Category: ठाणे

Thane news

  गांधारी रिंगरोडवरील भरधाव वाहनांवर कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी

गांधारी रिंगरोडवरील भरधाव वाहनांवर कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी उपविभाग प्रमुख कुणाल कुलकर्णी यांचे सहाय्यक पोलीस आयुक्तांना पत्र कल्याण: कल्याण पश्चिमेतील गांधारी वडवली रिंगरोड येथे वाहनचालक अतिवेगाने वाहने चालवत असल्याने वारंवार अपघाताच्या घटना घडत असून या अपघाताला कारणीभूत असलेल्या भरधाव वाहनांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना विभाग उपप्रमुख कुणाल कुलकर्णी यांनी वाहतूक विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांना पत्र दिले आहे. गांधारी वडवली रिंगरोड हा रस्ता पूर्णत्वास आलेला नाही. या रस्त्यावर दिवसा व रात्रीच्या वेळी भरधाव दुचाकीस्वार व चारचाकी वाहन चालक आपल्या वाहनांची रेसिंग लावून इतर नागरिकांचा जीव धोक्यात घालत आहेत. नुकताच काही दिवसांपूर्वी याठिकाणी अपघात होऊन एक जण गंभीर जखमी झाला आहे. भरधाव वाहनांच्या वेगामुळे मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याठिकाणी स्पीडगन, दुभाजक, गतिरोधक लावून ठोस कारवाई करण्याची मागणी शिवसेना उपविभाग प्रमुख कुणाल कुलकर्णी यांनी केली आहे. दरम्यान कुलकर्णी यांच्या पत्रानंतर वाहतूक पोलीस सतर्क झाले असून रिंगरोडवर बंदोबस्त लावून वाहनचालकांची तपासणी करत कारवाई केली आहे.

 कल्याण पश्चिमेतील गोविंद वाडी परिसराची महापौर हर्षाली चौधरी यांनी केली पहाणी

कल्याण पश्चिमेतील गोविंद वाडी परिसराची महापौर हर्षाली चौधरी यांनी केली पहाणी नागरिकांशी साधला थेट संवाद कल्याण : कल्याण पश्चिमेतील गोविंद वाडी परिसराची केडीएमसी महापौर हर्षाली चौधरी यांनी स्वतः पायी फिरून पहाणी केली आणि तेथील रहिवाशी असलेल्या मुस्लिम बांधवांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांनी यावेळी सदर परिसरातील स्वच्छतेची पाहणी केली.  गोविंद वाडी परिसरात ड्रेनेजचे पाणी तुंबत असल्याबाबत पालिका सदस्या समीना शेख यांनी केलेल्या तक्रारीवरून तेथील मलनिस्सारण व्यवस्थेची देखील त्यांनी  पाहणी केली आणि सदर तक्रारीचे  निराकरण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. यावेळी महापालिका सचिव किशोर शेळके, उपायुक्त रामदास कोकरे, मलनिस्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद सखदेव, काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी त्यांच्या समवेत उपस्थित होत्या. यावेळी नवनिर्वाचित महापौरांचा सत्कार करण्यासाठी नागरिक पुढे सरसावले असता आधी तुमची कामे होऊ द्यात, नंतर सत्कार करा असे सांगत महापौरांनी आपल्या सहृदयतेने नागरिकांची मने जिंकली.

