Category: ठाणे

Thane news

नववर्षाचे औचित्य साधून आजोबा गडावर राबवली स्वच्छता मोहिम

कल्याण : शंभुदुर्ग संघटनेच्या वतीने दरवर्षी नवीन वर्षाचे निमित्त साधून दोन दिवसीय गडकिल्ले स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात येते.  दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा संघटनेच्या वतीने शहापूर तालुक्यातील आजोबा गडावर स्वछता मोहिमेचे…

 ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून ११ शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू

ठाणे : जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत ११ शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया नोव्हेंबर, २००५ पूर्वी सुरू झाल्यामुळे ११ शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली आहे.  ठाणे गिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या मात्र नोव्हेंबर २००५ पूर्वी भरती प्रक्रिया सुरू झालेल्या शिक्षकांना यापूर्वी परिभाषित अंशदान योजना लागू करण्यात आली होती. मा. उच्च न्यायालयाने एका याचिकेत या शिक्षकांच्या सेवेबाबत पडताळणी करून जुनी निवृत्ती वेतन योजना लागू होते किंवा कसे याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने संबंधित शिक्षकांची सुनावणी घेऊन कागदपत्रे पडताळणी अंती या ११ शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया नोव्हेंबर, २००५ पूर्वी सुरू झाल्यामुळे ११ शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे.याबाबत विशेष पाठपुरावा प्रत्येक सोमवारी आढावा बैठक घेऊन शिक्षकांचा बराच काळ प्रलंबित असलेले विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न जिल्हा परिषदे मार्फत करण्यात येत आहेत. कामकाजाचा वेळोवेळी पाठपुरावा होत असल्याने ११ शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली आहे.  याबाबत संबंधित शिक्षक व शिक्षक संघटना यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी (प्राथ) बाळासाहेब राक्षे यांचे आभार व्यक्त केले आहेत. 000000

वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ ४२६ शिक्षकांना मंजूर

ठाणे : राज्यात २०१४ मध्ये सहावा वेतन आयोग लागू करण्यात आला असून जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण विभागातील ४२६ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा परिषदे मुख्य कार्यकारी…

वंचितांचा रंगमंच शहरी व ग्रामीण भागात अभिव्यक्ती प्रेरणेसाठी महत्त्वाचा – ॲड. इंदवी तुळपुळे

ठाणे : ठाण्यासारख्या मोठ्या शहरातील वस्ती मध्ये विचारांना चालना देणारा वंचितांचा रंगमंच उपक्रम ११ वर्ष सातत्याने चालू राहणे हे त्या समाजातील मुलांच्या वैचारिक प्रगतीसाठी अतिशय महत्वाचे आहे. छोटी शहरे आणि…

मुरबाड रस्त्यावरील लांबलचक खड्ड्यांमुळे प्रवासी त्रस्त

कल्याण – कल्याण शहरातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुरबाड-शहाड रस्त्यावर प्रेम ऑटो चौक येथे काही यंत्रणांनी भूमिगत सेवावाहिन्या टाकण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून खोदून ठेवले आहे. खोदाई केलेला भाग पेव्हर ब्लॉक किंवा काँक्रीटने…

अंध खेळाडूंची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा दिमाखात सुरू

ठाणे : रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रल तर्फे आयोजित केलेल्या काॅक्वेस्ट २०२४ या अंध खेळाडूंच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेस आज सेंट्रल मैदानावर दिमाखात सुरूवात झाली. ब्लाइंड वेल्फेअर असोसिएशनच्या सहकार्याने ही स्पर्धा…

