Category: ठाणे

Thane news

कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपातर्फे निरंजन डावखरेंना उमेदवारी

ठाणे : विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपातर्फे विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाच्या नवी दिल्ली येथील मुख्यालयातून राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांच्याकडून प्रसिद्धीपत्रकान्वये निरंजन डावखरेंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात उमेदवारी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आमदार निरंजन डावखरे यांनी आभार मानले आहेत. तसेच भाजपाचे कोकणातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवेन, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. आमदार निरंजन डावखरे यांच्याकडून २०१२ पासून कोकण पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले जात आहे. ते यंदा सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढवित आहेत. महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून बेरोजगार पदवीधरांना नोकरीबरोबरच कोकणातील सामान्य नागरिकांसाठी आरोग्य, रस्ते आदींसह पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आमदार डावखरे यांनी प्रयत्न केले आहेत. तसेच कोकणात शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळांमध्ये डिजिटल साहित्य व प्रयोगशाळांची निर्मिती केली आहे. जनतेशी थेट संपर्क, प्रत्येक प्रश्नाची खोलात जाऊन घेतलेली माहिती, कार्यकर्ते व अधिकाऱ्यांशी संवाद ही त्यांच्या कामाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

महिलांची एकेरी विकेट क्रिकेट स्पर्धा

इरा जाधवला विजेतेपद ठाणे : इरा जाधवने अंजु सिंगचा सहज पराभव करत शतकपूर्ती करणाऱ्या स्पोर्टींग क्लब कमिटी आयोजित मुंबई क्रिकेट संघटनेच्या कार्यक्षेत्रातील एकमेव महिलांच्या एकेरी विकेट क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद संपादन…

भाजप कार्यकर्त्यावर हल्ला

एकला अटक उल्हासनगर  :  बांधकाम व्यवसायात  सलग्न असलेल्या भाजपा कार्यकर्त्या वर खंडणी साठी जीवघेणा हल्ला करणाऱ्या निलेश सरोजा याला पोलिसांनी रात्री उशिरा अटक करून गजाआड केले  आहे. भाजप कार्यकर्त्यावर झालेला हल्ला ही  संपूर्ण घटना…

पुनर्विकासाच्या नावाखाली फसवणूक करण्याऱ्या विकासकांच्या कामांवर टाच आणणार

संजय केळकर यांचे आश्वासन अनिल ठाणेकर ठाणे : पुनर्विकासाच्या नावाखाली कुटुंबांची अशा फसवणूक करण्याऱ्या विकासकांची जिथे जिथे कामे सुरु असतील त्यावर टाच आणली पाहिजे. हे मोकाट सुटले तर पुनर्विकासाच्या नावाखाली अजून सामान्य कुटुंबांना.  या फसवणूक झालेल्या कुटुंबांना बरोबर घेऊन त्यांना मुदतीत न्याय मिळावा याकरिता मला जे जे म्हणून करावे लागेल ते मी करेन असे आ. संजय केळकर यांनी सांगितले. पुनर्विकास मध्ये फसवणूक झालेल्या १६ सोसायट्यांतील २०० सभासदांनी रविवारी ठाण्यातील घंटाळी सहयोग मंदिर हॉल येथे आक्रोश बैठक घेतली. यावेळी त्यांनी आमदार संजय केळकर यांना निमंत्रित केले होते. यावेळी विद्याधार वैशंपायन, ॲड. सुभाष काळे, माजी नगरसेवक सुनेश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. या आक्रोश बैठकीत फसवणूक झालेल्या सदस्यांनी आपली मते मांडली. आमची घोर फसवणूक जोशी एंटरप्रायझेस च्या विकासकांनी केली आहे. आमची घराची स्वप्ने त्यांनी धुळीस मिळवली आहेत. वर्ष भर भाडेपण नाही. २०२३ ला आम्हाला भाडे दिले तेही आम्ही सतत तगाद लावल्यामुळे आम्हाला मिळाले. आ. केळकर यांनी पाठबळ दिल्यामुळे आमच्या लढाईला मोठ बळ मिळाले असून आम्ही एकत्रित हा लढा आ. केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली देणार असल्याचे या सदस्यांनी सांगितले. यावेळी या फसवणूक झालेल्या सदस्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची चिड व आक्रोश दिसत होता.  यावेळी आ. केळकर यांनी फसवणूक झालेल्या कुटुंबासोबत शेवट पर्यंत उभे राहून न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या बैठकीत १६ सोसायटयांचे जवळ जवळ २०० सभासद उपस्थित होते. जोशी इंटरप्राझेस च्या कळके आणी त्यांच्या भागीदारांनी शेकडो कुटुंबांची जाणून बुजून फसवणूक केली आहे. अनेकांनी आपली साठवलेली पुंजी मधून घरे घेतली होती. पण या फसवणुकीमुळे ही कुटुंबे आपल्या हक्काच्या घरांपासून वंचित आहेत.

