Category: ठाणे

Thane news

‘शालेय बस, रुग्णवाहिकांसाठी स्वतंत्र आरक्षित मार्गिका ठेवा’

मनसे  उपाध्यक्ष-ओवळा माजीवडा विधानसभा क्षेत्राचे उपशहराध्यक्ष पुष्कराज विचारे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली मागणी   ठाणे : घोडबंदर रोडवरील होणारी रोजची वाहतूक कोंडी ठाणेकरांसाठी विशेषतः या मार्गावर ये जा करणाऱ्या नागरिकांकरता डोकेदुखी ठरली आहे. गुरुवारी या वाहतूक कोंडीमुळे ठाण्यातील बहुतेक शाळांना सुट्टी जाहीर करावी लागली. या पार्श्वभूमीवर एक उच्चस्तरीय समिती नेमून शालेय बस आणि रुग्णवाहिकांकरता स्वतंत्र मार्गिका तयार करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना  उपाध्यक्ष-ओवळा माजीवडा विधानसभा क्षेत्राचे उपशहराध्यक्ष पुष्कराज विचारे यांनी केली. यासंदर्भात पुष्कराज विचारे यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे केली आहे. गुरुवारी घोडबंदर रोडवर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे ठाणेकरांचे अतोनात हाल झाले. कित्येकांनी वाहतुकीत अडकल्यामुळे पुन्हा घरी जाणे पसंत केली. या वाहतूक कोंडीमुळे  घोडबंदर परिसरातील  शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकून रुग्णाच्या जीवावर बेतू शकते त्यामुळे काही दुदैवी घटना घडल्यावरच प्रशासन लक्ष देणार का?असा सवाल पुष्कराज विचारे यांनी केला आहे. या परिसरात होणाऱ्या नेहमीच्याच वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ठाणे महापालिका आणि इतर शासकीय यंत्रणांचा समावेश असलेली उच्चस्तरीय समिती नेमण्यात यावी असे पुष्कराज विचारे यांनी सांगितले. 0000

 इंद्रलोक सर्वधर्मिय स्मृती उद्यान व स्मशानभूमीचे आरक्षण रद्द

१५ कोटींच्या निधीतून थीम गार्डनसह इतर विकास कामे होणार! २- आमदार प्रताप सरनाईक यांच्या मागणीवर मनपा आयुक्त संजय काटकर यांनी केले शिक्कामोर्तब! अनिल ठाणेकर / अरविंद जोशी भाईंदर : जनतेच्या…

लाडक्या बहीणींना लुटण्यासाठी भामट्यांनी लढवली शक्कल !

एकाच बाईचे २७ वेगवेगळे फोटो वापरून बोगस अर्जाव्दारे पैसे लाटले पनवेल : पनवेलमध्ये एका भामट्याने एकाच महिलेचा वेगवेगळ्या पोशाखातील फोटो वापरत तब्बल तिला २७ वेगवेगळ्या व्यक्ती म्हणून चित्रित करीत लाडकी बहीण योजनेचे पैसे…

