Category: ठाणे

Thane news

कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक व पदवीधर मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीचे दुसरे प्रशिक्षण संपन्न

राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केली मतमोजणी केंद्राची पाहणी अशोक गायकवाड     ठाणे : विधानपरिषदेच्या कोकण व मुंबई पदवीधर तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणी चे दुसरे प्रशिक्षण आज…

घोडबंदर रोड, नागला बंदर येथील हुक्का पार्लर, रेस्ट्रो बारवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

सुमारे ९२ हजार चौरस फूट क्षेत्रात झाली कारवाई     ठाणे : अनधिकृत पब, हुक्का पार्लर, बार व अंमली पदार्थ विक्री करणारी अवैध बांधकामे निष्कसित करण्याबाबत मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत पहिल्या वर्षी १० हजार ज्येष्ठ नागरिकांना घडवणार मोफत दर्शन

आमदार प्रताप सरनाईक यांची तीर्थ दर्शन योजनेची संकल्पना मान्य     ठाणे : महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे ’मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना“ याच वर्षांपासून लवकरच सुरु होणार असून ६० वर्षा वरील भाविक…

ठाणे किल्ल्याच्या संवर्धनासाठी विरोधाच्या भिंती पडल्या

ठाणे कारागृह बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही-आमदार संजय केळकर विरोधी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही दिला पाठिंबा अनिल ठाणेकर       ठाणे : सुमारे ३०० वर्षांचा इतिहास असलेला आणि…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही १५०० रुपयांचा आवळा’ देऊन मतांचा ‘कोहळा’ हे सरकार काढू पाहतेय – प्राची हातिवलेकर

अनिल ठाणेकर     ठाणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही १५०० रुपयांचा ‘आवळा’ देऊन मतांचा ‘कोहळा’ हे सरकार काढू पाहतेय. हे ऋण काढून सण करणे सरकारने त्वरित थांबवावे.…

 ठाणे महापालिकेत पोकळी वाढली

महापालिकेच्या सेवेतून ६२ अधिकारी, कर्मचारी सेवा निवृत्त ठाणे : ठाणे महापालिकेतून सेवा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढतांनाच दिसत आहे. मे महिन्यात ११२ अधिकारी, कर्मचारी सेवा निवृत्त झाल्यानंतर जून महिन्यात पुन्हा ६२ अधिकारी, कर्मचाºयांची त्यात भर पडली आहे. त्यामुळे ठाणे महापालिका दिवसेंदिवस रिती होत असल्याचेच चित्र या निमित्ताने दिसत आहे. यात उपायुक्त, शहर विकास विभागाचे कार्यकारी अभियंता, सहाय्यक आयुक्त, मुख्याध्यापिका, लिपीक, प्राथमिक शाळेचे शिक्षक आदींचा यात समावेश आहे. महापालिका शाळांमध्ये आधीच मुख्याध्यापकांची कमतरता आहे. शिक्षकांची देखील वानवा भासत आहे. त्यात सेवा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या काही कमी होतांना दिसत नाही. ठाणे महापालिकेच्या सेवेत २०१५ ते डिसेंबर २०२३ पर्यंत १५०० हून अधिक कर्मचारी, अधिकारी सेवा निवृत्त झाले आहेत. त्यात २०२४ सुरु होताच, पहिल्याच महिन्यात २७ कर्मचारी, अधिकारी हे सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात त्यात आणखी २३ जणांची भर पडली. त्यानंतर एप्रिल महिन्यात तब्बल ३८ अधिकारी, कर्मचारी सेवा निवृत्त झाल्याची माहिती पालिकेने दिली. त्यानंतर आता मे महिन्यात तब्बल ११२ अधिकारी, कर्मचारी सेवेतून निवृत्त झाले आहेत. त्यानंतर आता जून महिन्यात तब्बल ६२ अधिकारी, कर्मचारी सेवा निवृत्त झाले आहेत. दर महिना कर्मचाऱ्यांची ही संख्या वाढतच जात आहे. त्यात आता शहर विकास विभागातील कार्यकारी अभियंता सेवा निवृत्त झाले आहेत. मागील महिन्यात देखील एक कार्यकारी अभियंता सेवा निवृत्त झाले होते. त्यात पुन्हा एकाची भर पडली आहे. समाज विकास विभागाचे उपायुक्त, वर्तक नगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, कार्यालयीन अधिक्षक, कार्यालयीन उपअधिक्षक, दोन मुख्याध्यापिका सिस्टर इनचार्ज, वरीष्ठ लिपिक, दोन लिपीक, वरीष्ठ लेखापरिक्षक, प्रस्ताविका, प्राथमिक शिक्षका ११, चालक यंत्रचालक, वाहन चालक, जमादार, आरक्षक, बालवाडी आया, माळी बिगारी, बिगारी, सफाई कामगार आदींचा त्यात समावेश आहे. मागील काही वर्षापासून महापालिका शाळांमध्ये शिक्षक तसेच मुख्याध्यापकांची संख्या कमी आहे. महापालिकेने तासिका शिक्षक घेतले असले तरी देखील ते पूर्ण क्षमतेने हजर होत नसल्याने शिक्षकांची पोकळी दिसून येत आहे. त्यातही मुख्याध्यापकांची संख्या देखील आता घटत चालली आहे. दुसरीकडे शिक्षक नसल्याने मुख्याध्यापकांना देखील विद्यार्थ्यांना शिकवावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ही पोकळी केव्हा भरुन निघणार असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंब्रा व कौसा येथे मोफत दाखले वाटप शिबीर-आनंद परांजपे

