आंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धा
पिंपरी, पुणे : आंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस मुले आणि मुलींच्या स्पर्धेचे आयोजन पीसीसीओईआर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत मुलांच्या गटात आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग या संघाने ताथवडे येथील इंदिरा कॉलेज संघाचा पराभव करत विजय मिळवला. मुलींच्या स्पर्धेत रावेत येथील पीसीसीओईआर संघाने आकुर्डी येथील पीसीसीओई संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती आणि रावेत येथील पीसीसीओईआर यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी झालेल्या मुलांच्या उपांत्य सामन्यांमध्ये डॉ. डीवाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग संघाने राजश्री शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय संघाचा व इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स, ताथवडे संघाने पीसीसीओई संघाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. मुलींच्या स्पर्धेत रावेत येथील पीसीसीओईआर संघाने पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय संघ आणि पीसीसीओई, सासवड येथील पीडीइए कॉलेज ऑफ फार्मसी संघाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
मुलांच्या स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील एकूण १८ विविध महाविद्यालयांचे संघ तसेच मुलींच्या स्पर्धेत एकूण ८ विविध महाविद्यालयांचे संघ सहभागी झाले.स्पर्धेचे उद्घाटन पीसीसीओईआरचे संचालक प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सह सचिव डॉ. अक्षय काशीद, डॉ. गणेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले होते. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीसीसीओईआरचे संचालक प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सहसचिव डॉ. गणेश चव्हाण, निवड समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल कमलापुरे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचे आयोजन पीसीसीओईआरचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. मिलिंद थोरात यांनी केले. यशस्वी संघांचे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी अभिनंदन केले.
स्पर्धेचा अंतिम निकाल :- मुले विजयी :- आकुर्डी डीवायपीसीओइ,
उपविजयी :- ताथवडे आयसीसीएस,
तृतीय :- निगडी पीसीसीओई,;
मुली विजयी :- रावेत पीसीसीओईआर, उपविजयी आकुर्डी पीसीसीओई,
तृतीय :- पिंपरी डीवायपीएसीएससी.
0000
