Category: ठाणे

Thane news

पुढील काळातील वचन पूर्ण करण्यासाठी ‘व्हिजन डॉक्युमेंट’- निरंजन डावखरे

ठाणे : केलेली कामे पूर्णत्वास नेली असल्याचा अहवाल ‘कर्तवपथा’तुन मांडण्यात आला आहे तर पुढील काळातील वचन पूर्ण करण्यासाठी ‘व्हिजन डॉक्युमेंट’ प्रकाशित करण्यात आल्याची माहिती, ठाणे शहरातील विविध शाळा कॉलेजमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्गाशी संवाद साधताना कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुती पुरस्कृत भाजप उमेदवार निरंजन डावखरें यांनी दिली. येणाऱ्या सहा वर्षाच्या काळासाठी महत्वाकांक्षी व्सिजन डॉक्युमेंट तयार करण्यात आले आहे. या व्हिजन डाॅक्युमेंटमध्ये मिशन एज्युकेशन नुसार विद्यार्थी, संस्थाचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्गाच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाची पावले ओळखून नवीन शैक्षणिक धोरण आखले आहे. हायस्पीड इंटरनेट, डेटा व्यवस्थापन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांनो आणलेल्या क्रांतीचे आव्हान पेलण्यासाठी कौशल्य विकास, नवीन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा कोकणातील पाचही जिल्ह्यातील प्रत्येक शिक्षकाला लाभ मिळावा यासाठी समन्वय साधण्यात येणार आहे. जिल्हानिहाय व तालुकानिहाय प्रत्येक शाळेत डिजिटल रुम आणि रोबोटिक्स लॅब तसेच इलेक्ट्रॉनिक गॅझेट्ससाठी अखंड विजेची सुविधा प्राप्त करुन देणार, कोकणातील पाचही जिल्ह्यातील शाळा पुढील सहा वर्षांत टप्प्याटप्प्याने ग्रीन स्कूल करण्यात येईल. यासाठी शासकीय योजना आणि MEDHA च्या योजनांसाठी समन्वय साधून कोकणातील प्रत्येक मुलाला उत्तम शिक्षण देण्यासाठी वचनबद्ध आहे. एमपीएससी, युपीएससी व अन्य स्पर्धा परिक्षांसाठी जिल्हानिहाय व तालुकानिहाय मार्गदर्शन केंद्र यात ग्रंथपाल, इंटरनेट सुविधा उपलब्ध करणार, अर्धवेळ ग्रंथपाल व प्रयोग शाळा सहाय्यकांना पूर्णवेळ सेवेत सामावून घेण्यासाठी प्रयत्नशील पदवीधर शिक्षकांच्या पदोन्नती गती देणार, राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षक यांची जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्‍नशील आहोत. हे व्हिजन डाॅक्युमेंट लागू करण्यासाठी येत्या २६ जुनला कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत निवडून देण्याची विनंती महायुती पुरस्कृत भाजप उमेदवार निरंजन डावखरे यांनी ठाणे शहरातील विविध शाळा काॅलेज मधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्गाशी संवाद साधताना केली. यावेळी नौपाडा येथील सरस्वती स्कूल, शिवसमर्थ विद्यामंदिर, चरई येथील मावळी मंडळ,, श्रीरंग विद्यालय, माजीवडा येथील ग्रामीण शिक्षण संस्था हायस्कूल, वर्तकनगर येथील थिराणी हायस्कूल, घोडबंदर रोड येथील लोढा वर्ल्ड हायस्कूल या शाळांतील महायुती पुरस्कृत भाजप उमेदवार निरंजन डावखरे यांच्या सभांना मोठ्यासंख्येने उपस्थित राहून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याप्रसंगी माजी नगरसेवक सुनेश जोशी, माजी नगरसेविका प्रतिभा मढवी, समाजसेवक डॉ. राजेश मढवी, साहित्यिक नरेंद्र पाठक, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजचे अध्यक्ष सचिन मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. ०००००