सीएनजी एसटी चालकांना उष्म्याच्या धोका

ठाणे : प्रदूषणाला आळा घालता यावा, यासाठी ठाण्यातील खोपट एसटी आगाराने डिझेलवर चालणाऱ्या सुमारे ३० गाड्यांचे सीएनजीवर चालणाऱ्या गाड्यांमध्ये रूपांतर केले आहे; मात्र असे करताना संबंधित कंपनीने गाडीचालकांच्या जीविताची कोणतीही काळजी घेतलेली दिसत नाही. चालक बसत असलेल्या केबिनच्या खिडक्या कायमच्या बंद केल्याने बाहेरील वारा आत येणे बंद झाले आहे. केबिनमध्ये मोठ्या प्रमाणात इंजिनची गरम हवा जमा होत आहे. भरधाव गाडी सुरू असताना चालकाला उष्माघात झाल्यास गाडीतील प्रवाशांच्या जीवितालाही धोका पोहचणार आहे. अनेक संकटांचा सामना करणाऱ्या एसटीचालक आणि प्रवाशांच्या संकटात आणखी एका संकटाची भर पडली आहे. प्रदूषण टाळण्याच्या हेतून एसटी महामंडळाने डिझेलच्या गाड्यांचे सीएनजीत रूपांतर करण्याचे धोरण अवलंबले आहे. या धोरणानुसार ठाण्यातील खोपट एसटी आगाराच्या सुमारे ३० डिझेल गाड्यांचे सीएनजीवर चालणाऱ्या गाड्यांमध्ये रूपांतर केले आहे; मात्र असे करताना संबंधित कंपनीने चालकाच्या केबिनमध्ये उजव्या बाजूला असलेल्या मूळ खिडक्यांच्या काचा कायमच्या बंद केल्या आहेत. त्यामुळे गाडी धावतानाही चालकाच्या केबिनमध्ये बाहेरील वारा आत येत नाही. शिवाय केबिनमध्ये इंजिनमुळे प्रचंड प्रमाणात गरम होते. गेल्या महिन्यात केबिनमधील गरम हवा सहन न झाल्याने एका चालकाला चक्कर आल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले. या चालकाने वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने मोठी दुर्घटना टळली. परंतु अशा प्रसंगानंतरही आगार व्यवस्थापकाकडून कोणत्याही प्रकारचे पाऊल उचलले नसल्याचे येथील काही चालकांनी सांगितले. चालकांच्या दुर्दैवाने अशा गाड्या ४००-५०० किलोमीटरपर्यंत लांब पाठवल्या जात आहेत. त्यामुळे चालकासोबतच गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्याही जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. सीएनजी गाड्यांमधून रूपांतर करण्यात आलेल्या गाड्यांची दुरुस्ती करणेही अवघड झाले आहे. गेल्या महिन्यात एका चालकाला केबिनमधील उष्ण हवेमुळे उष्माघाताचा त्रास झाला. त्याला चक्कर आल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले. सीएनजी गाड्या चालवताना खूप गरम होते. बाहेरील हवा आत येत नाही. पूर्वीच्या डिझेल गाड्यांच्या खिडकीच्या काचा उघडता बंद करता येत होत्या. परंतु आता त्या कायमच्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या गाड्या चालवणे फारच कठीण झाले आहे. – चालक, खोपट आगार डिझेल गाड्यांमध्ये बदल करून सीएनजी गाड्यात रूपांतर करण्यात आलेल्या अशा प्रकारच्या २०० गाड्या ठाणे जिल्ह्यात आहेत. गाडीच्या खिडक्या उघडत नसल्याने त्रास होतोय अशी कोणत्याही चालकाची तक्रार आलेली नाही अथवा कोणाला चक्कर आल्याची माहिती नाही. – विलास राठोड, विभाग नियंत्रक, ठाणे

मुक्‍या प्राण्यांचे शोषण थांबवा

जुहू किनाऱ्यावर दुग्ध उद्योगाविरोधात निदर्शने मालाड-  जागतिक दूध दिनानिमित्त प्राण्यांच्या हक्‍कासाठी कार्यरत असलेल्‍या ‘युनायटेड फॉर कम्पॅशन इंटरनॅशनल फाऊंडेशन’कडून जुहू समुद्रकिनाऱ्यावर दुग्‍ध उद्योगांविरोधात निदर्शने करण्यात आली. मुक्‍या प्राण्यांचे शोषण थांबवा, अशी…

