Category: ठाणे

Thane news

इराणवरील हल्ल्यांचा निषेध करा – माकप

इराणवरील हल्ल्यांचा निषेध करा – माकप ठाणे: अमेरिका आणि इस्राइल यांनी इराणवर केलेल्या हल्ल्यांचा तीव्र निषेध करा, हे हल्ले इराणचे राष्ट्रीय सार्वभौमत्व, संयुक्त राष्ट्राची सनद तसेच सर्व आंतरराष्ट्रीय करार यांना निर्लज्जपणे धाब्यावर बसवून करण्यात आले आहेत, असा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोने केला आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणबरोबर सुरू असलेल्या चर्चांना पूर्णतः डावलून हे हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमधून तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानांतून स्पष्ट होते की त्यांचा या चर्चांवर कधीच विश्वास नव्हता. अमेरिका ही एका आक्रमक दबंग शक्तीप्रमाणे वागत असून, सार्वभौम देशांवर मनमानीपणे हल्ले करत आहे. इराणवरील हा हल्ला अलीकडेच व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्यानंतर आणि क्यूबाला दिलेल्या धमक्यांनंतर झाला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचा दौरा संपवल्यानंतर तात्काळ इराणवरील हा हल्ला करण्यात आला आहे. भारत सरकारने आपला मैत्रीपूर्ण देश असलेल्या इराणवरील या हल्ल्यांचा ठामपणे निषेध करून तात्काळ युद्धखोर कारवाई थांबवण्याची मागणी केली पाहिजे, असे आवाहन माकपने केले आहे.

भावी पोलिसांची रस्त्यावरील परवड थांबवा-  प्रताप सरनाईक

भावी पोलिसांची रस्त्यावरील परवड थांबवा-  प्रताप सरनाईक मिरा-भाईंदर: ‘राज्याच्या सुरक्षेची धुरा भविष्यात ज्यांच्या खांद्यावर असणार आहे, त्या तरुण उमेदवारांना आज मिरा-भाईंदरमध्ये उघड्यावर रात्र काढावी लागणे, ही प्रशासनासाठी अत्यंत लज्जास्पद बाब आहे,” अशा कठोर शब्दांत महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्हा पालकमंत्री आणि स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रशासकीय ढिसाळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी पोलीस भरतीसाठी आलेल्या हजारो युवक-युवतींच्या निवासाची आणि मूलभूत सुविधांची तत्काळ व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलीस आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त यांच्यात नियोजनाचा अभाव असल्याने ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्याचा ठपका पत्रात ठेवण्यात आला आहे. सोबतच मिरा-भाईंदर महानगरपालिकेची सभागृहे, एमएमआरडीए (MMRDA) आणि बीएसयूपी (BSUP) अंतर्गत असलेल्या रिक्त सदनिका पोलीस भारती देण्यासाठी आलेल्या उमेदवारांसाठी तात्काळ खुल्या कराव्यात, अशी सूचना देखील आयुक्तांना करण्यात आली आहे. प्रशासकीय दिरंगाई होत असतानाच, उमेदवारांच्या भोजनाची संपूर्ण जबाबदारी प्रताप सरनाईक स्वतः आणि त्यांच्या शिवसेना संघटनेच्या वतीने स्वीकारली असल्याचे हि या पत्रात नमूद करण्यात आलेले आहे.यासंपूर्ण प्रकरणाबद्दल बोलताना प्रताप सरनाईक म्हणतात कि, “दोन-दोन दिवस उन्हातानात तग धरून हे तरुण आपल्या भविष्याची परीक्षा देत आहेत. जे उद्या कायदा व सुव्यवस्था राखणार आहेत, त्यांनाच सुरक्षित आसरा न मिळणे हे वेदनादायी आहे. प्रशासनाने संवेदनशीलता दाखवून यावर ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा ही अनास्था खपवून घेतली जाणार नाही. तसेच भविष्यातील भरती प्रक्रियेसाठी कायमस्वरूपी ‘समन्वय आराखडा’ तयार करावा” प्रशासनाने या विषयाचे गांभीर्य ओळखून सकारात्मक पावले न उचलल्यास, उमेदवारांच्या हक्कासाठी अधिक आक्रमक भूमिका घेण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

 समाजातील वाईट प्रवृत्तींचे दहन

 समाजातील वाईट प्रवृत्तींचे दहन  पिसवलीतील जीआरसी हिंदी शाळेत उत्साहात होळी साजरी कल्याण : समाजातील वाईट, खोटेपणा आणि अहंकार यांचे प्रतीकात्मक दहन करून होळी साजरी करण्याचा संदेश देत कल्याण पूर्वेतील पिसवली येथे…

