आगरी कोंढरीपाडाचा मतदानावर बहिष्कार
उरण : दिनांक ६ में २०२३ रोजी उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत दद्दीतील आगरी कोंढरीपाडा येथे श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान मूर्तीची विटंबना झाली ही विटंबना गावात राहणाऱ्या भालचंद्र नारायण पाटील…
Thane news
उरण : दिनांक ६ में २०२३ रोजी उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत दद्दीतील आगरी कोंढरीपाडा येथे श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान मूर्तीची विटंबना झाली ही विटंबना गावात राहणाऱ्या भालचंद्र नारायण पाटील…
अनिल ठाणेकर ठाणे : कल्याण लोकसभेचे शिवसेना उमेदवार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभेचे शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के यांच्या संयुक्त प्रचारार्थ रविवारी कळवा येथील खारीगाव मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे…
भिवंडी : अवकाळी पावसामुळे भिवंडीत नागरिकांची एकच तारांबळ उडाली. तर निवडणूक प्रचाराचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले. पाऊस सुरू झाल्यानंतर वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरातील अनेक ठिकाणी अंधार पसरला होता. दुपारी तीन वाजता ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. तर ग्रामीण भागात हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे सर्वत्रच वातावरणात गारवा निर्माण झाला. कडक उन्हाळ्यात हैराण झाल्याने बच्चे कंपनीने मनसोक्तपणे पावसात भिजून पहिल्या पावसाचा आनंद लुटला. तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात वीटभट्टी मालकांसह आंबा बागायतदारांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, भिवंडी शहरातील काही भागात गारा पडल्याचेही पाहायला मिळाल्या. शेतकऱ्यांसह वीटभट्टी मालकांचे नुकसान झाले आहे. तर अचानक पाऊस सुरू झाल्याने शहरातील वीज गेल्याने शहरातील विविध भागात अंधार पसरला होता. यंत्रमाग कारखाने बंद झाल्याने कामगार वर्गदेखील पावसाचा गारवा अनुभवण्यासाठी बाहेर पडला.
एक लाख ७७ हजार मतदारांची नोंदणी, आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली माहिती वाशी : निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर विधान परिषद मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. सोमवार, १० जून रोजी मतदान होणार आहे. मुंबई शिक्षक व पदवीधर, कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात एकूण एक लाख ७७ हजार ३२ मतदारांची नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती कोकण विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली आहे. या पत्रकार परिषदेत उपायुक्त विवेक गायकवाड, उपायुक्त अमोल यादव, कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे उपस्थित होते. निवडणूक आयोगाकडून निवडणुकीसाठी १५ मे रोजी अधिसूचना जारी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बुधवार, २२ मे रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांनी अर्ज दाखल करणे, शुक्रवार, २४ मे रोजी अर्जाची छाननी करणे तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २७ मेपर्यंत राहणार आहे. १० जून रोजी सकाळी आठ ते सायंकाळी चार या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मुंबई शिक्षक-पदवीधर व कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी कोकण विभागीय आयुक्त हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहे. मुंबई शिक्षक व पदवीधर या दोन मतदारसंघांसाठी मुंबई शहर व मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी आणि कोकण विभागाचे उपायुक्त (सामान्य प्रशासन) हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील. कोकण पदवीधर मतदारसंघाकरिता ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी व कोकण विभागाचे उपायुक्त (सामान्य प्रशासन) हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी असतील, अशी माहिती आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली. मतदारांची संख्या वाढविण्यासाठी मतदार नोंदणी १२ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सदरचे अर्ज पदनिर्देशित ठिकाणी ऑनलाइन व ऑफलाइन स्वीकारले जातील. ऑनलाइनसाठी http://gterollregistration.mahait.org या लिंकचा वापर करा, असे कळविण्यात आले आहे. तालुकास्तरावर व्हिडीओग्राफी पथक तयार करण्यात आले आहे. चोवीस तास तक्रार निवारण कक्ष असणार आहे.
