Category: ठाणे

Thane news

हितेंद्र ठाकूर यांचा पराभव करणाऱ्या स्नेहा दुबे-पंडित कोण आहेत ?

वसई : विरारमध्ये गेली 35 वर्ष एक हाती सत्ता असलेल्या हितेंद्र ठाकूर यांना या निवडणूकीत जबरी पराभवाला सामोरे जावं लागलं. त्याच्या तिन्ही विद्यमान सीट भाजपा आणि शिवसेनेने जिंकून बहुजन विकास…

 ठाणे जिल्ह्यात मंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात ?

 रविंद्र चव्हाणांसह गणेश नाईक, किसन कथोरे, बालाजी किणीकर चर्चेत बदलापूरः एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळणार का ही चर्चा देशभर सुरू असतानाच त्यांच्याच ठाणे जिल्ह्यात मंत्रीपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. विद्यमान मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह माजी पालकमंत्री गणेश नाईक, पाच वेळा आमदार राहिलेले मुरबाडचे किसन कथोरे आणि एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अंबरनाथचे डॉ. बालाजी किणीकर यांच्या नावांची चर्चा रंगली आहे. भाजपचे अभ्यासू चेहरा असलेले संजय केळकर, प्रताप सरनाईक यांचीही नावे चर्चेत असल्याचे बोलले जाते. त्यातही एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदावरून बरीचशी समीकरणे बदलतील अशीही चर्चा आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातून कुणाच्या गल्यात मंत्रीपदाची माळ पडते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ठाणे जिल्ह्यात १८ विधानसभेच्या जागांवर महायुतीने निर्विवाद वर्चस्व मिळवले. मुंब्रा कळवा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाचे जितेंद्र आव्हाड आणि भिवंडी पूर्व मतदारसंघात समाजवादी पक्षाचे रईस शेख वगळता सर्व जागांवर महायुतीने विजय मिळवला. यात भाजपने एरोली, बेलापूर, ठाणे, डोंबिवली, भिवंडी पश्चिम, कल्याण पूर्व, उल्हासनगर, मुरबाड, मीरा भाईंदर हे मतदारसंघ जिंकले. तर कोपरी पाचपखाडी, ओवळा माजीवडा, कल्याण ग्रामीण, कल्याण पश्चिम, अंबरनाथ आणि भिवंडी ग्रामीण मतदारसंघ शिवसेनेने जिंकले. शहापूर हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने (अजित पवार) जिंकला. जिल्ह्यात महायुतीच्या मोठ्या विजयानंतर आता मंत्री पदासाठीही ज्येष्ठ आमदारांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पुन्हा मुख्यमंत्रीपदाची माळ पडेल का याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यांच्यासोबत मंत्रीमंडळात असलेले रविंद्र चव्हाण यांना पुन्हा संधी मिळण्याची चर्चा आहे. माजी पालकमंत्री गणेश नाईक यंदा मंत्रीपदाचे दावेदार मानले जातात. तर पाचव्यांदा आमदारपदी निवडून आलेले मुरबाडचे किसन कथोरे यांनी निकालाच्या दिवशीच आपल्याला मंत्रीपद मिळावे ही कार्यकर्त्यांची मागणी असल्याचे सांगत दावा केला आहे. तर चौथ्यांदा आमदार झालेले आणि एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अंबरनाथचे डॉ. बालाजी किणीकरही मंत्रीपदाच्या स्पर्धेत आघाडीवर आहेत. ओवळा माजीवडा मतदारसंघाचे प्रताप सरनाईक आणि भाजपचा अभ्यासू चेहरा असलेले संजय केळकर यांचीही नावे चर्चेत आहेत. एकनाथ शिंदेंच्या मंत्रीपदावर समीकरणे अवलंबून एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळते की ते एखादे दुसरे खाते सांभाळतील यावरून ठाणे जिल्ह्यातील मंत्रीपदाची समीकरणे अवलंबून असल्याचे बोलले जाते. एका जिल्ह्यात किती मंत्रीपदे मिळतील हाही मोठा प्रश्न आहे. त्यात भाजपचे पारडे यंदा जड मानले जाते. मात्र जिल्ह्यात एकनाथ शिंदे आपला वरचष्मा ठेवतील अशी शक्यता आहे. त्यामुळे भाजपतील काहींचा हिरमोड होऊ शकतो असेही बोलले जाते. नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निकष पाळल्यास काहींना अनपेक्षित मंत्रीपदाला लाभ होऊ शकतो, अशीही चर्चा आहे. 00000

मुख्यमंत्रिपदी शिंदेच हवेत

 ठाण्यातील मंदिरांमध्ये शिंदे गटाची आरती   ठाणे : महायुतीची सत्ता आल्यानंतर शिंदे गट आणि भाजपमध्ये आता मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू झाला आहे. एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिंदे गटाने ठाण्यातील कोपरी येथील मंदिरात आरती आयोजित केली होती. या आरती दरम्यान महिलांनी एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र असलेले फलक हाती घेतले होते. विधानसभा निवडणूकीत महायुतीला सत्ता मिळाली आहे. भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आल्याने आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी चढाओढ लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुख्यमंत्री त्यांच्याच पक्षाचा व्हावा अशी मागणी करत आहेत. दरम्यान, कोपरी येथील दौलतनगर परिसरातील एका मंदिरात शिवसेना शिंदे गटाने आरती आयोजित केली होती. यावेळी शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. मुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदे यांना मिळावे अशी मागणी महिला पदाधिकाऱ्यांनी केली. 00000

 श्री माँ विद्यालय तब्बल 281 धावांनी विजयी

 8 वी एन. टी. केळकर 16 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा अथर्व गावडेच्या 104 धावा तर अद्विक मंडलिकने केले 7 गडी बाद   ठाणे, दि. 25 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर 48…

विद्यावेतनपासून पालिकेचे शिक्षक वंचित

वाशी –  राज्यातील युवकांना चांगल्या नोकऱ्या आणि उपजीविकेच्या संधीसाठी आवश्यक असणाऱ्या कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे, मात्र या योजनेतून…

आरक्षण नाही दिल्यास मराठा समाज छाताडावर बसेल- जरांगे

जालना : सरकारने बेईमानी करू नये. सरकारचा शपथविधी झाल्यानंतर आम्ही समाजाची बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरविणार आहोत. जर आम्हाला दगा दिला तर मराठे छाताडावर बसतील, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी…

उभ्या हयातीत असा निकाल पाहिला नाही- शरद पवार

पुणे : “आमची अपेक्षा होती तसा निकाल लागला नाही. पण शेवटी लोकांनी निर्णय दिला आहे. त्यामुळे मी माझ्याकडे काही अधिकृत काही माहिती नाही तोपर्यंत आतापर्यंतची जी व्यवस्था आहे त्यावर भाष्य करणार नाही. निर्णय लोकांनी दिला आहे. अनेक…

जप्त वाहनांचा होणार लिलाव

ठाणे : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. विभागाच्या वायुवेग पथकाने कारवाईत जप्त केलेल्या ४० वाहनांचा या लिलावात समावेश आहे.…

राज्यात जातीय विभाजनाचा प्रयत्न कधीही घडला नव्हता पृथ्वीराज चव्हाण यांची खंत

कराड : भाजपच्या नेत्यांकडून मराठा विरुद्ध इतर मागासवर्गीय (ओबीसी), आदिवासी विरुद्ध धनगर, हिंदू दलित विरुद्ध बुद्धिस्ट दलित असे विभाजन करण्याचा प्रयत्न झाला. हे राज्याच्या भविष्याकरिता धोकादायक असून, महाराष्ट्रात असे कधीही…