Category: ठाणे

Thane news

कल्याण लोकससभा मतदारसंघातील निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांनी केले टपाली मतदान

ठाणे :निवडणूक कर्तव्यावर असलेले परंतु ज्यांचे मतदान कार्यक्षेत्राबाहेर असलेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी आज टपाली मतदानाची सुविधा 24 कल्याण लोकसभा मतदारसंघ अंतर्गत सर्व 6 विधानसभा मतदारसंघ निहाय करण्यात आली होती. यावेळी 24 कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान करुन आपला मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीच्या कामासाठी कर्तव्यावर असलेल्या व सध्या नेमणूक असलेल्या क्षेत्राबाहेर राहणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील तसेच निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी,कर्मचारी यांनी टपाली मतदान केले. यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे उपस्थित होते. 24 कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले कलामंदिर येथे तर 143- डोंबिवली सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली परदेशी यांनी कल्याण येथील विष्णुदास भावे कलामंदिर येथे टपाली मतदान केले. तर 144-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे सहा.निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांनी देखील टपाली मतदान केले. त्याचप्रमाणे शासकीय अधिकाऱ्यांबरोबरच निवडणूक कर्तव्यावरील आणि 24 कल्याण लोकसभा मतदारसंघ क्षेत्राबाहेर मतदार असलेल्या 564 अधिकारी/ कर्मचारी वर्गाने टपाली मतदानाद्वारे (postal ballate) आपल्या मतदानाचा हक्क काल बजावला. अत्यावश्यक सेवेत असलेल्या, 24-कल्याण लोकसभा मतदार संघातील नोंदणीकृत मतदार-पोलीस दलातील अधिकारी/कर्मचारी, अग्निशमन दल, वैदयकीय सेवेतील कर्मचारी यांच्यापैकी ज्यांनी विहित मुदतीत टपाली मतपत्रिकेसाठी नमुना 12 /12 ड व EDC  कार्यप्रमाण पत्राकरीता नमुना 12 अ मध्ये अर्ज केला होता व जे कर्मचारी तपासणीअंती पात्र ठरले आहेत अशा 12 अ च्या पात्र कर्मचाऱ्यांना EDC  प्रमाणपत्र वितरण करणे,  तसेच नमुना 12 / नमुना 12 ड भरलेल्या आणि पात्र ठरलेल्या मतदारांना टपाली मतपत्रिका वितरीत करुन, टपाली मतपत्रिकांच्या मतदानाकरीता निवडणूक निर्णय अधिकारी, 24- कल्याण लोकसभा मतदार संघ यांच्या स्तरावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानुसार या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मतदान केले. 24 कल्याण लोकसभा मतदारसंघ परिक्षेत्राबाहेरील निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी/ कर्मचाऱ्यांसाठी ही सुविधा दि 17 मे व 18 मे 2024 रोजी देखील उपलब्ध राहणार आहे.

कल्याण मोमीस समूहाने बाईक रॅलीच्या माध्यमातून केली मतदान जनजागृती

ठाणे : कल्याण पश्चिम मतदारसंघात कल्याण मोमीस समूहातर्फे मतदार जनजागृतीकरिता बाईक रॅली काढण्यात आली होती. या बाईक रॅलीत नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. आम्ही नक्की मतदान करणार असा संदेश या…