मेधा पाटकर यांचे उपोषण थांबवण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने

ठाणे : नर्मदा बचओ आंदोलांनाच्या वतीने नर्मदा खोऱ्यात बेमुदत आंदोलन पुन्हा सुरू करावे लागले आहे. आंदोलनाच्या नेत्या मा. मेधाताई पाटकर यांनी आपल्या सहकार्‍यांसह दि, १५ जून २०२४ पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. बेदखल झालेल्या प्रतिनिधींचे साखळी उपोषण सुरू आहे. आंदोलक काही हजार लोक त्यांच्या पुनर्वसनाच्या हक्कावर ठाम असून त्यांना देशभरातून लाखो लोकांचे समर्थन मिळत आहे.मधा पाटकर यांचे उपोषण थांबवण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करण्यात आली. पुनर्वसना शिवाय डुब नाही. सरदार सरोवर धरणाची पाणीपातळी १२२ एमएसवर कायम ठेवा ही आमची प्रमुख मागणी आहे. सरदार सरोवर बाधित आदिवासी, शेतकरी, मजूर आणि नर्मदा खोऱ्यातील सर्व भूमिहीन समुदायांनी अहिंसक सत्याग्रही म्हणून संघर्ष केला आणि पुनर्वसनाचा हक्क, जीवन आणि उपजीविकेचा हक्क मिळवला. भूमिहीन, स्त्रिया, भूमीधारक, मत्स्य कामगार, आदिवासी, कुंभार इत्यादींचाही कायदेशीर आणि सामूहिक कृतीं मुळे महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात उदारीकरण केलेल्या राज्य धोरणांमुळे समावेश झाला. कालांतराने सुमारे ५० हजार कुटुंबांचे पुनर्वसन झाले आहे. तथापि, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये अजूनही काही शेकडा सरदार सरोवर प्रकल्पग्रस्त कुटुंबे आहेत, तर मध्य प्रदेशात हजारो कुटुंबे आहेत, ज्यांचे पुनर्वसन होणे बाकी आहे.असे असूनही नर्मदा न्यायाधिकरणाच्या पुरस्काराचे, कायद्याचे आणि धोरणाचे उल्लंघन करून, निमाड, मध्य प्रदेशच्या मैदानी भागातील वरची गावे आणि एका टाऊनशीपसाठी बॅकवॉटरची पातळी बदलण्यात आली. पात्र कुटुंबांच्या यादीतून १५९४६ कुटुंबांना वगळण्यात आले. परंतु त्यांची घरे अधिग्रहित करण्यात आली. त्यांचे सर्व सामान उध्वस्त झाले. गुरेढोरे आणि माणसं मरणासन्न झाली !! अधिकाऱ्यांशी संघर्ष आणि संवादानंतर त्यांना काही मदतीची रक्कम मिळाली, पण अद्याप पूर्ण भरपाई मिळालेली नाही २०२४ चा पावसाळा दारात आलेला असताना पुढचे पाऊल म्हणून नर्मदा बचाव आंदोलन सत्याग्रहाची सुरुवात करत आहे. आंदोलनाच्या रास्त मागण्या खालीलप्रमाणे आहेत., केंद्रीय जल आयोगाने १९८४ मध्ये अंदाजित केलेली आणि २०२३ मध्ये ती बरोबर असल्याचे सिध्द झालेली बॅकवॉटरची पातळी ( जुनी ) स्वीकारा., बेकायदेशीरता आणि अनियमिततेमुळे घरे, शेते, गुरेढोरे, माणसे आणि सर्व मालमत्तेचे २०२३ मध्ये झालेल्या नुकसानाची बाजारमूल्याने भरपाई द्या., कायदे, धोरणे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पूर्ण पालन करून सर्व प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन करा., रिक्त पदांवर पुनर्वसन अधिकारी आणि तक्रार निवारण प्राधिकरण, मध्य प्रदेशच्या माननीय सदस्यांची लवकरात लवकर नियुक्ती करा., वरील कामे पूर्ण होईपर्यंत सरदार सरोवरची पाण्याची पातळी १२२ मीटर (क्रेस्ट लेव्हल) राखा, १७ मीटरचे दरवाजे उघडे ठेवा.वरील मागण्या घेऊन जिल्हाधिकारी  ह्यांना भेटून हे निवेदन मा. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे ह्यांना निवेदन द्यावं. मागण्या मान्य करण्यासाठी खालील संस्था संघटने तर्फे ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय येथे निर्देशने करण्यात आली.ह्या निर्दशनास जगदीश खैरालिया, राष्ट्रीय सरचिटणीस, श्रमिक जनता संघ, डॉ. संजय मंगला गोपाळ, राष्ट्रीय समन्वयक, जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय, राजेंद्र चव्हाण, ठाणे लोकसभा समन्वयक, भारत जोडो अभियान, नरेश भागवाने, महासचिव, बहुजन विकास संघ, लिलेश्र्वर बनसोडे, निमंत्रक, कामगार कर्मचारी संयुक्त कृती समिति, निर्मला पवार,  भारतीय महिला फेडरेशन, सुब्रतो भट्टाचार्य स्वराज अभियान, ठाणे हर्षलता कदम, अध्यक्ष, समता विचार प्रसारक संस्था, नितीन देशपांडे उपाध्यक्ष, धर्मराज्य पक्ष ह्या संस्था संघटना सहभागी झाले होते. हे निर्देशन यशस्वी करण्यासाठी अजय भोसले, सुनिल दिवेकर, गणेश चव्हाण ह्यांनी मेहनत घेतली. 000000

