Category: ठाणे

Thane news

 01 जुलै 2024 रोजी 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या युवकांनी मतदार यादीत नाव नोंदविण्याचे आवाहन

ठाणे  : भारत निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत दि.01 जुलै 2024 रोजी 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या युवकांनी मतदार यादीत नाव दाखल करण्यासाठी अर्ज करावे. तसेच सर्व…

डोंबिवलीतील पदवीधरांचा कोकण पदवीधर मतदानावर बहिष्कार

डोंबिवली :  येथील के.व्ही. पेंढरकर हे कॉलेज विनाअनुदानित करण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. याविरोधात कॉलेजमधील शिक्षक व माजी विद्यार्थी गेल्या आठवड्याभरापासून साखळी उपोषणास बसले आहेत. याकडे शासन लक्ष देत नसल्याने येत्या…

‘पेंढरकर कॉलेज बंद होऊ देणार नाही’

मनसेचा सरकारला इशारा डोंबिवली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर देसाई यांना पत्र पाठविले होते. या पत्राला देसाई यांनी समाधानकारक उत्तर दिलेली नाही. कॉलेजला स्वायत्तता मिळाली असली तरी व्यवस्थापन अनुदानित कॉलेज बंद करु शकत नाही. व्यवस्थापनाची ही कृती शिक्षक, विद्यार्थी यांच्यावर अन्याय करणारी आहे. तसेच विद्यापीठ कायदा आणि सरकारी नियमांचे उल्लंघन करणारी आहे. या प्रकरणी शिक्षण मंत्र्याकडे दाद मागणार अन्यता मनसे स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा गांगुर्डे यांनी देसाई यांना दिला आहे. डोंबिवलीतील के.व्ही.पेंढरकर कॉलेज अनुदानित असताना ते ते विनाअनुदानित करण्याचा घाट व्यवस्थापनाने घातला आहे. त्याविरोधात 14 जून पासून कॉलेज समोर शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांचे साखळी उपाेषण सुरु आहे. या आंदोलनाची गंभीर दखल घेत मनसे विद्यार्थी सेनेचे प्रदेश संघटक संतोष गांगुर्डे यांनी सोमवारी डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर देसाई यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा अध्यक्ष धनंजय गुरव, डोंबिवली शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे यांसह शिष्टमंडळ उपस्थित होते. एक तासांच्या प्रदीर्घ चर्चेअंती देसाई यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्याची सुनावणी 7 जुलै रोजी होणार आहे. त्यानंतर काय ते बाेलू असे सांगितले. गांगुर्डे यांनी मराठी विभाग का बंद केला आहे. कॉलेजमध्ये बाऊन्सर ची गरज काय ? प्राध्यापकासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एका खोलीत काम ने देता बसवून का ठेवले जात आहे. या प्रकरणी जाब विचारला. चर्चेअंती संस्थाचालकांकडून मनविसे शिष्टमंडळाला कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे शासन दरबारी जाब विचारुन मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा ईशारा मनविसेने दिला. याबाबत शिष्ठमंडळाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांची भेट घेऊन त्यांच्याही समस्या जाणून मनविसे पूर्णपणे त्यांच्यासोबत आहोत असे आश्वासन दिले.