मतदानासाठी २० मे रोजी भरपगारी सुट्टी – अशोक शिनगारे

ठाणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यात २० मे  रोजी मतदान होणार आहे. प्रत्येक मतदाराला मतदार करता यावे यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम १३५ ब नुसार भरपगारी रजा देय असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले आहेत. या आदेशात म्हटले आहे की, ठाणे जिल्ह्यात २३ भिवंडी, २४ कल्याण आणि २५ ठाणे लोकसभा मतदार संघ आहेत. या तीनही मतदार संघात पाचव्या टप्प्यात सोमवार २० मे रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघांच्या मतदार यादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे, यासाठी अशा सर्व मतदारांना लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम १३५ ब नुसार भरपगारी रजा देय आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व आस्थापना प्रमुखांना त्यांच्या अधिपत्याखालील सर्व अधिकारी /कर्मचारी /रोजंदारी कर्मचारी यांना सोमवार दि. २० मे रोजी भरपगारी रजा मंजूर करण्याचे आदेश शर्ती/अटीस अधीन राहून देय आहे. १.  सदर आदेश हा शासकीय आस्थापना/खासगी आस्थापना/रोजंदारीवरील कर्मचारी आस्थापना/दुकाने/कंपनी/अशा सर्व आस्थापनांना लागू आहे. २. ज्या आस्थापनांमध्ये उक्त कामगारांचे अनुपस्थितीमुळे उक्त आस्थापनांना धोका निर्माण होऊ शकतो अथवा मोठ्या प्रमाणात तोटा होऊ शकतो अशा कर्मचाऱ्यांसाठी लागू नाही. ३. सदर आदेशाचे पालन न करणाऱ्या आस्थापना प्रमुख हे उक्त कलमाचे १३५ ब (२) नुसार कारवाईस पात्र राहतील. ४. हा आदेश हा अन्य जिल्ह्यात काम करणाऱ्या परंतु ठाणे जिल्ह्याच्या क्षेत्रातील मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांच्या आस्थापना प्रमुखांनाही लागू होत आहे, असेही आदेशात म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींचे ठाकरेंवरील वक्तव्य निषेधार्ह – बैरीशेट्टी

अनिल ठाणेकर  ठाणे : शिवसेना  उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका भाषणात केलेले वक्तव्य हे अतिशय खालच्या पातळीचे असून निषेधार्ह आहे असे मत…

मतदान जनजागृतीसाठी हिरानंदानी  परीसरात मतदार जोडो पदयात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे : ठाणे, लोकशाही बळकटीकरणामध्ये मतदारांचा सक्रिय सहभाग असणे अत्यंत आवश्यक असून प्रत्येक मतदाराने मतदान करावे यासाठी शुक्रवारी ठाणे शहरातील हिरानंदानी इस्टेट परिसरात मतदार जोडो पदयात्राचे आयोजन करण्यात आले होते.…

नैसर्गिक आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांमधील समन्वयासाठी

महापालिका, पोलीस, महावितरण यांचा एकत्रित नियंत्रण कक्ष १ जूनपासून कार्यान्वित होणार – आयुक्त सौरभ राव ठाणे,  नैसर्गिक आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांमधील समन्वय उत्तम असावा यासाठी महापालिका, पोलीस आणि महावितरण यांचा…

श्री मावळी मंडळ आयोजित ७१ व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत

महिला गटात शिवशक्ती महिला संघ (मुंबई शहर) विजयी तर पुरुष गटात स्वस्तिक क्रीडा मंडळ (मुंबई उपनगर) सलग दुसऱ्यांदा विजयी अनिल ठाणेकर ठाणे : श्री मावळी मंडळ आयोजित ९९ व्या शिवजयंतीउत्सवानिमित्त…

प्रांजल, प्रतीक्षा, तन्वी, कनिष्का, आर्या चमकल्या

ठाणे  : प्रांजल मळेकर आणि प्रतीक्षा पोवारची शतकी भागीदारी  त्यानंतर तन्वी चव्हाण, कनिष्का सोलासे, आर्या कानडेच्या संतुलित गोलंदाजीमुळे स्पोर्टींग क्लब कमिटीने यंग मेन्स क्रिकेट क्लबचा १३१ धावांनी पराभव करत मुंबई…

 डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या प्रचाराचा धडाका सुरू!

अंबरनाथ, उल्हासनगर आणि दिव्यातील रॅलीला कार्यकर्त्यांसह नागरिकांचा तुफान प्रतिसाद डोंबिवली : कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे. एकीकडे वैयक्तिक भेटीगाठींवर भर देण्यात…

उल्हासनगरात धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण सुरू

उल्हासनगर : उल्हासनगर मनपा क्षेत्रातील धोकादायक इमारतींविरुध्द पावसाळ्यापूर्वी पाहणी करुन नियमानुसार कारवाई करण्यात येत असते. शहरात पावसाळ्यात इमारत कोसळून दुर्घटना होऊ नये यासाठी शहरातील ज्या इमारती सकृतदर्शनी धोकादायक दिसून येत…