Category: ठाणे

Thane news

कर्जत नवनिर्वाचित तहसीलदार धनंजय जाधव यांचे उप अधीक्षक भूमि अभिलेख कर्जत नितीन आटाळे आणि शिरस्तेदार शैलेश जाधव यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

आज ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा- मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या…

‘ब्रो ठाणे बदलतंय!’ गणेश-विसर्जन मिरवणुक उत्साहात

ठाणे : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना अभिप्रेत असणारे तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘ठाणे बदलतंय’ या विषयावर स्वातंत्र्यवीर सावरकरनगरातील सार्वजनिक उत्सव मंडळाने…

माजी ज्येष्ठ नगरसेवक विक्रम मोरे यांचे निधन

ठाणे : ठाण्यातील चंदनवाडी परिसरातील ज्येष्ठ माजी नगरसेवक तथा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पहिले नियुक्त केलेले विभागप्रमुख असलेले विक्रम गणपत मोरे यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी सकाळी निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय…

शनिवारपासून भारतात प्रथमच जागतिक फिटनेस फेस्टीवल

ठाणे –  शनिवार आणि रविवारी गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे जागतिक फिटनेस फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलमध्ये जगभरातील सुमारे सात हजार स्पर्धक सहभागी होणार आहेत, अशी माहिती आयोजक एक्टवफिट…

 धनगरांना आरक्षण दिले तर ८५ मतदार संघात भूमिका घेऊ,

आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीचा राज्य सरकारला इशारा   ठाणे : धनगर ही जमात नसून जात असल्याने त्यांना आदिवासी कोट्यातून आरक्षण देता येऊ शकत नाही, असा दावा संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी धनगर आरक्षणास विरोध केला आहे. तसेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडवर धनगर समाजाला आरक्षण देऊन बेरजेचे राजकारण करत असाल तर, राज्यातील ८५ मतदार संघांमध्ये निर्णायक भुमिका घेऊन वजाबाकीचे राजकारण करू, असा इशारा समिती पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारला दिला आहे. राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा आरक्षण वाद रंगला असतानाच, त्यापाठोपाठ आता आदिवासी विरुद्ध धनगर समाज असा वाद रंगला आहे. संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीचे मधुकर तळपाडे, दिपक पेंदाम, हंसराज खेवरा, ॲड शशिकांत नागभिडकर, सुनील झळके यांच्या इतर पदाधिकाऱ्यांनी बुधवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन धनगर समाजाला आदिवासी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. धनगर समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी राज्य सरकारने एक समिती गठीत केली आहे. ही समिती धनगर आणि धनगड एकच असल्यासंबंधीचा अहवाल शासनाला सादर करेल आणि त्यानंतर राज्य सरकार स्वतंत्र अध्यादेश काढेल, असा निर्णय महायुतीने घेतला आहे. परंतु धनगर ही जात असून ती जमात नाही. ते आदिवासी असल्याचे निकष पुर्ण करू शकत नसल्यामुळे ते आदिवासी नाहीत. राज्याच्या अनुसुचित जमाती यादीत क्रमांक ३६ वर ओरॉन, धांगड आहेत. राज्यात ओरॉन, धांगड, धनगड या जमाती अस्तित्वात नाहीत. परंतु इतर राज्यात त्या जमाती आहेत. धनगर या जातीचा धांगड, धनगड या जमातीशी तिळमात्रही संबंध नाहीत, असे मधुकर तळपाडे यांनी सांगितले. उत्तरप्रदेशातील अलाहाबाद न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने धनगर समाजाला आरक्षण नाकारले आहे. असे असतानाही राज्य सरकार धनगर समाजाला आदिवासी कोट्यातून आरक्षण देत असेल तर ते घटनात्मक तरतुदी आणि न्यायालयीन निर्णयाशी विसंगत असण्याबरोबरच घटनाबाह्य असेल, असेही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडवर धनगर समाजाला आरक्षण देऊन बेरजेचे राजकारण करत असाल तर, राज्यातील ८५ मतदार संघांमध्ये निर्णायक भुमिका घेऊन वजाबाकीचे राजकारण करू. याशिवाय, राज्यातील विधानसभेच्या २५ जागा आदिवासी समाजासाठी आरक्षित आहेतच, असा इशारा देत आता राज्य सरकारने ठरवायचे आहे की अध्यादेश काढायचा की नाही, असे त्यांनी सांगितले.

