ठाणे : ठाण्यातील जुन्या फ्रेंडशिप क्रिकेट क्लबचे संस्थापक सदस्य आणि मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज मोहन नाखवा यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यसमयी त्यांचे वय ८४ वर्ष होते. फ्रेंडशिप क्रिकेट क्लबचे भरवशाचे क्रिकेटपटू म्हणून ओळखले जाणाऱ्या मोहन नाखवा यांना क्रिकेटच्या जोडीने मल्लखांब आणि फुटबॉल खेळाच्या जोडीने भारतासह परदेशात पर्यटन करण्याची आवड होती. बी. टेक असणाऱ्या मोहन नाखवा यांनी नामदेव अँड कंपनी आणि आमोद इंजिनिअर्स वर्क्स या दोन कंपन्यांची स्थापना केली होती. फ्रेंडशिप क्रिकेट क्लबतर्फे श्री आनंद भारती समाजाच्या सभागृहात  झालेल्या शोकसभेत मोहन नाखवा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. श्री आनंद भारती समाजाचे अध्यक्ष हरेश्वर मोरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शोकसभेत सर्वश्री ॲड रमाकांत कोळी, जगदीश कोळी, विजय नाखवा, प्रफुल्ल नाखवा, हर्षद नाखवा, गिरीश तांडेल यांनी समयोजित श्रद्धांजली वाहिली. देवेशू ठाणेकर यांनी नाखवा परिवाराच्या वतीने उपस्थितांचे आभार मानले. यावेळी मोहन नाखवा यांचे चिरंजीव आमोद ,सुन मुक्ता, कन्या डॉ शिल्पा आणि जुई हे नाखवा कुटुंबिय उपस्थित होते.  फ्रेंडशिप क्रिकेट क्लबचे सचिव प्रल्हाद नाखवा यांनी शोकसभेचे सूत्रसंचालन केले.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *