Category: ठाणे

Thane news

फांगूळगव्हाण पूलाचा प्रश्न सुटला, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिला न्याय

अनिल ठाणेकर ठाणे : मुरबाड फांगूळगव्हाण नाल्यावर देशी लाकडी जुगाडाच्या माध्यमातून येथील आदिवासी वाड्यावरील नागरीक ये-जा करीत असतात. पावसाळ्यात येथून ये-जा करताना जीवाला धोका असतो. नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीत…

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत अर्ज केलेल्या महिलांनी बँक खाते आधारकार्डशी संलग्न करावे – अशोक शिनगारे

ठाणे : मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजनेसाठी ठाणे जिल्ह्यातून एकूण ५ लाख ३ हजार ८० अर्ज पात्र ठरले असून ३७ हजार अर्ज त्रुटीयुक्त आहेत. मात्र अद्याप ज्या महिलांचे बँक खाते…

राजन राजे यांच्यामुळे प्रोटेगो इंडिया कंपनीतील कामगारांना मिळणार ८० हजारांची भरघोस पगारवाढ

ठाणे : ऑईल-गॅस, औषधे, रासायनिक खते उत्पादक कंपन्यांना, ‘फ्लेम-ॲरेस्टर, ब्रीदर-व्हाॅल्व्ह’सारख्या औद्योगिक-सुरक्षा उपकरणांचा पुरवठा करणाऱ्या, नवी मुंबईतील ‘प्रोटेगो इंडिया’ या जर्मन बहुराष्ट्रीय कंपनीत ‘धर्मराज्य पक्ष’प्रणित धर्मराज्य कामगार कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष, कामगार…

अनिता बिर्जे यांचा शिवसेना शिंदेगटामध्ये प्रवेश

 शिवसेना उबाठा गटाच्या उपनेत्या अनिल ठाणेकर ठाणे : गडकरी रंगायतन येथील शिवसेना उबाठा गटाचा मेळावा संपता संपताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना जोर का झटका दिलाय. उबाठा गटाच्या उपनेत्या आणि आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या कट्टर शिवसैनिक अनिता बिर्जे यांनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदेगटामध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शिवसेनेच्या जडणघडणीच्या कालखंडात अनित बिर्जे यांनी तत्कालीन शिवसैनिकांच्या साथीने शिवसेनेची महिला आघाडी तळागाळात पोहचवली होती. मुख्यमंत्री शिंदे यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या ‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे’ या सिनेमातही अनिता बिर्जे यांनी पक्षासाठी केलेले कार्य ठळकपणे दाखवण्यात आले होते. एकनाथ शिंदे यांनी पक्षात उठाव करून पुन्हा सत्तास्थापना केली तेव्हा अनिता बिर्जे यांनी या निर्णयाला ठाम विरोध करून उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणे पसंत केले होते. उबाठा गटात कायम राहिल्यामुळे त्यांची उबाठा सेनेत उपनेतेपदी वर्णी लावण्यात आली होती. मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने उबाठा गटाची ठाण्यात वाताहत झाली ती पाहता ठाण्यातील उबाठा गटाचे अनेक पदाधिकारी नाराज आहेत. एकनाथ शिंदे हेच स्वर्गीय आनंद दिघे अभिप्रेत असलेला जनसेवेचा वारसा पुढे चालवत आहेत हे पटल्यामुळेच त्यांनी आपण शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे बिर्जे यांनी यावेळी सांगितले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी काम करत असून ते पटल्यामुळेच आपण त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अनिता बिर्जे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे स्वर्गीय आनंद दिघे यांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेला नवीन बळ मिळाले आहे. शिवसेनेची वाघीण पुन्हा एकदा पक्षात सक्रिय होत असल्याचा आनंद आहे असे मत शिंदे यांनी व्यक्त केले. बिरजेबाईंच्या आजवरच्या अनुभवाचा फायदा आगामी काळात पक्षाला नक्की होईल. ठाणे जिल्ह्यातील शिवसेना महिला आघाडी अधिक मजबूत होऊन जोमाने काम करेल अशी अपेक्षा यावेळी शिंदे यांनी व्यक्त केली. यावेळी ठाणे जिल्हा महिला संघटिका मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेविका सुवर्णा करंजे, माजी नगरसेवक राम रेपाळे, माजी नगरसेवक रमाकांत मढवी, टेंभी नाका शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख निखिल बुडजडे  आणि ठाणे शिवसेनेतील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 00000

