Category: ठाणे

Thane news

संजय वढावकर यांच्या नेतृत्वाखाली बेक केमिकलमध्ये १५ हजारापर्यंत पगारवाढीचा करार

अनिल ठाणेकर     ठाणे : जनरल मजदूर सभेचे सरचिटणीस संजय वढावकर यांच्या नेतृत्वाखाली बेक केमिकल प्रा. लि., एम.आय.डी.सी., धाटाव, रोहा या कंपनीतीलकामगारांना रुपये १२,०००/- ते १५,०००/- एवढा भरघोस पगारवाढीचा…

रामशेठ ठाकूर व आ. प्रशांत ठाकूर यांनी सामाजिक वसा जपला-रवीशेठ पाटील*

अशोक गायकवाड     पनवेल : आपल्या खिशातील पैसे खर्च करून समाजोपयोगी कामे करणारे मोजकीच आहेत मात्र लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर हे सतत आणि अखंडपणे समाजाची सेवा करण्याचे…

बाळाच्या जन्मानंतर पहिले ६ महीने निव्वळ स्तनपानाच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे –  डॉ. गंगाधर परगे

ठाणे : बाळाच्या जन्मानंतर पहिले ६ महीने निव्वळ स्तनपानाच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करणे हे या सप्ताहाचे प्रमुख उद्दिष्ट आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिले. तर पहिले ६ महीने निव्वळ स्तनपान देणे हे कुटुंबाचे उद्दिष्ट असले पाहिजे. मातेला स्तनपान देण्यासाठी कुटुंबातील व्यक्तिनी प्रोत्साहन करण्यासोबतच मानसिक आधार देणेदेखील आवश्यक आहे. मातेला पौष्टिक आहार देण्यासोबतच तिला पुरेशी विश्रांती मिळेल याची काळजी कुटुंबाने घ्यायला हवी असे आवाहन जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटील यांनी दिली. दरवर्षी १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान दिन हा संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. यावर्षीही केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह ठाणे जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागामार्फत साजरा केला जात आहे. स्तनपान करणाऱ्या मातांकरिता सुरक्षित वातावरण निर्माण करणे, बालमृत्यु कमी करणे, बाळाच्या जन्मानंतर पहिले ६ महीने निव्वळ स्तनपानाच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करणे हे या सप्ताहाचे प्रमुख उद्दिष्ट आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिले. यावर्षी जागतिक सप्ताहासाठी “आई आणि बाळा मधील अंतर कमी करूया: स्तनपानाला समर्थन देऊया” ही थीम निश्चित करण्यात आली आहे. या सप्ताहाच्या अनुषंगाने सर्व प्रा. आ. केंद्र, उपकेंद्र, नागरी दवाखाने या स्तरावर हिरकणी कक्षाचे बळकटीकरण करण्यात येणार असून मातांच्या गोपनीयता व सुरक्षेवर भर देण्यात येत आहे. या सप्ताहाच्या अनुषंगाने प्रसूती विभागात काम करणाऱ्या सर्व वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एएनएम, समुदाय आरोग्य अधिकारी यांचे जन्मानंतर एका तासाच्या आत लवकरात लवकर स्तनपानाची सुरुवात, कोलस्ट्रम फीडिंग, निव्वळ स्तनपान याबाबत प्रशिक्षण आयोजित केले आहे. तसेच आरोग्य संस्था स्तरावर नवीन मातांना देखील स्तनपानाबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. Infant Milk Substitute Act (IMS act) अंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांना Milk formula food, दुधाची बाटली, मातेच्या दुधाला पर्यायी पदार्थ व आहार व उपकरणे यासारख्या बाबींना प्रोत्साहन न करण्याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली. ग्रामीण भागामध्ये स्तनपान व शिशु पोषणाच्या पद्धतीमध्ये विशेष लक्ष दिले जात असून नियमित लासिकरणावेळी, स्तनदा व गरोदर माता ग्रहभेटीदरम्यान स्तनपानाबाबत आरोग्य सेविका, समुदाय आरोग्य अधिकारी व आशामार्फत समुपदेशन केले जात असून स्तनदा मातांना आयर्न फोलीक एसिड व कॅल्शिअमच्या गोळ्यांचे १८० दिवस नियमित सेवन करण्याबाबत सांगितले जात आहे. चौकट जन्मानंतर पहिल्या तासात शिशुच्या आयुष्याची सोनेरी सुरुवात करण्यासाठी पुढील गोष्टी करणे आवश्यक आहे. जन्मानंतर एका तासाच्या आत स्तनपान सुरू करणे आवश्यक आहे. शिशुला मातेचे सुरुवातीचे घट्ट पिवळे दूध (चिकाचे दूध) देणे अतिशय महत्वाचे आहे. पहिले पिवळे दूध (चिक दूध) हे अनेक आजारांपासून बाळाचे संरक्षण करते. स्तनपान हे माता व बाळ यांच्यामध्ये जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करते तसेच बाळाच्या बौद्धिक विकासासाठी महत्वाचे ठरते.  सामान्य अथवा सिजेरियन दोन्ही प्रकारच्या प्रसूतिनंतर एका तासाच्या आत लवकरात लवकर स्तनपान सुरू केले पाहिजे. सुरुवातीच्या काळात दिवसातून ८ ते १२ वेळा स्तनपान देण्यात यावे. जन्मानंतर मातेच्या त्वचेचा स्पर्श शिशुला त्वरित होणे आवश्यक आहे. रात्रंदिवस शिशुला मातेच्या संपर्कात ठेवणे आवश्यक आहे त्यांना वेगळ करता कामा नये. पहिले सहा महिने शिशुला निव्वळ स्तनपानच दिले गेले पाहिजे. स्तनपानाखेरीज शिशुला गुटी, मध, साखरेचे पानी किवा इतर पेय अजिबात देता कामा नये. स्तनदा मातांनी दररोज ३ वेळा जेवण करावे व त्याव्यतिरिक्त २ वेळा थोडे छोटेसे जेवण किंवा फराळ घ्यावा ज्यामुळे दूध वाढण्यास मदत होते. 00000

