Category: ठाणे

Thane news

प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या  मार्गदर्शन वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन ठाणे : प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत अग्रगण्य नाव असलेल्या ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमूख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्यावतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या पूर्व परीक्षेसाठी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात येते. या वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. संस्थेच्या या निःशुल्क मार्गदर्शन वर्गांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रवेश परीक्षेसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे  आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमूख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था ही केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना निःशुल्क मार्गदर्शन करणारी अग्रगण्य संस्था आहे. तसेच, अशा पध्दतीने प्रशासकीय प्रशिक्षण संस्था चालविणारी ठाणे महानगरपालिका ही देशातील एकमेव महानगरपालिका आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा दिलेले विद्यार्थी यांच्यासाठी चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेतर्फे स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी प्रवेश परीक्षा रविवार, २३ जून, २०२४ रोजी होणार आहे. परीक्षेचा कालावधी स. ११ ते दु. १ असा राहील. प्रवेश परीक्षा शुल्क १०० रुपये आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी दिनांक १९ जून २०२४ पर्यंत संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.cdinstitute.net) उपलब्ध असलेल्या लिंकवरील विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.  टपालद्वारे, कुरिअरद्वारे तसेच ई-मेल द्वारे प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत किंवा विचारात घेतले जाणार नाहीत याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.        सदर प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेसंबंधी सर्व माहिती व सूचना संस्थेच्या नोटीस बोर्डावर तसेच ठाणे महानगरपालिकेच्या www.thanecity.gov.in व संस्थेच्या www.cdinstitute.net या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेली आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन चिंतामणराव देशमूख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ०२२-२५८८१४२१ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि सुसज्ज ग्रंथालय प्रशिक्षण केंद्रात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाते. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना मासिक तीन हजार रुपयांचे विद्यावेतन दिले जाते. संस्थेचे अद्ययावत ग्रंथालय असून स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारी जगभरातील नियतकालिके येथे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ग्रंथालयासाठी दरवर्षी महापालिका प्रशासन मोठ्या प्रमाणात अत्यावश्यक पुस्तके खरेदी करते.तसेच, सेवेतील ज्येष्ठ अधिकाऱ्यांची मार्गदर्शन सत्रेही या प्रशिक्षणार्थींसाठी आयोजित करण्यात येतात.

धीम्या गतीच्या लोकलचे वेळापत्रक कोलमडले; चाकरमान्यांचे हाल

ठाणे : मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावर धावणाऱ्या लोकलचे वेळापत्रक कोलमडले. यामुळे आज (सोमवार) सकाळ पासूनच या मार्गावरील ट्रेन अनिश्चित वेळापत्रकानुसार धावत आहेत. तर कल्याणहुन मुंबईकडे जाणाऱ्या अनेक लोकल ट्रेन अचानक रद्द करण्यात आल्याने लोकलने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी हाल झाले. काही तांत्रिक बिघाडामुळे ही अडचण उदभवल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. मात्र, ऐन पीकअव्हर मध्ये लोकल खोळंबल्‍याने सकाळपासूनच कल्याण, डोंबिवली, दिवा, ठाणे आदी स्थानकांसह इतर रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. त्यातच आज तापमानात वाढ असल्याने मोठा उकाडा जाणवत असून महिला व लहान मुलांचे मोठे हाल झाले. धीम्‍या गतीच्या लोकलचे वेळापत्रक कोलमडल्‍याने प्रवाशांना ताटकळत उभे रहावे लागले.

निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर कंपनीतील कामगारांना मतदानासाठी अर्ध्या दिवसाची सवलत

पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी (ता.१३) मतदानासाठी कामगारांना सुट्टी देण्याचे निवडणूक आयोगाचे शासन परिपत्रक असतानासुद्धा तळोजा औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखानदारांनी कामगारांना मतदानाची सुट्टी सरसकट न दिल्याने कामगारांनी थेट मावळ मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपर्यंत संपर्क साधल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कारवाईच्या दट्यानंतर कामगारांना दुपारच्या सत्रातील मतदानासाठी दोन तासांची सवलत देण्यात आली. तळोजा औद्योगिक वसाहतीमधील डब्ल्यू २४ या भूखंडावरील मार्वल ड्रग्स या कंपनीने सोमवारी निवडणुकीसाठी कामगारांना सुट्टी न दिल्याची माहिती मावळ लोकसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके यांना समजल्यावर त्यांनी तातडीने निवडणूक आयोगाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक या कंपनीकडे रवाना केले. पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी तातडीने पोलिसांचे पथकसुद्धा कंपनीकडे प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी पाठविल्यावर कंपनीने निवडणुकीसाठी सुट्टी दिली नसल्याचे सिद्ध झाले अखेर निवडणूक आयोगाने कंपनीवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने दोन तासांची सवलत जाहीर करुन कामगारांना निवडणुकीत मतदान करा आणि मतदान केलेले छायाचित्र कंपनीच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाठवावा अशा सूचना केल्या. कंपनी मतदान केलेल्या कामगारांसाठी एक सोडत घेऊन बक्षीस देणार असल्याचे मार्वल कंपनीने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. विशेष म्हणजे तळोजातील अनेक लहान कारखान्यांनी निवडणुकीत कामगारांना मतदान करता यावे यासाठी काही तासांची सवलत देणे अपेक्षित होते. परंतु रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या परिपत्रकाचा दाखल देत रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी तळोजातील काही कारखानदारांनी कारखाने बंद ठेवल्याची सबब देण्यात आली. मात्र मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत कारखानदारांनी काही तासांची सवलत देणे गरजेचे होते असे कामगारांच्यावतीने मागणी करण्यात येत होती.

वादळी वाऱ्यासह कल्याण डोंबिवलीत अवकाळी पाऊस

डोंबिवली : कल्याण डोंबिवली परिसरात सोमवारी दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी आल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. डोंबिवली येथे आज उद्धव ठाकरे यांची सभा असून त्या आधीच पावसाने हजेरी लावल्याने शिवसैनिकांना सभा कशी पार पडणार याची चिंता लागली आहे. दुपारी 3 वाजल्या शहरात सोसाट्याचा वारा सुटल्याने शहरात धुळीचे वादळ उठले होते. त्यात अचानक पावसाच्या सरी आल्याने नागरिकांची धांदल उडाली. सोमवारी दुपारी अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिक काहीसे सुखावले आहेत. उन्हाच्या तीव्र झळा, अंगाची होणारी काहिली यामुळे कल्याण डोंबिवली मधील नागरिक हैराण झालेले होते. सोमवारी दुपारी 2 नंतर शहरात सोसाट्याचा वारा सुटला. यामुळे रस्त्यावरील धूळ हवेत उडून सगळीकडे धुळच धूळ दिसत होती. सव्वा 3 च्या सुमारास पावसाच्या सरी सुरू झाल्या. पावसाचा जोर जास्त नसला तरी आलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. यामुळे नागरिक काहीसे सुखावले. पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणकडून काही भागाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. लग्नसराईचा हंगाम सुरू असून दुपारी ही हल्ली बाजारात गर्दी दिसून येते. अचानक आलेल्या पावसाने दुकानदार, विक्रेते यासोबतच खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची एकच धांदल उडाली. नागरिकांजवळ छत्र्या नसल्याने पावसापासून बचाव म्हणून लगेच आजूबाजूच्या दुकानाचा आसरा नागरिकांनी घेतला. राज्यामध्ये या आठवड्यामध्ये दुपारी तापमानात वाढ होणार असून, सायंकाळी मात्र पावसाची हजेरी लागणार आहे.असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. कल्याण,डोंबिवली सह ग्रामीण भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने रस्त्यावरील वाहन देखील वाहनचालकांना दिसून येत नव्हती. तर मुसळधार पावसाने प्रचंड अंधार दाटून आला आहे. अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी महावितरण कडून ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

