Category: ठाणे

Thane news

 केडीएमसीच्या “डिप क्लीनिंग” विशेष स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ

केडीएमसीच्या “डिप क्लीनिंग” विशेष स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ महापौर हर्षाली चौधरी थविल, उपमहापौर राहुल दामले यांच्याहस्ते मोहिमेला सुरवात कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका, घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत महापौर हर्षाली चौधरी थविल व उपमहापौर राहूल दामले यांच्या हस्ते दुर्गाडी किल्ला येथून दुर्गा देवीचे दर्शन घेऊन “डिप क्लीनिंग” विशेष स्वच्छता मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला. ही मोहीम सर्व प्रभागक्षेत्रात सुरुवात करण्यात आलेली आहे. ९ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत हि विशेष स्वच्छता मोहीम दैनंदिन सर्व प्रभागक्षेत्रात सुरु राहणार आहे. या प्रसंगी घनकचरा व्यवस्थापन उप आयुक्त रामदास कोकरे यांनी प्रस्तावना करुन स्वच्छता मोहीम राबविणे का आवश्यक आहे व त्याचे महत्व काय? याबाबत नागरीकांचा सहभाग अपेक्षित आहे असे सांगितले. तर आयुक्त अभिनव गोयल यांनी सर्वकष स्वच्छता ठेवुन शहर शाश्वत स्वच्छ कसे राहिल या करिता व मानांकन उंचावणेकरीता नगरसेवक व नागरिक यांनी सहकार्य करण्याचे आश्वासीत केले. उप महापौर राहूल दामले यांनी सुध्दा शहर स्वच्छ ठेवण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न करावेत. महापौर हर्षाली चौधरी थविल यांनी अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग यांनी संपूर्ण शहर तसेच ग्रामिण विभाग सुध्दा सर्वकष विशेष स्वच्छता मोहीम राबवून शहराचे मानांकन उंचावण्याचे आदेश उप आयुक्त व सर्व अधिका-यांना दिले. अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. या प्रसंगी महापौर, उप महापौर, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उप आयुक्त, नगरसेवक अस्मिता मोरे, विजया पोटे, शालिनी वायले, रेखा चौधरी, समिना शेख, गणेश जाधव, गणेश लांडगे, उमेश बोरगांवकर, मोरेश्वर भोईर, जयवंत भोईर, रमेश जाधव, कांचन कुलकर्णी, जतिन प्रजापती, तसेच सहा. आयुक्त प्रीती गाडे, मुख्य स्वच्छता अधिकारी आगस्तिन घुटे,  स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक व सफाई कर्मचारी उपस्थित होते.

बिर्ला कॉलेजचा वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न

बिर्ला कॉलेजचा वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न कल्याण : बी.के. बिर्ला कॉलेजमधील शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभागाने ऊर्जा-३ या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले होते. दोन दिवसांच्या या क्रीडा महोत्सवात वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील १,५९६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शिक्षण संचालक डॉ. नरेश चंद्र, प्राचार्य डॉ. अविनाश पाटील, शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. अनिल तिवारी आणि क्रीडा संचालक डॉ. वाय.डी. बागराव, प्रा. रोहिणी पाटील, दर्शन फुले यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी बॉक्स क्रिकेट मैदान, लांब उडी पिट, शॉट पुट आणि डिस्कस थ्रो यासारख्या नवीन क्रीडा सुविधांचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी बुद्धिबळ, टेबल टेनिस आणि फ्री फायर सारख्या एकाग्रता वाढवणाऱ्या खेळांमध्ये भाग घेतला. दुसऱ्या दिवशी, त्रिस्तरीय दौड़ स्पर्धा, लांब उडी, शॉट पुट, टग ऑफ वॉर, कॅरम, बॅडमिंटन, बीजीएमआयई क्रीडा आणि इतर खेळांचे आयोजन करण्यात आले. या काळात ‘फन स्टॉल’ देखील विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र राहिले. बिर्ला कॉलेज गेल्या दशकापासून क्रीडा क्षेत्रात सतत नवीन उंची गाठत आहे. महाविद्यालयाच्या क्रीडा विभागात शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी बॉक्सिंग आणि कुस्तीच्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आणि फ्रान्स आणि जर्मनीमध्ये योगा आणि रग्बीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपली उपस्थिती दर्शविली आहे. खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ओ.आर. चितलांगे यांचे सहकार्य, डॉ. नरेश चंद्र यांचे प्रोत्साहन आणि प्राचार्य डॉ. अविनाश पाटील यांचे सहकार्य नेहमीच उपलब्ध असते. विद्यार्थ्यांना क्रीडाविषयक अनेक आधुनिक सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जातात.

