Category: ठाणे

Thane news

तळोजामधील गृहसंकुलाचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

खारघर : तळोजा घोट कॅम्पमधील अरिहंत अनायिका सोसायटीमध्ये गेल्या पाच वर्षांपासून पाणी समस्या आहे. पाणी समस्यांविषयी सिडको आणि पनवेल महापालिकेकडे पत्रव्यवहार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे सोसायटीमधील मतदारांनी लोकसभा…

ठाणे परिसरात बेकायदा बांधकामांचे पेव

ठाणे : ठाणे पालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यात या अनधिकृत बांधकामांवरून पालिका प्रशासनावर होणारी टीका टाळण्यासाठी प्रशासनाकडून या बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. असे असताना देखील…

घोडबंदर घाटात रस्त्याचे काम रखडले

ठाणे : मुंबईहून ठाणेमार्गे वसई विरार, गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर मार्गावर नागमोडी घाट रस्ते आहेत. त्यामुळे घाटात अनेकदा वाहने बंद पडणे, तसेच पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे पडणाऱ्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीत भर…

‘…मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?’

जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल ठाणे : अजित पवार आता सगळ्यांना डोस देत सुटलेत, तुला पाडीन, तुला पाडीन करतायेत, मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही? लोकशाहीत एवढा माज कसला…

‘नाराज होऊ नका, मोदींसाठी निवडणुकीचे काम करा’

भाजपचे राष्ट्रीय संघटनमंत्री बी.एल.संतोष यांचा ठाण्यातील पदाधिकाऱ्यांना संदेश ठाणे : ठाण्यातील जागेवरून भाजपमधील काही नेत्यांसह पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा असतानाच, भाजपचे राष्ट्रीय संघटनमंत्री बी.एल.संतोष यांनी शनिवारी ठाण्यातील प्रमुख नेत्यांसह पदाधिकाऱ्यांची…

१२८ वर्षांच्या नुसी  संघटनेचा स्थापना दिवस संपन्न

ठाणे : ब्रिटिशांच्या काळात ९ मे १८९६ रोजी  मोहम्मद इब्राहिम सारंग यांनी जहाजावरील नाविक  कामगारांना संघटित करून त्यांच्या न्याय हक्कासाठी नॅशनल सिफेरर्स ऑफ इंडिया या संघटनेची स्थापना केली. गेली १२८ …

मतदान जनजागृतीसाठी ठाण्यात ‘रन फॉर वोट’ या ‍ मिनी मॅरेथॉनचे आयोजन

युवकांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होवून मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे -‍  अशोक शिनगारे ठाणे : लोकसभा निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढावा व जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे यासाठी ठाणे शहरात आयोजित…

वागळे इस्टेट येथील चर्चमध्ये स्वीपने केली मतदानाबाबत जनजागृती

ठाणे : ठाणे  लोकसभा  मतदारसंघातील 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील  वागळे इस्टेट परिसरातील डिसोझावाडी  येथील चर्चमध्ये ख्रिश्चन बांधवांची प्रार्थना झाल्यावर स्वीप पथकाने उपस्थितांना 20 मे रोजी मतदान करण्याचे आवाहन केले. मतदान करुन लोकशाही बळकट करा.. मतदानाचा आपला हक्क बजावा.. तुमचे मत खरा लोकशाहीचा आधार..,   असे आवाहन यावेळी ख्रिस्ती बांधव मतदारांमध्ये करण्यात आले. यावेळी उपस्थितांनीही स्वीप पथकाच्या माध्यमातून सुरू असलेल्या मतदान जनजागृतीमध्ये सहभाग घेत आम्ही मतदान करणारंच असा विश्वास दिला.  जे प्रथमच मतदान करणार आहेत, अशा तरुणांमध्ये देखील स्वीपच्या पथकाने मतदान करण्याचे आवाहन केले. नागरिकांनी देखील या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सदर प्रसंगी स्विप टिमचे श्री राजेन्द्र परदेशी सर, श्री अनंता सोनावळे, श्री सिताराम परब, श्री नैनेश भालेराव, श्री रोहित चेटोले, श्री अविनाश सावंत उपस्थित होते.

मासळी विक्रेत्यांमध्येही स्वीप पथकाने केली मतदानाबाबत जनजागृती

ठाणे : ठाणे लोकसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्वीपच्या माध्यमातून शहरात सर्वत्र मतदान जनजागृती करण्यात येत आहे. 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा अंतर्गत लोकमान्यनगर येथील पडवळ नगर व इंदिरानगर येथील मासळी बाजारातील मासळी विक्रेत्यांमध्ये मतदानाबाबत नुकतीच जनजागृती करण्यात आली. मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून मतदानाचा अधिकार हा प्रत्येकाने बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे. 20 मे 2024 ही मतदानाची तारीख लक्षात ठेवून आपले राष्ट्रीय हक्क बजावा असे आवाहन यावेळी मासळी विक्रेत्यांना करण्यात आले. पडवळ नगर व इंदिरानगर येथील मासळी बाजारातील विक्रेत्यांनीही मी मतदान करणार अशा घोषणा दिल्या. मतदार राजा जागा हो… लोकशाहीचा धागा हो.. अशी जनजागृती स्वीपच्या माध्यमातून करण्यात आली. यावेळी स्विप टिमचे सहकारी श्री.राजेंद्र परदेशी श्री.रोहीत चेटोले , श्री.अनंत सोनावळे, श्री.अविनाश सावंत, श्री.सिताराम परब व श्री.नैनेश भालेराव उपस्थित होते.

मतदान यंत्रे सीलबंद करण्याची प्रक्रिया सुरू

25 ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी लागणारी ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात ठाणे जिल्ह्यात 20 मे 2024 रोजी मतदान होणार असून यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा तयारी तरत आहे. 25 ठाणे लोकसभा…