रागिणीताई बैरीशेट्टी यांच्यावतीने रविवारी ज्येष्ठ व विधवा महिलांसाठी मोफत छत्री वाटप – भास्कर बैरीशेट्टी

अनिल ठाणेकर   ठाणे : स्थानिक माजी नगरसेविका सौ रागिणीताई बैरीशेट्टी यांच्यावतीने  शिवाई नगर परिसरातील सर्व विभागामधील, वय ६५ वर्षांवरील ज्येष्ठ महिला आणि विधवा महिला यांच्यासाठी छत्रीवाटप कार्यक्रमाचे आयोजन रविवारी २३ जून रोजी करण्यात आल्याची माहिती सामाजिक बांधिलकी जपणारे सच्चे समाजसेवक श्री भास्कर बैरीशेट्टी यांनी दिली आहे. पावसाळा सुरू होत आहे. पावसापाण्यात महिलांना संरक्षण मिळावे या हेतुने स्थानिक माजी नगरसेविका सौ रागिणीताई भास्कर बैरीशेट्टी यांच्यावतीने शिवाई नगर परिसरातील सर्व विभागामधील, वय ६५ वर्षांवरील ज्येष्ठ महिला आणि विधवा महिला यांच्यासाठी छत्रीवाटप कार्यक्रमाचे आयोजन रविवारी, २३ जून २०२४ रोजी,सायंकाळी ७ वाजता, जनसंपर्क कार्यालय, उपवन सोसायटी, शिवाई नगर शिवसेना शाखेजवळ, ठाणे (प) येथे करण्यात आले करण्यात आले आहे. छत्री वाटप कार्यक्रमध्ये जो उपस्थित राहील आणि कूपन आणेल त्यालाच छत्री मिळेल. छत्री वाटपाची कूपन जनसंपर्क कार्यालय येथून घेऊन जाणे. कूपन शिवाय छत्री दिली जाणार नाही. एका व्यक्तीला एकच कूपन दिले जाईल आणि एका व्यक्तीला एक कूपन एक छत्री दिली जाईल. एका कूपन व्यतिरिक्त दुसरे कूपन आणले तर छत्री मिळणार नाही. कार्यक्रमानंतर कूपन आणल्यास छत्री मिळणार नाही, याची नोंद घ्यावी, तरी या छत्रीवाटप कार्यक्रमास महिलांनी मोठ्यासंखेने उपस्थित रहावे असे आवाहन स्थानिक कार्यसम्राट माजी नगरसेविका सौ. रागिणीताई भास्कर बैरीशेट्टी व सामाजिक बांधिलकी जपणारे सच्चे समाजसेवक श्री भास्कर बैरीशेट्टी  यांनी केले आहे. ०००००

