Category: ठाणे

Thane news

विरोधक मुक्त मतदारसंघाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष

    ठाणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या वागळे इस्टेट भागातून पाचवेळा काँग्रेस पक्षातून नगरसेवक म्हणून निवडून आलेले आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात दोनदा विधानसभेची निवडणूक लढलेले मनोज…

 राजन विचारेंची केवळ राबोडीत तर, संजय केळकरांची संपुर्ण ठाण्यात गाडी सुसाट

    ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदार संघातुन विजयी झालेले भाजपचे उमेदवार संजय केळकर यांना राबोडी परिसर वगळता नौपाड्यापासून ते घोडबंदरपर्यंतच्या ९ पैकी ८ प्रभागात मताधिक्य मिळाले तर, मुस्लीम…

शहरात वर्षभर संविधान गौरव अभियान राबविणार – राजाभाऊ चव्हाण

    ठाणे : रेल्वे स्थानक परिसरात गटई चर्मकार समाज कामगार संघटना आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ढोलताशांच्या गजरात…

‘वुई आर फॉर यु’ च्या टिममुळे मोठी दुर्घटना टळली

    ठाणे : नौपाडा विभागातील एम जी रोड महापालिका पेटीजवळील महापालिकेच्या इलेक्ट्रिक पॅनल जवळ केबलमुळे लागलेल्या छोट्याश्या आगीने जवळ असलेल्या झाडाला पेट घ्यायला सुरुवात झाली. रस्त्यावर ये जा करणाऱ्या…

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने संविधान दिन साजरा

    ठाणे : भारतीय संविधान दिनानिमित्त, मंगळवार २६ नोव्हेंबर रोजी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. भारतीय संविधानास ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात संविधान अमृत महोत्सवी…

अंबरनाथच्या शेतकऱ्यांचे बेमुदत आमरण उपोषण!

 वडोदरा महामार्ग भूसंपादनाच्या मोबदल्यात घोटाळा; ठाणे : जिल्ह्यातून वडोदरा राष्र्टीय महामार्ग जात आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या शेत जमिनी संपादीत केलेल्या आहे. त्यानुसार अंबरनाथ तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांचीही शेतजमीन संपादीत झाली आहे. पण त्या बदल्यात त्यांना मोबदला मिळाला नसून तो परस्पर काढून घेतल्याचा आरोप करीत त्याविरोधात संबंधित आदिवासी शेतकरी बळीराज सेना या संघटनेच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर आजपासून बेमुदत अमरण उपोषणाला बसले आहेत. सडक परिवहन व राज्यमार्ग मंत्रालय भारत सरकारच्या वडोदरा महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या शेत जमिनी मोठ्याप्रमाणात भूसंपादीत करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील मौजे दहिवली, ता. अंबरनाथ, येथील स.नं. ६/३ मध्ये क्षेत्र ०.३५.४० हेक्टर जमिनीचे भूसंपादनही झालेले आहे. मात्र या जमिनीचा माेबदला संबंधित शेतकऱ्यांना न मिळता ताे परस्पर काढून भ्रष्टाचार केल्याचा आराेप या उपाेषणकर्त्या शेतकऱ्यांकडून केला जात आहे. या भ्रष्टाचाराला कारणीभूत असलेले संबधीत प्रांत अधिकारी व दलाल यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि संबंधित शेत जमिनीचा माेबदला मुळमालकाला मिळावा, या मागणीसाठी न्याय मिळावा यासाठी १३ आदिवासी शेतकरी आजपासून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत अमरण उपाेशणाला बसले, असे या बळीराज सेनेचे संपर्कप्रमुख दशरथ भाेईर यांनी लाेकमतला सांगितले आहे. अंबरनाथ तालुक्यातील दहिवली येथील सर्वे नंबर ६/३ मधील आदिवासी शेतकऱ्याची ०.३५.४० हेक्टर जमीन या वडाेदरा राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन झाले आहे. या शेत जमिनीचा मोबदला साधारणतः पाच कोटी ७७ लाख रूपये असा असतांना सातबाऱ्यावरील (७/१२) वारसांना प्रत्येकी १० लाख रूपये खात्यावर टाकणेत आले. त्यानुसार एकुण एक कोटी ७० लाख रूपये वारसांच्या खात्यावर पडले. परंतु त्यातील ही ७६ लाख रूपये प्रांत अधिकारी व दलाल यांचे नांवे नेरल बँकेतून परस्पर गेले, असा आराेप या उपाेषणकर्त्या शेतकऱ्यांकडून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आलेल्या तक्रारीत केलेला आहे. बेकेतुन परस्पर काढलेल्या रकमे व्यतिरिक्त उर्वरित रक्कम चार कोटी सात लाख रूपये दोन व्यक्तींच्या नांवे राहिली. परंतु ती रक्कम देखील प्रांत व दलाल यांनी परस्पर गायब केल्याचा आराेप या आदिवासी शेतकऱ्यांकडून केला जात आहे. हा घाेळ गंभीर स्वरूपाचा असुन आदिवासी शेतकऱ्यावर अन्याय करणारा आहे. त्याविराेधात कडक चौकशी करून आदिवासी शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी बेमुदत उपाेषणकर्ते बळीराज सेनेचे पदाधिकारी व संबधीत आदिवासी शेतकऱ्यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 0000

ठाण्यात प्रथमच गृहनिर्माण संस्थाचे महाअधिवेशन

ठाणे : शहरात जून २०२४ मध्ये प्रथमच होणारे गृहनिर्माण संस्थांचे महाअधिवेश आणि प्रदर्शन कोकण पदवीधर निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आले होते. हे अधिवेशन आता, २० ते २२ डिसेंबर या कालावधीत उपवन…

बाल विवाह प्रथेविरुध्द जिल्ह्यात चित्ररथाद्वारे होणार जाणीव जागृती कार्यक्रम

  ठाणे : बालविवाह प्रतिबंध दिनानिमित्त ठाणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय व सेवा संस्था/महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट (डॉ. कैलास सत्यर्थी फाऊंडेशन संलग्न भारत सरकार) यांच्या संयुक्त विद्यमाने…

 पुरुषांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी नसबंदी पंधरवडा

 ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कुटुंब नियोजनात   ठाणे : कुटुंब नियोजनात पुरुषांच्या सहभागास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ठाणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रात २१ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२४ या कालावधीत पुरुष नसबंदी…

 पुरुषांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी नसबंदी पंधरवडा

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कुटुंब नियोजनात   ठाणे : कुटुंब नियोजनात पुरुषांच्या सहभागास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ठाणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रात २१ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२४ या कालावधीत पुरुष नसबंदी…