Category: ठाणे

Thane news

मीरा भायंदरचे आयुक्त राजकीय व्यासपीठावर

भायंदर मधील इंद्रलोक परिसरात होणारं स्मृती उद्यानाला स्थानिकांचा विरोध झाल्यावर आमदार प्रताप सरनाईकांनी निर्णय फ़िरवला. त्या संदर्भात त्यांच्या कार्यालयात स्थानिकाची सभा घेण्यात आली. येणाऱ्या निवडणुकीवर डोळा ठेवून स्थानिकांचं म्हणणं त्यांनी…

 सार्वजनिक गणेश मंडळांना घरगुती दराने वीजपुरवठा

अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन   कल्याण : सार्वजनिक गणेश मंडळांना महावितरणकडून तात्पुरत्या स्वरूपात आणि त्वरित वीजजोडणीची सुविधा उपलब्ध आहे. या जोडणीसाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार आहे. तरी सार्वजनिक गणेश मंडळांनी या सुविधेचा लाभ घेत अधिकृत वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर करावा,  असे  आवाहन महावितरणने केले आहे. गणेश मंडळांना तात्पुरत्या स्वरूपातील वीजजोडणीसाठी नोंदणी प्रमाणपत्र, स्थानिक स्वराज्य संस्थेची मंडप परवानगी, पोलिस स्थानक परवाना, विद्युत निरिक्षक यांचे वीजसंच सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र, वीज मागणी अर्ज, वीजसंच मांडणी चाचणी अहवाल व राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुक छायांकित प्रत इ. कागदपत्रे आवश्यक आहेत. गणेश मंडळांनी आवश्यक कागदपत्रासह नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा. गणेशोत्सव काळात कोणत्याही प्रकारचा वीज अपघात होऊ नये यासाठी मंडप, रोषणाई व देखाव्यांची उभारणी करताना लघुदाब व उच्चदाब विद्युत वाहिन्या, वितरण रोहित्रे इ. यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे. मंडपातील वीजसंच मांडणी करताना विद्युत सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. मंडपातील वीजसंच मांडणी मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदारांकडून घ्यावी. गणेश मंडळांनी विद्युत सुरक्षा उपाययोजनांमध्ये तडजोड करू नये. आपात्कालीन स्थितीकरिता कार्यक्षेत्रातील महावितरणच्या शाखा अभियंत्यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावेत. याबरोबरच महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सेवा  केंद्राचे १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध आहेत. अनामत रक्कम मिळणार विनाविलंब परत तात्पुरत्या वीजजोडणीसाठी गणेश मंडळांना मंजूर वीजभारानुसार अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे. ही रक्कम ऑनलाईन भरल्यास गणेशोत्सव संपल्यानंतर वीजबिलाची रक्कम वगळून उरलेली रक्कम विनाविलंब परत केली जाईल. त्यामुळे गणेश मंडळांनी अनामत रक्कम ऑनलाईन पद्धतीनेच भरावी, असे आवाहनही महावितरणकडून करण्यात आले आहे. 000000

म्हाडाच्या ७९१ घरांवर बिल्डरांचा दरोडा

नवी मुंबईत फ्लॅट घोटाळा हस्तांतर न करता घरे हडपली महापालिका अधिकाऱ्यांशी संगनमत मुंबई : नवी मुंबईमध्ये म्हाडाच्या तब्बल ७९१ घरांवर बिल्डरांनी दरोडा टाकला आहे. सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून ही घरे म्हाडाला हस्तांतरीत…

दिवाळीनंतर फटाके महायुतीच फोडणार- मुख्यमंत्री शिंदे

ठाणे : एका घरामध्ये एक कुटुंब सुखी होण्यासाठी आपल्या सरकाने जे निर्णय घेतले ते आतापर्यंतच्या सरकारने घेतलेले नाहीत. मी अपॉइंटमेंटवर चालणारा मुख्यमंत्री नाही. पुर्वी एसटी हात दाखवून थांबवली जात तसेच माझे आहे. मला कोणी भेटले…

डोंबिवलीतील भूमाफियांवर गुन्हा दाखल

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील पाणउतार (जेट्टी) जवळील कांदळवन नष्ट करून तेथे मातीचा भराव टाकणाऱ्या अज्ञात भूमाफियांच्या विरुध्द महसूल डोंबिवली विभागाचे मंडल अधिकारी दीपक गायकवाड यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी जमीन…

३० कोटी खर्चून पद्मश्री सिंधुताई सपकाळ तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र सुरू होणार-प्रताप सरनाईक

अनिल ठाणेकर   ठाणे : भारतीय तिरंदाजाचे कौशल्य वाढविण्यासाठी तिरंदाजीत भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकण्यात यश मिळवून देण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून ठाणे येथे ३० कोटी रुपये खर्चून ज्येष्ठ…

 शिक्षा व जनसेवा संस्थेच्यावतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप

20 हून अधिक सरकारी शाळांमधील 1500 हून अधिक विद्यार्थ्यांना लाभ   ठाणे : प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही ठाणे जिह्यातील शिक्षा व जनसेवा संस्था या सामाजिक संस्थेने मोठ्या संख्येने शासकीय शाळा व…

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी दिलेला वारसा आपण जपला पाहिजे

अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज ॲड रुचिका शिंदे   ठाणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य जनकल्याणासाठी समर्पित केले. अनेक लोकपोयोगी कमी केली त्यामुळे त्यांनी आपल्याला दिलेला वारसा आपण…

 ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ सुरेंद्र दिघे यांना कर्मवीर पुरस्कार

आदर्श विकास मंडळाचा 40 वा वर्धापन दिन सोहळा संपन्न ठाणे : आदर्श विकास मंडळाचा 40 वा वर्धापन दिन सोहळा 1 सप्टेंबरला संपन्न झाला. संस्थापक अध्यक्ष बी. बी. मोरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ…