Category: ठाणे

Thane news

मतदाराला कुठल्याही प्रकारचा त्रास न व्हावा यासाठी मतदान केंद्रांबाहेर योग्य त्या सुविधा द्या–सुरेश म्हात्रे

राजीव चंदने मुरबाड : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता असल्याने व मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदान केंद्राबाहेर मंडप व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा अशी मागणी भिवंडी लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी भिवंडी लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे  केली आहे. सध्या तापमानात प्रचंड वाढ झाली असून तापमान ४० ते ४२ अंशापर्यंत पोहोचले आहे.२० मे रोजी भिवंडी लोकसभेसाठी मतदान होणार असून या काळातही तापमानात वाढ असणार असल्याने मतदारांना मतदान केंद्राबाहेर उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी व वाढत्या तापमानामुळे मतदानावर परिणाम होऊ नये यासाठी मतदान केंद्रानबाहेर मंडप, पिण्याचे पाणी, पंखे, खुर्च्या व खेळती हवा राहील अशी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी सुरेश म्हात्रे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे  केली आहे.

गुरूवारी दिवा, मुंब्रात काही क्षेत्रात आठ तास पाणी बंद

ठाणे  : दिवा प्रभाग क्षेत्रात शीळ, खर्डी आणि भोलेनाथ नगर तसेच, मुंब्रा प्रभाग क्षेत्रातील वाय जंक्शनपासून मुंब्रा अग्निशमन केंद्रापर्यंतच्या भागात गुरूवार, ९ मे रोजी  सकाळी १० ते सायंकाळी ६ या आठ तासात पाणी पुरवठा बंद…

श्री मावळी मंडळ राज्यस्थरीय कबड्डी स्पर्धा

महिला गटात पालघरच्या श्री राम कबड्डी संघाचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश ठाणे, श्री मावळी मंडळ आयोजित ९९ व्या शिवजयंतीउत्सवानिमित्त ७१ व्या राज्यस्थरीय कबड्डी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी महिला गटातील पहिल्या सामन्यात पालघरच्या श्री राम कबड्डी संघाने मुंबई उपनगरच्या नवशक्ती स्पोर्ट्स अकॅडमी संघाचा ३७-२२ असा १५ गुणांनी पराभव करून उप-उपांत्य फेरीत प्रवेश केला श्री मावळी मंडळ आयोजित ९९ व्या शिवजयंतीउत्सवानिमित्त ७१ व्या राज्यस्थरीय कबड्डी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी महिला गटात आरएफ नाईक (ठाणे), शिवशक्ती स्पोर्ट्स क्लब (धुळे) , होतकरू मित्र मंडळ (ठाणे), स्वराज्य स्पोर्ट्स क्लब (मुंबई उपनगर), श्री राम कबड्डी संघ (पालघर), शिवशक्ती महिला संघ (मुंबई शहर) या संघानी उप-उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर, पुरुष गटात जय बजरंग क्रीडा मंडळ वाशिंद (ठाणे), हुतात्मा शांताराम कालवार (ठाणे) ,नवरत्न मंडळ (मुंबई उपनगर), श्री विठ्ठल क्रीडा मंडळ (ठाणे), जय बजरंग रोहा (रायगड), श्री हनुमान सेवा (ठाणे), विजय काल्हेर (ठाणे) ह्या संघानी चवथ्या फेरीत प्रवेश केला. महिला गटातील पहिल्या सामन्यात पालघरच्या श्री राम कबड्डी संघाने मुंबई उपनगरच्या नवशक्ती स्पोर्ट्स अकॅडमी संघाचा ३७-२२ असा १५ गुणांनी पराभव करून उप-उपांत्य फेरीत प्रवेश केला. सदर  सामना  मध्यंतरापर्यंत अतिशय चुरशीचा झाला.दोन्ही संघानी अतिशय भक्कम क्षेत्ररक्षण करीत विरुद्ध संघाला एक एक गुणांसाठी संघर्ष करायला लावला.  मध्यंतराला दोन्ही संघाचे १४-१४ असे  समसमान गुण होते. मध्यंतरानंतर मात्र  श्री राम कबड्डी संघाच्या ऐश्वर्या ढवन हिने आक्रमक खेळ करीत आपल्या संघाची गुणसंख्या भराभर वाढवली व  नवशक्ती स्पोर्ट्स अकॅडमी संघावर लोन दिला. तिला रिया पाटील व हनी सोलमट्ट हयांनी पक्कडीत सुंदर साथ दिली व संघासाठी विजय मिळवला. पराभूत संघाकडून रविना थोरात हिने एकाकी झुंज दिली. महिला गटातील दुसऱ्या सामन्यात  धुळ्याच्या शिवशक्ती स्पोर्ट्स क्लब संघाने ठाण्याच्या जय भारत स्पोर्ट्स क्लब संघाचा ४५-१५ असा ३० गुणांनी धुव्वा उडवत उप-उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. ह्या सामन्यात  शिवशक्ती स्पोर्ट्स क्लब संघाने मध्यंतराला १७-०८ अशी ५ गुणांची आघाडी घेतली.  मध्यंतरानंतर शिवशक्ती स्पोर्ट्स क्लब संघाच्या विद्या व ज्योती यांनी आपला आक्रमक खेळ करीत जय भारत स्पोर्ट्स क्लब संघावर दोन लोण चढवले व सामना पूर्णपणे आपल्या संघाकडे झुकवला . पराभूत संघाकडून श्रेया गावंड हिने सुंदर खेळ केला. पुरुष गटातील सामन्यात ठाण्याच्या हुतात्मा शांताराम कालवार  संघाने अलहिदा डावात ठाण्याच्या आत्माराम क्रीडा मंडळाचा १ गुणांनी मात करून चवथ्या फेरीत प्रवेश केला.  हा सामना सुरवातीपासूनच अतिशय अटीतटीचा होता.  हुतात्मा शांताराम कालवार संघाच्या परेश म्हात्रे व आत्माराम क्रीडा मंडळाच्या अभिजित भोईर आपल्या संघासाठी प्रत्येक चढाईत गुण मिळवीत होते.  मध्यन्तराला हुतात्मा शांताराम कालवार संघाकडे १९-१४ अशी ५ गुणांची आघाडी होती. मध्यन्तरानंतर  आत्माराम क्रीडा मंडळाच्या  विवेक म्हात्रेने खोलवर चढाया करीत आपल्या संघाची गुणसंख्या वाढविली. व सामना २८-२८ असा समसमान गुणांवर संपवला. अलहिदा डावात  हुतात्मा शांताराम कालवार  संघाने आपल्या दुसऱ्या चढाईत दोन गुणांची कमाई केली व सामना १ गुणांनी जिंकला. पुरुष गटातील दुसऱ्या सामन्यात ठाण्याच्या श्री विठ्ठल क्रीडा मंडळाने मुंबई उपनगरच्या अभिनव क्रीडा मंडळाचा ४२-३५ असा ७ गुणांनी पराभव केला. ह्या सामन्यात दोन्ही संघ सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करीत होते. श्री विठ्ठल क्रीडा मंडळाच्या अक्षय मखवनाने खोलवर चढाया करीत आपल्या संघाची गुणसंख्या वाढविली. त्याला शुभम देशमुखची पक्कडीत उत्तम साथ मिळाली. मध्यन्तराला श्री विठ्ठल क्रीडा मंडळाने १८-१६ अशी २ गुणांची आघाडी घेतली.  मध्यन्तरानंतर अभिनव क्रीडा मंडळाच्या सिद्धेश शेलारने अष्टपैलू खेळ करीत आपल्या संघासाठी गुण मिळविले. परंतु तो आपल्या संघाचा पराभव टाळू शकाल नाही . ७ मे २०२४ दिवसाचे मानकरी : उत्कुष्ट चढाईपट्टू (पुरुष) : विघ्नेश चौधरी (विजय काल्हेर, ठाणे), उत्कुष्ट पक्कड (पुरुष)  : विराज पाटील (जय बजरंग रोहा, रायगड), उत्कुष्ट चढाईपट्टू (महिला)  : ऐश्वर्या ढवण (श्री राम कबड्डी संघ,पालघर), उत्कुष्ट पक्कड (महिला )  : रोशनी माने (आरएफ नाईक, ठाणे)