बाल तस्करी करणाऱ्या गँगचा उल्हासनगर पोलिसांकडून पर्दाफाश

उल्हासनगर : शहरातील झुलेलाल मंदिरासमोरील भिकाऱ्याच्या पाच महिन्यांच्या चिमुकलीचे अपहरण करून तिच्याकडून दोन लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिलांना उल्हासनगर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या तावडीतून बालकाची सुखरूप सुटका केली आहे.  पोलिसांनी एका अपहरणकर्त्याला हैदराबादमधून तर दुसऱ्याला बिहार राज्यातील नक्षलग्रस्त भागातून अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मीना सुनील सोनवणे (35) या उल्हासनगरच्या म्हारळगाव येथे सासू, पती आणि पाच मुलांसह राहतात.  तिचा सर्वात लहान 5 महिने वयाचा मुलगा कार्तिक आजाराने त्रस्त होता, गरिबीमुळे मीना त्याच्यावर उपचार करू शकली नाही, म्हणून तिने हॉस्पिटलचा अहवाल आणि मुलाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आणि लोकांना मदतीसाठी आवाहन केले होते. मुंबईतील बोरिवली येथे राहणाऱ्या स्वाती बेहराने सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला आणि मीनाला भेटण्यासाठी मुंबईहून उल्हासनगरला आली.  मदतीच्या नावाखाली तिने हैद्राबाद येथे राहणाऱ्या तिच्या मैत्रिणी कृष्णाताई सुरक्षावेणी हिच्याशीही बोलून सांगितले की, हैद्राबादमध्ये एक चांगला बालरोगतज्ञ असून तेथे स्वस्तात उपचार केले जातील.  मीनाने त्यांचे म्हणणे मान्य केले आणि आजारी मुलासह पतीसोबत हैदराबादला गेली.  तिथे त्यांची कृष्णाताईंची भेट झाली.  ते म्हणाले की येथे एक डॉक्टर आहे जो कमी खर्चात मुलाला बरा करेल.  त्यांनी मीना आणि सुनीलला हॉटेलमध्ये राहायला लावले आणि दुसऱ्या दिवशी मुलाला डॉक्टरकडे नेले, रिपोर्ट पाहिल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की मुलाला बरे करण्यासाठी एक महिना लागेल.  आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने मीना यांनी पैसे देण्यास असमर्थता व्यक्त केली .  मदतीच्या नावाखाली त्यांनी उपचार घेण्याचे मान्य केले.  मात्र मुलाला एक महिना हैदराबादमध्ये राहावे लागेल, असे त्यांनी मीनाला सांगितले.  आपल्या कुटुंबाची आणि मुलांची काळजी घेण्यासाठी मीना दोन दिवसांनी मुंबईला रवाना झाली.  दरम्यान, व्हिडिओ कॉलिंगद्वारे ती आपल्या मुलाच्या संपर्कात राहिली. महिनाभरानंतर मीनाने त्यांना मूल परत करण्यास सांगितले असता त्यांनी सांगितले की, मी दोन लाख रुपये वैद्यकीय उपचारासाठी खर्च केले आहेत, ते पैसे आधी मला द्या, मग मी मुलाला तुमच्या ताब्यात देईन.  मीना यांनी अनेकदा विनंती करूनही ते मूल परत करण्यास तयार नव्हते.  त्यांनी फोनही बंद केले आहेत.  शेवटी मीना यांना पोलिसांचा आधार घ्यावा लागला आणि स्वाती आणि कृष्णाताई यांच्या विरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीनंतर आरोपींना  पकडण्यासाठी पोलीस पथक हैदराबादला रवाना झाले. कृष्णाताईंना मदत करणाऱ्या सोनीदेवी पासवान (वय 32) हिला तेथून अटक करण्यात आली. अन्य तेथून मुलाला घेऊन पळून गेले होते.  पोलिसांनी आरोपी महिलेची पोलीस कोठडीत रवानगी केली व त्यानंतर उल्हासनगर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सोनी देवी अद्याप पोलिस कोठडीत असताना, पोलिसांना माहिती मिळाली की माला देवी (24) बिहार राज्यातील भागलपूर जिल्ह्यातील बकरपूर गावात तिच्या मुलासोबत आहे.  भागलपूर हा नक्षलग्रस्त भाग असल्याने उल्हासनगर पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार पाच जणांचे पथक बिहारला रवाना झाले आणि मोठ्या सतर्कतेने स्थानिक पोलिसांच्या मदतीने गावात पोहोचून स्वातीला अटक करून पाच महिन्यांच्या चिमुरडीला ताब्यात घेतले. तिच्यापासूनही सुखरूप सुटका केली.  उल्हासनगरच्या चोपडा न्यायालयाने स्वातीला 17 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी सांगितले की, स्वाती सहदेव बेहरा, कृष्णाताई सुरक्षादेवी, संतोषी रेड्डी आणि सुनीता यांचा या गुन्ह्यात सहभाग असून ते अद्याप फरार आहेत. बिहारमध्ये कारवाईसाठी गेलेल्या महिला पोलिस निरीक्षक निकिता भोईगड यांनी सांगितले की, आरोपी महिला मुलाला घेऊन नक्षलवाद्यांचा परिसर असलेल्या बकरपूर गावात गेली होती.  गावाचे नाव ऐकल्यावर एकही वाहनचालक तिकडे जायला तयार नव्हता.  दुप्पट भाडे मोजावे लागले.  बकरपूर गावात जाण्यासाठी आरोपी महिलेला पीरपथी गावातून जावे लागते, दोन्ही भागातील लोक गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत.  पोलीस महिलेला ताब्यात घेण्यासाठी गेले असता गावातील शेकडो लोकांनी पोलिसांना घेराव घातला.  मोठ्या कष्टानंतर पोलिसांना यश आले. निकिता भोईगडने पुढे सांगितले की, आरोपी आणि मुलाला तेथून पळवून नेणे सोपे नव्हते, माझ्या कारच्या पुढे एक पोलिस जीप होती आणि त्यानंतर आम्ही तेथून निघू शकलो.  किंवा असे म्हणता येईल की, पोलिसांनाही पोलिस बंदोबस्त घेऊन निघावे लागले.

