला दुपारी १२.०० वाजता आंबेडकर भवन समोर निदर्शने होणार आहेत. या आंदोलनात गोदी कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन ऑल इंडिया पोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशनचे ( वर्कर्स  )  जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज यांनी केले आहे. भारतातील प्रमुख बंदरातील सहा महासंघांच्या राष्ट्रीय समन्वय समितीच्या  २३ नोव्हेंबर २०२४ रोजी गोवा येथे झालेल्या मिटिंगमधील  निर्णयानुसार  २८ नोव्हेंबर  रोजी प्रत्येक बंदरात वेतन कराराची अंमलबजावणी त्वरित  करा,  असे पत्र सर्व बंदरातील कामगार संघटनांनी अध्यक्षांना दिले आहे. पी. डिमेलो भवन येथे  २ डिसेंबरला झालेल्या मुंबई बंदरातील मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी, सुधाकर अपराज व त्यांचे पदाधिकारी, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे सरचिटणीस, केेरसी पारेख व त्यांचे पदाधिकारी, मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष, मिलिंद घनकुटकर, प्लोटीला वर्कर्स असोसिएशनचे उदय चौधरी, मुंबई पोर्ट ट्रस्ट वर्कर्स युनियन व मुंबई पोर्ट ट्रस्ट  एससी एसटी वेल्फेअर असोसिएशनचे सुधीर मकासरे, मुंबई पोर्ट्र ट्रस्ट पेन्शनर्स असोसिएशनचे बाबाजी चिपळूणकर व त्यांचे पदाधिकारी या सर्वांच्या उपस्थितीत  ५ डिसेंबर रोजी सेवेतील कामगारांचा राष्ट्रीय निषेध दिन व १० डिसेंबर रोजी सेवानिवृत्त कामगार व कुटुंबीय यांचा राष्ट्रीय निषेध दिन आणि गरज भासल्यास १७ डिसेंबर रोजी किंवा नंतर बेमुदत संप  करण्याचे सर्वानुमते ठरले आहे, अशी माहिती कामगार नेते मारुती विश्वासराव यांनी दिली आहे. 0000

स्वच्छतारक्षकांच्या आरोग्यासोबतच, सर्वसामान्यांच्या आरोग्याचीही काळजी घ्या !

 ‘धर्मराज्य पक्षा’चे सहसचिव नरेंद्र पंडित यांचे ठामपा आयुक्त सौरव राव यांना पत्र   ठाणे : स्वच्छतारक्षकांच्या आरोग्यासोबतच, सर्वसामान्य ठाणेकर नागरिकांच्याही आरोग्याची प्राधान्याने काळजी घ्यावी, अशी मागणी, ‘धर्मराज्य पक्षा’चे सहसचिव नरेंद्र पंडित यांनी, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. ठाणे शहरातून रोज लाखो टन कचरा, शहराच्या विविध प्रभागांतून गोळा केला जातो. ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत याचे नियोजन केले जाते. सद्यस्थितीत ठाणे शहरातील स्वच्छतेसंदर्भात, समाधानकारक परिस्थिती असली तरी, ज्या वाहनांतून कचरा गोळा केला जातो किंवा वाहून नेला जातो, त्या वाहनांच्या स्वच्छतेबाबत मात्र, ‘आनंदी-आनंद’ असून, ठामपाच्या कचरा गोळा करणाऱ्या वाहनांची अत्यंत दुरवस्था झालेली पहावयास मिळत आहे. यातील बहुतांश वाहने अस्वच्छ असतात आणि या वाहनांतून कचरा टाकून दिल्यानंतरही, त्यामध्ये कचरा तसाच चिकटलेला दिसून येतो. परिणामी, गाडी कचऱ्याने भरलेली असो वा नसो, अस्वच्छतेमुळे या वाहनांतून कायमस्वरुपी दुर्गंधी येतच असते. याचा विपरीत परिणाम हा, अशा कचरावेचक वाहनांवर कार्यरत असणाऱ्या कामगारांच्या आरोग्यावर होत असतो. “कचरा गोळा करणारे कामगार हे, डॉक्टरांप्रमाणेच काम करीत असतात; कारण, ते स्वच्छतारक्षकाच्या भूमिकेतून, नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवत असतात!” अशाप्रकारचे विधान, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव यांनी काही महिन्यांपूर्वी केले होते, याच पार्श्वभूमीवर ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून, ठाणे शहरातील कचरा गोळा करणाऱ्या वाहनांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले आहे. दरम्यान, ठाणे शहरातील कचरा गोळा करुन, शहर स्वच्छ ठेवणाऱ्यांच्या वाहनांची झालेली दुरवस्था तर, ठामपाचे आयुक्त आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची वाहने टापटीप असणे, हा विरोधाभास ठाण्यासारख्या सुसंस्कृत नगरीला नक्कीच भूषणावह नाही, याची आपण प्रकर्षाने नोंद घ्यावी, अशी उपहासात्मक टिपणी धर्मराज्य पक्षाचे सहसचिव नरेंद्र पंडित यांनी, आयुक्तांना पाठवलेल्या पत्रातून केली आहे. दरम्यान, दिल्लीतील वाढते जीवघेणे प्रदूषण पाहाता, ठाणे महानगरपालिका प्रशासनाने, कचरा गोळा करणाऱ्या आणि तो वाहून नेणाऱ्या वाहनांची स्वच्छता राखण्यासाठी ठोस उपाययोजना करावी. अन्यथा, भविष्यात नागरिकांच्या आरोग्याचा बोजा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही पंडित यांनी आपल्या पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. ठाणेकर नागरिक हे ‘करदाते’ आहेत, ठाणेकरांच्या पैशातूनच शहरातील सोयी-सुविधा जनतेला पुरविल्या जातात. त्याचप्रमाणे, कचरा गोळा करणाऱ्या आणि तो वाहून नेणाऱ्या वाहनांची स्वच्छता राखणे हीदेखील एक महत्त्वाची सुविधा असून, अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त वाहने शहरात फिरणे, त्यातून आरोग्याचा प्रश्न निर्माण होणे, हा ठाणेकर करदात्या नागरिकांच्या पैशांचा अपव्यय असल्याचे लक्षात घेऊन, यापुढे ठाणे शहरातील कचरा गोळा करणाऱ्या आणि तो वाहून नेणाऱ्या वाहनांची स्वच्छता राखणेकामी, महापालिका प्रशासनाला आपण योग्य त्या सूचना देऊन, स्वच्छतारक्षकांच्या आरोग्यासोबतच, सर्वसामान्य ठाणेकर नागरिकांच्याही आरोग्याची प्राधान्याने काळजी घ्यावी, अशी मागणी, ‘धर्मराज्य पक्षा’चे सहसचिव नरेंद्र पंडित यांनी, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. ००००

