Category: ठाणे

Thane news

नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी कल्याण शहरात वाहतुक बदल

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आधारवाडी भागातील मैदानात होणार आहे. या सभेनिमित्ताने शहरातील अंतर्गत मार्गांवर वाहतुक बदल लागू करण्यात आले आहेत. हे वाहतुक बदल बुधवारी दिवसभर लागू असतील. त्यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गांवर कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. आधारवाडी चौक सिग्नल ते गांधारी पूल, बापगाव मार्गावर प्रवेशबंदी असेल. येथील वाहने वाडेघर चौक, वाडेघर गाव, काशी दर्शन येथून निलकंठ सृष्टी गृहसंकुल मार्ग, रोनक सिटी, मुथा महाविद्यालय, वेदांत रुग्णालय मार्गे वाहतुक करतील. गांधारी चौक ते भट्टी चहा येथील संपूर्ण रस्त्यावर प्रवेशबंदी असेल. येथील वाहने भट्टी चहा, थारवानी इमारत, झुलेलाल चौक, गोदरेज हिल बारावेगाव मार्गे वाहतुक करतील. ऋतू इमारतीपुढील मार्गावर प्रवेशबंदी असेल. येथील वाहने ऋतू इमारत, वेदांत रुग्णालय, मुथा महाविद्यालय, जलकुंभ येथून वाहतुक करतील. डी. मार्ट येथून अग्रवाल महाविद्यालय, मातोश्री रुग्णालयाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद असेल. वाहने डी. मार्ट ते वसंत व्हॅली वायलेनगर मार्गे वाहतुक करतील. महाराजा अग्रसेन चौक येथून हिना गार्डन, तुलसीपुजा चौक, कस्तुरी पार्क, गणपती चौककडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी असेल. येथील वाहने महाराजा अग्रसेन चौक, वायलेनगर येथून खडकपाडा ते दुर्गाडी मुख्य वाहिनी मार्गे वाहतुक करतील. डी. बी. चौक ते गणपती चौक, निक्कीनगर मार्गावर प्रवेश बंदी असेल. ही वाहने डी. बी. चौक ते ओम रेसीडन्सी येथून, निलकंठ सृष्टी सोसायटी, काशी दर्शन इमारत मार्गे , वाडेघर गाव वाडेघर चौक मार्गे जातील. आधारवाडी सिग्नल चौक ते आधारवाडी कारागृह, डी बी चौक रस्त्यावर वाहनांस प्रवेश बंद करण्यात येईल. येथील वाहतुक वाडेघर चौक, हनुमान मंदीर वाडेघर, काशी दर्शन इमारत, समर्थ कृपा गॅरेज, निलकंठ सृष्टी, ओम रेसीडन्सी समोरून जातील. वायलेनगर पोलीस चौकी येथून आधारवाडी कारागृहाच्या दिशेने वाहतु करणाऱ्या वाहनांना या मार्गावर प्रवेश बंदी असेल. येथील वाहने वायलेनगर पोलीस चौकी ते वायलेनगर चौक येथून दुर्गाडी ते खडकपाडा मुख्य वाहिनी मार्गे जातील. क्रोमा शो-रुम येथून हरिश्चंद्र गायकर निवास, आधारवाडी चौक, रिलायन्स मार्ट, वायलेनगरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी असेल. येथील वाहने वायलेनगर, खडकपाडा चौक मार्गे वाहतुक करतील.

निलिमा भडगावकर चमकल्या

ठाणे : ठाण्यातील योग प्रशिक्षक आणि फिजिकल ट्रेनर निलीमा भडगावकर यांनी नुकत्याच संपलेल्या ४३ व्या राष्ट्रीय मास्टर्स अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत चमकदार कामगीरी साधली आहे. मास्टर्स अॅथलेटिक्स ऑफ महाराष्ट्र आयोजित या…

मुंबईला जोडण्यासाठी भिवंडीहून लोकल ट्रेन सुरू करणार..

राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे जाहीरनाम्यात आश्वासन भिवंडी: राष्ट्रवादीचे (सपा) भिवंडीतील लोकसभा उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाल्या मामा यांनी सोमवारी त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील निवडणूक जाहीरनाम्याचे अनावरण केले ज्यात त्यांनी भिवंडी ते मुंबई लोकल ट्रेनने भिवंडी स्टेशन रोडवरून थेट लोकल ट्रेन सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. रेल्वे स्टेशन ते मुंबई, भिवंडीतील वाढत्या गोदाम उद्योगाच्या अनुषंगाने पायाभूत सुविधांवर काम करणे आणि विविध उपाययोजना करून भिवंडीतील मरणासन्न यंत्रमाग उद्योग वाचविण्याचे आश्वासन दिले . म्हात्रे यांचा जाहीरनामा प्रामुख्याने भिवंडी लोकसभेवर केंद्रित आहे ज्यात भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम आणि भिवंडी ग्रामीण या सहा विधानसभांपैकी तीन विधानसभा आहेत. यंत्रमाग उद्योगाशी निगडित लोकांना आकर्षित करण्यासाठी जाहीरनाम्यात जे खाजगी वीज पुरवठा कंपनीवर नेहमीच नाराज असतात, त्यांनी दावा केला की तो जिंकल्यानंतर तो टोरेंट पॉवर कंपनी भिवंडीतून काढून टाकेल आणि आणखी चांगली सेवा देण्यासाठी आणखी काही कंपनी आणण्याचा प्रयत्न करेल. तसेच रिंगरोड, काँक्रीट रस्ता आणि आवश्यक मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण करून शहरातील वाहतूक कमी करण्याचे आश्वासन दिले. भिवंडीला ठाणे आणि कल्याणशी जोडण्यासाठी मेट्रोचे काम वेगाने पूर्ण करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले असून त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. म्हात्रे हे भिवंडी मतदारसंघातून दोन वेळा खासदार राहिलेले केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या विरोधात तर तिसऱ्यांदा या जागेवर निवडणूक लढवत आहेत.

