Category: ठाणे

Thane news

 घंटागाडी चालकांचा थकीत पगार त्वरित अदा करा

घंटागाडी चालकांचा थकीत पगार त्वरित अदा करा महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियनची मागणी कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत घंटागाडीवर कार्यरत असलेल्या चालकांचा थकीत पगार त्वरित अदा करण्याची मागणी महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियनने केली असून याबाबत त्यांनी केडीएमसी महापौर हर्षाली चौधरी थविल यांची भेट घेतली. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत घंटागाडीवर कार्यरत असलेले ठोक पगारी जड वाहन चालक नियमितपणे आपले काम पार पाडत असतानाही त्यांचा १५ डिसेंबर पासून अद्यापपर्यंतचा पगार अदा करण्यात आलेला नाही. त्यामुळे संबंधित कामगारांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत तातडीने दखल घेऊन संबंधित ठोक पगारी जड वाहन चालकांचा थकीत पगार त्वरित अदा करण्याची व्यवस्था करावी. तरोच, सदर कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याच्या दृष्टीने सकारात्मक विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी महापौरांकडे करण्यात आली. यावेळी युनियनचे संघटक मच्छिंद्र सकट, कॉम्रेड उदय चौधरी उपस्थित होते.

 व्यवस्थेला दोष न देता मेहनतीने परिस्थ‍िती बदला – डॉ. मिताली संचेती

व्यवस्थेला दोष न देता मेहनतीने परिस्थ‍िती बदला – डॉ. मिताली संचेती ठाणे :   क्षेत्र कोणतेही असले तरी मेहनतीश‍िवाय पर्याय नाही. केवळ आपल्या सभोवताली असलेल्या व्यवस्थेला, यंत्रणेला दोष न देता कोणतीही परिस्थ‍िती बदलायची असेल तर त्यासाठी मेहनत करा. नोकरीचे ठिकाण असो की, श‍िक्षण क्षेत्र नियमित अभ्यास आण‍ि मेहनत घेतली तरच परिस्थ‍िती बदलते असे मार्गदर्शनपर वक्तव्य ठाणे महापालिकेच्या उपायुक्त डॉ. मिताली संचेती यांनी नुकतेच झालेल्या प्रश‍िक्षण कार्यक्रमात केले. ठाणे महानगरपालिका व रोटरी क्लबच्या वतीने आयोजित केलेल्या एसी, रेफ्रिजरेटर,वॉटर कुलर या उपकरणांच्या  दुरुस्तीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याना पदवीप्रदान कार्यक्रमात त्या बोलत होत्या. नौपाडा येथील पालिका शाळा क्र १९ येथील रोटरी सेंटर मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे महानगरपालिका, रोटरी क्लब ऑफ लेक सिटी, रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ व ब्लू स्टार कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक १९, विष्णुनगर, ठाणे (प) येथे स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू करण्यात आलेले आहे. पहिल्या टप्प्यात ११ मुलानी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. तीन महिन्याचे हे  प्रशिक्षण असून ते मोफत आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थीना नोकरी व व्यवसायसाठी देखील रोटरीतर्फे सहकार्य केले जाते. यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या उपायुक्त मिताली संचेती यांनी पूर्ण सेंटरची पाहणी करून सर्व उपक्रमाची माहिती घेतली आणि त्या आपल्या मनोगतात म्हणाल्या की रोटरीने हा चालू केलेला उपक्रम हा एक अभिनव असा उपक्रम असून याच्यात रोटरी विद्यार्थ्यांना पूर्णपणे अती उच्च प्रतीच्या साधन सामुग्रीसह प्रशिक्षण देतच आहेत तसेच त्यांनी त्यांना रोजगार निर्मितीचे पण साधन निर्माण करून दिलेला आहे. या उपक्रमाचा  जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा मिळावा यासाठी महापालिका सर्वतोपरी सहकार्य करेल असे डॉ. मिताली संचेती यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डिस्ट्रिक्ट ३१४२ चे प्रांतपाल हर्ष माकोल हे होते. ठाणे महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी शेषराव बडे, ब्लू स्टार ट्रेनिंग सेंटरचे मॅनेजर हरीश हे उपस्थित होते.तसेच यावेळी नियोजित प्रांतपाल चंद्रहास शेट्टी,माझी प्रांतपाल डॉक्टर मोहन चंदावरकर,रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटीचे अध्यक्ष सुरेश कल्याणकर, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या अध्यक्षा श्रीमती ममता वंजानी, जगदीश चेलारमानी, प्रशांत पात्रो,मेधा जोशी,देवयानी वेद,सुनील सोमण राजेश परांजपे, नियोजित अध्यक्ष निशा कपीला, यतीन कोळंबेकर आणि अनेक रोटेरियन्स उपस्थित होते.