अनंत चतुर्दशीला महापालिका क्षेत्रात ८५२३ श्रीगणेश मूर्तींचे भावपूर्ण विसर्जन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली शहरातील विसर्जन घाटांना भेट   ठाणे : अनंत चतुर्दशीला ठाणे महापालिका क्षेत्रातील विसर्जनस्थळांवर एकूण ८५२३ गणेश मूर्तींचे महापालिकेच्या सुव्यवस्थित नियोजनामध्ये विसर्जन संपन्न झाले. त्यात सार्वजनिक मंडळाच्या ३२१ गणेश मूर्तीही होत्या. पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची परंपरा यशस्वीपणे राबविणा-या ठाणे महापालिकेच्यावतीने निर्माण करण्यात आलेल्या कृत्रीम तलावांमध्ये ३९९४ तर, विशेष टाकी व्यवस्थेत ६२१ गणेश मूर्तींचे भाविकांनी विसर्जन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरात मासुंदा तलाव, कोपरी येथील विसर्जन घाट आणि पारसिक विसर्जन घाट येथे भेट देऊन तिथे पुरवण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी केली आणि गणेश भक्तांशी संवाद साधला. यावेळी खासदार नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरीक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, शंकर पाटोळे आदी उपस्थित होते. दरम्यान, महापालिकेने तयार केलेल्या विसर्जन व्यवस्थेला ठाणेकर नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार मानले आहेत. भाविकांनी १२३ मूर्ती स्वीकार केंद्रात दिल्या महापालिकेच्या विविध ठिकाणी असलेल्या गणेश मूर्ती स्वीकार केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण १२३ गणेश मूर्तींचे महापालिकेच्यावतीने विधिवत विसर्जन करण्यात आले. तसेच, फिरत्या विसर्जन केंद्रात २० मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. ०७ टन निर्माल्‍य भक्‍तांनी केले दान दीड दिवसाच्या गणेश मूर्ती विसर्जनावेळी सुमारे १२ टन, सहाव्या दिवशी १३ टन निर्माल्य संकलन झाले होते. तर, अखेरच्या दिवशी ०७ टन निर्माल्य संकलित झाले. विर्सजनाची आकडेवारी (विर्सजन स्थळ (संख्या) – गणेश मूर्तींची संख्या) कृत्रिम तलाव (१५) – ३९९४ खाडी विसर्जन घाट (०९) – ३७६४ विशेष टाकी व्यवस्था (४९) – ६२१ फिरती विसर्जन व्यवस्था (०६) – २० मूर्ती स्वीकृती केंद्र (१०) – १२३…

जेएम फायनान्शियल सर्व्हिसेसची पहिलीवहिली शाखा ठाण्यात

ठाणे : भारतातील सर्वात प्रतिष्ठित वित्तीय सेवा कंपनी पैकी एक, जेएम फायनान्शियल सर्व्हिसेसने (जेएमएफएस) तिची पहिली शाखा ए/४१०, सेंट्रम बिझनेस स्क्वेअर, वागळे इस्टेट, ठाणे येथे सुरू केल्याची घोषणा केली.गतिशील आणि…

ठामपाच्या ५७२ कोटी रुपयांच्या नवीन इमारतीच्या आवारात नागरीहीताच्या आंदोलनांसाठी जागा द्या –  नितीन देशपांडे

