Category: ठाणे

Thane news

धनगर प्रतिष्ठानच्या वतीने धनगर रत्न पुरस्कार

ठाणे : धनगर प्रतिष्ठान, ठाणे जिल्हा व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ, ठाणे  यांच्या वतीने रविवारी “धनगर रत्न” पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये  विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या धनगर समाजातील मान्यवरांना  पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. दरवर्षी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. या वर्षीचे धनगर रत्न पुरस्कार  तेजस्विनी गलांडे ( शासकीय ),गणेश कुरकुंडे ( पत्रकारिता),अनिकेत पडसे ( सामाजिक),अनिल झोरे ( शैक्षणिक ),अक्षय मासाळ ( क्रीडा ),डॉ स्मिता काळे-बंडगर ( वैद्यकीय ), भीमराव जानकर ( उद्योजक ),नागू आप्पा वीरकर  ( लेखक – साहित्यिक ),आकांक्षा शंकर वीरकर ( राजकीय ),सचिन तामखडे (कला ) राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान,नवी मुंबई  (सामाजिक संस्था)  यांना प्रदान करण्यात आले.तर पुश अप्स मध्ये ग्रिनीज वल्ड रेकॉर्ड करणारे संजय देवकाते यांचा विशेष सन्मान करण्यात आला.ठाण्यातील पाचपाखाडी येथील  ठाणे महापालिकेच्या कै नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे आयोजित या कार्यक्रमाला आमदार संजय केळकर,वसई विरार महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे,यशवंत सेना सरसेनापती माधवभाऊ गडदे,माजी नगरसेविका विशाखा खताळ,समाजाचे नेते जयसिंग तात्या शेंडगे,बाबासाहेब दगडे,संजय वाघमोडे,यशवंत सेना नवी मुंबई अध्यक्ष अभिजित कोकरे,समाजसेवक संदेश कवितके,संस्थेचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे, महिला अध्यक्षा माधवी गणेश बारगीर आदीसह मान्यवर उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य इतके मोठे आहे कि सर्व समाजाने त्यांची पूजा केली पाहिजे अशा शब्दात आमदार संजय केळकर यांनी अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव केला. समाजातील रत्न शोधून त्यांना पुरस्कराच्या माध्यमातून बळ देण्याचे काम धनगर प्रतिष्ठान करत आहे त्यामुळे प्रतिष्ठानचे कौतुक करावे तितके कमी आहे अशा शब्दात केळकर यांनी प्रतिष्ठानचे कौतुक केले.धनगर प्रतिष्ठान सतत समाजाच्या समस्या,प्रश्न सोडवण्यात पुढे असतात.त्यामुळे प्रतिष्ठान करत असलेल्या या सामाजिक कार्याला आमचे कायमचे पाठबळ असले असे सांगून मासुंदा तलाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे सुशोभीकरणासाठी आमदार निधी लागला तर देऊ असे आश्वासन देखील केळकर यांनी दिले आहे.सरकारने समाजासाठी विविध योजना सुरु केल्या आहेत या योजना समाजापर्यंत पोहचवण्यासाठी आपण पुढाकार घेऊन विविध शिबिरे आयोजित करण्यात येईल असे केळकर यांनी यावेळी सांगितले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील फोनवरून या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन धनगर प्रतिष्ठानच्या वतीने माझाकडे केलेल्या मागणीनुसार अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी भरीव निधी देऊन भव्य स्मारक उभारू असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष महेश गुंड,सचिव तुषार धायगुडे ,खजिनदार अनिल जरग,उपाध्यक्ष कुमार पळसे,राजेश वीरकर,प्रचारप्रमुख सचिन बुधे,उपखजिनदार सुरेश भांड,सल्लागार दिलीप कवितके, सूर्यकांत रायकर,मनोहर वीरकर,प्रसाद वारे,गणेश बारगीर,अविनाश लबडे,राजेश वारे,दीपक झाडे,संतोष बुधे,संतोष दगडे,उत्तम यमगर,अंकुश उघाडे,उद्धव गावडे,महेश पळसे,अनिकेत पडसे,महिला मंडळाच्या उपाध्यक्ष संगीता खटावकर,सचिव गायत्री गुंड,सचिव गायत्री गुंड,खजिनदार भारती पिसे,उपसचिव सुजाता भांड,उपखजिनदार सुषमा बुधे,सल्लगार अर्चना वारे,मीना कवितके,शीतल डफळ,वंदना वारे,अमृता बुधे,सीमा कुरकुंडे,मनीषा शेळके,रंजना यमगर,स्मिता गावडे,शुभांगी उघाडे,रिचा कुलाळ आदींसह कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