ठाणे : ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि राष्ट्रवादी काँग्रेस, ठाणे शहर (जि.) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी, २९ जून व रविवारी, ३० जून २०२४ रोजी, मुंब्रा व कौसा येथे ‘मोफत दाखले वाटप शिबीरा’चे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा खासकरुन विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस, अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी केले आहे. विद्यार्थांना लागणारे, 1.अधिवास (डोमीसाईल) दाखला, 2.उत्पन्नाचा दाखला, 3. रहिवासी दाखला त्याप्रमाणे नागरिकांना लागणारा 4. ज्येष्ठ नागरिक दाखला, हे दाखले तत्परतेने काढून देण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाची व राष्ट्रवादी काँग्रेस, ठाणे शहर(जि) पक्षाची संपूर्ण टीम मुंब्रा व कौसा येथील दाखल्याची नोंद करणाऱ्या ठिकाणी दिवसभर उपस्थित असणार आहे. डाॅक्युमेंट्स व्हेरिफाय करुन, अपलोड करुन, रिसीट दिली जाईल आणि या ठिकाणी आपल्याला आपला दाखला मोफत उपलब्ध करून दिला जाईल. तरी, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि राष्ट्रवादी काँग्रेस, ठाणे शहर (जि.) यांच्या संयुक्त विद्यमाने, शनिवार, दिनांक २९ जून २०२४ रोजी, आफरीन हाॅल, जामा मशीदीच्या बाजुला, मुंब्रा रेल्वे स्थानकासमोर व रविवार, दिनांक ३० जून, २०२४ रोजी, मुबारक पॅलेस हाॅल, दुसरा मजला, वीरानी पेट्रोल पंपाजवळ, कौसा-मुंब्रा येथे, सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेमध्ये, आयोजित करण्यात आलेल्या या ‘मोफत दाखले वाटप शिबीरा’चा, विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे अपील विद्यार्थीवर्गाला व ज्येष्ठ नागरिकवर्गाला, प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी केले आहे. मोफत दाखले वाटप शिबिरामध्ये उपलब्ध होणारे दाखले आणि त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत : 1.अधिवास (डोमीसाईल) दाखल्यासाठी, १.आधार कार्ड, २. रेशन कार्ड / लाईट बिल / टॅक्स पावती, ३. शाळा सोडल्याचा दाखला / जन्माचा दाखला, ४. अर्जदाराचा १ फोटो, ५. जन्म महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर १० वर्षाचा रहिवासी पुरावा,  त्यामध्ये फक्त अर्जदाराच्या नावाचे लाईट बिल किंवा टॅक्स पावती किंवा अर्जदार शाळेमध्ये शिकत असल्यास १० वर्षाचे प्रगती पुस्तक लागतील. 2. रहिवासी दाखल्यासाठी, १ आधार कार्ड, २.रेशन कार्ड / लाईट बिल / टॅक्स पावती, ३. शाळा सोडल्याचा दाखला / जन्माचा दाखला, ४. अर्जदाराचा १ फोटो, ५. जन्म महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर १५ वर्षाचा रहिवासी पुरावा, त्यामध्ये फक्त अर्जदाराच्या नावाचे लाईट बिल किंवा टॅक्स पावती किंवा अर्जदार शाळेमध्ये शिकत असल्यास १५ वर्षाचे प्रगती पुस्तक लागतील. 3. उत्पन्नाचा दाखल्यासाठी, १.अर्जदाराचे आधार कार्ड, २. पॅन कार्ड, ३. रेशन कार्ड, ४.मागील तीन महिन्याचे लाईट बिल, ५. शेजाऱ्यांचे आधार कार्ड, ६. अर्जदाराचे ४ फोटो, ७. बँकेचे पासबुक अपडेटे केलेले. ८. एक लाखाच्या आत दाखला हवा असल्यास नोटरी केलेले प्रतिज्ञा पत्र सादर करावे लागेल. 4. ज्येष्ठ नागरिक दाखल्यासाठी, १. आधार कार्ड, २. पॅन कार्ड, ३. रेशन कार्ड किंवा लाईट बिल लागेल. शिबिराच्या ठिकाणी तपासणीकरिता सर्व मूळ कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. तरी या मोफत दाखले वाटप शिबीराचा जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी व सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, अशी विनंती प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी केली आहे.