कर्जत उपविभागीय अधिकारीपदी प्रकाश सकपाळ झाले रुजू

अशोक गायकवाड कर्जत : कर्जत उपविभागीय अधिकारीपदी प्रकाश संकपाळ यांची प्रशासकीय बदलीने नियुक्ती झाली असून त्यांनी मंगळवार, ७ ऑगस्ट २०२४ रोजी उपविभागीय अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. याप्रसंगी तहसीलदार डॉ.शीतल रसाळ यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. कर्जत पोलीस उपविभागीय अधिकारी डी.डी. टिळे, कर्जत उपविभागीय अधिकारी कार्यालय नायब तहसीलदार प्रसाद पाटील, कर्जत तहसील कार्यालय निवासी नायब तहसीलदार सचिन राऊत, खालापूर तहसील कार्यालय निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड, कर्जत तहसील कार्यालय महसूल नायब तहसीलदार सोपान बाचकर, खालापूर तहसील कार्यालय नायब तहसीलदार मिलिंद तिऱ्हेकर, कर्जत पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड, नेरळ पोलीस ठाणे, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे, माथेरान पोलीस ठाणे, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने, मंडळ अधिकारी माणिक सानप, संतोष जांभळे, वैशाली पाटील, बाबासो शेटे, तलाठी दत्ता ठोकळ, अभिजित हिवरकर, शिपाई बाळू आढाव, नथू गायकवाड, उघडा, मनोहर वाघ, राहुल गायकवाड यांनीही पुष्पगुच्छ देवून प्रशासकीय भवनामध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालयात संकपाळ यांचे स्वागत केले. 00000

 ठाण्यात राडा

शिवसेना मनसे आमने सामने   ठाणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह मोहीम राबविली जात आहे. या मोहीमेच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शनिवारी सायंकाळी ठाण्यातील गडकरी रंगायतनात मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी मोठ्यासंख्येने पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्येकर्त्यांनी गर्दी केली होती. बीड मध्ये राज ठाकरे यांच्या ताफ्यावर उद्धव ठाकरे गटाच्या कार्यर्त्यांनी सुपाऱ्या फेकल्यामुळे आक्रमक झालेल्या ठाण्यातील मनसैनिकांनी गडकरी रंगायतन परिसरात गोंधळ घालण्यासाठी गर्दी केली होती. उद्धव ठाकरे यांचा ताफा ठाण्यात येताच, काही मनसैनिकांनी उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे ठाण्यातील सभेसाठी येत असताना मुलुंड चेक नाक्याजवळ ठाकरे यांच्या गाडीवर  शेण फेकले. तसेच पुढे त्यांचा ताफा आल्यानंतर ताफ्यावर नारळही फेकण्यात आले पाच ते सहा जण मोठ्या पिशवीतून नारळ भरुन घेऊन आले होते. भर रस्त्यात उद्धव यांच्या ताफ्यावर हे नारळ फेकले जात होते. यावेळी सर्वसामान्य नागरिक देखील वाहनातून प्रवास करत होते. त्यामुळे नारळ नागरिकांना लागून दुर्घटना होण्याची शक्यता होती. त्यानंतर त्यांची गाडी गडकरी रंगायतन मध्ये पोहोचताच त्यांच्या गाडीच्या मागून मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांच्या गाडीवर बांगड्या फेकण्यास सुरुवात केली. यावेळी मनसे आणि उद्धव सेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले. यावेळी नौपाडा पोलीसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी मनसे व शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी ‘उद्धव ठाकरे मुर्दाबाद’ अशाच्या घोषणा दिल्या. तसेच उद्धव ठाकरे यांना पुन्हा कधी ठाण्यात येऊ देणार नाही, असा इशारा देखील दिला. आमचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या मोटारीसमोर शुक्रवारी उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या फेकल्या. त्यामुळे मनसैनिकांमध्ये खदखद होती. आमच्या १५० ते २०० मनसैनिकांनी आंदोलन करून उद्धवसेनेला चोख प्रत्युत्तर दिले. मनसे जशास तसे उत्तर द्यायला मागेपुढे पाहणार नाही.- अविनाश जाधव, जिल्हाध्यक्ष, मनसे, ठाणे-पालघर 000000