कोचिंग क्लासेस संचालक संघटनेतर्फे अमोल जगताप हे कोकण पदवीधर निवडणूक लढविणार- सतिश देशमुख

अनिल ठाणेकर ठाणे : शासन पातळीवर होत असलेल्या दुर्लक्ष्याच्या निषेधार्थ शालेय शिक्षण व्यवस्थेला पूरक अशी शैक्षणिक संस्था असलेल्या कोचिंग क्लासेस संचालक संघटनेनेचे प्रतिनिधी म्हणून संगणक इंजिनियर अमोल गौतम जगताप हे कोकण पदवीधर निवडणूक लढविणार असल्याची माहिती कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचे अध्यक्ष सतिश देशमुख यांनी दिली आहे. गेल्या सहा महिन्यापूर्वी कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या वतीने कोकण पदवीधर निवडणूक लढण्याचे जाहीर केले होते, त्याच अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीनंतर कोकण पदवीधर निवडणूक जाहीर केली असल्याने संघटनेने ही निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. आजपर्यंत ७५०० तरुण पदवीधर यांचे फॉर्म संघटनेच्या वतीने भरण्यात आले असून हजारो माजी विद्यार्थी यांना संपर्क साधण्यात आलेला आहे. शासन पातळीवर होत असलेल्या दुर्लक्ष्याच्या निषेधार्थ शालेय शिक्षण व्यवस्थेला पूरक अशी शैक्षणिक संस्था असलेल्या कोचिंग क्लासेस संचालक संघटनेने आता कोकण पदवीधर निवडणूक लढवण्याचा निश्चय केला आहे. महाराष्ट्रातील क्लासेस संचालक म्हणजेच खाजगी शिक्षक यांच्या न्याय हक्कासाठी संघटना काम करत आहे. शालेय शिक्षण व्यवस्था कमकुवत पडत असताना शिक्षकांसह विद्यार्थ्याच्या हितासाठीही संघटना कार्यरत असुन अनेक डॉक्टर, वकील, इंजिनियर घडवण्यात याच क्लासेसचा वाटा आहे. या पार्श्वभूमीवर या क्षेत्राच्या विकासासंदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार करूनही दखल घेतली गेली नसल्याने कोचिंग क्लासेस संघटना संतप्त झाल्या आहेत. या राज्यात केवळ  सुशिक्षित पदवीधर निर्माण होत आहेत परंतु त्यांच्या रोजगाराबाबत कोणीही बोलत नाही. पदवीधरांच्या समस्यांबाबतही कोणताही विचार केला जात नाही. पदवीधरांना केवळ गृहीत धरण्यात येते. यामुळे आता मतदार नोंदणी यशस्वी झाल्यानंतर संघटनेच्या वतीने तरुण उमेदवार म्हणून संगणक इंजिनियर अमोल गौतम जगताप हे कोचिंग क्लासेस संचालक संघटनेनेचे प्रतिनिधी म्हणून कोकण पदवीधर निवडणूक लढविणार असल्याचे सतिश देशमुख यांनी जाहीर  केले आहे.