ठाणे-रायगड जिल्ह्यात मोठी पोलीस भरती

ठाणे : पोलीस दलात नोकरीच्या अनुषंगाने तयारी करणार्‍यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील ठाणे आणि रायगड (Raigad) जिल्ह्यात विविध पदासाठी घेण्यात येणाऱ्या पोलीस भरतीची माहिती समोर आली आहे. रायगड जिल्ह्यात 422 पोलीस पदांसाठी 31 हजार 63 अर्ज दाखल झाले आहेत. तर ही भरती 21 जूनपासून…

वंचितांचा नव्हे हा तर संचिताचा रंगमंच! – विजयराज बोधनकर

ठाणे : ठाणे शहरातील लोकवस्तीतील मुले वंचित नसून भाग्यवान आहेत कारण त्यांना व्यक्त होण्यास त्यांचा स्वतःचा अवकाश मिळाला आहे. गरिबीमुळे कच न खाता कष्ट करत आलेल्या संधीचे सोने करण्याची उर्जा त्यांना इथे सापडते आहे. त्यामुळे हा वंचितांचा नव्हे संचिताचा रंगमंच आहे, अशा शब्दात सुप्रसिद्ध चित्रकार आणि कवी विजयराज बोधनकर यांनी वंचितांच्या रंगमंचावरील मुलांची रंगतदार कामगिरी बघून गौरवोद्गार काढले. समता विचार प्रसारक संस्थेतर्फे  काशिनाथ घाणेकर मिनीथिएटरमध्ये आयोजित वंचितांचा रंगमंचाच्या दशकपूर्ती सोहोळ्यात ठाण्यातील विविध वस्तीतील युवांच्या, उल्हासात पार पडलेल्या युवा नाट्यजल्लोष मध्ये ते बोलत होते. वंचितांच्या रंगमंचाचे प्रणेते स्मृतिशेष रत्नाकर मतकरी यांच्या स्मृतीस वंदन करून, साने गुरुजींच्या १२५ व्या जयंतीवर्षा निमित्त महाराष्ट्रात चालू असलेल्या साने गुरुजी १२५ अभियानांतर्गत नाट्यजल्लोषचे यंदा दहावे पर्व सादर झाले. या वेळेस मान्यवरांनी मुलांचे कौतुक करत त्यांना अशा प्रकारच्या उपक्रमात सहभागी होण्याची प्रेरणा दिली. नाट्यप्रशिक्षण शिबिर घेणाऱ्या थिएटर कोलाज च्या सुप्रसिद्ध प्रशिक्षक पल्लवी वाघ – केळकर मुलांच्या प्रयत्नांची प्रशंसा करुन म्हणाल्या की, इथे जगण्यातच संघर्ष आहे त्यामुळे खरे नाटक सापडते आणि मुलांच्या कलेला कसलीही भिंत नसते, भेद नसतो आणि मुलांच्या प्रगतीसाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे. या वेळेस ‘दीवार म्हणजेच भिंत’ या विषयाच्या अनेक पैलूंवर आधारित नाटिका सादर झाल्या. डॅा. संजय मंगला गोपाळ यांनी ‘पाडू चलारे भिंत ही मध्ये आड येणारी’ हे गीत सादर करून थीमचं महत्व अधोरेखित केलं. ठाणे शहरातील विविध वस्तीतील युवांनी एकत्र येत ‘आधार’ ही नाटिका सादर केली. वेगवेगळ्या भिंती कशा दुःखितांच्या आधार बनतात हे नाटिकेतून प्रभावीपणे सादर केलं. अंबिका नगर गटाने ‘ ढ ची गोष्ट’ या नाटिकेत विद्यार्थी हुशार किंवा ढ असे नसतात. कुणी अभ्यासात तर कुणी खेळात तर कुणी कलेत हुशार असतात व अन्य कशात तरी ढ असतात. मित्रांनी एकमेकांना मदत करुन पाठबळ दिलं तर हुशार