२ मार्च रोजी नवी मुंबई महापालिकेचा लोकशाही दिन

२ मार्च रोजी नवी मुंबई महापालिकेचा लोकशाही दिन नवी मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका स्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार माहे मार्च २०२६…

मंगळवारी बारावी एच एस सी बोर्ड ची परीक्षेला सुरुवात झाली असून ठाण्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत फुल उधळून करण्यात आले. यामुळे विद्यार्थी च्या चेहऱ्यावर एकच आनंद दिसत होता त्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर…

हिरवी सावर जातीचे बहूउपयोगी झाड तोडल्याप्रकरणी केडीएमसी आयुक्तांकडे तक्रार

हिरवी सावर जातीचे बहूउपयोगी झाड तोडल्याप्रकरणी केडीएमसी आयुक्तांकडे तक्रार कल्याण : डोंबिवली मिलापनगर परिसर हा विविध वृक्षराजीने बहरला आहे. यामुळे या परिसरात आल्यावर एक प्रकारचा पर्यावरणीय आनंद सर्वाना मिळतो. सद्या या परिसरात गटारे नाले, भूमिगत सांडपाणी वाहिन्या यांची कामे चालू आहेत. त्यामुळे काही झाडांना इजा होऊन ती पडतात किंवा सुकून मरून जात आहेत. काही रहिवाशांना आता ही मोठी झालेली काही झाडे नकोशी झाली आहेत. त्यापासून विविध अडचणी आल्याने त्यांना ही झाडे पूर्णपणे तोडून हवी आहेत. त्यासाठी कायदेशीर मार्गाने न जाता झाड तोडणाऱ्यांना कंत्राट देऊन झाडे तोडली जात आहेत. असेच एक मिलापनगर RL-१३० आणि RL-१३१भूखंड मधील रस्त्याचा कडेला असलेले “हिरवी सावर” जातीचे बहुउपयोगी मोठे झाड हे सोमवारी अचानक माणसे आणून तोडण्यात आले. त्यामुळे काही वृक्षप्रेमी हळहळले. मिलापनगर मधील एक वृक्षप्रेमी ज्येष्ठ नागरिक मुकुंद वैद्य यांनी हे झाड बेकायदेशीर तोडण्यास हरकत घेतली असता झाड तोडण्यास सांगणाऱ्या त्या रहिवाशाने त्यास विरोध केला. मुकुंद वैद्य यानी या झाडाच्या फांदया छाटाव्यात व जर पूर्ण झाड तोडायचे असेल तर प्रशासनाकडून रीतसर परवानगी घ्या, असा सल्ला दिला. परंतु त्या रहिवाशाचा हट्टापायी हे “हिरवी सावर” जातीचे बहुउपयोगी झाड पूर्ण तोडले गेले. यामुळे व्यथित होऊन वृक्षप्रेमी मुकुंद वैद्य यानी फोटो सहित याची तक्रार केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे इमेल द्वारे केली आहे. त्या तक्रारीची प्रत त्यानी मिलाप नगर रेसी. वेलफेअर असोसिएशनला दिली आहे. या तक्रारीची दखल घेऊन केडीएमसी कडून यावर काय कार्यवाही होते का ते पाहावे लागेल.

क्रांतिकारी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी महापौर हर्षाली चौधरी यांना निवेदन

क्रांतिकारी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी महापौर हर्षाली चौधरी यांना निवेदन आरती परब डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील पत्रकारांसाठी “पत्रकार विकास योजना” राबवण्या बाबत “क्रांतिकारी पत्रकार संघाच्या” वतीने महापौर यांना निवेदन देण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील पत्रकार आपल्या मूलभूत सुविधा पासून वंचित आहेत. पत्रकार लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. पत्रकार हे लोकशाही टिकवण्यासाठी धडपड करत असतात. आपले जीवन जनतेसाठी समर्पित करून कार्य करत असतात, वेतन नसल्यामुळे या महागाईच्या जमान्यात पत्रकारांची आर्थिक स्थिती बिकट होत चालली आहे व पत्रकारितेतून कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी पुरेसा मोबदला मिळत नसल्याने कौटुंबिक परिस्थिती हलाकीची झाल्याने त्यांना त्यामध्ये जीवन जगावं लागतं आहे. तेव्हा वस्तुस्थिती समजून घेता सहानूभूतीपूर्वक पत्रकार विकास योजना राबवून सहकार्य करावे. प्रामुख्याने पत्रकारांच्या मुलांसाठी शैक्षणिक सुविधा विनामूल्य मिळाव्यात, ज्या पत्रकारांचे स्वतःच घर आहेत त्यांना महानगरपालिके तर्फे घर पट्टी माफ करणे, पालिकेतील रुग्णाल्यातून निशुल्क सुविधा मिळाव्यात, मेडिक्लेम, विमा, आरोग्य सुविधा देण्यात याव्या. शासनाने पत्रकारांसाठी राबवलेले धोरण महानगर पालिकेने लागू करावे. महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्ह्यात पत्रकारांसाठी घरकुलासाठी/भुखंड योजना राबवण्यात आल्या आहेत. तत्कालीन आयुक्त आर. डी. शिंदे, यांनी सन २००८ च्या पत्रकार समारंभात सर्व पत्रकारांसाठी घरासाठी मनपा हद्दीत भूखंड उपलब्ध करून दिला जाईल असे सूचक विधान केले होते. त्यामुळे पत्रकारांसाठी घरकुल योजना किंवा गृह भूखंड योजना राबविण्यात यावी. लोकशाहीचा हा चौथा स्तंभ मजबूत करण्यासाठी ही वस्तुस्थिती डोळ्यासमोर ठेऊन सुविधा, सवलती मिळतील अशा आशयाचे निवेदन संघटनेच्या वतीने महापौरांना देण्यात आले. यावेळी, राष्ट्रीय अध्यक्ष – गुलाबचंद्र यादव, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष – मधुकर वाल्हेकर, राष्ट्रीय सचिव – प्रमोद तांबे, पत्रकार – राजू काऊटकर, पत्रकार – दीपक इंगळे, यांनी निवेदन सादर केले. तसेच अधिक माहिती साठी आमदार विश्वनाथ भोईर, कल्याण, उपमहापौर कल्याण डोंबिवली महानगरपालिका, शहर अभियंता, कल्याण डोंबिवली महानगरपालिका उप आयुक्त सामान्य प्रशासन यांना प्रत रवाना करण्यात आली आहे.