२५वी रोचेस खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धा

अथर्व सोनीला विजेतेपद ठाणे : आपल्यापेक्षा सरस गुणांकन असलेल्या वरिष्ठ बुद्धिबळपटूंना मागे टाकत १५ वर्षीय अथर्व सोनीने रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ आयोजित २५ व्या रोचेस खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले. स्पर्धेत अव्वल स्थान पटकावताना अथर्वने सात फेऱ्यांमध्ये साडे सहा गुणांची कमाई करत पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस आपल्या खिशात टाकले. अनिरुद्ध पोतवाड आणि ऋषी कदम अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले. सहाव्या फेरीअखेर विजेतेपदासाठी चुरस निर्माण झाली होती. साडे पाच गुण असलेल्या अथर्वने सातव्या फेरीत फिडे मास्टर  अनिरुद्ध पोतवाडला मात देत विजयासह आपले वर्चस्व राखले. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी चौघांमध्ये चढाओढ होती. सहा गुणांसह बरोबरीत असलेल्या अनिरुद्ध आणि ऋषीने  जास्त गुणाकणांची नोंद करत इतरांना मागे टाकले. वडील सत्यभान सोनी यांच्या मार्गदर्शनाखाली अथर्व वयाच्या सहाव्या वर्षांपासून बुद्धिबळाचे धडे गिरवत आहे. अथर्व बदलापूर येथील एअरसन इंग्लिश स्कुलमध्ये नवव्या इयत्तेत शिकत आहे. स्पर्धेत दीडशेहून अधिक बुद्धिबळपटू सहभागी झाले होते. त्यात ७७ आंतरराष्ट्रीय गुणांकन असलेल्या बुद्धीबळपटूंचा समावेश होता. स्पर्धेतील इतर निकाल : ८ वर्षे वयोगट मुले : शिवांश करीआ, निवेश पांचाळ, सात्विक प्रधान. मुली : मिराई सरदाना, डेलिया खैरनार, मनवा पारकर. ११ वर्षे वयोगट मुले : आराध्य पार्टे, नीद्वयुष आनंद, आर्यन पांडे. मुली : मेहूली मुखर्जी, त्रिशा पांचाळ आराध्या धेंडे. १५ वर्षे वयोगट : सोनी अथर्व, विवान सरदाना, हिंदोळ घोष. मुली : गिरिशा पै, जीअना धरमसी, महती रामकुमार. सर्वोत्तम वयस्कर बुद्धिबळपटू : अनिल सनदांशी. सर्वोत्तम महिला खेळाडू : वनश्री कुन्नेकर. बिगर गुणांकित : ऋषी मोटवानी.

माजी महापौर दिवंगत सतीश प्रधान यांना

– ठाणे महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वाहिली श्रद्धांजली ठाणे : ठाणे महानगरपालिकेचे पहिले महापौर आणि माजी खासदार सतीश प्रधान यांच्या प्रतिमेला अभिवादन करून महापालिका मुख्यालय येथील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात त्यांना महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी श्रद्धांजली वाहिली. सतीश प्रधान यांचे रविवार, २९ डिसेंबर रोजी निधन झाले. सोमवार, ३० डिसेंबर रोजी कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपूरे, विधि अधिकारी मकरंद काळे, महिला व बालविकास अधिकारी दयानंद गुंडप, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. ठाण्याचे सुपूत्र सतीश प्रधान यांचे ठाणे शहराच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. त्यांनी ठाणे महानगरपालिकेचे पहिले महापौरपद भुषविले. ते २१.०३.१९८६ ते ३०.०३.१९८७ या काळात महापौर होते. तत्पूर्वी, ठाण्याचे नगराध्यक्ष आणि महापौरपदानंतर राज्यसभेचे दोनदा खासदार झाले.