कल्याण-शिळफाटा रस्त्याला वाहनकोंडीचा विळखा

दोन्ही मार्गिकांमधून एकाच दिशेने वाहने सोडण्याचा प्रकार कल्याण: कल्याण शिळफाटा रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलीस दररोज संध्याकाळी दोन्ही मार्गिकांमधून एकाच दिशेने वाहने सोडतात. या कालावधीत समोरून दोन्ही मार्गिकांमधून येणारी वाहने काही अंतरावर वाहतूक पोलिसांकडून किमान १५ मिनिटे रोखून धरली जातात. वाहतूक पोलिसांच्या या मनमानी नियोजनामुळे काही दिवसांपासून शिळफाटा रस्त्यावर पुन्हा वाहन कोंडी होऊ लागली आहे. शिळफाटा रस्त्यावर वाहने धावण्याचा वेग सर्वाधिक आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहने धावती असली की वाहन कोंडी होत नाही. वाहतूक नियोजनाच्या नावाने कोळसेवाडी वाहतूक विभागाचे पोलीस काटई नाका, खिडकाळी, देसई हद्दीत संध्याकाळच्या वेळेत कल्याणकडून शिळफाटा दिशेने येणारी वाहने रोखून धरतात. त्याचवेळी शिळफाटा दिशेने जाणारी वाहने दोन्ही मार्गांमधून एकाच वेळी सोडतात. या वाहनांची रांग संंपली की मग कल्याणकडे येणारी रोखून धरलेली वाहने दोन्ही मार्गिकांमधून सोडली जातात. किमान पंधरा मिनिटे वाहने रोखून धरण्याच्या या प्रकरामुळे शिळफाटा रस्त्यावर दररोज वाहन कोंडी होऊ लागली आहे. वाहतूक नियोजनाच्या या अजब नियोजनामुळे प्रवासी त्रस्त आहेत. शिळफाटा रस्त्यावरून दोन्ही बाजुने सतत वाहने धावत असली तर वाहन कोंडी या रस्त्यावर होत नाही. वाहने एकाच जागी रोखून धरण्याच्या प्रकारामुळे खिडकाळी, काटई, निळजे, मानपाडा, शिळफाटा रस्त्याचे पोहच रस्त्यांवरील वाहने अडकून पडतात. संध्याकाळच्या वेळेत नोकरदार, शाळकरी विद्यार्थी घरी परतत असतात. त्यांना या कोंडीचा सर्वाधिक फटका बसतो. मुंबई, नवी मुंबईतून यापूर्वी खासगी वाहनाने शिळफाटा रस्त्यावरून घरी सात ते साडे सात वाजता पोहचणारा प्रवासी आता साठे ते नऊ वाजता पोहचत आहे. साडे सहा वाजता घरी पोहचणारे विद्यार्थी शाळेच्या बस वाहन कोंडीत अडकत असल्याने सात ते साडे सात वाजता घरी पोहचत असल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत. वाहतूक पोलिसांनी वाहने रोखून धरण्याची पध्दत बंद करून शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक धावती ठेवावी, अशी प्रवाशांची मागणी आहे. अधिक माहितीसाठी कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचीन सांडभोर यांना संपर्क केला, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. मोबदला नाही कल्याण शिळफाटा रस्त्यालगतच्या ११ गावांमधील रस्ते बाधित शेतकऱ्यांंना शासनाने गे्ल्या तीन महिन्यापूर्वी सुमारे ३५० कोटीचा मोबदला जाहीर केला आहे. हा मोबदला अद्याप शेतकऱ्यांंना वाटप करण्यात येत नसल्याने शेतकऱ्यांनी मोबदला मिळाल्याशिवाय शिळफाटा रस्ता रुंदीकरणासाठी जमीन न देण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे काटई, निळजे, मानपाडा, कोळे गाव हद्दीतील रस्तारूंदीकरण अद्याप रखडले आहेत. लोकसभेची आचारसंंहिता लागू होण्यापूर्वी शासनाने रस्ते बाधितांना भरपाईची रक्कम जाहीर केली होती. आता आचारसंहिता संपली आहे ही रक्कम तातडीने शेतकऱ्यांना वितरित करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी निरंजन डावखरेंचे ‘व्हिजन डॉक्युमेंट’