आणि ढ ही दीवार पाडली जाईल व ढ समजले जाणारे विद्यार्थी सुद्धा पास होतील हे विनोदी अंगाने छान सादर केलं. घणसोली गटाने ‘हे जीवन सुंदर आहे’ या नाटकात खेडेगावातून शहरात शिक्षणासाठी आलेल्या मुलीला अनेक अपमानास्पद वागणुकींना कसं सामोरं जावं लागतं व अशा वेळी नैराश्य येऊन आत्महत्येचे विचार तिच्या मनात घोळत असताना तिची मैत्रीण तिला या विचारापासून कशी दूर नेते आणि तिच्यात कसा आत्मविश्वास निर्माण करते, हे अतिशय प्रभावी पद्धतीने दाखवलं. खारटन रोड गटाने ‘ आवाज उठाओ’ या नाटकात अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे धारिष्ट दाखवलं तर श्रीमंत आणि गरीब यातील भिंत पाडायला वेळ लागणार नाही हे उत्तम प्रकारे सादर केले. याच बरोबर एनॉक कोलियार याने निर्माण केलेली ‘मिरास’ आणि मयुर बने याने बनवलेली ‘पॉईंट ऑफ व्ह्यू’ या सुंदर शॉर्टफिल्म्स दाखवल्या गेल्या. वैष्णवी कारंडे आणि करीना साऊद यांनी कोळी नृत्य पेश केलं. राबोडी मधील अल्फिया, फलक, मुस्कान, शिफा या मुलींनी मुशायरा पेश करून प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमात समता विचार प्रसारक संस्थेच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ, एपिकॉन कंपनीचे चेअरमन जयंत कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक मीनल उत्तुरकरांनी तर आभार प्रदर्शन हर्षलता कदम यांनी केले. वंचितांच्या रंगमंचाच्या संयोजिका हर्षदा बोरकर आणि एकलव्य कार्यकर्ता दर्शन पडवळ यांनी सुत्र संचालन केलं. लोकवस्तीतील युवांच्या नाटिका बघून त्यांचे कौतुक करण्यासाठी लघुपटकार डॉ. संतोष पाठारे, नाट्यजल्लोष ची आयोजक, प्रसिद्ध लेखिका व अभिनेत्री सुप्रिया मतकरी विनोद, यू ट्युबर रवींद्र पोखरकर, जगदीश खैरालिया, सीमा साळुंखे, मयूरेश भडसावळे, टॅगचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. मुलांना सहाय्यक म्हणून सुनीता फडके, सुयश पुरोहित, विश्वनाथ चांदोरकर,नीलिमा सबनीस यांनी मदत केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लतिका सु. मो. , सुनिल दिवेकर, अजय भोसले, किशन सिंग बेदी, निलेश दंत आदींनी मेहनत घेतली. लोकवस्तीतील एकलव्य युवा दीपक, अक्षता, एंजेल, माही, मयुर, अनमोल, स्नेहा, साक्षी, प्रसन्न यांनी छान अभिनय केला. सृष्टी, ऋतुजा, कार्तिक, अथर्व, साक्षी, यशस्वी, हेमाली यांनी प्रभावी अभिनय करून प्रेक्षकांना हसवलं. नेहा, श्रद्धा, तेजस्वी, राधिका, सायली, सानिका, कार्तिकी, अस्मिता यांनी नाटिकेत सहभाग घेतला. किशन, अश्रफीय, एंजेल, रुद्र, टिया, निखिल, निकिता, दिव्या, प्रमिता यांनी छान कामे केली. 0000