उन्हाचा तडाखा अजून कमी होण्याचे चिन्ह दिसत नाही उलट वाढतच जात आहे याचा फटका पशू पक्षांना देखील बसताना दिसत आहे ठाणे गावदेवी येथे अशाच एका कॉपर्स स्मित बारबेट पक्षाला उष्माघाताचा त्रास होऊन पक्षी रस्तावर पडला होता पक्षी मित्रांनी या पक्षाला उचलून पाणी पाजून जीवदान दिले … फोटो प्रफुल गांगुर्डे

उल्हासनगर खेमानी नाल्याचे सांडपाणी उल्हास नदीत

लाखो नागरिकांना दूषित पाणी उल्हासनगर : शहरातील खेमानी नाल्याचे सांडपाणी ओव्हरफ्लॉ होऊन उल्हास नदीत जात असल्याने नदीचे पाणी प्रदूषित असल्याची ओरड सुरू झाली. उल्हास नदी पात्रात ज्या ठिकाणी खेमानी नाल्याचे सांडपाणी मिळते त्याच ठिकाणाहून एमआयडीसी पाणी उचलत आहे. उल्हासनगर संच्युरी कंपनी जवळून वाहणाऱ्या उल्हास नदी पात्रातून एमआयडीसी पाणी उचलून उल्हासनगरसह इतर शहराला पाणी पुरवठा करते. नेमके त्याच ठिकाणी शहरातील सांडपाण्याचा खेमानी नाला नदीला मिळत असल्याने, नदीतील पाणी प्रदूषित होते. या प्रदूषित पाण्याचा पुरवठा लाखो नागरिकाला होत असल्याचा आरोप-प्रत्यारोप झाल्यावर, महापालिकेने खेमानी नाल्याचे पाणी विहिरीत अडविले जाते. अडविले पाणी पंपिंग करून शांतीनगर मलनिस्सारण केंद्रात आणून त्यावर प्रक्रिया करून नदी खाडीत सोडले जाते. यावर महापालिकेने कोट्यावधी रुपये खर्च केले. नाल्याचे सांडपाणी अडवलेल्या ठिकाणी तुंबून ओव्हरफ्लॉ होत नदी पात्रात जात असल्याचे चित्र आहे. यावर महापालिकेने त्वरित कारवाई करण्याची मागणी सामाजिक संस्थेकडून होत आहे. शहरातील खेमानी नाल्या प्रमाणे, म्हारळगावातून येणारा सांडपाणी नाला खेमानी नाल्यापुर्वी उल्हास नदीला मिळून नदीचे पाणी प्रदूषित करीत आहे. त्या नाल्याचे पाणी अडवून, त्यावर प्रक्रिया करून नदी ऐवजी नदी खाडीत पंपिंगद्वारे सोडण्याच्या मागणीने जोर धरला आहे. खेमानी नाल्याचे पाणी ज्याठिकाणी अडविले आहे. त्याठिकाणी नाल्यात वाहून येणाऱ्या कचऱ्यासाठी एक लोखंडी जाळी बसविली आहे. त्या जाळीला कचरा अडकुन पाणी ओव्हरफ्लॉ होऊन नदीत जात असल्याच्या घटनेत वाढ झाली आहे. महापालिका कोट्यावधी रुपये खर्चून ही परिस्थिती असून संबंधित ठेकेदार व महापालिका अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची गरज आहे. याबाबत महापालिका पाणी पुरवठा अभियंता परमेश्वर बुडगे यांच्याशी संपर्क केला असता झाला नाही.