जादूटोणाविरोधी कायदा राष्ट्रीय पातळीवर करा – गणेश चिंकोले

सुप्रिया सुळे व संजय दिना पाटील यांना निवेदन अनिल ठाणेकर   ठाणे : जादूटोणाविरोधी कायदा राष्ट्रीय पातळीवरती व्हावा याकरिताचे निवेदन खासदार सुप्रिया सुळे तसेच खासदार संजय दिना पाटील यांना  देण्यात आले. अंधश्रद्धा निर्मूलन ट्रस्टचे विश्वस्त गणेश चिंचोले व राज्य कार्यकारणी सदस्य प्रा प्रवीण देशमुख यांनी दोन्ही खासदारांची नुकतीच भेट घेऊन हे निवेदन दिले. जुलै २०२४ मध्ये हातरस येथे एका भोंदू बाबाच्या दरबारात १२४ महिलांच्या दुर्दैव मृत्यूनंतर  हा कायदा संपूर्ण देश पातळीवरती होण्याची गरज  निर्माण झाली आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी हातरस घटनेनंतर जादूटोणाविरोधी कायद्याची राष्ट्रीय पातळीवर  अंमलबजावणी करण्याची भूमिका मांडली. उपराष्ट्रपती जगदीश धनकड यांनी महत्त्वाची बाब म्हणून त्याचा स्वीकार केला. महाराष्ट्रामध्ये जादूटोनाविरोधी कायदा व्हावा यासाठी करिता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सतत प्रयत्न केले. डॉ नरेंद्र दाभोळकरांच्या खुनानंतर २०१३ महाराष्ट्रामध्ये जादूटोणाविरोधी कायदा संमत झाला. या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याकरिता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने  संपूर्ण महाराष्ट्रात सातत्याने या कायद्याच्या प्रबोधनाचे कार्यक्रम राबवले. त्याचा परिणाम म्हणून आज पर्यंत एक हजारच्या वर  गुन्हे या जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत नोंद झालेले आहेत. नंतर महाराष्ट्राच्या जादूटोणाविरोधी कायद्याच्या धर्तीवर कर्नाटक सरकारने सुद्धा जादूटोणाविरोधी कायदा केला. मागील महिन्यामध्ये गुजरात सरकारने सुद्धा जादूटोणाविरोधी कायद्याचे विधेयक मंजूर  करून राज्यपालांकडे सही करिता पाठवले. आज महाराष्ट्र मध्ये कुठलाही बुवा बापू महाराज उघडपणे चमत्काराचा दावा करून फसवणूक करायला सहजासहजी धजावत नाही अशी स्थिती आहे. बागेश्वरधाम सारख्या महाराजाला महाराष्ट्रातून पळून  दुसऱ्या राज्यात जावून आपल्या दाव्याला योग्य ठरवण्याचा प्रयत्न करावा  लागतो, हा महाराष्ट्रात असलेल्या जादूटोणाविरोधी कायद्याचा धाक आहे असे मत प्रा प्रवीण देशमुख यांनी व्यक्त केले. असे असले तरी संपूर्ण भारतात सातत्याने घडणाऱ्या घटना या अस्वस्थ करणाऱ्या असतात. नुकत्याच हातरस येथे घडलेल्या घटनेने  हा कायदा संपूर्ण देश पातळीवरती होण्याची गरज प्रकर्षाने आणि निर्माण झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जादूटोणाविरोधी कायदा हा संपूर्ण राष्ट्रीय पातळीवर देश पातळीवरची व्हावा याबाबतचे निवेदन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते सर्व खासदारांना भेटून देत आहेत. आम्ही सातत्याने या मागणीचा पाठपुरावा करत राहू अशी भूमिका महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यकारिणी सदस्य प्रा प्रवीण देशमुख यांनी स्पष्ट केली.

नाविकांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे जीवनमान सुधारण्यासाठी वचनबद्ध – मिलिंद कांदळगावकर

ठाणे : भविष्यात नाविक कामगारांच्या हितासाठी  अनेक कामगार कल्याणकारी योजना राबविल्या जातील. आपल्या भाषणात  ते पुढे म्हणाले की, आम्ही आमच्या नाविकांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे जीवनमान सुधारण्यासाठी वचनबद्ध आहोत असे नुसिचे सरचिटणीस  मिलिंद कांदळगावकर…