युवा ग्रामिण पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी भूषण साळुंखे

पनवेल : दैनिक भास्करचे रायगड जिल्हा प्रतिनिधी भूषण साळुंखे यांची युवा ग्रामिण पत्रकार संघाच्या रायगड जिल्हाध्यक्ष पदावर नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. युवा ग्रामिण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार…

 देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याने भाजपाचा ठाण्यात आनंदोत्सव

 महाराष्ट्राची प्रगती कायम राहील : संजय वाघुले   ठाणे : भाजपाच्या विधीमंडळ पक्ष गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झाल्यानंतर भाजपाच्या ठाण्यातील कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली वर्तकनगर येथील पक्षकार्यालयासमोर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज दुपारी फटाके फोडत विजयाच्या घोषणा देऊन आनंदोत्सव साजरा केला. भाजपाच्या विधीमंडळ पक्षाची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत विधीमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याचे वृत्त धडकताच, भाजपाच्या वर्तकनगर येथील विभागीय कार्यालयात जल्लोष करण्यात आला. विधानसभा निवडणुकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकसंधपणे केलेली मेहनत फळाला आली असल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली. त्यानंतर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वात मिठाई वाटत महिला कार्यकर्त्यांनी फुगड्या घालून आनंद व्यक्त केला. या वेळी माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्राच्या विकासात २०१४ ते २०१९ या काळात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मोठे योगदान दिले होते. आता पुन्हा देवेंद्र फडणवीस यांची उद्यापासून मुख्यमंत्रीपदी निवड होत आहे, हा समस्त महाराष्ट्रासाठी व भाजपाच्या कार्यकर्त्यांसाठी आनंदाचा क्षण आहे. प्रगतीपथावर असलेला महाराष्ट्र आता भविष्यात आणखी मोठी भरारी घेईल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी व्यक्त केला. तसेच लाडकी बहीण योजनेतील बहिणींना आणखी आर्थिक बळ मिळेल, असे संजय वाघुले यांनी सांगितले. 00000

माझी वसुंधरा अभियानची अंमलबजावणी कोकण विभागात अधिक प्रभावीपणे करावी

कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांचे प्रतिपादन ठाणे : पर्यावरणातील बदल लक्षात घेता माझी वसुंधरा अभियान ५.० हा कार्यक्रम कोकण विभागात वेगाने राबवावा, प्रत्येक यंत्रणेने या अभियानात सक्रिय व्हावे,…

वाशीत रविवारी यमुनाई मातृवंदन सोहळा

नेरूळ : कोकण मराठी साहित्य परिषद व यमुनाई फाउंडेशन यांच्या वतीने यमुनाई मातृवंदन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आयोजक मोहन भोईर यांनी दिली. दरवर्षी समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींना यमुनाई…

आयुष्मान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुलुंड ः मुलुंडचे आमदार मिहीर कोटेचा यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (ता. १) आयुष्मान कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुलुंडमधील ७० वर्षे आणि त्‍यापेक्षा अधिक वय असलेल्‍या ज्येष्ठ नागरिकांना आयुष्मान कार्ड…

ठाणे जिल्ह्यात १५ बालविवाह रोखण्यात यश शिक्षण, गरिबी प्रमुख कारण

ठाणे : एकीकडे देशात मुलींच्या शिक्षणासाठी कोट्यावधींच्या निधीसह विविध योजना राबवल्या जात असल्या तरी आजही जिल्ह्यात शिक्षण सुटल्याने मुलींच्या लग्नगाठी बांधल्या जात असल्याचे दिसून आले आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या वर्षभरात…

ठाणे स्थानक परिसरात बेकायदा फलकबाजी

ठाणे : शहरातील स्थानक परिसरात एका बाजूला महापालिकेने ‘स्थानक परिसरात जाहिराती लावण्यास सक्त मनाई आहे’ असे सूचना फलक लावण्यात आले आहेत. स्थानक परिसर स्वच्छ ठेवण्याकरिता प्रशासनाकडून संदेश दिला जात आहे.…