साहित्यिकांनी सत्तेच्या नव्हे तर सत्याच्या बाजूने लिहावे – कृष्णात खोत

ठाणे : लेखक आणि कवींनी कुठल्याही काळात सत्तेच्या नव्हे, तर सत्याच्या बाजूने असले पाहिजे. सत्याचे लेखन हाच त्यांचा धर्म, तीच त्यांची जात असली पाहिजे. आत्मविस्थापनाच्या सद्ध्याच्या दुर्दैवी काळात तर लिहिणाऱ्या हातांनी निर्भयपणे लिहीत रहायला हवे. स्वतःला आणि व्यवस्थेला प्रश्न विचारत रहायला हवेत असे स्पष्ट मत साहित्य अकादमी पुरस्कार विजेते, साहित्यिक कृष्णात खोत यांनी व्यक्त केले. मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वर्धापन दिनाचे दुसरे पुष्प कै. वा. अ. रेगे साहित्य पुरस्काराच्या वितरणाने गुंफले गेले. शनिवारी वा. अ. रेगे सभागृहात खोत यांनी आपले विचार मांडले ते म्हणाले. सत्तेचे ढोंग फाडण्याचे काम च्हित्यिक करत असतो. कोणताही साहित्यिक हा लोकशाही वादी असतो त्यात जास्त लोकशाही वादी हा कादंबरीकार असतो कारण तो अल्पमतवादी असतो. तो एकट्या माणसाचे सत्य घेऊन लढत असतो. लिहीणारा माणूस हा नेहमी शेवटच्या हबाकावर बसलेलेा असतो. सामान्यांचा आवाज पोहोचवण्याची ताकद लेखकात असते. राजाला लेखकाची भिती वाटत असते. सामान्य माणसाचे प्रतिनिधीत्व लेखक, कवीने करावे तेव्हाच सामान्य माणसांचा चेहरा वाचता येतो. लेखकाने सभ्यतेकडे सातत्याने लक्ष दिले पाहिजे. जेत्यांचा इतिहास लिहीताना पराजितांच्या इतिहासाकडे देखील बाकराने पहावे. मानवता, करुणा याकडे देखील लेखकाचे लक्ष हवे. धर्म म्हणजेच सत्य यापलिकडे काही नाही अशी त्याची भूमिका असावी. धर्म हा उंबराच्या आत आणि उंबराच्या बाहेर आल्यावरमानवतेचा, भूतदयेचा धर्म लेखकाने पाळावा. मुंगीलाही जगण्याचा अधिकार आहे यावर लेखकाचा विश्वास असला पाहिजे. महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालय, मुंबईचे प्र.संचालक अशोक गाडेकर म्हणाले की, २०२४ पासून ज्या साहित्यकृतींना पुरस्कार दिले जातात त्या साहित्यकृतींचा समावेश शासनाच्या ग्रंथालयात केला जाणार आहे. शासकीय ग्रंथालये देखील आधुनिकतेकडे वाटचाल करीत आहेत. ४७ लाख शासनमान्य ग्रंथ शासनाकडे असून त्यापैकी ३० लाख ग्रथांची नोंदणी ई प्रणालीद्वारे करण्यात आली आहे. तसेच, १०० हून अधिक वर्षे झालेल्या पुस्तकांचे शासनाच्या माध्यमातून डिजीटायझेशन करुन ती पुस्तके वाचकांना मोफत उपलब्ध करुन दिली जाणार आहे. सुरूवातीला विद्याधर ठाणेकर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर ललित गटात वैभव साटम लिखीत भावकी अन गावकी तर ललितेतर गटात रुपाली मोकाशी लिखीत श्रीस्थानकाचे शीलेहार यांना ॲड. वा. अ. रेगे जिल्हास्तरीय साहित्य पुरक्साराने गौरविण्यात आले. कार्यक्रमाला डावीकडून ग्रंथालय संचालक प्रशांत पाटील, दा.कृ. सोमण, ठाणेकर, गाडेकर, खोत, विश्वस्त मकरंद रेगे, हेमंत काणे आणि विनायक गोखले आदी उपस्थित होते. वृंदा दाभोलकर यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.

गुजरातमधील पर्यटक बोर्डी समुद्रकिनाऱ्यावर

बोर्डी : राज्याच्या सीमेपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या गुजरात राज्यातील उंबरगाव आणि नारगोल समुद्रकिनारी प्रशासनाने पर्यटकांना बंदी घातली आहे. त्यामुळे गुजरात राज्यातील पर्यटकांचा ओघ आता बोर्डी या निसर्गरम्य समुद्रकिनारी, तसेच येथील वॉटरपार्कमध्ये वाढला आहे. आता पावसाळा उंबरठ्यावर येऊन ठेपल्याने कोणत्याही वेळी अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन गुजरात प्रशासनाने समुद्रकिनाऱ्यावरील बहुसंख्य पर्यटन केंद्रावर पर्यटकांना जाण्यास मनाई हुकूम काढला आहे. गुजरात राज्यातील वापी, सुरत, तसेच अन्य शहरांमध्ये प्रचंड तापमान वाढल्यामुळे थोडासा दिलासा मिळावा, म्हणून त्या भागातील ग्रामस्थ पर्यटनाचा व थोडाफार थंड हवेचा आनंद लुटण्यासाठी उंबरगाव, नारगोल, तसेच अन्य समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात पर्यटनाचा ओघ वाढला होता; मात्र १ जूनपासून गुजरात प्रशासनाने राज्यातील पर्यटकांवर समुद्रकिनारी जाण्यास मनाई हुकूम काढला आहे. हे नागरिक बोर्डी परिसरातील वॉटरपार्क, तसेच समुद्रकिनारी गार्डनमध्ये फिरण्यासाठी येत असल्यामुळे बोर्डी परिसरात पर्यटकांची गर्दी वाढली आहे.