Category: ठाणे

Thane news

डेक्कन जिमखान्याला समस्यांचा विळखा -ॲड.भाऊसाहेब मोरे

अशोक गायकवाड   कर्जत : गेल्या काही दिवसांपासून टू व्हीलर, फोर व्हिलर, रिक्षा पार्किंग व कचरा आदी समस्यांच्या विळख्यात डेक्कन जिमखाना परिसर अडकला आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी…

रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते वासांबे विभागासाठी रुग्णवाहिका लोकार्पण!

पनवेल : यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था तसेच रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचा दरवर्षी दोन रुग्णवाहिका लोकार्पण करण्याचा मानस आहे. त्या अनुषंगाने मागच्या महिन्यात दिघोडे…

कल्याण शहरात खड्ड्यांचे साम्राज्य

कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना अक्षरश: कसरत करावी लागत आहे, तसेच अनेकांना पाठ व मणकादुखीचा आजार उद्भवत आहे; मात्र प्रशासनाकडून यावर कोणतीच उपाययोजना करण्यात…

बँक लिंकेज संदर्भात रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने कार्यशाळा संपन्न

ठाणे  : आर्थिक वर्ष २०२४-२५ या कालावधीत जास्तीत जास्त पतपुरवठा (बॅंक कर्ज) उपलब्ध करून देणे, ऑनलाइन बँक लिंकेज करणे ही प्रक्रिया राबवण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र, जिल्हा अग्रणी बँक, वागळे इस्टेट येथे सर्व बँक व्यवस्थापक व उमेद कर्मचारी यांची १२ ऑगस्टला एक दिवशीय कार्यशाळा मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झाली. या कार्यशाळेची सुरुवात दिपप्रज्वलन व मान्यवरांचे स्वागत करून करण्यात आले. कार्यशाळेचे प्रास्तविक प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तथा सह जिल्हा अभियान संचालक एमएसआरएलएम,  छायादेवी शिसोदे यांनी केले. तसेच राष्ट्रीय संसाधन प्रशिक्षक (NRP) खान्डेराव दिक्षित यांनी कार्यशाळेचे प्रशिक्षण दिले. गटाचे बँक लिंकेज NRLM MIS पोर्टलवर ऑनलाइन प्रक्रिया करणे व आर्थिक वर्ष २०२४-२५ या कालावधीतील आर्थिक व भौतिक लक्ष साध्य करण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.  प्रशिक्षणादरम्यान उद्भवलेल्या शंकांचे निरस जिल्हा व्यवस्थापक – आर्थिक समावेशन प्रतिक्षा आगीवले यांनी केले. एनआरएलएम मध्ये आर्थिक समावेशन उपक्रम एनआरएलएम च्या समूहांना त्यांच्या सामाजिक व आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी वेळेवर, प्रभावी आणि पारदर्शक आर्थिक सेवा प्रदान करतात, तसेच जीवन संरक्षण आणि वृद्धापकाळसाठी संरक्षणात्मक कवच प्रदान करते. स्वयं सहाय्यता समूहांचे आर्थिक व सामाजिक दृष्ट्या जीवनमान उंचावण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) अंतर्गत स्वयं सहाय्यता समूहांना विविध बँकेद्वारे बँक पतपुरवठा उपलब्ध करून देण्यात येतो उपलब्ध झालेल्या कर्जाचा वापर करून महिला प्राथमिक गरजा पूर्ण करतात तसेच व्यवसाय सुरू करतात. आर्थिक वर्ष २०२३-२४ व २०२४-२५ पर्यंत एकूण २५९८० स्वयंसहाय्यता समूहांना ७५८९६.६७ (लक्ष) बँक पतपुरवठा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. उमेद अंतर्गत विविध अभिनव उपक्रम गावस्तरावर राबविले जात आहेत. स्वयंसहाय्यता समूहांना व्यवसायामध्ये वृद्धी निर्माण करणेसाठी विविध बँकांच्या माध्यमातून शून्य टक्के व्याज दरातून कर्ज पतपुरवठा उपलब्ध करून दिला जातो. बँक व्यवस्थापक यांचे एक दिवसीय प्रशिक्षण मध्ये आर्थिक समावेशन बाबत मार्गदर्शन करण्यात आले, Online बँक प्रस्ताव सादर करण्याचे प्रशिक्षण, PMJJBY, PMSBY, अटल पेन्शन योजना, आरोग्य विमा, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना, सुमतीबाई सुकाळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजना, मुद्रा कर्ज योजना, आणि वैयक्तिक उद्योग व्यवसायाकरिता मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र ठाणे सोनाली देवरे, जिल्हा अग्रणी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र व्यवस्थापक अभिषेक पवार, जिल्हा अभियान व्यवस्थापक (MSRLM) सारिका भोसले, तसेच  जिल्ह्यातील सर्व  बँक व्यवस्थापक, सर्व MSRLM चे अधिकारी, प्रभाग समन्वयक, माविम कर्मचारी व सर्व बँक सखी आदि प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. सदर प्रशिक्षणाचे नियोजन जिल्हा अभियान व्यवस्थापक सारिका भोसले व जिल्हा व्यवस्थापक- आर्थिक समावेशन प्रतिक्षा आगीवले यांनी केले. कार्यशाळेचा समारोप सारिका भोसले यांनी सर्वांचे आभार मानून केले. 00000