 इंद्रलोक सर्वधर्मिय स्मृती उद्यान व स्मशानभूमीचे आरक्षण रद्द

१५ कोटींच्या निधीतून थीम गार्डनसह इतर विकास कामे होणार! आमदार प्रताप सरनाईक यांच्या मागणीवर मनपा आयुक्त संजय काटकर यांनी केले शिक्कामोर्तब!   अनिल ठाणेकर / अरविंद जोशी भाईंदर : जनतेच्या भावनेचा आदर करत इंद्रलोक भागातील सर्वधर्मिय स्मृती उद्यान व पर्यावरण पूरक स्मशानभूमीचे काम रद्द करण्याची मागणी आमदार सरनाईक यांनी महापालिका आयुक्त संजय काटकर यांना पत्र लिहून केली होती. आमदार सरनाईक यांच्या मागणीची दखल घेत मनपा आयुक्तांनी शिक्कामोर्तब केले. याऐवजी आता त्याजागेत १५ कोटीच्या विकास निधीतून थीम गार्डनसह इतर विकास कामे विकसित करणार असल्याची घोषणा आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. इंद्रलोक परिसरातील शासकीय जमिनीवर महापालिकेने सर्वधर्मीय  स्मृती उद्यान आणि पर्यावरण पूरक (इको फ्रेंडली) आधुनिक स्मशानभूमी प्रस्तावित केली होती. त्यासाठी १५ कोटींचा निधी राज्य सरकारकडून आला होता. पण या नागरी वस्तीत स्मशानभूमी येणार, सर्वधर्मीय स्मृती उद्यान होणार यामुळे काही लोक नाराज होते. स्थानिक हौसिंग सोसायट्या आणि नागरिकांनी महापालिका आयुक्त व आमदार प्रताप सरनाईक यांना निवेदने दिल्यावर सरनाईक यांच्या जनसंपर्क कार्यालयात सर्वांची बैठक झाली. यावेळी मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त संजय काटकर हेही उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार सरनाईक म्हणाले की, लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासन सर्वानी लोक भावनेचा आदर केला पाहिजे. मीरा भाईंदर शहरात वेगाने विकास होत आहे. भविष्याची लोकांची गरज ओळखून काही कामे प्रस्तावित केली गेली आहेत. गेल्या २ वर्षात मीरा भाईंदर शहराच्या विकास कार्यासाठी राज्य सरकारकडून ३ हजार कोटी विकास निधी आणला आहे. मीरा भाईंदरचा घोडबंदर खाडी किनारा विकास करण्यासाठी १५० कोटीचा प्रकल्प असून तेथे रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट करणार आहोत अशी मोठी कामेही शहरात होत आहेत. लोकांना इंद्रलोक सर्वधर्मिय स्मृती उद्यान व पर्यावरण पूरक स्मशानभूमी नको असेल तर ते आरक्षण रद्द करुन लोकभावनेचा आदर करूया. इंद्रलोकच्या  शासकीय जमिनीत चांगले थीम गार्डन किंवा जनहितासाठी चांगली सुविधा विकसित करूया, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. याबद्दल इंद्रलोकच्या नागरिकांनी त्यांचे आभार मानले. भाईंदर पश्चिमेला १२.५ एकर शासकीय जागा असून त्याठिकाणी हे सर्वधर्मीय स्मृती उद्यान प्रस्तावित करावे, अशी सूचना आमदार सरनाईक यांच्याकडून करण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजू भोईर, विधानसभा संघटक सचिन मांजरेकर, विक्रम प्रताप सिंग, जिल्हा संघटक निशा नार्वेकर आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. 00000