अनिल ठाणेकर   ठाणे : महापालिकेच्या ५७२ कोटी रुपयांची नवीन प्रस्तावित इमारतीच्या आवारात, नागरीहीताच्या आंदोलनांसाठी जागा उपलब्ध करुन द्या. अशी मागणी धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. ठाणे महापालिकेची नवीन प्रस्तावित इमारत, रेमण्ड कंपनीच्या राखीव भूखंडावर उभारण्यास महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिलेली आहे. वर्ष-१९८२ मध्ये ठाणे महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर, वर्ष-१९८९ मध्ये, पाचपाखाडी येथील सध्याची इमारत कार्यान्वित झाली. मात्र, नंतरच्या काळात ठाणे शहराची लोकसंख्या प्रचंड वाढल्याने, विद्यमान इमारतीमधून प्रशासकीय कारभार चालविणे गैरसोयीचे ठरु लागले. तसेच, विभागनिहाय कामकाज करण्यासाठी, इमारत अपुरी पडू लागली. याच पार्श्वभूमीवर, ठाणे महापालिकेच्या ताब्यात असलेल्या ८ एकरच्या भूखंडावर, तब्बल ३२ मजली भव्य इमारत उभारण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली आहे. सुमारे ५७२ कोटी रुपयांची निविदा याकामी काढण्यात येऊन, शासनाकडून २५० कोटी रुपये मंजूरही करण्यात आलेले आहेत. आजमितीस ठाणे शहराची लोकसंख्या ही, २० लाखांहून अधिक असून, नगरसेवकांची संख्या १३१ एवढी झालेली आहे. एकंदरीतच ठाणे महापालिका प्रशासनाचा कारभार हा, पूर्वीपेक्षा अधिक विस्तारित झालेला असल्याकारणाने, ठाणे शहराचे कामकाज चालविण्यासाठी प्रशस्त इमारतीची आवश्यकता होतीच, ती आता नवीन प्रस्तावित प्रशासकीय इमारतीच्या माध्यमातून साध्य होईल. याच अनुषंगाने, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव यांना पत्र पाठविण्यात आले असून, पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी, आपल्या पत्रात आयुक्तांना सूचित केले आहे की, ठाणे महापालिकेची प्रस्तावित इमारत जरी भव्यदिव्य स्वरुपात उभारण्यात येत असली तरी, प्रशासनाचा वादग्रस्त कारभार, विकासकामांचा खोळंबा, नागरी सोयी-सुविधांचा अभाव, भ्रष्टाचार आणि इतर मुलभूत प्रलंबित प्रश्न उपस्थित राहणारच आहेत. परिणामी, करदाते-कष्टकरी ठाणेकर नागरिक व सामाजिक/राजकीय संस्था-संघटनांना, प्रशासनाच्या गैरकारभाराविरोधात आवाज उठविण्याचा, प्रसंगी प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याचा घटनादत्त अधिकार आहे. तसा अधिकारच भारतीय लोकशाहीने सर्वसामान्य नागरिकांना दिलेला आहे. तोच अधिकार अबाधित राखण्यासाठी आणि जनतेचा आवाज, सत्ताधारी व प्रशासकीय व्यवस्थेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने, आंदोलनकर्त्यांसाठी प्रस्तावित इमारतीच्या आवारात अधिकृतपणे जागा उपलब्ध करुन देण्यात यावी. सदर जागा ही, ‘जनतेचे व्यासपीठ’ किंवा ‘जनता मंच’ म्हणून ओळखली जाईल. अशाप्रकारचा प्रयोग महापालिका प्रशासनाने राबविल्यास, ठाणे शहर हे, एक आदर्श शहर म्हणून नव्याने नावारुपाला तर येईलच, त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना, लोकशाहीमार्गाने आंदोलनाचा, निषेध व्यक्त करण्याचा व सनदशीरपणे मोर्चा काढण्याचा अधिकार बहाल करणारी पहिलीवहिली स्वायत्त संस्था म्हणून, ठाणे महानगरपालिका ओळखली जाईल, याबाबत आमच्या मनात कोणताही संदेह नाही. काहीवेळेस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची हातमिळवणी होऊन, घटनाविरोधी ठराव संमत होतात. अशावेळी कर्तव्यदक्ष नागरिकांनी आवाज उठविणे हे, क्रमप्राप्त ठरते. (संदर्भ : ठामपा/शाविवि/वियोग, अंक-९६०/३००० दि. २०/१०/२०१४) यासंदर्भात, मुंब्रा तलाव बुझवून, ट्रांझिस्ट कॅम्प बांधण्याचा ठराव पारित झाला होता. अर्थात, महासभेत घटनाविरोधी ठराव येतो, हे प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या हातमिळवणीचे उत्तम उदाहरण असून, आदर्श लोकशाहीस धक्का देणारे आहे, याकडे नितीन देशपांडे यांनी, आयुक्तांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान, ठाणे महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून जे काही प्रकल्प राबविण्यात येतात किंवा प्रस्तावित असतात, अशा प्रकल्पांच्या प्रतिकृतींचे सुसज्ज असे दालनदेखील, ठाणे महानगरपालिकेच्या प्रस्तावित नवीन प्रशासकीय इमारतीतउभारण्यात यावे, यानिमित्ताने एक चांगला आदर्शवत असा पायंडा पाडला जाईल, याचीही प्रकर्षाने नोंद घ्यावी, अशी सुचनावजा मागणी, देशपांडे यांनी आपल्या पत्राद्वारे आयुक्तांकडे केली आहे. याप्रकरणी आयुक्तांनी प्राधान्याने विचार करुन, ठाणे महापालिकेच्या नवीन प्रस्तावित इमारतीच्या आवारात, नागरीहीताच्या आंदोलनांसाठी जागा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात सकारात्मक पाऊले उचलावीत, अशी विनंती ‘धर्मराज्य पक्षा’चे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी, ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरव राव यांच्याकडे केली आहे.

पोर्ट ट्रस्ट कामगार दिवाळी विशेषांकासाठी साहित्य पाठवा – मारुती विश्वासराव

ठाणे : अखिल भारतीय बंदर व गोदी उद्योगात जुनी असलेली मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनला १०४ वर्ष झाली असून, या युनियनचे ” पोर्ट ट्रस्ट  कामगार ” या दिवाळी…