दिल्ली ते मुंबई ‘हिंदायान सायक्लोथॉनला’ महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी दाखवला झेंडा

दिल्ली ते मुंबई ‘हिंदायान सायक्लोथॉनला’ महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी दाखवला झेंडा अनिल ठाणेकर ठाणे: भारत सरकारच्या युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय तसेच संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने दिल्लीपासून ३० नोव्हेंबर रोजी सुरू झालेली हिंदायान सायक्लोथॉन ठाणे येथून मुंबईकडे निघाली. या सायक्लोथॉनला महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील यांनी महापालिका भवन येथे हिरवा झेंडा दाखवून सायकलस्वारांना शुभेच्छा दिल्या. या हिंदयान सायक्लोथॉनमध्ये उत्स्फूर्तपणे सायकलप्रेमी सहभाग घेतला. तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटातील सायकलस्वारांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. महिलांचा सहभागही मोठ्या प्रमाणात असल्याने या उपक्रमाला अधिक बळ मिळाले. महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांनी सायकलप्रेमींना शुभेच्छा दिल्या. त्यांनी प्रत्येक सायकलस्वाराशी संवाद साधत त्यांच्या अनुभवांबाबत जाणून घेतले.भारतात सायकलिंगला शाश्वत, आरोग्यदायी व पर्यावरणपूरक वाहतूक माध्यम म्हणून प्रोत्साहनदेणे हा या मागचा उद्देश आहे , दिल्लीपासून सुरू झालेला हा प्रवास ठाण्यातून मुंबईपर्यंत पोहोचत आहे, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.”असे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी नमूद केले. उपमहापौर कृष्णा पाटील यांनी ‘फिट इंडिया’ उपक्रमांतर्गत या सायक्लोथॉनचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, “सायकलिंग हा उत्तम व्यायाम असून तो शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक क्षमता वाढवतो. भविष्यात अशा उपक्रमांमध्ये अधिकाधिक लोकांचा सहभाग वाढला पाहिजे असेही ते म्हणाले.ठाणे महानगरपालिकेपासून सुरू झालेल्या सायक्लोथॉनचा कुलाबा मिलिटरी स्टेशन, मुंबई येथे समारोप  झाला. यावेळी मेजर सागर सावंत यांच्या हस्ते प्रत्येक सायकलप्रेमींना आकर्षक पदक देऊन गौरविण्यात आले. यावेळी विष्णुदास चापके यांनी या सायक्लोथॉन आयोजनामागील उद्देश स्पष्ट करत भविष्यात अधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी हिंदायान फाऊंडेशनचे प्रमुख विष्णुदास चापके, आम्ही सायकल प्रेमी फाऊंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे, सदस्य अमोल कुळकर्णी, ठाणे महानगरपालिकेच्या प्र.उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर, दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहाचे कर्मचारी उपस्थित होते.