राजाराम मोरे यांची ‘सहाय्यक गट विकास अधिकारी’ माणगाव पदी बढती

विश्वास गायकवाड   बोरघर / माणगाव : रायगड जिल्हा परिषद अलिबाग विभागांतर्गत  माणगाव पंचायत समितीच्या ‘सहाय्यक प्रशासन अधिकारी’ या पदावर कार्यरत असणारे राजाराम अनंत मोरे यांच्या आजवरच्या प्रशासकीय कार्याची रायगड जिल्हा परिषद प्रशासनाने दखल घेऊन त्यांची माणगाव पंचायत समिती कार्यालय येथे ‘सहाय्यक गट विकास अधिकारी’ पदावर नियुक्ती करून बढती करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे रायगड जिल्हा परिषद व माणगाव पंचायत समिती कार्यालय,कौटुंबिक आप्त परिवार, मित्र परिवार आणि सामाजिक स्तरातून सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. राजाराम मोरे हे ८ जानेवारी १९९० रोजी माणगाव पंचायत समिती येथे रुजू झाले होते, आणि आता त्याच ठिकाणी त्यांना ‘सहाय्यक गट विकास अधिकारी’ या पदावर बढती देण्यात आली आहे. राजाराम मोरे यांना प्रथम पदोन्नती हि १० ऑक्टोबर २००३ मध्ये बालविकास प्रकल्प विभागात मिळाली होती तर दुसरी पदोन्नती हि १ फेब्रुवारी २०१३ मध्ये म्हसळा पंचायत समिती येथे ‘कनिष्ठ प्रशासन अधिकारी’ या पदावर देण्यात आली होती. तसेच राजाराम मोरे यांनी सुधागड पाली पंचायत समिती येथे देखील रोखपाल पदावर काम केले आहे. एकंदरीत राजाराम मोरे यांना जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन, बालविकास प्रकल्प, ग्रामपंचायत, समाजकल्याण, प्राथमिक शिक्षण विभागात देखील काम केल्याचा प्रदीर्घ अनुभव असून त्यांचे कार्य कुशल आणि समाधानकारक प्रशासकीय कामकाज पाहता प्रशासकिय दृष्टिकोनातून त्यांना ही एक संधी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद यांनी दिनांक ३० ऑगस्ट २०२४ रोजी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे पंचायत समिती माणगाव आता पर्यंतच्या कार्यकाळात सहाय्यक प्रशासन अधिकारी यास प्रथमत सहाय्यक गट विकास अधिकारी ह्या पदावर श्री. राजाराम मोरे साहेबांच्या रूपाने संधी मिळाली याचा समस्त माणगाव करांसह रायगड जिल्ह्यास आनंद होत आहे.   राजाराम मोरे हे ‘सहाय्यक गट विकास अधिकारी’ या पदावर 2 सप्टेंबरला हजर झाले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या प्रशासकिय कामकाजाची जबाबदारी देखील वाढली असून ते या पदाला निश्चितच योग्य तो न्याय देतील यात शंका नाही. त्यांचा मित्र परिवार आणि   हितचिंतकांकडून त्यांना सोशल मीडियाच्या वॉट्सअप, फेसबुक आणि प्रत्यक्ष भेटून त्यांना अभिनंदनपर शुभेच्छा देत आहेत.

अविनाश फडतरे यांच्या हस्ते सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान

ठाणे : जिल्हा परिषद ठाण्याच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक महिन्यात आनंददायी निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येत आहे या अनुषंगाने ऑगस्ट महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व…

जिल्हा परिषद अंतर्गत ६९७ युवा प्रशिक्षणार्थीना नियुक्तीपत्र

ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजक्ता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन-ठाणे कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जिल्हा परिषद अंतर्गत राबविली जात आहे. युवा प्रशिक्षणांतर्गत…