मुलीच्या नातेवाइकांनी लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने नराधमाने केले वार

कल्याण – अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने १४ वर्षीय मुलीच्या दोन नातेवाईकांवर चाकूहल्ला केल्याप्रकरणी कल्याण पोलिसांनी रविवारी २६ वर्षीय तरुणाला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर आरोपीने आत्महत्येचा…

आगरी कोंढरीपाडाचा मतदानावर बहिष्कार

उरण : दिनांक ६ में २०२३ रोजी उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत दद्दीतील आगरी कोंढरीपाडा येथे श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान मूर्तीची विटंबना झाली ही विटंबना गावात राहणाऱ्या भालचंद्र नारायण पाटील…

राज ठाकरेंच्या भाषणामुळे श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के यांच्या अडचणीत वाढ

अनिल ठाणेकर  ठाणे : कल्याण लोकसभेचे शिवसेना उमेदवार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभेचे शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के यांच्या संयुक्त प्रचारार्थ रविवारी कळवा येथील खारीगाव मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे…

पावसामुळे निवडणूक प्रचाराचे वेळापत्रक कोलमडले

भिवंडी : अवकाळी पावसामुळे भिवंडीत नागरिकांची एकच तारांबळ उडाली. तर निवडणूक प्रचाराचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले. पाऊस सुरू झाल्यानंतर वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरातील अनेक ठिकाणी अंधार पसरला होता. दुपारी तीन वाजता ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. तर ग्रामीण भागात हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे सर्वत्रच वातावरणात गारवा निर्माण झाला. कडक उन्हाळ्यात हैराण झाल्याने बच्चे कंपनीने मनसोक्तपणे पावसात भिजून पहिल्या पावसाचा आनंद लुटला. तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात वीटभट्टी मालकांसह आंबा बागायतदारांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, भिवंडी शहरातील काही भागात गारा पडल्याचेही पाहायला मिळाल्या. शेतकऱ्यांसह वीटभट्टी मालकांचे नुकसान झाले आहे. तर अचानक पाऊस सुरू झाल्याने शहरातील वीज गेल्याने शहरातील विविध भागात अंधार पसरला होता. यंत्रमाग कारखाने बंद झाल्याने कामगार वर्गदेखील पावसाचा गारवा अनुभवण्यासाठी बाहेर पडला.

शिक्षक, कोकण पदवीधर निवडणुकीसाठी आयोग सज्ज

एक लाख ७७ हजार मतदारांची नोंदणी, आयुक्‍त पी. वेलरासू यांनी दिली माहिती वाशी : निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर विधान परिषद मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. सोमवार, १० जून रोजी मतदान होणार आहे. मुंबई शिक्षक व पदवीधर, कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात एकूण एक लाख ७७ हजार ३२ मतदारांची नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती कोकण विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली आहे. या पत्रकार परिषदेत उपायुक्त विवेक गायकवाड, उपायुक्त अमोल यादव, कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे उपस्थित होते. निवडणूक आयोगाकडून निवडणुकीसाठी १५ मे रोजी अधिसूचना जारी होणार असल्‍याचे यावेळी सांगण्यात आले. बुधवार, २२ मे रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांनी अर्ज दाखल करणे, शुक्रवार, २४ मे रोजी अर्जाची छाननी करणे तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २७ मेपर्यंत राहणार आहे. १० जून रोजी सकाळी आठ ते सायंकाळी चार या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मुंबई शिक्षक-पदवीधर व कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी कोकण विभागीय आयुक्त हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहे. मुंबई शिक्षक व पदवीधर या दोन मतदारसंघांसाठी मुंबई शहर व मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी आणि कोकण विभागाचे उपायुक्त (सामान्य प्रशासन) हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील. कोकण पदवीधर मतदारसंघाकरिता ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी व कोकण विभागाचे उपायुक्त (सामान्य प्रशासन) हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी असतील, अशी माहिती आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली. मतदारांची संख्या वाढविण्यासाठी मतदार नोंदणी १२ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सदरचे अर्ज पदनिर्देशित ठिकाणी ऑनलाइन व ऑफलाइन स्वीकारले जातील. ऑनलाइनसाठी http://gterollregistration.mahait.org या लिंकचा वापर करा, असे कळविण्यात आले आहे. तालुकास्तरावर व्हिडीओग्राफी पथक तयार करण्यात आले आहे. चोवीस तास तक्रार निवारण कक्ष असणार आहे.