गरोदर मातांची काळजी घेण्यासाठी किलकारी योजना – डॉ. गंगाधर परगे

ठाणे : जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत ग्रामीण भागात देखील ‘किलकारी’ या नवीन योजनेची अंलबजावणी करण्यात आली असून गर्भवती महिलेला गावातील आरोग्यसेविकाद्वारे Reproductive and Child Health (आर.सी.एच) पोर्टलवर नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी केले आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागातर्फे गरोदर महिलांच्या व एक वर्षापर्यंतच्या बालकांच्या सुरक्षेसाठी ‘किलकारी’ ही नवीन योजना आणि आशासेविकांसाठी मोबाईल अकादमी ठाणे जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘किलकारी’ योजना केंद्रीकृत संवादात्मक ध्वनी प्रतिसाद (आयव्हीआर) आधारित मोबाइल आरोग्यसेवा आहे. गर्भधारणा, बाळंतपण आणि बाल संगोपन विषयक ७२ श्राव्य संदेश थेट कुटुंबांच्या नोंदणीकृत भ्रमणध्वनीवर गर्भधारणेच्या दुसऱ्या तिमाहीपासून मूल एक वर्षाचे होईपर्यंत आई व बाळाचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी मोफत, साप्ताहिक रेकॉर्डेड ऑडियो कॉल करण्यात येत आहे. ऑडियो कॉल चुकल्यास किंवा त्या आठवड्यातील ऑडियो कॉल पुन्हा ऐकायचा असल्यास नोंदणीकृत १४४२३ या मोबाईल क्रमांकाद्वारे संपर्क करता येणार आहे. गरोदर महिलांचे स्वत: वापरत असलेल्या मोबाईल द्वारेच नोंदणी करण्यात यावी अशी माहिती जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटिल यांनी दिली आहे. एप्रिल व मे महिन्यातील आकडेवारी नुसार ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात ६ हजार ४१८ व शहरी भागात २१ हजार ६२० गर्भवती महिलांची नोंद आहे. ठाणे जिल्ह्यातील १ हजार १२३ आशासेविकांना त्यांच्या कामात उपयुक्त ठरणारे ऑनलाइन प्रशिक्षण दिले आहे. त्याच धर्तीवर आशासेविकांसाठी नोंदणीकृत १४४२९ दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच किलकारी सेवा देण्यासाठी येणारा दूरध्वनी क्रमांक ०१२४-४४५१६६० आहे.

ठाणे स्थानकाजवळ रेल्वेची संरक्षण भिंत कोसळली

एक वृद्ध जखमी     ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक येथील फलाट क्रमांक दोन जवळ रेल्वेच्या २० फूट उंच संरक्षण भिंतीचा भाग कोसळून वृद्ध जखमी झाले. नरेंद्र कोळी (६२) असे जखमीचे नाव असून त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुमारे दोन वर्षांपूर्वीच ही भिंत बांधली होती. जमीन खचल्याने ही भिंतीचा भाग कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. नागरिकांनी रेल्वे रुळ ओलांडू नये तसेच रुळांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासनाने ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील फलाट क्रमांक दोनजवळील कोळीवाडा भागात भिंत उभारली होती. शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास या भिंतीचा ६० फूट लांब आणि २० फूट उंच भाग कोसळला. याच दरम्यान, नरेंद्र कोळी हे या भागातून जात होते. कोळी या घटनेत जखमी झाले. त्यांच्या पायाला दुखापत झाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ठाणे महापालिका, रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी धोकापट्टी उभारली आहे. जमीन खचल्याने ही भिंत कोसळल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 00000

सलग दुसऱ्या दिवशीही ठाणे शहरातील बेकायदेशीर

पब्ज-बार व अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर महापालिकेची धडक कारवाई   ठाणे : ठाणे शहरातील पब्ज, बार व अंमली पदार्थ विक्री करणारी अवैध बांधकामे निष्कसित करण्याची कारवाई सलग दुसऱ्या दिवशीही…