 पदवीधर मतदारसंघातून अमोल जगताप यांची उमेदवारी मागे

निरंजन डावखरे यांना पाठिंबा देत कोचिंग क्लासेस संघटनेची माघार ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार निरंजन वसंत डावखरे यांना वाढता पाठिंबा मिळत असून, निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या कोचिंग क्लासेस संचालक संघटनेनेही उमेदवार अमोल जगताप यांची उमेदवारी माघारी घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी सायंकाळी ठाण्यात झालेल्या सभेत कोचिंग क्लासेस संचालक संघटनेने महायुतीला पाठिंबा जाहीर केला. कोचिंग क्लासेस संचालक संघटनेला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन आमदार निरंजन डावखरे यांनी दिले. त्याचबरोबर कोचिंग क्लासेस संघटनेच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याची ग्वाही दोन्ही नेत्यांनी दिली. संघटनेचे अध्यक्ष सतीश देशमुख व सचिव अॅड. सचिन सरोदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आमदार डावखरे यांना पाठिंबा असल्याचे पत्र प्रदान केले. तसेच त्यांच्या प्रचारात सक्रिय राहणार असल्याची ग्वाही दिली. 00000

देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं-नरेश म्हस्के

ठाणे : विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. यात महायुतीकडून कोकण पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरेंना उमेदवारी मिळाली आहे. परंतु तत्पूर्वी मनसेनं अभिजीत पानसेंना उमेदवारी जाहीर केल्यानं शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची द्विधा मनस्थिती झाली होती. निरंजन डावखरे यांच्या प्रचारावेळी म्हस्केंनी बैठकीत हा किस्सा सांगितला. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मी या संकटातून वाचलो असंही म्हस्के यांनी सांगितले. खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, खासदारकीच्या निवडणुकीत अवघ्या १२ दिवसांत मला महायुतीच्या सर्व घटक पक्षातील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी मेहनत करून निवडून आणलं. खासदारकीनंतर लगेच विधान परिषदेची निवडणूक लागली. निरंजन डावखरेंसोबत आमची चर्चा सुरू होती. कसं नियोजन करायचे, त्यात अभिजीत पानसेंना उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर सगळ्यात पहिला माझ्या पोटात गोळा आला. अभिजीत पानसे, निरंजन डावखरे हे दोघेही माझे मित्र. दोघांनीही निवडणुकीत प्रचंड काम केले आहे. निकाल लागून ५-६ दिवस झालेले, त्यात सगळे पत्रकार या दोघांना सोडून माझ्यामागे लागले होते. त्यावेळी मी फोन बंद केला आणि नाशिकला पळून गेलो. उत्तर काय देणार? असं त्यांनी सांगितले. तसेच निरंजन डावखरेला योग्य म्हटलं तर अभिजीतला राग येणार, अभिजीतला योग्य म्हटलं तर निरंजनला राग येणार, मी रवींद्र चव्हाणांना फोन केला, हे मिटवा लवकर…मी रोज निरंजनला फोन करायचो, हा विषय लवकर संपव, फडणवीस साहेबांना सांग..एकदा अभिजीतला फोन करून त्याचे मत परिवर्तन होतं का हे पाहिले. किती नोंदणी केली आहेस, निरंजनपेक्षा पुढचा आकडा अभिजीतनं सांगितला. मी म्हटलं आता वाटोळं झालं, करायचं काय..फडणवीस यांनी मला या सगळ्यात मोठ्या संकटातून वाचवलं असं खासदार म्हस्केंनी म्हटलं. त्याशिवाय महायुती म्हणून निरंजनचं काम करायचं आहे पण महायुतीत अभिजीत पानसेही आहेत. निरंजनचं काम केल्यानंतर अभिजीत पानसे मला गद्दार, ऐहसान फरामोश म्हणणार, अभिजीत लहानपणापासून मित्र आहे, या निवडणुकीत अभिजीतनं माझ्या प्रचाराचं डिझाईन करायचे काम केले. अविनाश जाधवचा चेहरा आठवला. आता करायचे काय, परंतु केवळ फडणवीसांनी भूमिका घेतली आणि अतिशय सलोख्याने आज आपण महायुतीत बसलो आहोत. निरंजन डावखरेंचा विजय निश्चित आहे. विरोधकांचा उमेदवार कोण, तेदेखील कोणाला माहिती नाही असं नरेश म्हस्के म्हणाले. दरम्यान, बऱ्याच जणांना ही निवडणूक माहिती नाही. पक्षाच्या वतीने त्या त्या विभागातील पदवीधरांची यादी दिली जाईल. पदवीधरांशी संपर्क करा, वेळ पालून त्यांच्याशी संपर्क साधा. पक्षाचे पदाधिकारी, विभागप्रमुख, नगरसेवक यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. निरंजन डावखरे यांना निवडून आणण्यासाठी शिवसेना कुठेही कमी पडणार नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा करू असा विश्वास खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला. 00000