गुरूवारी दिवा आणि मुंब्रामध्ये काही क्षेत्रात आठ तास पाणी बंद राहणार

अनधिकृत नळ जोडणी खंडित करणे आणि व्हॉल्व्ह दुरुस्तीची कामे होणार ठाणे : दिवा प्रभाग क्षेत्रात शीळ, खर्डी आणि भोलेनाथ नगर तसेच, मुंब्रा प्रभाग क्षेत्रातील वाय जंक्शनपासून मुंब्रा अग्निशमन केंद्रापर्यंतच्या भागात गुरूवार, ०९ मे रोजी  स. १० ते सायं. ६ या आठ तासात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनीवर भोलेनाथ नगर गेट समोरील नाल्यातील ६६० मीमी व्यासाच्या जलवाहिनीवरील अनधिकृत नळ संयोजन खंडित करणे आणि कल्याण फाटा जलकुंभाकडे जाणाऱ्या जलवाहिनीवरील ३५० मी मी व्यासाच्या व्हॉल्व्हची दुरुस्ती करणे या कामांसाठी गुरूवार, ०९ मे रोजी  स. १० ते सायं. ६ या आठ तासात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. कल्याण फाटा येथून एमआयडीसीच्या जलवाहिनीवरून होणारा पाणी पुरवठा या काळात खंडित राहणार आहे. दुरुस्तीचे काम झाल्यानंतर पुढील दोन दिवस या भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक पाणी साठा करून ठेवावा, तसेच, पाण्याचा अपव्यय टाळून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

ठाकरे गटाच्या शाखेत नरेश म्हस्के यांचे शक्ती प्रदर्शन

ठाणे : शिवसेनेत खूप पडल्यानंतर ठाण्यातील चंदनवाडी ही शाखा ठाकरे गटाकडे राहिली होती त्यानंतर बुधवारी याच शाखेत जाऊन शिंदे सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी प्रचारादरम्यान ठाकरे गटातील शाखेत प्रवेश करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हार घातला आणि नतमस्तक होत शाखेत घोषणाबाजी करत शक्ती प्रदर्शन केले. मात्र यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) यांना मानणारे कट्टर शिवसैनिकांच्या हाती ही शाखा आहे. या शाखेचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाल्याने ही शाखा म्हणजे सर्व शिवसैनिकांचे  श्रद्धास्थान मानले जाते. ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी शिवसेना शाखा कोणाची या मुद्द्यावरून भांडण रंगलेली पाहायला मिळाली होती. शिवसैनिक एकमेकांच्या पुढे उभे ठाकले होते, मात्र चदनवाडी शाखा त्याला अपवाद ठरली होती. याच शाखेवर शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांच्या नावावर काळे फासले होते. त्यामुळे आशा प्रकारे प्रचारात शाखेवर जाऊन डीवचण्याचा प्रयन्त पुन्हा एकदा शिंदे गटाकडून करण्यात आला.