ठाणे : कोकणातील पदवीधर तरुण व स्पर्धा परीक्षार्थींना नोकरीची संधी, पर्यटन व्यवसायाला पाठबळ आणि कोकणाच्या सर्वांगीण विकासाची खात्री देणारे `व्हिजन डॉक्युमेंट’ आमदार निरंजन डावखरे यांनी जाहीर केले आहे. तसेच कोकणाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पुन्हा एकदा निवडून देण्याचे आवाहन केले आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी भाजपासह महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांची या मतदारसंघात दुसरी टर्म झाली असून, ते आता हॅट्रिकसाठी सज्ज झाले आहेत. आगामी सहा वर्षाच्या काळात कोकणातील पाचही जिल्ह्यात करण्यात येणाऱ्या विकासकामांचे `व्हिजन डॉक्युमेंट’ जाहीर केले आहे. या `व्हिजन डॉक्युमेंट’मध्ये `मिशन एज्युकेशन’नुसार विद्यार्थी, संस्थाचालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीवर्गाच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाची पावले ओळखून नवीन शैक्षणिक धोरण आखले आहे. त्यानुसार बदलत्या काळानुसार हायस्पीड इंटरनेट, डेटा व्यवस्थापन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांनी आणलेल्या क्रांतीचे आव्हान पेलण्यासाठी कौशल्य विकास, नवीन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. कोकणातील पाचही जिल्ह्यातील प्रत्येक शिक्षकाला नवीन शैक्षणिक धोरणाचे प्रशिक्षण देण्यासाठी समन्वय, नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक शाळेत डिजिटल रुम आणि रोबोटिक्स लॅब तसेच इलेक्ट्रॉनिक गॅझेट्ससाठी अखंड विजेची सुविधा, शासकीय योजना आणि `मेडा’च्या योजनांसाठी समन्वय साधून कोकणातील पाचही जिल्ह्यातील शाळा पुढील सहा वर्षांत टप्प्याटप्प्याने ग्रीन स्कूल, कोकणातील प्रत्येक मुलाला उत्तम शिक्षण आदी `व्हिजन’मध्ये मांडण्यात आले आहे. एमपीएससी, युपीएससी व अन्य स्पर्धा परिक्षांसाठी जिल्हानिहाय व तालुकानिहाय मार्गदर्शन केंद्र स्थापन करून त्यात ग्रंथपाल व इंटरनेट सुविधा उपलब्ध करणार, पदवीधर शिक्षकांच्या पदोन्नती गती देणार, राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षक यांची जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्‍नशील राहणार आहोत, अशी ग्वाही `व्हिजन डॉक्युमेंट’मध्ये देण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा केंद्राची स्थापना झाल्यानंतर तालुका स्तरावर सुविधा, पदवीधर शिक्षकांसाठी सेवा व पदोन्नती, पदवीधर शिक्षकांचे वेतनविषयक प्रश्न, पदवीधर शिक्षकांच्या विविध समस्या, कोकणातील शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी एकात्मिक मध धोरण, मच्छिमारांसाठी मत्स्योद्योग धोरण, फळांवरील प्रक्रिया उद्योगाला वेग, पुष्पशेतीच्या प्रगतीसाठी पुढाकार आदींबरोबर कोकणासाठी स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ सुरू करण्याचा संकल्प आमदार निरंजन डावखरे यांनी केला आहे.

कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यातील १२४ मतदान केंद्रांवर मतदान

ठाणे : विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदार लसंघासाठी येत्या 26 जून 2024 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील १२४ मतदान केंद्रावर सकाळी ७.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव असलेल्या जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजाववा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यातील मतदान केंद्राची यादी सोबत जोडली आहे.

सर्व्हिस रोडवरील बिल्डरच्या अडगळीचे सामान हटवण्याची मागणी

ठाणे : सर्व्हिस रोड गुरुद्वारा पदचारी पुलाजवळ ड्रीम्स कंपनी ने टाकलेल्या त्यांच्या लोखंडी सामानामुळे या पुला वरून नागरिक ये-जा करू शकत नाहीत.  रहदारीच्या रस्त्यावरून लोकांना रस्ता क्रॉस करावा लागत आहे, यामुळे  अपघाताची शक्यताही खूप वाढली असून लोखंडी अडगळ काढण्याची मागणी रिपब्लिकन बहुजन सेनेने  पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे करण्यात आली आहे. सुचिता कॉ-ऑप,सोस, लिमिटेड , C.T. S  No . ३४०/३४१/३४२/३४३ आणि ३४४ , टीका नं.१० , व्हिलेज नौपाडा ,ठाणे. येथे, सुचिता कॉ-ऑप,सोस चे  री-डेव्हलोपमेंट चे काम चालू आहे. जवळील सर्व्हिस रोड ला लागून पब्लिक फ्लाय ओव्हर ब्रिज आहे . याच ब्रिज वरून लोक ये-जा करतात , परंतु ड्रीम्स कंपनी ने टाकलेल्या त्यांच्या लोखंडी सामानामुळे या ब्रिज वरून लोक ये-जा करू शकत नसल्याचे … यांनी सांगितले सर्व्हिस रोड वर हे लोखंडी सामान असल्यामुळे आता पाऊस चालू झाला आहे तर तेथे पाणी साचते आहे आणि त्यामुळे तेथे खूप मच्छर होत आहेत त्यामुळे पब्लिक मध्ये आजारपण वाढण्याची शक्यता  वाढली आहे. बिल्डरच्या मनमानी कारभारामुळे ठाणेकरांना हा त्रास सहन करावा लागतो आहे. या प्रकरणी पालिका आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी आणि सर्व्हिस रोड वरील सामान काढून  टाकावे. सर्विस रोड वरील सामान हटवून  लोकांना येण्या-जाण्यासाठी सर्विस रोड ताबडतोब खुला करून द्यावा अशी रिपब्लिकन बहुजन सेनेची मागणी आहे . जर हि कारवाई तात्काळ झाली नाही तर रिपब्लिकन बहुजन सेनाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. ०००००

 पार्वतीबाई जोंधळे महिला विधी महाविद्यालयाचा पदवी वितरण समारंभ संपन्न

कायदेशीर क्षेत्रातील व्यावसायिक प्रवासात न्याय, सचोटी आणि समानता या मूल्यांचे पालन करा – सागर जोंधळे अनिल ठाणेकर   ठाणे : कायदेशीर क्षेत्रातील व्यावसायिक प्रवास सुरू करताना विद्यार्थ्यांनी न्याय, सचोटी आणि समानता या मूल्यांचे पालन करावे, असे आवाहन पार्वताबाई जोंधळे महिला विधी महाविद्यालयाचे संस्थापक उपाध्यक्ष सागर शिवाजीराव जोंधळे यांनी केले. डोंबिवली (पू.) येथील पार्वतीबाई जोंधळे महिला विधी महाविद्यालयाचा पदवी वितरण सोहळा नुकताच शिवाजीराव जोंधळे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला. यावेळी सागर जोंधळे बोलत होते. या सोहळ्याला मान्यवर पाहुणे म्हणून एसएनडीटी विद्यापीठाचे एचओडी राजेश वानखेडे, अधिवक्ता मानकुवर देशमुख, पार्वतीबाई जोंधळे महिला विधी महाविद्यालयाच्या संस्थापक अध्यक्षा वैशालीताई शिवाजीराव जोंधळे, संस्थापक सचिव देवेंद्र शिवाजीराव जोंधळे, संस्थेचे पदाधिकारी शिराज सागर जोंधळे आदी मान्यवर उपस्थित होते. पार्वतीबाई जोंधळे महिला विधी महाविद्यालय हे एसएनडीटी विद्यापीठाचे हे पहिलेच एलएलएम कॉलेज आहे. महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं हे एक अनोखा पाऊल आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी या भावी न्यायाधीश व भारताचे सर न्यायाधीश होऊ शकतात. पदवी वितरण समारंभाने पदवीधर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीची कबुली देण्यासाठी आणि त्यांच्या निवडलेल्या करिअरमध्ये उत्कृष्टतेसाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून शिवाजीराव जोंधळे अभियांत्रिकी महाविद्यालयाने काम केले. या कार्यक्रमाचा समारोप, अभिमान आणि आशावादाच्या भावनेने झाला कारण पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या योग्य पदव्या मिळाल्या. जे कायदेशीर व्यवसायात आणि समाजात मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रभाव पाडण्याच्या त्यांच्या तयारीचे प्रतीक आहे. पार्वताबाई जोंधळे महिला विधी महाविद्यालय पदवीधर विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांमध्ये यश आणि पूर्तीसाठी शुभेच्छा देतो, अशा सदिच्छा सागर शिवाजीराव जोंधळे यांनी दिल्या. पार्वतीबाई जोंधळे महिला विधी महाविद्यालयाचा प्रतिष्ठित पदवी वितरण सोहळा पदवीधर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरला, त्यांची मेहनत, समर्पण आणि विद्वत्तापूर्ण कामगिरी ओळखून विश्वस्त पदवीधर विद्यार्थ्यांना त्यांच्या कायद्यातील मास्टर ऑफ लॉ- एलएलएम पदवीसाठी सन्मानित करण्यात आल्याने वातावरण अभिमानाने, आनंदाने आणि कर्तृत्वाच्या भावनेने भरले होते.पार्वतीबाई जोंधळे महिला विधी महाविद्यालयाचे शिराज सागर जोंधळे यांनी आभार प्रदर्शन केले. ००००००