अखिल आगरी समाज परिषदेच्या मेळाव्यात मान्यवरांचा

आगरी समाजाच्या उन्नतीसाठी एकजुटीने पुढे जाण्याचा निर्धार !   पनवेल : आगरी समाजाच्या सध्याच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय परिस्थितीचा विचार करून सामूहिक संघटनेच्या बळावर काही ठोस कार्यवाही करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यासाठी अखिल आगरी समाज परिषदेतर्फे आगरी समाज काल आज आणि उद्या या शीर्षकाखाली समाजातील लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक आणि समाज बांधव, भगिनींचा भव्य मेळावा रविवारी जासई येथील लोकनेते दि. बा. पाटील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या वेळी मान्यवरांनी आपली मते व्यक्त करून समाजाच्या उन्नतीसाठी एकजुटीने पुढे जाण्याचा निर्धार व्यक्त केला. या मेळाव्यास आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष दशरथ पाटील, सल्लागार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी मंत्री व ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, खासदार बाळ्यामामा म्हात्रे, खासदार संजय पाटील, आमदार गणेश नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार मनोहर भोईर, कामगार नेते महेंद्र घरत, उद्योगपती जे.एम. म्हात्रे, अरुणशेठ भगत, कार्याध्यक्ष जे.डी.तांडेल, सरचिटणीस दिपक म्हात्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल भगत, लोकनेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, कामगार नेते भूषण पाटील, राजेश गायकर, संतोष केणे, दशरथ म्हात्रे, माजी नगरसेवक विकास घरत, विजय चिपळेकर, प्रीतम म्हात्रे, माजी नगरसेविका दर्शना भोईर, सुरेश ठाकूर, सोन्या पाटील, संतोष घरत, दीपक पाटील, भावना घाणेकर, वंदना घरत यांच्यासह आगरी समाजाचे बांधव आणि भगिनी उपस्थित होत्या. या वेळी आगरी समाजातील नवनिर्वाचित खासदार बाळ्यामामा म्हात्रे आणि खासदार संजय पाटील यांचा सत्कार करण्यात आला. प्रत्येक समाज आपापल्या संघटना बळकट करत आहेत. आम्हीही आमची आगरी समाजाची संघटना एकसंघ मातृसंस्था म्हणून अखिल आगरी समाजाच्या व्यासपीठावर एकत्र आणण्याचा हा पहिला प्रयत्न केला आहे. समाजातील नवतरुणांमध्ये जागृती व्हावी याकरिता या मेळाव्याचे आयोजन केले असल्याचे मत परिषदेचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी व्यक्त केले. लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव विमानतळाला देण्यात यावे यासाठी जो संघर्ष इथल्या भूमिपुत्रांनी आणि स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी केला, त्यामुळेच या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात यश येताना दिसतंय. आधीपासूनच समाज कष्टाने स्वाभिमानाने जगत राहिला, परंतु समाजाच्या कथा व्यथा या सर्व मांडण्याकरिता अखिल आगरी समाज परिषदचे व्यासपीठ निर्माण झाले, ही अभिमानाची गोष्ट आहे, असे गौरवोद्गार आमदार गणेश नाईक यांनी काढले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, आपण ज्या ज्या परिसरात राहतो त्या परिसराचे संदर्भ आणि प्रश्न बदलत चाललेले आहेत. समाज हा वेगवेगळ्या समाजामध्ये काम करणार्‍या आपणा सर्वांच्या धडपडणार्‍या आणि त्याचबरोबर चळवळ आंदोलनाच्या मार्गामध्ये पुढे जाणार्‍या आपल्या सर्व सहकार्‍यांमुळे समाज अधिकाधिक व्यापक आणि मोठा होत चाललेला आहे. आपण आज ज्या गावात बसलोय ती भूमी क्रांतीची आहे. या भूमीने १९८४ सालच्या आंदोलनाची धग पाहिलेली आहे. लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांच्या नेतृत्वाखाली सिडकोच्या विरोधातील आंदोलन आणि आंदोलनामुळे दि.बा. पाटीलसाहेबांचा लढा महाराष्ट्राच्या सीमारेषा ओलांडून पलीकडे गेला. या आंदोलनामुळे जे साडेबारा टक्के विकसित भूखंड भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांना द्यायचे तत्व प्रस्तापित झाले आणि त्यामुळे पाटीलसाहेबांचे नेतृत्व आणि समाजाचा लढा साता समुद्रापलिकडे जाऊन पोहचला त्यातून आगरी समाजाची संघर्षशील प्रवृत्ती अधिक ठळक झाली. आपल्याला साहेबांनी एक मंत्र दिलाय की, लढल्याशिवाय मिळत नाही आणि लढणे हे थांबवायचे नसते. समाजाच्या मागण्यांसाठी व प्रगतीसाठी जोमाने वाटचाल करूया. अन्य उपस्थित वक्त्यांनीही आपले विचार व्यक्त केले. या वेळी आगरी दर्पण या मासिकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. 0000