नॅप फाऊंडेशनचे ९ जून रोजी ठाण्यात स्नेहसंमेलन

पालिवाल समाजातील ज्येष्ठ व्यक्ती आणि युवा उद्योजकांचा होणार सन्मान ठाणे: सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पालिवाल समाजातील ज्येष्ठ महनिय व्यक्तीचा तसेच समाजातील युवा उद्योजकांचा नॅप फाऊंडेशनच्या वतीने रविवार,  9 जून रोजी ठाण्यात सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती नॅप फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा निकीता पालिवाल यांनी दिली आहे. नॅप फाऊंडेशनच्या वतीने ठाणे शहरासह संपूर्ण भारतभर सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. महिला सक्षमीकरण्याच्या उद्देशाने महिलांना स्वयंरोजगार मिळावा या उदात्त हेतूने नॅप फाऊंडेशनच्या माध्यमातून आयुर्वेदिक प्रसाधने बनविण्यात येत आहेत. या उत्पादानांची विक्री फाऊंडेशनच्या माध्यमातून लवकरच संपूर्ण भारतभर केली जाणार आहे. शैक्षणिक, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रातही नॅप फाऊंडेशन कार्यरत आहे. 9 जून रोजी महेश भवन, कासारवडवली येथे नॅप फाऊंडेशनच्या स्नेहसंमेलनाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या पालिवाल समाजातील ज्येष्ठ व्यक्तीचा तसेच भारतातील प्रमुख ८ राज्यातील युवा उद्योजकांचा सन्मान करण्यात येणार आहे.  आताच्या तरुण पिढीला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती निकीता पालिवाल यांनी दिली आहे. यावेळी महिलांनी उत्पादन केलेल्या आयुर्वेदिक प्रसाधनांचे प्रदर्शन मांडण्यात येणार असून विक्रीही करण्यात येणार आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपातर्फे निरंजन डावखरेंना उमेदवारी

ठाणे : विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपातर्फे विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाच्या नवी दिल्ली येथील मुख्यालयातून राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांच्याकडून प्रसिद्धीपत्रकान्वये निरंजन डावखरेंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात उमेदवारी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आमदार निरंजन डावखरे यांनी आभार मानले आहेत. तसेच भाजपाचे कोकणातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवेन, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. आमदार निरंजन डावखरे यांच्याकडून २०१२ पासून कोकण पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले जात आहे. ते यंदा सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढवित आहेत. महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून बेरोजगार पदवीधरांना नोकरीबरोबरच कोकणातील सामान्य नागरिकांसाठी आरोग्य, रस्ते आदींसह पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आमदार डावखरे यांनी प्रयत्न केले आहेत. तसेच कोकणात शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळांमध्ये डिजिटल साहित्य व प्रयोगशाळांची निर्मिती केली आहे. जनतेशी थेट संपर्क, प्रत्येक प्रश्नाची खोलात जाऊन घेतलेली माहिती, कार्यकर्ते व अधिकाऱ्यांशी संवाद ही त्यांच्या कामाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

महिलांची एकेरी विकेट क्रिकेट स्पर्धा

इरा जाधवला विजेतेपद ठाणे : इरा जाधवने अंजु सिंगचा सहज पराभव करत शतकपूर्ती करणाऱ्या स्पोर्टींग क्लब कमिटी आयोजित मुंबई क्रिकेट संघटनेच्या कार्यक्षेत्रातील एकमेव महिलांच्या एकेरी विकेट क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद संपादन…

भाजप कार्यकर्त्यावर हल्ला

एकला अटक उल्हासनगर  :  बांधकाम व्यवसायात  सलग्न असलेल्या भाजपा कार्यकर्त्या वर खंडणी साठी जीवघेणा हल्ला करणाऱ्या निलेश सरोजा याला पोलिसांनी रात्री उशिरा अटक करून गजाआड केले  आहे. भाजप कार्यकर्त्यावर झालेला हल्ला ही  संपूर्ण घटना…