 मोफत दाखले वाटप शिबीराचा नागरिकांनी घेतला मोठ्याप्रमाणात लाभ

२ जुलैला होणार वाटप – आनंद परांजपे   ठाणे : जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे आणि समर्थ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने, शनिवारी व रविवारी, ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस मध्यवर्ती कार्यालय, फ्लॉवर व्हॅली काॅम्प्लेक्स, सर्विस रोड, ज्युपिटर हॉस्पिटलसमोर, ठाणे (पश्चिम) येथे आयोजित केलेल्या मोफत दाखले शिबीरात १२५१ विविध दाखले नोंदविण्यात आले. या दाखले वाटप शिबीराचा विद्यार्थी, आजी- आजोबा व नागरिकांनी मोठ्याप्रमाणात लाभ घेतला. २ जुलै २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे मध्यवर्ती कार्यालयात या दाखल्यांचे वाटप नागरिकांना केले जाईल, अशी माहिती, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस, अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे आणि समर्थ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी, २२ जून २०२४ व रविवारी, २३ जून, २०२४ रोजी, सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेमध्ये ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस मध्यवर्ती कार्यालय, फ्लॉवर व्हॅली काॅम्प्लेक्स, सर्विस रोड, ज्युपिटर हॉस्पिटलसमोर, ठाणे (पश्चिम) येथे मोफत दाखले वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १) रहिवासी दाखला, २) अधिवास (डोमेसाईल दाखला), ३) उत्पन्नाचा दाखला आणि ४) ज्येष्ठ नागरिक दाखला असे १२५१ विविध दाखले नोंदविण्यात आले. या मोफत दाखले वाटप शिबीराचा, विद्यार्थी, आजी- आजोबा व नागरिकांनी मोठ्याप्रमाणात लाभ घेतला. २ जुलै २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे मध्यवर्ती कार्यालयात सर्वे नागरिकांना या दाखल्यांचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी केली आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रसचे ठाणे शहर (जिल्हा) कार्यकारिणी सदस्य, महिला पदाधिकारी, युवक पदाधिकारी, युवती पदाधिकारी, विद्यार्थी पदाधिकारी तसेच सर्व फ्रंटल / सेल / विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 00000

 श्री माँ बालनिकेतन हायस्कूलचे सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण

वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा होणार सुवर्णमहोत्सव   ठाणे : दिव्य श्री तारा माँ यांनी श्री माँ ट्रस्टच्या माध्यमातून १९७५ साली कोपरी येथे स्थापन केलेल्या श्री माँ बालनिकेतन हायस्कूल आपले सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. यानिमित्त वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. रविवार, २३ जून २०२४ रोजी शाळेच्या परिसरातील जेष्ठ नागरिकांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. आरोग्य शिबीरात सामान्य तपासणी, इ.सी.जी., नेत्र तपासणी, बी.एम. डी., हाडांचे आणि दातांचे विकार, उपचार इत्यादी विविध सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या. शिबीरात तज्ञ डॉक्टर डॉ. सुंदर कृष्णन, डॉ. उदय गाडगीळ, डॉ. सुबोध मेहता, डॉ. न्याशा, डॉ. जय लालवाणी, डॉ. प्रांजली जोशी, डॉ. रितू छाबरा, डॉ. प्रतिमा शर्मा, डॉ. आनंद शर्मा, डॉ. उदय खोना, डॉ. आर.एन.सुद या ठाणे शहरातील सुप्रसिद्ध तज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली. आरोग्य शिबिरात माजी विद्यार्थ्यांचाही सहभाग होता.