मर्द असता तर समोर आले असते, हल्ला करून पळून का गेले?

ठाकरे गटाचे राजन विचारे यांची मनसेवर टीका     ठाणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर शनिवारी ठाण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी नारळ फेकून हल्ला केला. तसेच गडकरी रंगायतन परिसरात त्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न झाला. या घटनेनंतर ठाण्यात ठाकरे गटाकडून संताप व्यक्त केला जात आहे. महिलांना पुढे करून हा प्रकार झाला आहे. मर्द असता तर समोर आला असतात. पळून कशाला गेलात, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन विचारे यांनी केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आले होते. यावेळी नितीन कंपनी भागात मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्याच्या दिशेने नारळ फेकले होते. या हल्ल्यात ताफ्यातील एका वाहनाच्या काचा फुटल्या आहेत. तसेच गडकरी रंगायतन परिसरात उद्धव ठाकरे यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी केला. या हल्ल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. रात्री उशीरा ठाकरे गटाचे नेते माजी खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी पत्रकार परिषद घेतली. तसेच मनसेच्या या प्रकाराविषयी संताप व्यक्त केला. महिलांना पुढे करून हा प्रकार झाला आहे. मर्द असता तर समोर आला असतात. पळून कशाला गेलात. गडकरी रंगायतनमध्ये दोन ते तीन हजार शिवसैनिक होते. हे शिवसैनिक खाली उतरले असते तर वेगळ काही घडल असतं, शिवसैनिकांवर हल्ले करण्याची भाषा करू नका, असे राजन विचारे म्हणाले. लहान मुले सुद्धा दगडफेक करून पळून जातात. तसाच हा प्रकार आहे. ही मर्दाची लक्षणे नाहीत. नारळ फेकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हे तिथून जीवघेत पळत सुटले अशी टीका विचारे यांनी केली. ही घटना अत्यंत निंदनीय आहे. स्टंट करण्यासाठी, पक्षासाठी काही तरी करतोय हे दाखविण्यासाठी असले प्रकार करण्यात आले आहेत. नारळ फेक करताना सर्वसामान्य नागरिक ये-जा करत होते. त्यावेळी सर्वसामान्य नागरिकांना हे नारळ लागून गंभीर दुखापत झाली असती. त्याला कोण जबाबदार असते असा प्रश्न केदार दिघे यांनी उपस्थित केला.

 प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने राज्य शासन यावर्षी देणार

