Category: ठाणे

Thane news

येऊर येथील गोशाळेत युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी केले गोमातेचे विधिवत पूजन

अनिल ठाणेकर   ठाणे : आमदार प्रताप सरनाईक यांच्यावतीने भागवत सत्संग सनातन राष्ट्रसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रसंमेलनाचा समारोप करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत देशी गायीला राज्यमाता – गोमाता म्हणून मान्यता देण्यात आल्याचा व देशी गाईंच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना लागू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. याचे औचित्य साधून मंगळवारी येऊर येथील गोशाळेला युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी भेट दिली. या ठिकाणी ब्राह्मणांच्या उपस्थितीत गोमातेची विधिवत पूजा पुर्वेश सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी युवासेना ठाणे लोकसभा अध्यक्ष विराज निकम व नितीन लांडगे, युवासेना पालघर निरिक्षक सिद्धार्थ पांडे, ठाणे जिल्हा सचिव अभिषेक शिंदे, जिल्हा समन्वयक अर्जुन डाबी, विधानसभा निरिक्षक किरण जाधव, ओवळा माजिवडा विधानसभा अध्यक्ष देवेंद्र साळवी, युवासेना ठाणे विधानसभा अध्यक्ष जितेश गुप्ता, विधानसभा उपाध्यक्ष विकेश भोईर, अशफाक शेख, अमित यादव, राकेश जयस्वाल, युवासनेचे  प्रतिक भालेराव, साई ढवळे, सागर राजपुत, संदीप तिवारी, सोहम सुर्वे, सुजय पाटील, आदेश वाघमारे, युवतीसेना कोअरकमिटी सदस्य पुजा लोंढे यांच्यासह युवासेना पदाधिकारी व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गाय ही आपल्यासाठी पूजनीय आहे. तिच्या गर्भात ३३ कोटी देवांचा वास असतो. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभरात गायींचे पूजन करण्यात येईल. तसेच तिच्या देखभालीसाठी राज्य सरकारने अनुदान देण्याचा निर्णयही घेतला असून त्यामुळे गोमातेचे जतन केले जाईल. राज्य सरकारने देशी गायीला राज्यमाता – गोमाता म्हणून मान्यता दिल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. याबद्दल पुर्वेश सरनाईक यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनःपूर्वक आभार मानले. राज्यभरात युवा सैनिक गोशाळांना भेट देऊन ते गोमातेचे पूजन करतील. तसेच या शासन निर्णयाची प्रत गोशाळांना देण्यात येईल. युवासेनेच्या माध्यमातून या शासन निर्णयाची जनजागृती राज्यभरात करण्यात येईल, अशी माहिती पूर्वेश सरनाईक यांनी दिली.

 विद्यार्थ्यांनी पारसिक रेतीबंदर येथे साकारली मानवी साखळी

 महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतला सफाई मोहिमेत सहभाग   ठाणे : ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानात मंगळवारी पारसिक रेती बंदर येथे प्लास्टिकच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या साखळीचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानात परिसरातील हजारो विद्यार्थी सहभागी झाले. प्लास्टिकमुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यासाठी मोठ्या आकाराचा देव मासा आणि त्याच्या पोटात साठलेला प्लास्टिकचा कचरा हे प्रतिक साकारण्यात आले. तसेच, विद्यार्थ्यांनी प्लास्टिक न वापरण्याची प्रतिज्ञाही यावेळी केली. या उपक्रमास महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी भेट दिली. घोषवाक्यांसह सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले. याच निमित्ताने, पारसिक रेतीबंदर घाट येथे साफसफाई मोहिमेचेही आयोजन करण्यात आले होते. त्यात महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले. विसजर्न घाटावर वाहून आलेले निर्माल्य, तरंगता कचरा यावेळी बाहेर काढण्यात आला. बुधवारी होणार सांगता ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाअंतर्गत गेले पंधरा दिवस सुरू असलेल्या उपक्रमांची सांगता, तसेच स्पर्धांच्या पारितोषिक वितरणाचा सोहळा बुधवार, ०२ ऑक्टोबर रोजी उपवन तलावालगतच्या अॅम्फी थिएटर येथे होणार आहे. या सोहळ्यातही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन उपायुक्त (घनकचरा) मनीष जोशी यांनी केले आहे. 00000