मतदानाच्या जागृतीसाठी ठाण्यात शनिवारी मिनी मॅरेथॉन

ठाणे महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे जिल्हा अॅथलेटिक असोसिएशन आणि ठाणे सिटीझन्स फाऊंडेशन यांचा संयुक्त उपक्रम ठाणे (०८): येत्या २० मे रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे…

ठाणे प्रीमियर टी २० क्रिकेट लीग स्पर्धा

एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (ब) अंतिम फेरीत ठाणे :दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये प्रकाश झोतात खेळल्या गेलेल्या लढतीत एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाने ठाणे वॉरियर्स क्रिकेट क्लबचा सहा गडी राखून पराभव करत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित ठाणे प्रीमियर टी २० क्रिकेट लीग स्पर्धेतील  सलग चौथे विजेतेपद मिळवण्याकडे वाटचाल केली. अन्य लढतीत अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबने बॉईज क्रिकेट क्लबचा सात फलंदाज राखून पराभव करत अंतिम फेरीतले स्थान निश्चित केले उपांत्य फेरीत एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाने ठाणे वॉरियर्स क्रिकेट क्लबला १६.४ षटकात१०५ धावांवर गुंडाळले.रमणप्रीत सिंग (२६) आणि जितेश राऊतने ३३ धावा केल्यामुळे ठाणे वॉरियर्स क्रिकेट क्लबला शतकी धावसंख्या उभारता आली. प्रतिस्पर्ध्यांना मर्यादित धावांवर रोखताना धृमील मटकरने आठ धावांत ३, हेमंत बुचडे आणि अर्जुन शेट्टीने प्रत्येकी दोन गडी बाद केले. उत्तरादाखल अमन खान,निखिल देसाई आणि आशय सरदेसाईने जबाबदारीपूर्ण खेळी करत ८.५ षटकात ४ बाद १०९ धावसंख्येसह एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाला निर्णायक फेरीत पोहचवले. या डावात खिजार दाफेदारने दोन, अजित यादव आणि यासिन शेखने प्रत्येकी एक बळी मिळवला. अन्य लढतीत बॉईज क्रिकेट क्लबने नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी करत २० षटकात ८ बाद १६० धावांचे आव्हान उभे केले. त्यात आदित्य रावत (६९) आणि हर्षल जाधवने (५४) अर्धशतकी धावसंख्येचे योगदान दिले. प्रथमेश महाले, परीक्षित वळसंगकर,भाविन दर्जीने प्रत्येकी दोन बळी मिळवले. या आव्हानाला सामोरे जाताना प्रसाद पवारने नाबाद ५४ धावांची अर्धशतकी खेळी करत संघाला विजयाचा मार्ग मोकळा करून दिला. श्रीराज घरतने नाबाद ३९ आणि अनिल रोंनकीने  ४९ धावा करत  संघाला विजयी केले. हर्षल जाधव, निनाद  ठाकूर आणि यश सिंगने प्रत्येकी एक गडी बाद केला.

एकनाथ शिंदे आणि शिवसेनेशी जास्त वाट लावणारा हा म्हस्केच

नरेश म्हस्के यांना मी जवळून ओळखतो;आयुष्यभर शकुनीमामा कोंग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा थेट आरोप ठाणे : नरेश मस्के या व्यक्तीला मी अत्यंत जवळून ओळखतो, आयुष्यभर त्यांनी शकुनीमामाचे काम केले आहे. त्याच भूमिकेत ते राहिले आहेत. शिवसेना आणि भविष्यात एकनाथ शिंदे यांची जास्त वाट लावणारा हाच नरेश म्हस्के आहे. त्यावेळी सतत धर्मवीर आनंद दिघे यांच्या विरोधात भूमिका म्हक्से घ्यायचा असा थेट आरोप ठाणे कोंग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला. राजन विचारे यांच्या प्रचारासाठी ठाण्यातील मनोरमा नगर या ठिकाणी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी चव्हाण बोलत होते. नरेश म्हस्के हा माझ्या नंतरचा नगरसेवक आहे. धर्मवीर आनंद दिघे हे गेल्यानंतर यांच्याकडे संपती कशी आली? हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे,उध्दव ठाकरे यांच्या जीवनावर यांनी पैसे कमावले आहेत ना, असा टोला देखील विक्रांत चव्हाण यांनी लगावला. ज्यांनी शिवसेना चोरली, पक्ष चोरला त्यांना कायमचे तडीपार करा आणि राजन विचारे या सच्चा शिवसैनिकाला विजयी करा असे आवाहन यावेळी चव्हाण यांनी केले.