भिवंडीत मुस्लिम बांधवांकडून बकरी ईदनिमित्त नमाज पठण

भिवंडी: जगभरातील मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा कुर्बानीचा सण सोमवारी शहर परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध मशिदी व मदरशांमध्ये लाखो मुस्लिम बांधवांनी बकरा ईदची नमाज अदा केली. भिवंडी शहरातील असलेल्या कोटरगेट, दिवानशहा दरगाह, आसबीबी, मामूभांजा, चांद तारासहित अनेक मशीदींमध्ये मुस्लिम बांधवांनी बकरी ईदची नमाज अदा करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. या ईद सणानिमित्त पोलिसांच्यावतीने कोटरगेट मशीद येथे मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा देऊन स्वागत करण्यात आले. तसेच भिवंडी महापालिकेच्यावतीने कुर्बानी सेंटर तयार करण्यात आलेल्या ठिकाणी बकरा आणि रेड्याची कुर्बानी देण्यात आली. तर दुसरीकडे अखंडता कायम टिकून राहावी यासाठी मुस्लिम बांधवांसह सर्वच जातीधर्माच्या नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन केले. 00000

नाल्यावरील गाळ्याची भिंत पडली

सुदैवाने जीवितहानी नाही   ठाणे : लोकमान्य पाडा नं. ३ या भागातील लाकडीपुलाजवळील नाल्यावर असलेल्या गाळ्याची भिंत पडल्याची घटना रात्री १ वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने गाळे बंद असल्याने कोणत्याही स्वरुपाची जिवीतहानी झाली नाही. मात्र या गाळ्याच्या बाजूला असलेले तीन गाळे देखील धोकादायक झाले असल्याची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून येथील चारही गाळे तोडण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री १.०२ वाजताच्या सुमारास लोकमान्य पाडा नं. ३ येथील लाकडी पुलाजवळील नाल्यावर असलेल्या अमित म्हात्रे यांच्या दुकानाच्या गाळ्याची भिंत नाल्यात पडल्याची घटना घडली. सुदैवाने रात्रीच्या सुमारास गाळे बंद असल्याने जिवीतहानी टळली आहे. मात्र घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभागातील कर्मचारी व इतर यंत्रणांनी धाव घेत, परिस्थितीचा आढावा घेतला. परंतु ज्या गाळ्याची भिंत पडली होती. त्या गाळ्याच्या बाजूला असलेल्या इतर गाळयांची स्थिती देखील धोकादायक झाली होती. त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन येथील चारही गाळे तोडण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. त्यानंतर नाल्यात पडलेले डेब्रीज आणि नाल्याच्या आजूबाजूला पडलेले डेब्रीज देखील काढून टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान यापूर्वीच महापालिकेच्या माध्यमातून नाल्यावरील व नाल्या शेजारी असलेल्या बांधकामांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. परंतु अद्यापही नाल्यावरील रहिवासी स्थलांतरीत झालेले दिसून आलेले नाही. त्यामुळे आता प्रभाग समिती निहाय सर्वच ठिकाणांच्या नाल्याशेजारील व नाल्यावरील बांधकामांचा सर्व्हे केला जाणार असून जे अतिधोकादायक स्थितीत असतील त्यांना स्थलांतरीत करण्याच्या सुचना देण्यात येतील अशी माहिती उपायुक्त गजानन गोदेपुरे यांनी दिली. तरी देखील रहिवासी स्थलांतरीत झाले नाही तर महापालिका त्यांनी तेथून स्थलांतरीत करेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