प्रल्हाद भांगले स्मृती कनिष्ठ गटाची मैदानी स्पर्धा

प्रल्हाद भांगले स्मृती कनिष्ठ गटाची मैदानी स्पर्धा ठाणे: सिम्पथिझर्स स्पोर्ट्स क्लब तर्फे ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे माजी सचिव, मुंबई विद्यापीठाचे ५००० मिटर धावण्याच्या शर्यतीतील विक्रमवीर,माजी राष्ट्रीय धावपटू प्रल्हाद भांगले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १४ वी ठाणे शहर मर्यादित आंतरशालेय मैदानी (ॲथलेटिक्स) स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. श्री मावळी मंडळाच्या क्रीडांगणावर १४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या रंगणाऱ्या या स्पर्धेत ८ ते १४ वर्ष वयोगटाच्या एकंदरीत आठ गटांच्या मुले – मुलींच्या स्पर्धा होतील. विनामूल्य असलेल्या या स्पर्धेत विजेत्यांना रोख बक्षिसे, पदकं आणि प्रमाणपत्र आणि सांघिक विजेतेपद देऊन गौरवण्यात येईल. आयोजकांना स्पर्धेत ७०० छोट्या धावपटूंचा सहभाग अपेक्षित आहे. अधिक माहिती आणि स्पर्धेच्या प्रवेशिकेसाठी ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव अशोक अहेर यांचेशी  (९८२०४९७९३७) संपर्क साधावा.

 श्री माँ विद्यालयात २५ वी आंतरशालेय विज्ञान प्रकल्प स्पर्धा संपन्न

श्री माँ विद्यालयात २५ वी आंतरशालेय विज्ञान प्रकल्प स्पर्धा संपन्न ठाणे : श्री माँ विद्यालय, पातलीपाडा, ठाणे (प) यांच्या विद्यमाने ७ फेब्रुवारी दिवशी आयोजित केलेल्या २५ व्या आंतरशालेय विज्ञान प्रकल्प स्पर्धेचे व शालांतर्गत प्रदर्शनाचे उद्घाटन श्री माँ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे चेअरमन बालगोपाल यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले.   यावेळी एफडीए महाराष्ट्रचे असिस्टंट कमिशनर योगेश ढाणे, छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण मुंबईच्या आरोग्य अधिकारी एम महेश्वरी, ठाणे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम तसेच श्री माँ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे सेक्रेटरी रमेश जोशी, विश्वस्त मिस मंजू तेजवानी, चित्रा अय्यर, प्रिन्सिपॉल मिनी नायर, व्हाईस प्रिन्सिपॉल मेघना वांगे आणि रमा अनंतरामन यांचीही उपस्थिती लाभली. विज्ञान प्रकल्पासाठी विविध बुध्दीगम्य विषय देण्यात आले. विज्ञान प्रदर्शनासाठी ठाणे जिह्यातील २२ शाळांचा समावेश होता. आंतरशालेय ३० प्रकल्प, तसेच वार्षिक ४०० प्रकल्प आयोजित केले होते. इयत्ता पाचवी ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी – दैनंदिन जीवनात बायोप्लास्टीकचा वापर, विज्ञान आणि स्वच्छ उपग्रह तसेच आठवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी – मानवतेसाठी तंत्रज्ञान, पर्यावरण पूरक भविष्यातील वाहतूक हे विषय देण्यात आले आहेत. श्री माँ स्नेहदिप ट्रस्ट संचालित श्री माँ स्नेहदिप स्कूलच्या विशेष विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात सहभाग दिला असून त्यांनी विविध विषयावरील शैक्षणिक साधनांवर तयार केलेल्या प्रकल्पांची मांडणी केली आहे. यावेळी उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल उपस्थित प्रमुख पाहुणे विद्यार्थी व पालकांनी श्री माँ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे कौतुक करत आभार मानले तसेच श्री माँ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या वतीने ही सर्वांचे आभार मानण्यात आले.