कल्याणमधील नांदिवली, व्दारलीमधील बेकायदा गोदामे, चाळी भुईसपाट

कल्याण : कल्याण लोकसभा निवडणुकीची धामधूम जोरात सुरू असल्याने कल्याण डोंबिवली पालिकेचा अधिकारी वर्ग निवडणूक कामात व्यस्त आहे, असा विचार करून भूमाफियांनी कल्याण पूर्वेतील व्दारली, नांदिवली तर्फ भागात रस्ते, मोकळ्या जागा अडवून तेथे बेकायदा गोदामे, बेकायदा चाळी उभारल्या होत्या. याविषयी तक्रारी प्राप्त होताच, आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या निर्देशानुसार आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी नऊ गोदामे, याच भागातील बेकायदा चाळी जेसीबी यंत्र आणि तोडकाम पथकाच्या साहाय्याने शुक्रवारी भुईसपाट केल्या. कल्याण पूर्वेतील मलंगगड रस्त्यावरील नांदिवली तर्फ, व्दारली गाव हद्दीत भूमाफियांनी गाव हद्दीतील मोकळ्या जागा हडप करून तेथे गोदामांची आणि बेकायदा चाळींची बांधकामे सुरू केली आहेत. या बांधकामांना तातडीने रंगरंगोटी करून या गोदामांचा वापर, खोल्यांमध्ये रहिवास सुरू करण्याच्या हालचाली माफियांनी सुरू केल्या होत्या. याविषयीची कुणकुण लागताच आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी निवडणूक कामातून वेळ काढून नांदिवली तर्फ, व्दारली येथील गोदामे, बेकायदा चाळी तोडकाम पथक, जेसीबीच्या साहाय्याने शुक्रवारी जमीनदोस्त केल्या. यावेळी गुन्हा दाखल होईल या भीतीने भूमाफियाने पळून गेले होते. दहा प्रभागांमध्ये आय प्रभागात सर्वाधिक बेकायदा बांधकामांविरुध्द कारवाई सुरू असल्याने माफियांचे कंबरडे मोडले आहे. या सततच्या कारवाईने आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांच्या आक्रमक कारवाईचे कौतुक केले आहे. बांधकामे जैसे थे पालिकेच्या डोंबिवली विभागातील ह आणि फ प्रभागात बेफाम बेकायदा बांधकामे सुरू आहेत. परंतु, या प्रभागाचे साहाय्यक आयुक्त आम्ही लोकसभा निवडणूक कामात खूप व्यस्त असे तक्रारदारांना सांगून या बेकायदा बांधकामांना अभय देत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. ह प्रभागात कोपर पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील शैलेश पाटील यांच्या बेकायदा कोंबड्याच्या खुराड्यावर कारवाई न केल्याने या खुराड्यात कोंबड्या, त्यांची पिल्ले आणून व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. ठाकुरवाडीतील भूमाफिया प्रकाश गोठे, शंकर ठाकूर यांच्या फशी हाईट्स, गटारवरील दोन बेकायदा इमारती, जुनी डोंबिवलीतील धिरेंद्र भोईर यांनी तक्रार केलेली शिवलिला, राहुलनगर मधील सुदामा, रमाकांत आर्केड इमारती, कुंभारखाणपाडा हरितपट्टयावरील बेकायदा बांधकामे सुरू आहेत. फ प्रभागात खंबाळपाडा, सुयोग हॉल गल्लीतील आराधना पुनर्निमाणाच्या इमारतीचे बेकायदा बांधकाम वेगाने पूर्ण करण्याच्या हालचाली माफियांनी सुरू केल्या आहेत. आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांना निवडणूक कामातून बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी वेळ मिळतो, मग फ आणि ह प्रभागातील अधिकारी बेकायदा बांधकामांविषयी उदासिन का, असे प्रश्न तक्रारदार करत आहेत. आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या निर्देशानुसार आय प्रभागात एकही नवीन बेकायदा बांधकाम उभे राहणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. जुन्या बेकायदा बांधकामांच्या तक्रारी प्राप्त होत्याच ती बांधकामेही विहित प्रक्रिया पूर्ण करून तोडली जात आहेत. आय प्रभागात नवीन बेकायदा बांधकाम सुरू असल्याची तक्रार प्राप्त होताच तातडीने ती बांधकामे तोडली जातात. – हेमा मुंबरकर,साहाय्यक आयुक्त, आय प्रभाग, कल्याण.