आशा कॅन्सर ट्रस्टतर्फे कर्करोगमुक्त रूग्णांसाठी `रोझ डे’ साजरा

ठाणे : आशा कॅन्सर ट्रस्टतर्फे कर्करोग मुक्त रूग्णांसाठी २९ सप्टेंबर रोजी `रोझ डे’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. १५० हुन अधिक कर्करोगमुक्त रुग्ण, नातेवाईक, डॅाक्टर, हॅास्पिटल स्टाफ, पाहुणे कलाकार सर्व मिळुन…

कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याजवळील ४० फुटी रस्त्यावरील २२ अतिक्रमणे जमीनदोस्त

 भटाळे तलाव बुजवून उभारली होती बेकायदा बांधकामे   कल्याण : कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या भटाळे तलावात भराव टाकून या भागातील ४० फुटी विकास आराखड्यातील रस्त्यावर स्थानिकांनी बेकायदा व्यापारी…

बेरजेचे राजकारण कराल तर 85 मतदारसंघात वजाबाकी करू – आंदोलकांचा इशारा

 आदिवासींचे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उलगुलान ठाणे : राज्य सरकारने धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गात म्हणजेच अनुसूचित जमातीअंतर्गत आरक्षण देण्यासाठी समिती गठीत केली आहे. त्या निषेधार्थ तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गात धनगरांचा समावेश…

किमान वेतन सल्लागार समितीची स्थापना त्वरित करा – जगदीश उपाध्याय

अनिल ठाणेकर   ठाणे : किमान वेतन सल्लागार समितीची स्थापना न झाल्याने, कामगार किमान वेतनापासून वंचित झाले आहेत यामुळे तत्काळ किमान वेतन सल्लागार समितीची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र…

कर्मवीर अण्णांची शिकवण घेऊन कतृत्वाने मोठे व्हा- लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : बहुजन समाजासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची गंगा आणली, त्यांच्या शिकवणीतून समाज समृद्ध झाला, त्यामुळे कर्मवीर अण्णांची शिकवण घेऊन कतृत्वाने मोठे व्हा, असा मोलाचा सल्ला रयतचे मॅनेजिंग कौन्सिल…

दैवज्ञ ब्राह्मण समाजाचा कौतुक सोहळा २०२४ संपन्न

ठाणे : दैवज्ञ ब्राह्मण समाज ठाणे या संस्थेच्या वतीने काल रविवार, 29 सप्टेंबर रोजी मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे येथे नाना शंकर शेट यांचे १५९ वे पुण्यस्मरण आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ…

महात्मा गांधी जयंती दिनी ठाण्यात शांती यात्रा – जगदीश खैरालिया

ठाणे : ठाण्यातील विविध समविचारी संस्था – संघटना आणि शांतताप्रिय व संविधानवादी ठाणेकर नागरिकांनी महात्मा गांधी जयंती दिनी २ ऑक्टोबर रोजी शांती यात्रेचे आयोजन केले आहे. महात्मा गांधी उद्यान, तलाव…

 मुंब्रावासियांबाबत ठाणे महापालिकेचा दुजाभाव

 पाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे बेमुदत धरणे आंदोलन अनिल ठाणेकर   ठाणे : महानगर पालिकेवर सध्या राज्य सरकारचा हस्तक्षेप वाढीस लागला आहे. त्यामुळेच विरोधकांचे प्राबल्य असलेल्या विभागाबाबत दुजाभाव केला जात आहे. त्याचाच…