मालमत्ता कर वसुलीच्या कामातील हलगर्जीपणासाठी दोन लिपिकांवर निलंबनाची कारवाई

मालमत्ता कर वसुलीच्या कामातील हलगर्जीपणासाठी दोन लिपिकांवर निलंबनाची कारवाई कल्याण: मालमत्ता कर वसुलीच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ९ आय प्रभागातील दोन लिपिकांवर कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी निलंबनाची कडक कारवाई केली. मालमत्ता कर वसुलीच्या उददीष्टपुर्तीसाठी कर संकलन विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामार्फत अथक प्रयत्न करण्यात येत आहेत. आज आयुक्त अभिनव गोयल यांनी कर वसुलीसंदर्भात समक्ष महानगरपालिकेच्या ९ आय व १० इ प्रभागात भेट दिली आणि दोन्ही प्रभागांचे सहायक आयुक्त, कर अधिक्षक व कर विभागातील भाग लिपिक यांच्या समवेत कर वसुलीबाबत सविस्तर बैठक घेवून, वसुलीच्या सद्यस्थितीबाबत  एकंदर आढावा घेतला. या बैठकीत भाग लिपिकांशी चर्चेअंती अत्यंत कमी प्रमाणात कर वसुलीस जबाबदार असणा-या ९ आय प्रभागातील भाग लिपिक अरविंद काळण व राजेंद्र पाटील यांच्यावर कामातील हलगर्जीपणाबाबत तातडीने निलंबनाची कारवाई करत, कर वसुलीचे उद्दिष्टपूर्तीसाठी  अधिक गांभीर्याने काम करण्याबाबत अधिकारी व कर्मचारी वर्गास सक्त निर्देश दिले. यावेळी, कर वसुलीसाठी  प्रभागात पहाणी करीत असताना कर लावण्यास अटकाव करणा-या  सुमारे ४ अनधिकृत अनिवासी मालमत्तावर निष्कासनाची  धडक कारवाई देखिल करण्यात आली. मार्च महिना हा कर संकलनाचा या आर्थिक वर्षातील शेवटचा महिना असून, कर चुकवेगिरी करणा-यांवर तसेच कर वसुलीच्या कामात जाणीवपुर्वक निष्काळजीपणा दाखविणा-या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर देखिल कडक कारवाई केली जाईल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी दिली आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, कर विभागाचे उपआयुक्त बाळासाहेब चव्हाण उपस्थित होते.

महानगरपालिका मुख्यालयात भिक्षा मागून करवाढ विरोधात शिवसेनेचा निषेध

महानगरपालिका मुख्यालयात भिक्षा मागून करवाढ विरोधात शिवसेनेचा निषेध मिरा -भाईंदर महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी पक्षाने सुचवलेल्या ६०% करवाढीविरोधात शिवसैनिकांनी तीव्र निषेध केला. शेकडो शिवसैनिकांनी महानगरपालिका मुख्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले आणि सत्ताधारी पक्षाविरुद्ध भीक मागून आणि घोषणाबाजी करून आपला निषेध नोंदवला. निदर्शनादरम्यान, शिवसैनिकांनी एका पेटीत भिक्षा मागत सत्ताधारी पक्षासाठी “देणगी” असे म्हटलं आणि त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली. संतप्त कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेचे मुख्य गेट जबरदस्तीने उघडले आणि आवारात प्रवेश केला. पोलिसांच्या वारंवार प्रयत्नांनंतरही, ते महापौरांना भेटून निवेदन सादर करण्याच्या त्यांच्या मागणीवर कायम राहिले. महापौर त्यांच्या दालनात उपस्थित नसताना, शिवसैनिकांनी महापौरांच्या दालनासमोर घोषणाबाजी केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर, शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेतली, निवेदन सादर केले आणि वाढीव करदर तात्काळ मागे घेण्याची मागणी केली. या प्रसंगी, शिवसेना नेते सचिन मांजरेकर यांनी सत्ताधारी पक्षावर तीव्र हल्ला चढवला आणि म्हटले की, करवाढ ही कोणत्याही जनहित धोरण नाही तर “पैशाची भूक” आहे. त्यांनी उपहासात्मक टिप्पणी केली की, “जर सत्तेत असलेल्यांना पैशांची इतकी कमतरता असेल, तर आम्ही शिवसैनिक भीक मागू आणि पैसे वसूल करू, परंतु आम्ही जनतेवर अतिरिक्त कर लादू देणार नाही.” दरम्यान, शिवसेना नेते विक्रम प्रताप सिंह यांनी सांगितले की, आर्थिक बळाच्या जोरावर निवडणुका जिंकल्यानंतर, सत्ताधारी पक्ष आता जनतेकडून पैसे उकळू इच्छित आहे. त्यांनी आरोप केला की नवीन आणि जुन्या घरांवरील कराबाबत गोंधळ पसरवला जात आहे, तर प्रत्यक्षात या निर्णयाचा थेट परिणाम शहरातील कायमस्वरूपी रहिवाशांवर होईल. याला “तुघलकी फर्मान” म्हणत त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, शिवसेना या कराचा तीव्र विरोध करत राहील. जर करवाढ मागे घेतली नाही तर आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. सेव्हन इलेव्हन कंपनीचे ७८ कामगार महासभा चालवत आहेत-निशा नार्वेकर निदर्शनादरम्यान, शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा निशा नार्वेकर यांनी सत्ताधारी पक्षावर तीव्र हल्ला चढवला आणि म्हणाल्या की महासभा जनहिताकडे दुर्लक्ष करत आहे आणि केवळ सत्ताधारी पक्षाच्या फायद्यासाठी ठराव मंजूर करत आहे. त्यांनी आरोप केला की कर मनमानी पद्धतीने वाढवला जात आहे आणि महासभेत काम करणारे लोक भाजप बहुमताने निवडून आलेल्या नगरसेवकांसारखे नाही तर सेव्हन इलेव्हन कंपनीच्या ७८ कामगारांसारखे वागत आहेत आणि सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्यावर निर्णय घेत आहेत.