पुनर्विकासाच्या नावाखाली फसवणूक करण्याऱ्या विकासकांच्या कामांवर टाच आणणार

संजय केळकर यांचे आश्वासन अनिल ठाणेकर ठाणे : पुनर्विकासाच्या नावाखाली कुटुंबांची अशा फसवणूक करण्याऱ्या विकासकांची जिथे जिथे कामे सुरु असतील त्यावर टाच आणली पाहिजे. हे मोकाट सुटले तर पुनर्विकासाच्या नावाखाली अजून सामान्य कुटुंबांना.  या फसवणूक झालेल्या कुटुंबांना बरोबर घेऊन त्यांना मुदतीत न्याय मिळावा याकरिता मला जे जे म्हणून करावे लागेल ते मी करेन असे आ. संजय केळकर यांनी सांगितले. पुनर्विकास मध्ये फसवणूक झालेल्या १६ सोसायट्यांतील २०० सभासदांनी रविवारी ठाण्यातील घंटाळी सहयोग मंदिर हॉल येथे आक्रोश बैठक घेतली. यावेळी त्यांनी आमदार संजय केळकर यांना निमंत्रित केले होते. यावेळी विद्याधार वैशंपायन, ॲड. सुभाष काळे, माजी नगरसेवक सुनेश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. या आक्रोश बैठकीत फसवणूक झालेल्या सदस्यांनी आपली मते मांडली. आमची घोर फसवणूक जोशी एंटरप्रायझेस च्या विकासकांनी केली आहे. आमची घराची स्वप्ने त्यांनी धुळीस मिळवली आहेत. वर्ष भर भाडेपण नाही. २०२३ ला आम्हाला भाडे दिले तेही आम्ही सतत तगाद लावल्यामुळे आम्हाला मिळाले. आ. केळकर यांनी पाठबळ दिल्यामुळे आमच्या लढाईला मोठ बळ मिळाले असून आम्ही एकत्रित हा लढा आ. केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली देणार असल्याचे या सदस्यांनी सांगितले. यावेळी या फसवणूक झालेल्या सदस्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची चिड व आक्रोश दिसत होता.  यावेळी आ. केळकर यांनी फसवणूक झालेल्या कुटुंबासोबत शेवट पर्यंत उभे राहून न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या बैठकीत १६ सोसायटयांचे जवळ जवळ २०० सभासद उपस्थित होते. जोशी इंटरप्राझेस च्या कळके आणी त्यांच्या भागीदारांनी शेकडो कुटुंबांची जाणून बुजून फसवणूक केली आहे. अनेकांनी आपली साठवलेली पुंजी मधून घरे घेतली होती. पण या फसवणुकीमुळे ही कुटुंबे आपल्या हक्काच्या घरांपासून वंचित आहेत.