‘प्रो गोविंदा सीझन- २’ मधील१६ संघांचा नामकरण व जर्सी अनावरण सोहळा

मराठमोळ्या गोविंदाचे रूपांतर स्पोर्ट्समध्ये स्वप्न पूर्ण- प्रताप सरनाईक अनिल ठाणेकर     ठाणे :  ‘मी स्वप्न पाहिलं होते की आपला मराठमोळ्या गोविंदाचे रूपांतर स्पोर्ट्समध्ये व्हावे ही इच्छा युवासेना कार्याध्यक्ष तथा प्रो गोविंदा लीग अध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात प्रो गोविंदाच्या माध्यमातून पूर्ण होत आहे याचे समाधान वाटते,’ असे मत आमदार प्रताप सरनाईक याप्रसंगी यांनी व्यक्त केले. तर प्रो गोविंदा खेळाचे व्यावसायिकीकरण तसेच या खेळाला प्रोफेशनल टच मिळावा यासाठी आज अलॅाटमेंट प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या माध्यमातून गोविंदा खेळाला नक्कीच प्रतिष्ठा प्राप्त होईल व खेळाडूंमध्ये आत्मविश्वास दृढ होईल असा विश्र्वास प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी व्यक्त केला. प्रो गोविंदा सीझन-२ मध्ये अंतिम फेरीत निवड झालेल्या १६ संघांचे नामकरण व जर्सी अनावरण सोहळा ताज लँड्स एंड हॉटेल, बांद्रा मुंबई येथे पार पडला. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक, डोम सिनेयुग कंपनीचे संचलाक अध्यक्ष मोहम्मद मोरानी, डोम एन्टरटेन्मेंटचे व्यवस्थापकीय संचालक मजहर नाडियादवाला आदी मान्यवर उपस्थित होते. गोविंदा या खेळाला राष्ट्रीय दर्जा प्राप्त व्हावा त्याचप्रमाणे या खेळाचे व्यावसायिकीकरण व्हावे यासाठी प्रो गोविंदा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. ज्या प्रमाणे क्रिकेट, कबड्डी खेळाला व्यासपीठ मिळून हा खेळ मोठा झाला. त्याचप्रमाणे गोविंदा या मराठमोळा खेळाला मोठं करण्यासाठी व त्याला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मागील दोन वर्षांपासून आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने व प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश नेतृत्वात प्रो गोविंदा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा प्रो गोविंदा सीझन २ मोठ्या जल्लोषात १८ ऑगस्ट, २०२४ रोजी वरळी येथील NSCI डोम येथे होणार आहे. प्रो गोविंदा सीझन २ साठी १६ संघांची निवड करण्यात आली. या संघांचे नामकरण, अलॅाटमेंट प्रक्रिया आज पूर्ण करण्यात आली तसेच १६ संघांच्या जर्सीचे अनावरणही करण्यात आले. आयपीएल प्रमाणे प्रत्येक संघ एक एक मालकाने निवडला असून पुढील सीझनपर्यंत हे संघ या मालकांकडे राहणार आहेत. चौकट गोविंदा पथकाचे नाव व मालक यांची यादी पुढीलप्रमाणे १.  कोकण नगर (कोकण गिन्ट्स) – डॉ. नलीन गुप्ता २. जय जवान (सातारा सिंघम) – श्री. प्रतीक शेळके ३. यश गोविंदा पथक ( लातूर लेजेण्ड्स)  – श्री. विनय चौघ ४. श्री आग्रेश्वर गोविंदा पथक (नाशिक चॅलेंजर)  –  श्री. अजित सिंग मित्रा ५. शिव गणेश गोविंदा (संभाजी नगर रॉयल) – श्री. विजय पटेल ६. हिंदू एकता गोविंदा पथक (रायगड रॉयल) – श्रीमती अनुष्का गुप्ता आणि श्री. रोहन गुप्ता ७. ओम ब्रह्मांड साई गोविंदा ( सेट्रल मुंबई) – श्री. चंद्रेश विठलानी…