 ठाणे महापालिकेच्या महासभांचे ऑनलाईन थेट प्रक्षेपणाची मागणी

ठाणे महापालिकेच्या महासभांचे ऑनलाईन थेट प्रक्षेपणाची मागणी भाजपाच्या नगरसेविका नम्रता कोळी यांचे महापौरांना पत्र ठाणे,   : ठाणे महापालिकेच्या ५ मार्चपासून होणाऱ्या महासभांचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण करावे, अशी मागणी भाजपाच्या नगरसेविका…

  प्रभाग क्र. ८ मध्ये पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास काँग्रेस पक्षातर्फे आंदोलनाचा इशारा

प्रभाग क्र. ८ मध्ये पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास काँग्रेस पक्षातर्फे आंदोलनाचा इशारा नगरसेविका कांचन कुलकर्णी आक्रमक कल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कल्याण पश्चिमेतील प्रभाग क्र. ८ मध्ये गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास कॉंग्रेस पक्षातर्फे आंदोलन करण्याचा इशारा नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. प्रभाग क्र. ८ या प्रभागात बहुसंख्य मुस्लिम बांधव वास्तव्यास असून सध्या पवित्र रमजान महिना सुरू आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना गेल्या दहा दिवसांपासून बिना पाण्याचे राहावे लागत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. निवडणुकीच्या काळात या भागात पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात पुरवले जात होते. मात्र निवडणुकीनंतर अचानक पाणीपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पुढील आठ दिवसांच्या आत प्रभाग क्र. ८ मधील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत व नियमित करावा, अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने आयुक्त, महापौर तसेच संबंधित अधिकारी यांच्या निवासस्थानाबाहेर तीव्र आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनातून उद्भवणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाची राहील असा इशारा नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी दिला आहे.

पाच हजार कर्मचाऱ्यांना दिलासा, कंत्राटी शिक्षकही होणार कायम – संजय केळकर

पाच हजार कर्मचाऱ्यांना दिलासा, कंत्राटी शिक्षकही होणार कायम – संजय केळकर ठाणे-ठाणे महापालिकेत झालेल्या संयुक्त बैठकीत आयुक्तांनी दिलेल्या तत्वतः मान्यतेनुसार सुमारे फायलेरिया विभागात कर्मचाऱ्यांसह पाच हजार कंत्राटी कामगारांना दिलासा मिळणार…

 अनिवार्य `वंदे मातरम’चा निर्णय ठाण्याच्या महापौरांनी टाळला

अनिवार्य `वंदे मातरम’चा निर्णय ठाण्याच्या महापौरांनी टाळला नगरसेविका अर्चना मणेरा यांची नाराजी ठाणे: केंद्र सरकारने राष्ट्रीय गीत `वंदे मातरम’चे पूर्ण गीत अनिवार्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, ठाणे महापालिकेच्या प्रत्येक महासभेत सहा…