24 कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी लागणारी ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात ठाणे जिल्ह्यात 20 मे रोजी मतदान होणार असून यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा तसेच निवडणूक यंत्रणा कार्यरत आहे. 24-कल्याण लोकसभा मतदारसंघाकरीता 1960 मतदान केंद्र असून, प्रत्येक मतदान केंद्रावर लागणारे ईव्हीएम मशीन, बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट मशीन्स सील करण्याची प्रक्रिया आज करण्यात आली. सदरची प्रक्रिया उद्या 14 मे 2024 रोजी व आवश्यकता भासल्यास 15 मे रोजी सुरू राहणार आहे. केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) श्री.मनोज जैन यांनी समक्ष या प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी 24-कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते उपस्थित होत्या. सदरची प्रक्रिया ही उमेदवारांच्या राजकीय प्रतिनिधींसमक्ष करण्यात येत आहे.
अत्यावश्यक सेवेतील मतदारांसाठी 14 मे पासून ठाणे : भिवंडी लोकसभा मतदारसंघात नियुक्तीस असलेल्या अत्यावश्यक सेवेतील मतदार व निवडणूक कर्तव्यावर असलेले मतदार यांनी नमुना १२ डी भरून दिला आहे. त्यांचे मतदान पोस्टल वोटिंग सेंटर (पीव्हीसी) येथे तर त्या ज्यांनी नुमना 12 भरून दिला आहे, त्यांचे मतदान सुविधा केंद्र (एफ.सी) येथे होणार आहे. यासाठी भिवंडी लोकसभा मतदार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पोस्टल वोटिंग सेंटर व मतदान सुविधा केंद्र सुरू केले असून या मतदारांना दि. 14 ते 19 मे या कालावधीत मतदान करता येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली आहे. भारत निवडणूक आयोगाकडे यांच्याकडील दिनांक 31 ऑक्टोबर 2023 परिपत्रकनुसार पोस्टल वोटिंग व मतदान सुविधा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावरील या मतदारांच्या मतदानाच्या तारखा खालील प्रमाणे आहेत. पोस्टल वोटिंग सेंटर 138 कल्याण पश्चिम, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, मुंबई युनिव्हर्सिटी उपकेंद्र, वसंत व्हॅली रोड, खडकपाडा कल्याण पश्चिम येथे दिनांक 14, 15,16 मे रोजी सकाळी 9 ते 5 या दरम्यान मतदान होणार आहे. 23 भिवंडी लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, एस. टी.स्टँड समोर भिवंडी येथे दिनांक 17,18,19 मे रोजी सकाळी 9 ते 5 या दरम्यान मतदान केंद्र सुविधा केंद्रात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. अत्यावश्यक सेवेतील मतदार, निवडणूक कर्तव्यावर असलेले मतदारांनी या मतदान सुविधा केंद्रामध्ये मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी केले आहे. ठाणे : भारत निवडणूक आयोगाने अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 25- ठाणे लोकसभा मतदारसंघातील अत्यावश्यक सेवेत असलेल्या तसेच निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना दि. 14 मे 2024 ते 19 मे 2024 या कालावधीत टपाली मतदान करुन आपला मतदानाचा हक्क बजावता येणार असल्याची माहिती 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये- धुळे यांनी दिली. नोंदणीकृत मतदार- पोलीस दलातील अधिकारी/कर्मचारी,अग्निशमन दल, वैद्यकीय सेवेतील कर्मचारी यांच्यापैकी ज्यांनी विहित मुदतीत टपाली मतपत्रिकेसाठी नमुना 12 ड भरुन दिला आहे, त्यांचे टपाली मतदान दि. 14 मे 2024, दि. 15 मे 2024 व दि. 16 मे 2024 या कालावधीत “प्रशिक्षण केंद्र, जिल्हा विकास उद्योजक केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, कोर्ट नाका, ठाणे प 400601 येथे सकाळी 9 ते सायं. 5 या वेळेत होणार आहे. तसेच निवडणूक कामी कर्तव्यावर असलेले व अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचारी ज्यांनी नमुना 12 भरुन दिला आहे, अशा कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान दि. 17 मे 2024, दि. 18 मे 2024 व दि. 19 मे 2024 या दिवशी प्रशिक्षण केंद्र, जिल्हा विकास उद्योजक केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, कोर्ट नाका, ठाणे प. – 400601 येथे सकाळी 9 ते सायं. 5 वाजेपर्यंत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तरी मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त झालेले अत्यावश्यक सेवेतील अधिकारी/कर्मचारी यांनी आपले मत नोंदवून आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन 25- ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांनी केले आहे.