७५ हजार गोविंदांना प्रत्येकी १० लाखाचे विमा कवच ! अनिल ठाणेकर     ठाणे : परंपंरागत दहिहंडी उत्सवामध्ये मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदांचे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे या गोविंदाना विमा संरक्षण मिळावे यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी ती मान्य करून दहिहंडी उत्सवा दरम्यान मानवी मनोरे रचताना दुर्घटनाग्रस्त झालेल्या गोविंदाना, राज्य शासन यावर्षी ओरिएन्टल इन्शुरन्स विमा कंपनीच्या माध्यमातून ७५ हजार गोविंदाना प्रत्येकी १० लाखाचा विमा संरक्षण देण्यात येणार आहे. प्राचीन काळापासून सुरू असलेला व महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपणारा एक महत्वाचा सण गोकुळाष्टमी  म्हणजेच दहिकाला उत्सव. हा सण मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असून मुंबई-ठाणे शहरांबरोबरच महाराष्ट्रातील अन्य शहरांमध्येही हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या उत्सवात १५ ते ४० वयोगटातील तरूण-तरूणींचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. दहिहंडी (गोविंदा) उत्सवाला स्पर्धेचे रूप प्राप्त झाल्याने महाराष्ट्रातील प्रामुख्याने मुंबई-ठाण्यातील हजारो गोविंदा गोकुळअष्टमीच्या दिवशी ज्या ठिकाणी दहिहंडीचे आयोजन करण्यात आलेले असते त्या ठिकाणी थरावर-थर चढवून हंडी फोडण्याचा प्रयत्न करीत असतात. त्याचप्रमाणे या उत्सवात महिलांची देखील गोविंदा पथके सहभागी होत असतात.दरवर्षी गुरूपोर्णिमेच्या दिवसापासून ते गोकुळाष्टमीच्या दिवसापर्यंत गोविंदा थरावर-थर चढवून हंडी फोडण्याचा सराव करीत असताना त्यामध्ये अनेक गोविंदा जायबंदी होत असतात, तर गोकुळाष्टमीच्या दिवशी हा आकडा मोठा असतो. सर्व गोविंदा पथकांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने त्यांच्यावर होणार्या औषधोपचाराचा खर्च या गोविंदा मंडळास परवडत नाही. तसेच याकरिता काही सेवाभावी संस्था मदतही करतात तरीही काही ठिकाणी औषधोपचार वेळेवर न मिळाल्याने काही गोविंदा मृत्यू पावल्याच्या घटना घडलेल्या आहेत. परिणामी अपघातग्रस्त गोविंदाना व त्यांच्या कुटूंबियांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागते. त्यामुळे जर विम्याचे कवच मिळाल्यास गोविंदांना आर्थिक संरक्षण मिळणार आहे. त्यानुसार ७५ हजार गोविंदाना ओरिएन्टल इन्शुरन्स विमा कंपनीच्या माध्यमातून विमा संरक्षण देण्यात येणार आहे. त्याचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. शासन निर्णयानुसार दहिहंडी उत्सवा दरम्यान मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदाचा अपघाती मृत्यु झाल्यास परिवाराला दहा लाख मिळतील. तसेच दोन अवयव किंवा दोन डोळे गमावल्यास दहा लाख रूपये, एक हात, एक पाय किंवा एक डोळा गमावल्यास पाच लाख तसेच कायमस्वरूपी पुर्ण अपंगत्व आल्यास दहा लाख रूपये त्याचप्रमाणे अपघातामुळे रूग्णालयीन खर्च एक लाखापर्यंत देण्यात येणार आहे. त्यामुळे आता गोविंदाना विमा कवच मिळणार असल्याने गोविंदांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. दहिहंडी उत्सवा दरम्यान मानवी मनोरे रचताना दुर्घटनाग्रस्त झालेल्या सुमारे ७५ हजार गोविंदांना दहा लाखाचा विमा संरक्षण शासनाच्या वतीने देण्यात येणार असल्यामुळे दहिहंडी समन्वय समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व पाठपुरावा करणारे आमदार प्रताप सरनाईक यांचे आभार मानले.

घोडबंदर परिसराला होतोय अपुरा पाणी पुरवठा

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होत असला तरी नवे ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदर परिसरात पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने त्याठिकाणी टंचाईची समस्या निर्माण…

आरटीई प्रवेश मोफत तरी, इतर उपक्रमाच्या नावाखाली शाळांकडून पैसे उकळण्याचे काम सुरु; पालक आक्रमक

ठाणे : आरटीई अंतर्गत निवड झालेले विद्यार्थ्यांची कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर पालक जेव्हा शाळेत प्रवेश घेण्यास जात आहेत. तेव्हा शाळा प्रशासनाकडून पालकांकडे शाळेतील इतर उपक्रमांच्या नावाखाली पैशांची मागणी केली जात आहे.…