मन, मनगट, आणि मेंदू यांनी आपल्या मुलांना सक्षम बनवणे म्हणजे राष्ट्र उभारणीच – सुमेधा चिथडे

मन, मनगट, आणि मेंदू यांनी आपल्या मुलांना सक्षम बनवणे म्हणजे राष्ट्र उभारणीच – सुमेधा चिथडे कल्याण : “मुलांवर आपण काय संस्कार करतो त्यांना काय शिकवतो ? इतिहास चुकीचा समजल्यामुळे भूगोल…

केंद्र सरकारच्या मालकधार्जिणे व कामगारविरोधी धोरणाविरुद्ध १२ फेब्रुवारीला देशव्यापी संप – हरभजन सिंग सिद्धू

केंद्र सरकारच्या मालकधार्जिणे व कामगारविरोधी धोरणाविरुद्ध १२ फेब्रुवारीला देशव्यापी संप – हरभजन सिंग सिद्धू अनिल ठाणेकर ठाणे : केंद्र सरकारच्या या मालक धार्जिणे व कामगार धोरणाविरुद्ध १२ फेब्रुवारी २०२६ रोजी…

तिसगांव पाडा, विजयनगर प्रभागातील प्रलंबीत रस्तामुळे नागरीक त्रस्त

तिसगांव पाडा, विजयनगर प्रभागातील प्रलंबीत रस्तामुळे नागरीक त्रस्त काम त्वरीत मार्गी लावण्यासाठी नगरसेवक महेश गायकवाड यांनी अधिकाराऱ्यांना धरले धारेवर कल्याण : कल्याण पूर्वेतील विजय नगर प्रभागातील सम्राट अशोक विद्यालय ते…

 चिन्मय मिशनच्या ठाणे केंद्रामध्ये अमृत्व महोत्सव प्रित्यर्थ गुरुपादुका पूजन सोहळा संपन्न

चिन्मय मिशनच्या ठाणे केंद्रामध्ये अमृत्व महोत्सव प्रित्यर्थ गुरुपादुका पूजन सोहळा संपन्न ठाणे – परमपूज्य स्वामी चिन्मयानंद यांनी वेदांताचा प्रामुख्याने श्रीमद्भगवद्गीतेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी स्थापन केलेल्या विश्वव्यापी चिन्मय मिशनला…

अंजना उबाळे यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न

अंजना उबाळे यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न ठाणे : शहापूर तालुक्यातील साठगाव येथील रहिवासी असलेल्या अंजना तानाजी उबाळे या भिवंडी परिमंडळ पोलीस उपायुक्त कार्यालयात सळग ३१ वर्षे चतुर्थ श्रेणी पदावरून आपली सेवा करून अलीकडेच सेवानिवृत्त झाल्या आहेत.काल त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम साठगाव येथे आयोजित करण्यात आला होता.त्यांनी  उत्तम सेवा बजावली.त्याच्या सेवेच्या कामगिरी बद्दल ठाणे पोलिस आयुक्त ठाणे शहर आशुतोष डुंबरे यांनी त्यांच्या कार्याचा सन्मानपत्र देऊन गौरव केला आहे. या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते मधुकर उबाळे,जेष्ठ पत्रकार  बी.डी. गायकवाड,पत्रकार अविनाश उबाळे, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी मारुती चन्ने,डॉ.  बी.बी. प्रधान,कुमार उबाळे,गोविंद विशे,लक्ष्मण विशे,दीपक गायकवाड,मनोहर गायकवाड,जगन गायकवाड,राज जाधव भिवंडी पोलीस उपायुक्त कार्यालयातील कर्मचारी,साठगावचे पोलीस पाटील सचिन गायकवाड गावातील ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.या वेळी भीमाई संस्थेचे अध्यक्ष घनश्याम गायकवाड, पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले.उपस्थित मान्यवरांनी सेवापूर्ती समारंभाच्या निमित्ताने आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे  बौद्धाचार्य  मनोज गायकवाड यांनी केले. उपस्थितांचे आभार घनश्याम गायकवाड यांनी मानून कार्यक्रमाची सांगता केली.