महिला कांगा क्रिकेट स्पर्धा ठाणे : स्पोर्टींग क्लब कमिटीने डोंबिवली क्रिकेट क्लबवर सहा धावांनी निसटता विजय मिळवत मुंबई क्रिकेट संघटना आयोजित महिला बाद पद्धतीच्या डॉ कांगा क्रिकेट स्पर्धेत आपली आगेकूच कायम राखली. ध्रुवी पटेलच्या अर्धशतकी खेळीमुळे ३५ षटकात ८बाद १८० धावा उभारल्यावर स्पोर्टींग क्लब कमिटीच्या गोलंदाजांनी डोंबिवली क्रिकेट क्लबला ५ बाद १७४ धावांवर रोखत अंतिम फेरीच्या दिशेने आगेकूच कायम राखली. नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी करताना स्पोर्टींग क्लब कमिटीची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीची जोडी अवघ्या १५ धावांत माघारी परतल्यावर ध्रुवी पटेलने ५४ धावा करत संघाला सुस्थितीत नेले. तन्वी चव्हाणने नाबाद २४ आणि प्रणाली मळेकरने ११ धावांची खेळी केली. प्रीती चौधरी आणि सानिका खैरनारने प्रत्येकी दोन बळी मिळवले. दिक्षा दुबे, सायली भालेराव, ध्रुवी कापडणेने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. उत्तरादाखल लावण्या शेट्टीने अर्धशतक झळकवत संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण इतर फलंदाजांनी अपेक्षेनुसार कामगीरी न केल्याने डोंबिवली क्रिकेट क्लबला पराभव पत्करावा लागला. लावण्याने ६४ आणि सायली भालेरावने ३९ धावा केल्या. अभिगील नाईक, वैष्णवी पालन, आर्या कानडे, स्वरा दिवेकर आणि अंजु सिंगने प्रत्येकी एक विकेट मिळवली. संक्षिप्त धावफलक : स्पोर्टींग क्लब कमिटी : ३५ षटकात ८ बाद १८० (ध्रुवी पटेल ५४, तन्वी चव्हाण नाबाद २४, प्रणाली मळेकर ११, प्रिती चौधरी ५-३७-२, सानिका खैरनार ६-३०-२, दिक्षा दुबे ४-२३-१, सायली भालेराव ६-३४-१, ध्रुवी कापडणे ७-२६-१) विजयी विरुद्ध डोंबिवली क्रिकेट क्लब : ३५ षटकात ५ बाद १७४ (लावण्या शेट्टी ६४, सायली भालेराव ३९, अभिगील नाईक ४-२९-१, वैष्णवी पालन ७-४०-१, आर्या कानडे ४-३३-१, स्वरा दिवेकर ३-२२-१, अंजु सिंग ३-१०-१ ).
