‘यू विन पोर्टल’मार्फत नियमित लसीकरण – डॉ. गंगाधर परगे
ठाणे: जिल्ह्यातील गरोदर माता व बालक लसीकरण विना राहू नये तसेच बालकांचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आता ‘यू विन पोर्टल’वर नोंद…
Thane news
ठाणे: जिल्ह्यातील गरोदर माता व बालक लसीकरण विना राहू नये तसेच बालकांचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आता ‘यू विन पोर्टल’वर नोंद…
ठाणे : विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत भाजपाचे उमेदवार निरंजन डावखरे यांना विविध संघटनांचा वाढता पाठिंबा मिळत असून, अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघानेही आमदार डावखरे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. संघाचे अध्यक्ष डॉ. आर. बी. सिंह, सरचिटणीस माधव राऊळ यांनी आमदार डावखरे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय होईल, असा विश्वासही व्यक्त केला. कोकणातील महाविद्यालयांमधील हजारो कर्मचारी अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघाचे सदस्य आहेत. कोकणातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार डावखरे यांनी सातत्याने पुढाकार घेतला. अशासकीय शिक्षकेतरांचे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालयात बैठका आयोजित करण्यासाठी प्रयत्न करून, अनेक प्रश्नांवर तोडगाही काढला. त्याचे कोणतेही श्रेय न घेता प्रामाणिकपणे शिक्षकेतर संघाला मदत केली. त्यामुळे संघाने सलग दुसऱ्या निवडणुकीत आमदार निरंजन डावखरे यांना पाठिंबा दिला, असे संघाचे अध्यक्ष डॉ. आर. बी. सिंह यांनी सांगितले. कोकणातील पदवीधर मतदारांपर्यंत शिक्षकेतर कर्मचारी पोचून डावखरेंचा मोठ्या मताधिक्याने विजय घडवून आणतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, यापूर्वी कोकणातील शिक्षकांची अग्रगण्य संघटना दिवंगत माजी आमदार स्व. रामनाथ मोते यांच्या विचाराने कार्य करणारी महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना, आमदार किसन कथोरे यांचा महाराष्ट्र राज्य स्वाभिमान प्राथमिक शिक्षक संघाने आमदार डावखरे यांना पाठिंबा दिला आहे. त्यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून पदवीधर मतदारांबरोबर संपर्क साधला जात आहे.
ठाणे : विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत भाजपाचे उमेदवार निरंजन डावखरे यांना विविध संघटनांचा वाढता पाठिंबा मिळत असून, अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघानेही आमदार
ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गालगतच्या सेवा रस्त्यावरील वाऱ्याने हलणारे होर्डिंग तत्काळ काढण्यात येणार आहे. त्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. तसेच, महापालिकेने होर्डिंग मालक आणि जागा मालक यांना नोटिसा बजावल्या आहेत. त्याचबरोबर, या होर्डिंगच्या नव्याने प्राप्त झालेल्या स्थिरता प्रमाणपत्राची (स्टॅबिलिटी रिपोर्ट) छाननी करण्याचा निर्णयही महापालिकेने घेतला आहे. सेवा रस्त्यावरील मुक्ता अडर्व्हटायझिंग कंपनीकडे असलेले होर्डिंग वाऱ्याने हलत असल्याची तक्रार आल्यानंतर तेथे जाहिरात विभाग उपायुक्त दिनेश तायडे, उथळसर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यासह महापालिकेच्या अभियंत्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीनंतर, कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी हे होर्डिंग काढले जात आहे. तसेच, जागामालक व होर्डींग कॉन्ट्रॅक्टरला नोटीस देण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली. 00000
ठाणे : भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीसाठी निवडणूक आयोगामार्फत मतदारसंघनिहाय निवडणूक निरिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी दिली. भारत निवडणूक आयोगाच्या प्रसिध्दी पत्रकानुसार २६ जून २०२४ रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर,कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीचे मतदान होणार आहे. या निवडणूकीच्या अनुषंगाने मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी श्रीमती. अंशु सिन्हा,भाप्रसे (एमएच:99) यांची निवडणूक निरिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीमती. सिन्हा यांचा दूरध्वनी क्रमांक 9920793676 असून त्यांचा ईमेल आयडी anshus72@yahoo.com असा आहे. उमेदवार,राजकीय पक्ष,मतदार व नागरिकांना विभागीय आयुक्त कार्यालय, पहिला मजला, जुनी सचिवालय, महात्मा गांधी मार्ग, फोर्ट, मुंबई -32 या कार्यालयात सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 या वेळेत श्रीमती. सिन्हा यांच्यांशी संपर्क साधता येईल. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी एन नवीन सोना, भाप्रसे (एमएच:2000) यांची निवडणूक निरिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. सोना यांचा दूरध्वनी क्रमांक 8591248668 असून त्यांचा ईमेल आयडी nawin.sona@gmail.com असा आहे. उमेदवार,राजकीय पक्ष,मतदार व नागरिकांना विभागीय आयुक्त कार्यालय,पहिला मजला, जुनी सचिवालय, महात्मा गांधी मार्ग, फोर्ट, मुंबई -32 या कार्यालयात सकाळी 11.00 ते दुपारी 01.00 या वेळेत श्री. सोना यांच्यांशी संपर्क साधता येईल.मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी डॉ.महेंद्र कल्याणकर, भाप्रसे (एमएच:2007) यांची निवडणूक निरिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. कल्याणकर यांचा दूरध्वनी क्रमांक 9324565110 असून त्यांचा ईमेल आयडी mahendrakalyankar@gmail.com असा आहे. उमेदवार,राजकीय पक्ष,मतदार व नागरिकांना विभागीय आयुक्त कार्यालय,पहिला मजला, जुनी सचिवालय, महात्मा गांधी मार्ग, फोर्ट, मुंबई -32 या कार्यालयात सकाळी 11.00 ते दुपारी 01.00 या वेळेत डॉ. कल्याणकर यांच्यांशी संपर्क साधता येईल.
राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा भाईंदर : येथे नुकत्याच झालेल्या बालयोगी श्री सदानंद महाराज राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत स्वस्तिक क्रीडा मंडळाने विजेतेपदाचा मान मिळवला. स्वस्तिकने उपांत्यफेरी मध्ये ओवळी क्रीडा मंडळाचा आरामात पराभव केला. तर अंतिम सामन्यामध्ये त्यांनी…
सलमान पठाण ठाणे : नुकत्याच मुंबई आणि ठाण्यात झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचलेलं बघायला मिळालं. कापूरबावडी ते बाळकूम रोडवरील कोलशेतकडे जाणाऱ्या नाक्यावर मोठया प्रमाणात पाणी साचले आहे. अवघ्या १ तास पडलेल्या पावसातच इथे पाणी साचलेले दिसले. या साचलेल्या पाण्यामुळे मोठया प्रमाणात ट्राफिक जामचा वाहनचालकाला त्रास होत आहे. गाडी चालवताना ड्रायव्हयर्सना योग्य ती खबरदारी घ्यावी लागत आहे. महत्वाचं म्हणजे याठिकाणी रस्त्यावर खोदकाम सुरू आहे. आणि…
अशोक गायकवाड* नवीमुंबई : मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी डॉ.महेंद्र कल्याणकर, भाप्रसे (एमएच:२००७) यांची निवडणूक निरिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. कल्याणकर यांचा दूरध्वनी क्रमांक ९३२४५६५११० असून त्यांचा ईमेल आयडी mahendrakalyankar@gmail.com…
नवी मुंबई : सानपाडा येथील मिलेनियम टॉवरमध्ये राहणाऱ्या व महिला मंडळ बाल विकास केंद्र प्राथमिक शाळा, कुर्ला ( प.) येथे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या व कवयित्री सौ. अनिता मेस्त्री यांच्या ‘आनंदयात्री मी’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मॉरिशस येथे नुकतेच पार पडले. महात्मा गांधी इन्स्टिट्यूट स्कूल ऑफ इंडियन स्टडीज, डिपार्टमेंट ऑफ मराठी स्टडीजच्या सहकार्याने स्नेहल आर्ट्स अँड एज्युकेशन सोसायटी महाराष्ट्र, अक्षर विश्व मराठी साहित्य संमेलन ३१ मे २०२४ रोजी सब्रमणिय भारती लेक्चर थिएटर, महात्मा गांधी इन्स्टिट्यूट मोका, मॉरिशस येथे पार पडले. या संमेलनात मराठी गझल कार्यक्रम, काव्यगायन सादरीकरण झाले. संमेलनात प्रमुख मान्यवर डॉ.श्रीम.मधुमती कुंजुल (मराठी अभ्यास विभाग प्रमुख, मॉरिशस), श्री. रामपरताब (सी.एस.के. महासंचालक, एम्.जी. आय. अँड आर.टी.आय. मॉरिशस ) श्री.नितीन बापू (राजकीय नेते मॉरिशस), श्री.एम. के. गोंधळी (माजी शिक्षण सहसंचालक,कोल्हापूर ) डॉ. दिलीप पांढरपट्टे व श्रीम.कल्पना गवरे (अध्यक्ष, स्नेहल आर्ट्स अँड एज्युकेशन सोसायटी ) तसेच अजमेर लेखिका मंच अवाम सामाजिक सेवा संस्था या सर्वांच्या उपस्थितीत भारताच्या मुंबईतील कवयित्री सौ.अनिता मेस्त्री यांच्या ‘आनंदयात्री ’मी या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन पार पडले. याच काव्यसंग्रहातील हेचि दान या कवितेचे सादरीकरणही त्यांनी केले. श्री.रामचंद्र मेस्त्री व सौ. अनिता मेस्त्री यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. आपला पहिला काव्यसंग्रह ‘आनंदयात्री मी’ मॉरिशस येथे प्रकाशित झाला याचा आनंद निश्चितच अवर्णनीय आहे; असे मनोगत उभयतांनी व्यक्त केले.