भिवंडीतील महाविकास आघाडीच्या उमेदवाराला माकपचा पाठिंबा – डॉ. अशोक ढवळे

अनिल ठाणेकर  ठाणे : भिवंडीतील महाविकास आघाडी पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जाहीर पाठिंबा दिल्याची माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्यूरो सदस्य डॉ. अशोक ढवळे यांनी दिली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची या मतदारसंघात शहापूर, वाडा, भिवंडी व मुरबाड या चार तालुक्यांत बऱ्यापैकी व वाढती ताकद आहे. या सर्व तालुक्यांतून, आणि विशेषतः शहापूर व वाडा तालुक्यांतून, माकपचे कार्यकर्ते हातात लाल बावटे घेऊन आणि लाल स्कार्फ घालून मोठ्या संख्येने आले होते. सभेतील मविआच्या प्रमुख वक्त्यांना त्याची दखल घ्यावी लागली.रविवारी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी-पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश म्हात्रे (उर्फ बाळ्या मामा) यांच्या प्रचारासाठी वासिंद, ता. शहापूर, जि. ठाणे येथे प्रचंड सभा झाली. भिवंडी लोकसभा मतदारसंघात ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांचे भाग येतात. येथे मुख्य लढत मविआचे सुरेश म्हात्रे विरुद्ध भाजपचे विद्यमान खासदार आणि पंचायत राज चे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यामध्ये आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भिवंडी मतदारसंघातील शहापूर, वाडा, भिवंडी व मुरबाड या चार तालुक्यांत बऱ्यापैकी वाढती ताकद आहे. या सर्व तालुक्यांतून, आणि विशेषतः शहापूर व वाडा तालुक्यांतून, माकपचे कार्यकर्ते हातात लाल बावटे घेऊन आणि लाल स्कार्फ घालून मोठ्या संख्येने सुरेश म्हात्रे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत आले होते. सभेतील मविआच्या प्रमुख वक्त्यांना त्याची दखल घ्यावी लागली. जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्यूरो सदस्य डॉ. अशोक ढवळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार, उमेदवार सुरेश म्हात्रे, तसेच स्थानिक नेत्यांची भाषणे झाली. सर्व वक्त्यांनी मोदी-शहा-प्रणित भाजप केंद्र सरकारच्या सर्वच क्षेत्रांतील दिवाळखोरीवर, तसेच शिंदे-फडणवीस-अजित पवार राज्य सरकारच्या अनैतिक व भ्रष्ट कारभारावर आसूड ओढले. वक्त्यांनी मांडले की देशभर आणि महाराष्ट्रातही या निवडणुकीचे वारे भाजपच्या विरुद्ध वाहू लागले आहेत. स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वात जनविरोधी, धनिकधार्जिणे, हुकूमशाही, धर्मांध आणि भ्रष्ट अशा भाजपच्या मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी भिवंडीतून मविआचे सुरेश म्हात्रे यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन सर्वांनी केले.