सीएनजी एसटी चालकांना उष्म्याच्या धोका

ठाणे : प्रदूषणाला आळा घालता यावा, यासाठी ठाण्यातील खोपट एसटी आगाराने डिझेलवर चालणाऱ्या सुमारे ३० गाड्यांचे सीएनजीवर चालणाऱ्या गाड्यांमध्ये रूपांतर केले आहे; मात्र असे करताना संबंधित कंपनीने गाडीचालकांच्या जीविताची कोणतीही काळजी घेतलेली दिसत नाही. चालक बसत असलेल्या केबिनच्या खिडक्या कायमच्या बंद केल्याने बाहेरील वारा आत येणे बंद झाले आहे. केबिनमध्ये मोठ्या प्रमाणात इंजिनची गरम हवा जमा होत आहे. भरधाव गाडी सुरू असताना चालकाला उष्माघात झाल्यास गाडीतील प्रवाशांच्या जीवितालाही धोका पोहचणार आहे. अनेक संकटांचा सामना करणाऱ्या एसटीचालक आणि प्रवाशांच्या संकटात आणखी एका संकटाची भर पडली आहे. प्रदूषण टाळण्याच्या हेतून एसटी महामंडळाने डिझेलच्या गाड्यांचे सीएनजीत रूपांतर करण्याचे धोरण अवलंबले आहे. या धोरणानुसार ठाण्यातील खोपट एसटी आगाराच्या सुमारे ३० डिझेल गाड्यांचे सीएनजीवर चालणाऱ्या गाड्यांमध्ये रूपांतर केले आहे; मात्र असे करताना संबंधित कंपनीने चालकाच्या केबिनमध्ये उजव्या बाजूला असलेल्या मूळ खिडक्यांच्या काचा कायमच्या बंद केल्या आहेत. त्यामुळे गाडी धावतानाही चालकाच्या केबिनमध्ये बाहेरील वारा आत येत नाही. शिवाय केबिनमध्ये इंजिनमुळे प्रचंड प्रमाणात गरम होते. गेल्या महिन्यात केबिनमधील गरम हवा सहन न झाल्याने एका चालकाला चक्कर आल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले. या चालकाने वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने मोठी दुर्घटना टळली. परंतु अशा प्रसंगानंतरही आगार व्यवस्थापकाकडून कोणत्याही प्रकारचे पाऊल उचलले नसल्याचे येथील काही चालकांनी सांगितले. चालकांच्या दुर्दैवाने अशा गाड्या ४००-५०० किलोमीटरपर्यंत लांब पाठवल्या जात आहेत. त्यामुळे चालकासोबतच गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्याही जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. सीएनजी गाड्यांमधून रूपांतर करण्यात आलेल्या गाड्यांची दुरुस्ती करणेही अवघड झाले आहे. गेल्या महिन्यात एका चालकाला केबिनमधील उष्ण हवेमुळे उष्माघाताचा त्रास झाला. त्याला चक्कर आल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले. सीएनजी गाड्या चालवताना खूप गरम होते. बाहेरील हवा आत येत नाही. पूर्वीच्या डिझेल गाड्यांच्या खिडकीच्या काचा उघडता बंद करता येत होत्या. परंतु आता त्या कायमच्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या गाड्या चालवणे फारच कठीण झाले आहे. – चालक, खोपट आगार डिझेल गाड्यांमध्ये बदल करून सीएनजी गाड्यात रूपांतर करण्यात आलेल्या अशा प्रकारच्या २०० गाड्या ठाणे जिल्ह्यात आहेत. गाडीच्या खिडक्या उघडत नसल्याने त्रास होतोय अशी कोणत्याही चालकाची तक्रार आलेली नाही अथवा कोणाला चक्कर आल्याची माहिती नाही. – विलास राठोड, विभाग नियंत्रक, ठाणे

मुक्‍या प्राण्यांचे शोषण थांबवा

जुहू किनाऱ्यावर दुग्ध उद्योगाविरोधात निदर्शने मालाड-  जागतिक दूध दिनानिमित्त प्राण्यांच्या हक्‍कासाठी कार्यरत असलेल्‍या ‘युनायटेड फॉर कम्पॅशन इंटरनॅशनल फाऊंडेशन’कडून जुहू समुद्रकिनाऱ्यावर दुग्‍ध उद्योगांविरोधात निदर्शने करण्यात आली. मुक्‍या प्राण्यांचे शोषण थांबवा, अशी…

उन्हाचा तडाखा अजून कमी होण्याचे चिन्ह दिसत नाही उलट वाढतच जात आहे याचा फटका पशू पक्षांना देखील बसताना दिसत आहे ठाणे गावदेवी येथे अशाच एका कॉपर्स स्मित बारबेट पक्षाला उष्माघाताचा त्रास होऊन पक्षी रस्तावर पडला होता पक्षी मित्रांनी या पक्षाला उचलून पाणी पाजून जीवदान दिले … फोटो प्रफुल गांगुर्डे