वालधुनी नदी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा पाहणी दौरा

वालधुनी नदी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा पाहणी दौरा कल्याण: काँग्रेस पक्षाचे कल्याण जिल्हाध्यक्ष डॉ. राजकुमार पातकर यांनी वालधुनी नदी परिसराचा पाहणी दौरा करून प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्था यांनी नदीतील वाढते प्रदूषण, गाळ साचणे व पूरस्थिती याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी तात्काळ संबंधित विभागाकडे निवेदन सादर केले. संस्थेचे अध्यक्ष सुनील उतेकर यांनी उपस्थित राहून नदीची सद्यस्थिती, पूरकाळातील अडचणी व नागरिकांच्या समस्या यांची सविस्तर माहिती दिली. भवानीनगर, अनुपम नगर, घोलप नगर, योगिता, त्रिमूर्ती कॉलनी, गुरु आत्मा स्मार्ट सिटी शाळा, बंदर पाडा, मोना रोड, वालधुनी विभाग, छत्रपती शिवाजी महाराज नगर, मिलिंद नगर आदी भाग नदी पात्रालगत आहेत. जुलै महिन्यात पूर आल्यावर या परिसरातील नागरिकांना स्थलांतर करावे लागते. पाच ते सात फूट पाणी दुकाने व घरांमध्ये शिरते. पूर ओसरल्यानंतर दोन दिवस सरकारी यंत्रणेकडून साफसफाईसाठी प्रतीक्षा करावी लागते. स्थानिक नागरिकांचे स्पष्ट मत आहे की,‘आम्हाला तात्पुरती मदत नको; पण नदी कायमस्वरूपी स्वच्छ व प्रदूषणमुक्त करा. वालधुनी नदीचे सुशोभीकरण करून पर्यटन स्थळ म्हणून विकसित करा’. यावेळी डॉ. राजाकुमार पातकर यांनी संस्थेला पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. ‘वालधुनी नदी संदर्भात कोणताही विषय असेल, आम्ही तुमच्या सोबत आहोत.’ असे त्यांनी स्पष्ट केले. वालधुनी नदीचे पुनरुज्जीवन, गाळ काढणे, रुंदी व खोली वाढवणे, प्रदूषणमुक्ती आणि सुशोभीकरण या कामांसाठी प्रशासनाने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ. श्यामला वनारेसेंचे निधन

पुणे : ‘स्वभावाला औषध असते’च्या लेखिका आणि प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आणि बालकारणी डॉ. श्यामला वनारसे यांचे पुण्यात अल्प आजाराने निधन झाले. त्या ८७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने साहित्य, सांस्कृतिक आणि मानसशास्त्र क्षेत्रात शोककळा पसरली आहे. डॉ.…

भाजपाच्या महिला नेत्याच्या मुलीकडून रामाला शिवीगाळ

स्लग- इन्स्टावर रीळ टाकल्यानंतर बदलापूरमध्ये उद्रेक ० भाजपाकडून प्रतिभा जाधवांचा राजीनामा ० मुलगी मृणालवर गुन्हा दाखल बदलापूर : भाजपाच्या बदलापूर पूर्वमधील महिला आघाडी प्रमुख असलेल्या प्रतिभा जाधव यांची मुलगी मृणाल जाधवने मर्यादा पुरुषोत्तम रामाला अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ करीत…

बी.के. बिर्ला कॉलेजमध्ये नवीन लेखकांचे शिबिर संपन्न

कल्याण : कल्याणातील बी.के. बिर्ला कॉलेज आणि दिल्लीतील केंद्रीय हिंदी निदेशालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सहा दिवसांच्या हिंदी हिंदीतर भाषिकांसाठी नवीन लेखकांच्या शिबिराचा समारोप झाला. याप्रसंगी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय…

 जागतिक महिला दिनानिमित्त ‘महिला सन्मान मॅरेथॉन’चे आयोजन

महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कल्याण : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जीवनदीप कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जीवनदीप फाउंडेशन आणि जीवनदीप वार्ता यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, दि. ८ मार्च रोजी सकाळी ६ वाजता “महिला सन्मान मॅरेथॉन”चे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या आरोग्यजागृतीसाठी, आत्मविश्वास वृद्धीसाठी व त्यांच्या सामाजिक योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. परिसरातील सर्व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. टिटवाळा येथील पद्मावती रॉयल सोसायटी येथून या मॅरेथॉनची सुरवात होणार असून ३ कि.मी. अंतर पार करून घोटसाई गाव प्रवेशद्वार येथे सांगता होईल. यामध्ये १८ ते ३० वर्षे व ३० वर्षांवरील महिला सहभागी होऊ शकतात मात्र नाव नोंदणी अनिवार्य आहे. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार असून सर्व सहभागी महिलांना टी-शर्ट व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे उपस्थित राहणार आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क 91६7५६341२, 9५६13६3133 ००००००

समाजसेविका मंगलाताई अडसूळ स्मृती १४ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धा शनिवारी

आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुपतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त ज्येष्ठ समाजसेविका स्व. मंगलाताई अडसूळ स्मृती चषक ८/११/१४ वर्षाखालील  मुलामुलींच्या स्वतंत्र एकूण ६ वयोगटामध्ये जलद बुध्दिबळ स्पर्धा ७ मार्च रोजी…

रनर्स क्लॅन फाऊंडेशनकडून दुर्गम भागातील शाळेला मदतीचा हात

क्रीडा स्वास्थ्य आणि समाजसेवा यांचा संगम कल्याण : मॅरेथॉन विश्वात आपल्या शिस्तबद्ध आणि उत्कृष्ट आयोजनाने देशभर नाव कमावणाऱ्या कल्याण-डोंबिवलीतील ‘रनर्स क्लॅन फाऊंडेशन’ने आपल्या ‘क्रीडा स्वास्थ्य एवं समाजसेवा’ या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत एका सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले. मलंगगडच्या पायथ्याशी असलेल्या जि.प. शाळा, वाडी (शिवमंदिर) या दुर्गम भागातील शाळेला फाऊंडेशनच्या वतीने शैक्षणिक व क्रीडा साहित्याची मदत देण्यात आली. फाऊंडेशनच्या सदस्यांनी या शाळेला सदिच्छा भेट दिली. यावेळी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालावर आणि कवायती सादर करत सदस्यांचे जंगी स्वागत केले. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी स्थानिक भागातील उपलब्ध पाना-फुलांपासून स्वतः तयार केलेले पुष्पगुच्छ पाहुण्यांना देऊन त्यांचे स्वागत केले, ज्यामुळे उपस्थित सदस्य भारावून गेले. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि कलाविष्कार शहरातून आपल्याला कोणीतरी भेटायला आले आहे, या भावनेने भारावलेल्या विद्यार्थ्यांनी यावेळी गाणी आणि नृत्यांचे सादरीकरण केले.