ठाणे, नवीमुंबई महानगपालिकेत भाजपाची शिंदेंच्या शिवसेनेला ठसण

 ठाणे महानगर पालिकेच्या महासभेत व्यासपीठ सोडून भाजपाचे उपमहापौर मैदानात नवी मुंबईत भाजपाच्या महापौरांना शिवसेना नगरसेवकांचा घेराव, केला सभात्याग स्वाती घोसाळकर ठाणे : राज्यात आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले असून महायुतीतील भाजापा आणि…

 ‘मोर्चा’ या कथेस प्रथम क्रमांक तर ज्ञान तेच देव या कथेस द्वितीय क्रमांक

राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धा संपन्न ‘मोर्चा’ या कथेस प्रथम क्रमांक तर ज्ञान तेच देव या कथेस द्वितीय क्रमांक कल्याण : नाट्य रसिकहो कल्याण आयोजित राज्यस्तरीय कथा साहित्य अभिवाचन स्पर्धेत इरसाल स्टोरी टेलर्स, मुंबई यांनी सादर केलेल्या “मोर्चा” या कथेचे अभिवाचन प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहे. तसेच ज्ञान वैखरी, पुणे या संस्थेने सादर केलेल्या “ज्ञान तेच देव” या कथा अभिवाचनास द्वितीय क्रमांकाचे व प्रायोगिक रंगमंच संघ, मुंबई यांनी सादर केलेल्या “राडा” या कथा अभिवाचनास तृतीय क्रमांक जाहीर झाला आहे. तसेच  स्टुडिओ- ६४ पुणे या संस्थेच्या “डियर फादर”, सुमंगल फाउंडेशन कल्याण या संस्थेच्या “गुडघ्या एवढ्या महापुराची कहाणी” व प्रायोगिक रंगमंच संघ, मुंबई  यांच्या बेईमान या कथा अभिवाचनाला सांघिक उत्तेजनार्थ क्रमांक जाहीर झाला असल्याचे नाट्य रसिकहोचे अध्यक्ष व प्रमुख आयोजक सुरेश पवार यांनी सांगितले. या राज्यस्तरीय कथा साहित्य अभिवाचन स्पर्धेसाठी मुंबई, पुणे, नाशिक ठाणे तसेच कल्याण डोंबिवली मधील एकूण २३ संघांचा सहभाग होता. कल्याण मधील आचार्य अत्रे रंगमंदिर येथील कॉन्फरन्स हॉलमधील या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ करिता नगरसेविका आर्या नाटेकर, ज्येष्ठ साहित्यिक व रंगकर्मी भिकू बारस्कर, नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे कार्यकारणी सदस्य शिवाजी शिंदे, नाट्य परिषद कल्याण शाखेचे अध्यक्ष रवींद्र सावंत, बालरंगभूमी परिषद कल्याण अध्यक्षा सुजाता डांगे, ज्येष्ठ अभिनेते राम दौंड, आनंद जाधव, सुधीर चित्ते, डॉ. प्रदीप सरवदे, किरण डांगे आणि राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे ठाणे जिल्हाध्यक्ष हेमंत यादगिरे यांच्या हस्ते संपन्न झाले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून ज्येष्ठ नाट्य अभ्यासक आणि चतुरस्त्र रंग कर्मी अरुण कदम व आकाशवाणी वृत्त निवेदिका तसेच अनेक अभिवाचन कार्यक्रमाच्या अनुभव असलेल्या श्रद्धा वझे यांनी परीक्षण केले. नाट्य रसिकहो अध्यक्ष म्हणून बोलताना सुरेश पवार म्हणाले की, यंदाचे या स्पर्धेचे हे सातवे वर्ष आहे. व यंदाचा प्रतिसाद हा अधिकच सुखावह असाच असल्याने यापुढे सदर स्पर्धा अधिकाधिक आकर्षक व दर्जेदार करण्यासाठी निश्चितच कटिबद्ध राहू असे सांगितले.  याप्रसंगी अभिनेते सुधाकर वसईकर, अविनाश साळवी, विशाल राऊत, निलेश शास्त्री, किरण खांडगे, माणिक शिंदे, सिताराम शिंदे, महेश जोशी, हेमंत कर्णिक, डोंगरे, आदी मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित होती.