बारावीची परीक्षा आजपासून

बारावीची परीक्षा आजपासून पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे उद्या मंगळवार दिनांक १० फेब्रुवारी पासून राज्यभरात बारावीची परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेसाठी १० हजार ६६४ शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांतील १५ लाख ३२ हजार ४८७…

१२०० कोटींची फसवूणक करणाऱ्या ‘बंटी-बबलीला’ गुंतवणूकदारांनी न्यायालयाच्या आवारातच घेरले

१२०० कोटींची फसवूणक करणाऱ्या ‘बंटी-बबलीला’ गुंतवणूकदारांनी न्यायालयाच्या आवारातच घेरले ठाणे : जादा परताव्याचे अमीष दाखवून गुंतवणूकदारांची  तब्बल १२०० कोटींची फसवणूक करणाऱ्या टीडब्ल्यूजे असोसिएटेड प्रा. लि. या कंपनीच्या संचालकांना आज त्रस्त गुंतवणूकदारांनी न्यायालयाच्या आवारतच…

उल्हासनगरात लेटलतिफांना आयुक्तांचा शिस्तीचा दणका

उल्हासनगरात लेटलतिफांना आयुक्तांचा शिस्तीचा दणका उल्हासनगरः उल्हासनगर महापालिकेत लोकनियुक्त सरकार स्थापन होताच सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पालिका मुख्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला. उशिराने आलेल्या प्रवाशांना थेट पालिका मुख्यालयातच प्रवेश नाकारण्यात आल्याने कर्मचाऱ्यांची पहिल्याच…

महाराष्ट्रातील ख्रिश्चन समुदाय राजकारणात नामशेष होण्याच्या मार्गावर ?

महाराष्ट्रातील ख्रिश्चन समुदाय राजकारणात नामशेष होण्याच्या मार्गावर ? कल्याण : महाराष्ट्र आणि देशाच्या प्रगती आणि विकासात ख्रिश्चन समुदायाचे योगदान दुर्लक्षित करता येणार नाही, तरीही गेल्या ४० वर्षांत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एकाही ख्रिश्चन व्यक्तीला संधी देण्यात आलेली नाही. विखुरलेल्या ख्रिश्चन मतपेढीमुळे आज महाराष्ट्रात या समुदायाचा कोणताही आमदार निवडणूक जिंकू शकत नाही हे वेगळे आहे. तथापि, ख्रिश्चन समुदायाला प्रतिनिधित्व देण्यासाठी, महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी उदारता दाखवून विधान परिषदेच्या माध्यमातून एका ख्रिश्चन सदस्याला मंत्रिमंडळात स्थान देऊन इतिहास घडवला. परंतु दुःखाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात ख्रिश्चन समुदायाशी अनेकदा भेदभाव केला गेला आहे, म्हणूनच आजही महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगावर एकाही ख्रिश्चन व्यक्तीची नियुक्ती झालेली नाही यावरून हे सिद्ध होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते नोवेल साळवे यांनी केला आहे. ज्याप्रमाणे सर्व धर्म आणि जातीच्या लोकांना राजकारणात त्यांच्या समुदायाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली जाते, त्याप्रमाणे ख्रिश्चन समुदायातील लोकांनाही राजकारणात त्यांच्या समुदायाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली पाहिजे अशी मागणी साळवे यांनी केली आहे.