डायघरवासियांना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिला दिलासा

अनिल ठाणेकर   ठाणे : कल्याण तालुक्यातील डायघर येथील भागात नागरिकांना कचऱ्याच्या समस्येने ग्रासले आहे. याविषयी त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचे हत्यारही उपसले होते. मात्र संवेदनशील जिल्हाधिकारी म्हणून ओळख असलेले जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी त्यांच्या या प्रश्नांबाबत चर्चेतून प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्यासह तेथील नागरिकांना आज जिल्हाधिकारी कार्यालयात आमंत्रित केले होते. या बैठकीस ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, कल्याण तहसिलदार सचिन शेजाळ, नायब तहसिलदार दिनेश पैठणकर, डायघरवासिय उपस्थित होते. यावेळी आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी तेथील समस्यांचा पाढाच वाचला. बहुतांश समस्या या त्या परिसरात साचलेला कचरा, दुर्गंधी अन् त्यामुळे उद्भवणाऱ्या आरोग्य विषयक समस्या याबाबतीतील होत्या. यावर जिल्हाधिकारी श्री.शिनगारे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हे विषय अतिशय गांभीर्याने घेण्याचे सूचित केले. तसेच या परिसरातील कचरा तात्काळ हटवावा, त्या कचऱ्यावर आवश्यक ती प्रक्रिया करावी, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने कराव्यात, अशाही सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. याशिवाय येथील नागरिकांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मुर्त्यांच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावाचीही मागणी केली. ही मागणी तात्काळ मान्य करीत ठाणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी तेथे कृत्रिम तलावाची लगेचच उभारणी करण्यात येईल, असे आश्वासित केले. शेवटी जिल्हाधिकारी महोदयांनी डायघरवासियांसाठी तातडीने घेतलेल्या या बैठकीबद्दल आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्यासह उपस्थित सर्व नागरिकांनी आभार मानले. 00000

जिल्हा परिषदेच्या पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये शिक्षकांची कंत्राटी तत्वावर भरती – बाळासाहेब राक्षे

ठाणे : जिल्हा परिषद ठाणे, प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या कालावधीसाठी मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये पात्र उमेदवारांची उपशिक्षक, पदवीधर शिक्षक या पदावर एकत्रित मानधन तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने…

२७ गावांतील सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार- डॉ. श्रीकांत शिंदे

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या २७ गावांतील सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांचे…

कर्जत तालुक्यात सुरळीत वीज पुरवठ्यासाठी उर्जामंत्र्यांसोबत बैठक घेणार : सुधाकर घारे*

अशोक गायकवाड   कर्जत : कर्जत तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी महावितरणच्या विरोधात कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीने कर्जत येथील टिळक चौकात साखळी उपोषण सुरु केले आहे. रायगड…

कल्याणमधील शहाड, रामबाग परिसराचा पाणी पुरवठा रात्रीपासून बंद

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेची उल्हास नदी काठच्या मोहिली येथील जलशुध्दीकरण केंद्राची कल्याण पश्चिमेतील शहाड, रामबाग, बिर्ला महाविद्यालय परिसर, जोशीबाग, मिलिंदनगर परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला सोमवारी मध्यरात्री दीड वाजता…

ठाण्याला नवे सायबर पोलीस ठाणे, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच उद्घाटनाची शक्यता

ठाणे : गेल्याकाही वर्षांपासून ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात सायबर गुन्ह्यांची मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. फसवणूक झाल्यानंतर नागरिकांनी तक्रारी कुठे करायच्या असा प्रश्न निर्माण होत असे. अनेकदा तक्रारदाराला पोलीस ठाण्यातून मुख्यालय,…