 ऐरोली सगळीकडे कडकडीत बंद

गणेश नाईक यांच्या विरोधात उपोषण विजय चौगुले यांची प्रकृती ढासळली     ऐरोली:: नवी मुंबई झोपडपट्टी पुनर्वसनाच्या मागणीसाठी नवी मुंबई शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांच्या समर्थनार्थ ऐरोली मतदार संघात बंद पाळण्यात आला आहे ऐरोली रबाळे तिघा परिसरात कडकडीत बंद असून अन्यत्र संमिश्र प्रतिसाद आहे बंद साठी कुठलेही आवाहन करण्यात आले नसून व्यापारी नागरिकांनीच उत्स्फूर्तपणे बंद केला असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे दरम्यान काल रात्रीपासून विजय चौगुले यांची तब्येत बिघडली असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे मात्र त्यांनी उपचार होण्यास नकार दिला आहे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही असं वक्तव्य त्यांनी केले आहे. नवी मुंबईतील एमआयडीसी भागात असणाऱ्या झोपडपट्टी पुनर्वसन मागणी मान्य होऊन बायोमेट्रिक सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते मात्र ऐरोली चे भाजप आमदार गणेश नाईक यांनी हे काम बंद केले या विरोधात विजय चौगुले शिवसेना नवी मुंबई जिल्हाध्यक्ष यांनी त उपोषण एक ऑगस्ट पासून सुरू केले यादरम्यान काल रात्रीपासून त्यांना अस्वस्थ वाटत होते अध्याप त्यांना आराम पडलेला नाही  अशी माहिती चौगुले यांच्या  आजपर्यंत स्विय सहाय्यक यांनी दिली. चौगुले यांनी पुकारलेल्या बंद याच्या समर्थनार्थ ऐरोली मतदार संघात संपूर्णपणे बंद पाळण्यात आला आहे व्यापाऱ्यांनी यांना उत्स्फूर्तपणे समर्थ म्हणून बंद पुकारला आहे ऐरोली दिघा परिसरात कडकडीत बंद असून कोपरखैरणे आणि घनसोलीत बहुतांश दुकाने बंद होती मात्र वैद्यकीय सेवा देणारे दुकाने आणि दवाखाने सुरू आहे. 0000