मतदान यंत्रे सीलबंद करण्याची प्रक्रिया सुरू

24 कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी लागणारी ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात ठाणे जिल्ह्यात 20 मे  रोजी मतदान होणार असून यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा तसेच निवडणूक यंत्रणा कार्यरत आहे. 24-कल्याण लोकसभा मतदारसंघाकरीता 1960 मतदान केंद्र असून, प्रत्येक मतदान केंद्रावर लागणारे ईव्हीएम मशीन, बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट मशीन्स सील करण्याची प्रक्रिया आज करण्यात आली. सदरची प्रक्रिया उद्या 14 मे 2024 रोजी व  आवश्यकता भासल्यास 15 मे रोजी सुरू राहणार आहे. केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) श्री.मनोज जैन यांनी समक्ष या प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी 24-कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते उपस्थित होत्या. सदरची प्रक्रिया ही उमेदवारांच्या राजकीय प्रतिनिधींसमक्ष करण्यात येत आहे.

टपाली मतदानाची सुविधा

अत्यावश्यक सेवेतील मतदारांसाठी 14 मे पासून ठाणे : भिवंडी लोकसभा मतदारसंघात नियुक्तीस असलेल्या अत्यावश्यक सेवेतील मतदार व निवडणूक कर्तव्यावर असलेले मतदार यांनी नमुना १२ डी भरून दिला आहे. त्यांचे मतदान पोस्टल वोटिंग सेंटर (पीव्हीसी) येथे तर त्या ज्यांनी नुमना 12 भरून दिला आहे, त्यांचे मतदान सुविधा केंद्र (एफ.सी) येथे होणार आहे. यासाठी भिवंडी लोकसभा मतदार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पोस्टल वोटिंग सेंटर व मतदान सुविधा केंद्र सुरू केले असून या मतदारांना दि. 14 ते 19 मे या कालावधीत मतदान करता येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली आहे. भारत निवडणूक आयोगाकडे यांच्याकडील  दिनांक 31 ऑक्टोबर 2023 परिपत्रकनुसार पोस्टल  वोटिंग व मतदान सुविधा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी 23  भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावरील या मतदारांच्या मतदानाच्या तारखा खालील प्रमाणे आहेत. पोस्टल वोटिंग सेंटर 138 कल्याण पश्चिम, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, मुंबई युनिव्हर्सिटी उपकेंद्र, वसंत व्हॅली रोड, खडकपाडा कल्याण पश्चिम येथे दिनांक 14, 15,16 मे रोजी सकाळी 9 ते 5 या दरम्यान मतदान होणार आहे. 23 भिवंडी लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, एस. टी.स्टँड समोर भिवंडी येथे दिनांक 17,18,19 मे रोजी सकाळी 9 ते 5 या दरम्यान मतदान केंद्र सुविधा केंद्रात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. अत्यावश्यक सेवेतील मतदार, निवडणूक कर्तव्यावर असलेले मतदारांनी या मतदान सुविधा केंद्रामध्ये मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी केले आहे. ठाणे : भारत  निवडणूक आयोगाने अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 25- ठाणे लोकसभा मतदारसंघातील अत्यावश्यक सेवेत असलेल्या तसेच निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना दि. 14 मे 2024 ते 19 मे 2024 या कालावधीत टपाली मतदान करुन आपला मतदानाचा हक्क बजावता येणार असल्याची माहिती 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये- धुळे यांनी दिली. नोंदणीकृत मतदार- पोलीस दलातील अधिकारी/कर्मचारी,अग्निशमन दल, वैद्यकीय सेवेतील कर्मचारी यांच्यापैकी ज्यांनी विहित मुदतीत टपाली मतपत्रिकेसाठी नमुना 12 ड भरुन दिला आहे, त्यांचे टपाली मतदान दि. 14 मे 2024, दि. 15 मे 2024 व दि. 16 मे 2024 या कालावधीत “प्रशिक्षण केंद्र, जिल्हा विकास उद्योजक केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, कोर्ट नाका, ठाणे प 400601 येथे सकाळी 9 ते सायं. 5 या वेळेत होणार आहे. तसेच ‍निवडणूक कामी कर्तव्यावर असलेले व अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचारी ज्यांनी नमुना 12 भरुन दिला आहे, अशा कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान दि. 17 मे 2024,‍ दि. 18 मे 2024 व  दि. 19 मे 2024 या दिवशी प्रशिक्षण केंद्र, जिल्हा विकास उद्योजक केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, कोर्ट नाका, ठाणे प. – 400601 येथे  सकाळी 9 ते सायं. 5 वाजेपर्यंत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तरी मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त झालेले अत्यावश्यक सेवेतील अधिकारी/कर्मचारी यांनी आपले मत नोंदवून आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन 25- ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये-धुळे  यांनी केले आहे.