शहरातील तब्बल ३० ठिकाणी दरड कोसळण्याची भीती

 महापालिका बजावतेय केवळ नोटीस   ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत २०२० मध्ये दरड कोसळणाऱ्या ठिकाणांची यादी ही २६ च्या आसपास होती. त्यानंतर २०२१ पासून ही संख्या १४ वर आली होती. मात्र यंदा पावसाळा सुरु होत असतांना ही संख्या थेट ३० वर गेली आहे. त्यामुळे आता येथील रहिवाशांना संबधींत प्रभाग समिती मार्फत केवळ नोटीस बजावण्याची कारवाई केली जात आहे. मात्र याठिकाणी राहणाऱ्यांनी स्वत:ची काळजी स्वत:च घ्यावी, असेही पालिकेने सांगितले आहे. दुसरीकडे येथील घरे देखील रिकामी करण्यास रहिवासी तयार होत नसल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे दरवर्षी पावसाळ्यात कळवा, मुंब्य्रातील डोंगराळ भागात दरड कोसळण्याची घटना घडत असल्याचे दिसून आले आहे. किंबहुना दरवर्षी पावसाळ्यात दोन ते तीन घटना घडत असल्याचे सांगण्यात येत आहे. यंदा देखील पालिकेने सुरवातीला यादी जाहीर केली होती. त्यात पूर्वीचीच म्हणजेच १४ ठिकाणेच होती. मात्र आता पालिकेने पुन्हा सर्व्हे करुन सुधारीत यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार ही ठिकाणे आता तब्बल ३० एवढी झाली आहेत. याचाच अर्थ आधीच्या यादीत १६ ठिकाणांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या माध्यमातून कळवा प्रभाग समिती हद्दीत दरड प्रवण क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना पालिकेने नोटीस बजावण्यास सुरवात केली आहे. तसेच मुंब्रा भागातही अशा प्रकारच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या नोटीसीद्वारे सुरक्षितेची हमी मात्र पालिकेने दिलेली नाही. पावसाळ्यात काही दुर्घटना घडल्यास महापालिका त्याला जबाबदार असणार नसल्याचे पालिकेने सांगत आपले हात यातून झटकल्याचे दिसत आहे.दरम्यान, येथील रहिवासी देखील ऐन पावसाळ्यात कुटुंब घेऊन कुठे जाणार असे सांगत घरे रिकामी करण्यास तयार नसल्याचा दावा पालिकेने केला आहे. ठाणे महापालिकेने जाहीर केलेली सुधारीत यादी महापालिकेने जाहीर केलेल्या सुधारीत यादीत वागळे प्रभाग समिती – ०४, वर्तकनगर – ०१, माजिवडा मानपाडा – ०३, कळवा – ०७, मुंब्रा – १५ आदी भागांचा यात समावेश आहे. याचाच अर्थ कळवा आणि मुंब्य्रातच दरड कोसळणाऱ्या ठिकाणांचा अधिक समावेश असल्याचे या यादीवरुन स्पष्ट होत आहे. ००००