ज्ञानसाधना महाविद्यालयाचे अर्थशास्त्राचे शिक्षक प्रा. डाँ श्रीरंग कुडुक निवृत्त

ठाणे येथील ज्ञानसाधना महाविद्यालयातील अर्थशास्त्र शिकविणारे लोकप्रिय प्रा. डाँ श्रीरंग कुडुक सर नुकतेच निवृत्त झाले असून त्यांच्या निवृतीनिमीत्ताने एका विविधरंगी कार्यक्रमाचे नियोजन पारसिकनगर कळवा येथे करण्यात आले होते  ! आपल्या शांत आणि मनमिळाऊ स्वभावामुळे ते विद्यार्थी वर्ग , मित्रमंडळी, राजकीय नेते मंडळी,  सामाजिक क्षेत्रात फार लोकप्रिय होते. अनेक मित्रमंडळी त्यांचा अजातशत्रू म्हणून उल्लेख मोठ्या सन्मानाने करीत करतात . अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले होते  , खेडेगावातील झाडाच्या पारावर भरणाऱ्या शाळेत चौथी पर्यंत शिक्षण घेत पुढे स्वकष्टाने त्यांनी अनेक हाल अपेष्ठांचा सामना करीत त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. वेळ प्रसंगी गवताची कापणी केली तर विद्यार्थी दशेत अर्थांजनासाठी कँन्टीन चालविण्याचे काम ही केले  , एकच वही इयत्ता पास झाल्यानंतर ती नदीच्या पात्रात धुवून पुन्हा दुसर्‍या इयत्तेत त्यांना वापरावी लागली हे वास्तव त्यांनी मनात जपून ठेवले आहे . या सर्व गोष्टींचा बाऊ न करता उत्तरोत्तर प्रगती करत त्यांनी यशाचे शिखर सर केले आहे  , या सगळ्या संधर्षमय आयुष्यात त्यांना त्यांच्या मातोश्री श्रीमती मालनबाई यांचा आशीर्वाद आणि सुविद्य पत्नी जेष्ठ कवयित्री प्रा. नलिनी कुडुक यांची फार मोलाची साथ लाभली हे ते मोठ्या मनाने कबुल करतात  . कुडुक दापत्यांचे सामाजिक क्षेत्रात सुध्दा योगदान असुन अनेक यशस्वी कामे त्यांनी कुठल्याही प्रसिद्धच्या मागे न लागता पार पाडली  ! त्यांच्या निवृतीनंतरच्या समारंभात त्यांच्या मातोश्रींचा नव्वदीचा वाढदिवस सुद्धा साजरा करण्यात आला  , कलाक्षेत्र  , राजकीय क्षेत्र  , सामाजिक  , साहित्यिक , शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी या समारंभात उपस्थित होती  , या समारंभाच्या निमित्ताने स्वागतपर भाषणे  , कराओके संगीत मेजवानी  , लावणीनृत्य  , अशा विविधरंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . शेकडो कुडुकप्रेमी लोकांनी या कार्यक्रमात आपला सहयोग नोंदवला  ! या कार्यक्रमाचे नियोजन , सूत्रसंचालन ठाणे जिल्हा कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष जेष्ठ कवि लेखक बाळ कांदळकर यांनी केले तर स्वत: प्रा डाँ श्रीरंग कुडुक आणि प्रा. नलिनी कुडुक यांनी सर्वांचे आभार मानले. 00000

महसूल पंधरवडा अंतर्गत विविध कार्यक्रम संपन्न

कल्याण : ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कल्याण तालुक्यातील जांभुळ येथे महसुल पंधरवडा अंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण, वृक्षारोपण, विविध दाखल्यांचे वाटप या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला आमदार किसन कथोरे…

बारवी धरण ८९ टक्के भरले

मुसळधार पावसाने सात टक्क्यांची भर     बदलापूर: ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरणात रविवारी सकाळपर्यंत ८९ टक्के पाणी जमा झाले होते. शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अवघ्या २४ तासात सात टक्के पाण्याची भर धरणात झाली. त्यामुळे समाधान व्यक्त केले जाते आहे. शनिवारी २४ तासात धरण क्षेत्रात सुमारे २०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे बारवी धरण ८२ टक्क्यांवरून थेट ८९ टक्क्यांपर्यंत पोहोचले. ठाणे जिल्ह्यातील बहुतांश महापालिका, नगरपालिका आणि औद्योगिक वसाहतींना बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेले बारवी धरण पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरावे अशी सर्वांची आशा असते. त्यामुळे वर्षभर उद्योग आणि पिण्यासाठी आवश्यक पाणी उपलब्ध होते. यंदाच्या वर्षात कडक उन्हाळ्यामुळे बारवी धरणाची पाणी पातळी २५ टक्क्यांपर्यंत खाली आली होती. त्यानंतर जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने धरण क्षेत्रातील साठा समाधानकारक नव्हता. मात्र जुलै महिन्यात पावसाने संततधार का होईना धरणाच्या पाणी पातळीत वाढ केली. सुरुवातीचे तीन आठवडे संथगतीने बारवी धरणात पाणी साठा झाला. मात्र जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे बारवी धरणात समाधानकारक पाणीसाठा झाला. २४ ते २६ जुलै या तीन दिवसात बारवी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. २३ जुलै रोजी बारवी धरणात ५१ टक्के इतका पाणीसाठा होता. तर २६ जुलै रोजी धरणात ६८ टक्के पाणीसाठा होता. या तीन ते चार दिवसाच्या पावसामुळे बारवी धरण वेगाने भरले. मात्र त्यानंतर पुन्हा पावसाने उघडीप दिल्याने बारवी धरण संथ गतीने भरत होते. शनिवारी बारवी धरण क्षेत्रात सुमारे २०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामुळे बारवी धरणाच्या पाणी पातळीत वेगाने वाढ झाली. बारवी धरणात शनिवारी ८२ टक्के पाणीसाठा होता तर रविवारी हा पाणीसाठा ८९ टक्क्यांवर पोहोचला. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास येत्या काही दिवसात बारावी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची अशा व्यक्त होते आहे. रविवारी बारवी धरणाची पाणी पातळी ७१.४० मीटर पर्यंत होती. धरणात सध्या ३०१ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत हा पाणीसाठा कमीच आहे. गेल्यावर्षी ४ ऑगस्ट रोजी बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले होते. 000000