विरार : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या (ता. १४) वसईत येत आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारानिमित्त वसई-माणिकपूर येथील वायएमसीए मैदानात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला ते प्रमुख म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. वसई सनसिटी येथील मैदानावर सायंकाळी साडेचार वाजता हेलिकॉप्टरमधून त्यांचे आगमन होईल. त्यानंतर येथून जवळच असलेल्या बिशप हाऊसला ते भेट देतील. त्या ठिकाणी उपस्थित नागरिक आणि धर्मगुरूंसोबत संवाद साधतील. त्यानंतर नियोजित वेळेत सभास्थळी पोहोचून सभेला मार्गदर्शन करतील. उद्धव ठाकरे यांनी ३ एप्रिल रोजी महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांची उमेदवारी घोषित केली होती. महाविकास आघाडीने भारती कामडी यांच्या रूपाने महिला उमेदवार दिला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेते नितीन बानुगडे पाटील यांनी ६ एप्रिल आणि उद्धव ठाकरे यांनी १२ एप्रिल रोजी अनुक्रमे वसई व बोईसर येथे सभा घेतलेली आहे. आदित्य ठाकरे यांनीही ८ मे रोजीच्या ‘बाईक रॅली`तून विरार-नालासोपारा भागातील नागरिकांसोबत संवाद साधला आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शनिवार, ११ मे रोजी पालघरमध्ये पुन्हा भेट दिली होती. या भेटीत त्यांनी येथील विविध क्षेत्रांतील संघटनांची भेट घेऊन त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ते पुन्हा वसईत जाहीर सभा घेत आहेत. पर्यावरण हानी, आरोग्य व्यवस्था, वाहतूक कोंडी, औद्योगिकीकरण, वाहतूक व्यवस्था, अनधिकृत बांधकामांमुळे शहराची होणारी वाताहत व पाणी योजना आदी विषयांवर या सभेतून ते जनतेशी संवाद साधतील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन ठाणे : प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत अग्रगण्य नाव असलेल्या ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमूख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्यावतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या पूर्व परीक्षेसाठी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात येते. या वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. संस्थेच्या या निःशुल्क मार्गदर्शन वर्गांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रवेश परीक्षेसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमूख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था ही केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना निःशुल्क मार्गदर्शन करणारी अग्रगण्य संस्था आहे. तसेच, अशा पध्दतीने प्रशासकीय प्रशिक्षण संस्था चालविणारी ठाणे महानगरपालिका ही देशातील एकमेव महानगरपालिका आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा दिलेले विद्यार्थी यांच्यासाठी चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेतर्फे स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी प्रवेश परीक्षा रविवार, २३ जून, २०२४ रोजी होणार आहे. परीक्षेचा कालावधी स. ११ ते दु. १ असा राहील. प्रवेश परीक्षा शुल्क १०० रुपये आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी दिनांक १९ जून २०२४ पर्यंत संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.cdinstitute.net) उपलब्ध असलेल्या लिंकवरील विहित नमुन्यात अर्ज सादर करावा. टपालद्वारे, कुरिअरद्वारे तसेच ई-मेल द्वारे प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत किंवा विचारात घेतले जाणार नाहीत याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. सदर प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेसंबंधी सर्व माहिती व सूचना संस्थेच्या नोटीस बोर्डावर तसेच ठाणे महानगरपालिकेच्या www.thanecity.gov.in व संस्थेच्या www.cdinstitute.net या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेली आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन चिंतामणराव देशमूख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ०२२-२५८८१४२१ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि सुसज्ज ग्रंथालय प्रशिक्षण केंद्रात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाते. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना मासिक तीन हजार रुपयांचे विद्यावेतन दिले जाते. संस्थेचे अद्ययावत ग्रंथालय असून स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारी जगभरातील नियतकालिके येथे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ग्रंथालयासाठी दरवर्षी महापालिका प्रशासन मोठ्या प्रमाणात अत्यावश्यक पुस्तके खरेदी करते.तसेच, सेवेतील ज्येष्ठ अधिकाऱ्यांची मार्गदर्शन सत्रेही या प्रशिक्षणार्थींसाठी आयोजित करण्यात येतात.
ठाणे : मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावर धावणाऱ्या लोकलचे वेळापत्रक कोलमडले. यामुळे आज (सोमवार) सकाळ पासूनच या मार्गावरील ट्रेन अनिश्चित वेळापत्रकानुसार धावत आहेत. तर कल्याणहुन मुंबईकडे जाणाऱ्या अनेक लोकल ट्रेन अचानक रद्द करण्यात आल्याने लोकलने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी हाल झाले. काही तांत्रिक बिघाडामुळे ही अडचण उदभवल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. मात्र, ऐन पीकअव्हर मध्ये लोकल खोळंबल्याने सकाळपासूनच कल्याण, डोंबिवली, दिवा, ठाणे आदी स्थानकांसह इतर रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. त्यातच आज तापमानात वाढ असल्याने मोठा उकाडा जाणवत असून महिला व लहान मुलांचे मोठे हाल झाले. धीम्या गतीच्या लोकलचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांना ताटकळत उभे रहावे लागले.