मतदाराला कुठल्याही प्रकारचा त्रास न व्हावा यासाठी

मतदान केंद्रांबाहेर मंडपाची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा,–सुरेश म्हात्रे राजीव चंदने मुरबाड : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता असल्याने व मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदान केंद्राबाहेर मंडप व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा अशी मागणी भिवंडी लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी भिवंडी लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे  केली आहे. सध्या तापमानात प्रचंड वाढ झाली असून तापमान ४० ते ४२ अंशापर्यंत पोहोचले आहे.२० मे रोजी भिवंडी लोकसभेसाठी मतदान होणार असून या काळातही तापमानात वाढ असणार असल्याने मतदारांना मतदान केंद्राबाहेर उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी व वाढत्या तापमानामुळे मतदानावर परिणाम होऊ नये यासाठी मतदान केंद्रानबाहेर मंडप, पिण्याचे पाणी, पंखे, खुर्च्या व खेळती हवा राहील अशी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी सुरेश म्हात्रे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे  केली आहे.

उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयातील रुग्णांना दारू, गांजा व गुटखा

उल्हासनगर : मध्यवर्ती रुग्णालयातील रुग्णांना भेटण्यासाठी येणारे नातेवाईक दारू, गांजा, गुटखा आदी साहित्य पुरवीत असल्याचे उघड झाले. रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण नातेवाईकांच्या अंगझडतीत दारू, गांजा, गुटका सापडल्याची माहिती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बनसोडे यांनी दिली आहे. उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, बदलापूर यांच्यासह ग्रामीण परिसरातून शेकडो नागरिक उपचार करण्यासाठी येतात. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज एक हजार पेक्षा जास्त रुग्णांची नोंद होत आहे. तर क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत असल्याची परिस्थिती मध्यवर्ती रुग्णालयाची आहे. रुग्णालयाच्या भिंती व स्वच्छतागृह गुटक्याच्या फिचकाऱ्याने रंगल्याचे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांच्या लक्षात आले. त्यांनी रुग्णांना भेटण्यासाठी आलेल्या नातेवाईकांची रुग्णालय प्रवेशद्वारवर अंगझडती घेण्याचे आदेश दिले. या अंगझडतीत रुग्णांच्या नातेवाईकडे दारू, गांजा, गुटखा, तंबाखू आदी पदार्थ सापडत असल्याचे उघड झाले. काही रुग्णाच्या नातेवाईकडून अंतरवस्त्रात लपून आणलेल्या दारूच्या बॉटल रुग्णालय सुरक्षा रक्षकांनी जप्त केल्याने, एकच खळबळ उडाली. मध्यवर्ती रुग्णालयाचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना मिळण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र याला काही रुग्णांचे नातेवाईक छेद देत असल्याचे डॉ मनोहर बनसोडे म्हणाले. रविवारी रात्री असाच प्रकार उघड झाला असून रुग्णांच्या नातेवाईकडून अंतरवस्त्रात लपून ठेवण्यात आलेल्या दारूच्या बॉटल सुरक्षा रक्षकांनी जप्त केल्याची माहिती डॉ बनसोडे यांनी दिली. यापुढे रुग्णांच्या नातेवाईकसह संबंधितांवर कारवाईचे संकेत रुग्णालय प्रशासन यांनी दिले आहे. थेट रुग्णालयात नशेली प्रदार्थाची विक्री रुग्णांना होत असल्याने, मध्यवर्ती रुग्णालय चांगलेच चर्चेत आले आहे.