ठाण्यातील पाचही मतदारसंघात भाजपाच्या नेतृत्वाखाली विजयाचा संकल्प

भाजपा ठाणे जिल्हा विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा निर्धार     ठाणे : भाजपा ठाणे शहर जिल्हा अंतर्गत येणाऱ्या ठाणे शहर, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा, कळवा-मुंब्रा आणि कल्याण ग्रामीण मतदारसंघात भाजपाच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सर्व उमेदवांरांच्या विजयाचा संकल्प शनिवारी करण्यात आला. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच महायुतीच्या नेत्यांनी ठरविलेल्या उमेदवारांच्या विजयासाठी कार्य करण्याचा निर्धार भाजपाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचे रणशिंग फुंकण्यात आले. भाजपा महाराष्ट्र प्रदेशच्या महाअधिवेशनानंतर भाजपा ठाणे शहर जिल्ह्याच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक खारकर आळीतील महाजनवाडी येथील सभागृहात उत्साहात पार पडली. या बैठकीला प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ठाणे लोकसभा विस्तारक जयप्रकाश ठाकुर, जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, ठाणे शहर विधानसभा प्रमुख सुभाष काळे, ओवळा-माजिवडा विधानसभा प्रमुख मनोहर डुंबरे, सरचिटणीस मनोहर सुगदरे, सचिन पाटील, विलास साठे, डॉ. समीरा भारती, माजी नगरसेवक संदीप लेले, महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्नेहा पाटील, युवा मोर्चाचे अध्यक्ष सुरज दळवी आदींसह पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. या बैठकीला पालघरचे भाजपा खासदार हेमंत सवरा यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात येत होते. मात्र, अपरिहार्य कारणामुळे ते अनुपस्थित होते. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी प्रस्तावना केली. या बैठकीत सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर प्रदेश महाअधिवेशनात केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनानुसार विधानसभा निवडणुकीपर्यंत कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. तर आमदार निरंजन डावखरे यांच्या सूचनेनुसार, कोकणात सहापैकी पाच जागांवर महायुतीचा झेंडा फडकविण्यात महत्वाचे योगदान असलेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचेही अभिनंदन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या बैठकीला प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांनी अभिनंदन केले. लोकसभा निवडणुकीत विरोधकांकडून खोटे नरेटिव्ह प्रस्थापित करण्यात आले होते. त्याचा मुकाबला भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने करून मतदारांना भाजपाची भूमिका पटवून द्यावी. लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रत्येक कुटुंबापर्यंत पोचवावी, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्याबरोबरच त्यानंतर होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी भाजपा कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे.  नवमतदारांच्या नोंदणीबरोबरच लोकसभा निवडणुकीत वगळलेली व गायब झालेल्या मतदारांची आवर्जून नोंदणी करून घ्यावी. माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, भाजपा महिला मोर्चा आणि भाजपा युवा मोर्चाबरोबरच मंडलांमध्येही मतदारनोंदणी शिबिरे सुरू आहेत. मतदारनोंदणीबाबत सर्व पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न स्तुत्य आहेत, अशा शब्दांत जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. 00000