महापालिकेच्या डास प्रतिबंधाच्या नियमास गृहसंस्थांचा विरोध

 कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील ५० पेक्षा अधिक सदनिका असलेल्या गृहसंकुलांनी अधिकृत पेस्ट कंट्रोल एजन्सी नेमून डास आळीनाशक औषधांची फवारणी करण्याचे परिपत्रक महापालिका प्रशासनाने काढल्यानंतर यास आता गृहनिर्माण संस्थेच्या संघटनेने विरोध केला आहे. परिपत्रकानुसार गृहसंकुलात डासांच्या आळ्या आढळल्यास दंडही भरावा लागणार आहे. महापालिकेच्या या परिपत्रकाचा गृहनिर्माण संस्थेच्या संघटनेने विरोध केला आहे. तसेच महापालिकेच्या कारवाईला देखील सामोरे जाण्याचा तयारी दर्शविली आहे. तसा ठरावच संघटनेने केला. संघटनेच्या या निर्णयास ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर यांनीही पाठिंबा दर्शविला आहे. महापालिकेच्या निर्णयामुळे आता वाद पेटण्याची चिन्हे आहेत. दि ठाणे ड्रिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशन आणि ठाणे जिल्ह्याच्या सहकार विभागाच्या वतीने सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अधिवेशन भरविले होते. यावेळी गृहनिर्माण संस्थांचा पूनर्विकास, समस्या याविषयी संस्थांतील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. ठाणे महापालिका क्षेत्रात डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी महापालिकेकडून फवारणी केली जाते. महापालिकेने नुकताच एक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, ५० पेक्षा जास्त सदनिका असलेल्या गृहसंकुलांना स्वत:च डास प्रतिबंधक फवारणी करावी लागणार आहे. तसेच डासांच्या आळ्या आढळल्यास दंडही भरावा लागणार आहे. महापालिकेने गृहनिर्माण संकुलांना नोटीसा देखील बजावल्या आहेत. या निर्णयास दि ठाणे ड्रिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशन या गृहनिर्माण संस्थेच्या संघटनेने विरोध केला. संमेलनामध्ये फेडरेशनचे महापालिकेच्या परिपत्रकाचा विषय निघाला. फवारणीचा खर्च उचलणार नाही. गुन्हा दाखल झाल्यास त्यास आम्ही तयार आहोत. लोकप्रतिनिधींनी हा विषय प्राधान्यांने मांडायला हवा असे ते म्हणाले. यास खासदार नरेश म्हस्के आणि आमदार संजय केळकर यांनीही पाठिंबा दिला. फवारणी करण्यासाठी महापालिका पत्रक काढत असेल तर नागरिकांनी हे पैसे भरू नका असे म्हस्के म्हणाले. असे परिपत्रक महापालिकेने तातडीने रद्द केले पाहिजे. याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. तातडीने हे परिपत्रक रद्द करून घेऊ असेही केळकर म्हणाले. कचरा, मलनिस्सारण वाहिन्या, रस्ते आम्हीच स्वच्छ करायचे. आता डासांचा प्रतिबंधही आम्ही करायचा, मग महापालिका केवळ दंड लावून कर घेणार का? ठाणे महापालिकेच्या निर्णयाला आमचा पूर्णत: विरोध आहे. -सिताराम राणे, अध्यक्ष, दि ठाणे ड्रिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशन. मुख्यमंत्र्यांचा मोबाईलद्वारे संवाद देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे केंद्र सरकारने सात दिवस राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. या कार्यक्रमास भाजपचे आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते. फडणवीस यांनी दरेकर यांच्या मोबाईलवर संपर्क साधून उपस्थितांशी संवाद साधला. या संमेलनातील निर्णय, अडचणींबाबत मुंबईत बैठक बोलविणार असल्याचे फडणवीस म्हणाले. तक्रारीत ठाणे जिल्हा अग्रेसर कोकण विभागातील गृहनिर्माण संस्थेच्या तक्रारींपैकी ८० टक्के तक्रारी या ठाणे जिल्ह्यातील असतात. यामध्ये निवडणुक, परिक्षण, विशेष सभा, पूर्नविकास या विषयांवरील तक्रारी अधिक आहेत. कायद्याच्या अभावामुळे या तक्रारी वाढलेल्या दिसून येते. गृहनिर्माण सोसायट्यांमधील पदाधिकारी आणि तक्रारदारांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळेच तक्रारी वाढत असल्याचे सहकार विभागाचे सह-निबंधक मिलिंद भालेराव यांनी सांगितले. जिल्ह्यात ३० हजाराहून अधिक सोसायट्या आहेत त्यापैकी केवळ ५० टक्केच सोसायट्यांचे परिक्षण झाले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 00000

मुंबई नाशिक महामार्गावर कारला लागलेल्या आगीमळे महामार्गावर वाहतुक कोंडी

ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील दिवे अंजूर भागात सोमवारी सकाळी एका कारला अचानक आग लागली. या घटनेमुळे परिसरात वाहतुक कोंडी झाली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या…