ठाणे महापालिकेच्या दोन्ही नाट्यगृहात मतदानासाठी जागृती

गडकरी रंगायतन आणि घाणेकर नाट्यगृहात प्रत्येक प्रयोगाच्या वेळी दिला जातो मतदानाचा संदेश ठाणे : लोकसभेच्या निवडणुकीत २० मे रोजी मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावे याबद्दल ठाणे महानगरपालिका विविध उपक्रमांमधून जागृती करत आहे. याच उपक्रमात ठाणे महापालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन आणि डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे प्रत्येक प्रयोगाच्या आधी मतदान करण्याबद्दलचा संदेश दिला जात आहे. त्यामुळे हजारो नाट्यरसिकांना मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याची जाणीव करून दिली जात आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार, अधिकाधिक नागरिकांपर्यंत मतदान करण्याचा संदेश महापालिकेच्या यंत्रणेमार्फत पोहोचवण्यात येत आहे. गडकरी रंगायतनची आसन क्षमता एक हजार प्रेक्षकांची आहे. तेथे दररोज किमान दोन नाटकांचे प्रयोग होतात. शनिवार-रविवारी हे प्रमाण तीन प्रयोगापर्यंत जाते. तर, घाणेकर नाट्यगृहाची आसनक्षमता ११०० प्रेक्षकांची आहे. येथे दररोज किमान एक प्रयोग होतो तर, शनिवार-रविवारी किमान दोन प्रयोग होतात. घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटरमध्येही प्रयोग होतात. या प्रयोगांना येणाऱ्या हजारो रसिकांच्या माध्यमातून त्यांना आणि त्यांच्यामार्फत त्यांच्या कुटुंबियांपर्यंत मतदान करण्याचा संदेश पोहोचवण्यात येत आहे. जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभागी वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदार जागृतीकरिता विविध उपक्रम राबविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेद्वारेही जाहिराती, बॅनर्स, सोशल मिडिया,आशा सेविका तसेच महापालिकेच्या विविध उपक्रमातंर्गत मतदान जनजागृती करण्यात येत आहे. महापालिकेने मतदान यंत्रांची प्रतिकृती असलेला मॅस्कॉटही तयार केलेला आहे. त्याचबरोबर, मिनी मॅरेथॉन आणि फ्लॅश मॉबच्या माध्यमातूनही मतदान जागृतीचा संदेश देण्यात आला आहे.

मीरा भाईंदरची जनता विकास कामांना देणार साथ-राजन विचारे

मीरारोड- मीरा भाईंदरमध्ये गेल्या १० वर्षात खासदार म्हणून केलेल्या कामांची जनतेला कल्पना आहे. येथील जागरूक जनता यावेळी देखील आपली साथ देईल असे उद्धवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांनी प्रचार फेरी दरम्यान…

राज ठाकरेंचा ठाण्यात आता  ‘लाव रे तो व्हिडीओचा पार्ट 2’

ठाणे : मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी आता ‘लाव रे तो व्हिडीओ’ चा सिझन 2 ठाण्यात सुरू केले. फक्त त्यातील पात्र आता भाजपा नसून ठाकरे सेना होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त…