 जिल्ह्यात १५ ऑगस्टपर्यंत पशुसंवर्धन पंधरवडा

पंचसूत्रीची अंमलबजावणी   ठाणे : पंचसुत्रीच्या संदर्भात पशुपालकांमध्ये जागृती निर्माण करणे तसेच या पंचसुत्रीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने जिल्ह्यात १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘पशुसंवर्धन पंधरवडा-२०२४’ राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त डॉ. वल्लभ जोशी तसेच जिल्हा परिषदेच्या जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. समीर तोडणकर,  यांनी दिली आहे. १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील सर्व पशुवैद्याकीय संस्थामार्फत पशुधनाचा प्रादूर्भावापासून साथ रोग बचाव होण्याकरिता पशुधनास लाळखुरकुत, सांसर्गिक गर्भपात, लम्पीचर्मरोग, घटसर्प, फऱ्या, पीपीआर, आंत्रविषार इ. रोगांचे लसीकरण तसेच पशुमधील जंत निर्मुलन करण्यासाठी जंतनाशक औषधींचे वाटप, गोचीड गोमाशा निर्मुलनासाठी औषध फवारणी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे गाई म्हशींची वंधत्व तपासणी व उपचार शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती, पशुधनाच्या सकस आहाराचे महत्त्व तसेच सप्टेंबर २०२४ पासून चालू होणाऱ्या २१ व्या पशुगणनेच्या अनुषंगाने माहिती तसेच मार्गदर्शन करण्यात येत असून याचा लाभ घेण्यासाठी पशुपालकांनी नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेशी संपर्क साधावा. राज्यातील पशुधनाच्या उत्पादक क्षमतेचा पुरेपुर वापर करुन पशुपालनापासून मिळणाऱ्या उत्पन्नाद्वारे राष्ट्रीय सकल उत्पादनात भर टाकण्याची आवश्यकता विचारात घेऊन राज्यात पशुउद्योजकता निर्माण करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग कार्यरत आहे. त्यासाठी विभागाकडून उच्च उत्पादन क्षमता असलेल्या वंशावळीची पैदास, पशुस्वास्थ, पशुखाद्य, पशुचारा व व्यवस्थापन या पंचसुत्रीची अंमलबजावणी करण्यात येत आहेत. राज्यातील सर्व पशुधनास बाबत २७ फेब्रुवारीला शासनाने सूचना निर्गमित केल्या असून जिल्हाधिकारी यांनी ठाणे जिल्ह्यात सर्व जनावरांना टॅगिंग करणे बाबत आदेश दिले आहेत, त्यानुसार अनावधानाने राहिलेले अथवा नवीन जन्म घेतलेली जनावरे यांना सुद्धा पशुपालकांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन tagging करून घ्यावे. ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण तीन तालुका लघुपशु वैद्यकीय, सर्व चिकित्सालय एक, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय एक फिरता पशुवैद्यकीय दवाखाना, श्रेणी १ मधील २२ व श्रेणी २ मधील ४२ असे एकूण ६९ संस्था कार्यरत आहेत. चौकट ६ ऑगस्ट व ७ ऑगस्ट रोजी कार्यशाळा पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन व जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पशुधन विकास अभियानांतर्गत उद्योजकता निर्माण करण्याच्या दृष्टीने ठाणे जिल्ह्यात ६ ऑगस्ट आणि ७ ऑगस्ट या दोन दिवशी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळा ही रोटरी कम्युनिटी क्लब, वडवली, अंबरनाथ या ठिकाणी सकाळी ९:३० वाजता आयोजित केली आहे. या कार्यशाळेमध्ये राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत येणाऱ्या विविध योजनेचे तपशील, बारकावे व योजनेचा अर्ज कसा करावा याविषयी सखोल मार्गदर्शन तज्ञांद्वारे करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये अर्ज प्रक्रिया ज्या लाभार्थ्यांनी पूर्ण केली आहे किंवा जे लाभार्थी यशस्वीरित्या शेळीपालन, कुक्कुटपालन व्यवसाय करत आहेत त्यांचे स्वः अनुभव व मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये करण्यात येणार आहेत. पशुपालकांनी कार्यशाळेत नोंदणी करण्यासाठी आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना किंवा तालुक्यातील पंचायत समिती, पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा व नाव नोंदणी करावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे. 00000