`नृत्यविविधा’ या विशेष नृत्य कार्यक्रमाचे आयोजन
श्री गणराज नृत्य कला निकेतन, ठाणे या संस्थेच्या २५ व्या वर्धापन दिननिमित्त `नृत्यविविधा’ या विशेष नृत्य कार्यक्रमाचे आयोजन ठाणे -भारतीय शास्त्रीय नृत्य परंपरेचे जतन व संवर्धन करणाऱ्या श्री गणराज नृत्य…
शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर यांची ठाणे महापौरपदी तर भाजपचे कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी निवड
शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर यांची ठाणे महापौरपदी तर भाजपचे कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी निवड अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक आज पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत ठाणे शहराच्या महापौरपदी शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर यांची, तर उपमहापौरपदी भारतीय जनता पक्षाचे कृष्णा दादू पाटील यांची निवड झाल्याची अधिकृत घोषणा पीठासीन अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी केली. मंगळवारी, ३ फेब्रुवारी, सकाळी ११.३० वाजता ठाणे महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस पीठासीन अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, जिल्हाधिकारी, ठाणे तसेच महापालिका सचिव मनीष जोशी उपस्थित होते. महापौर व उपमहापौरपदाच्या निवडीची घोषणा झाल्यानंतर ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी नवनिर्वाचित महापौर शर्मिला पिंपळोलकर व उपमहापौर कृष्णा पाटील यांचे तुळशीचे रोप देऊन अभिनंदन व स्वागत केले.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सीएसआर निधीतून तिसरा सोलर हायमास्ट
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सीएसआर निधीतून तिसरा सोलर हायमास्ट कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात शाश्वत विकासावर भर देवून शहराचा विकास करण्याचा महापालिका आयुक्त अभिनव गोयल, यांचा मानस आहे. तसेच महापालिका क्षेत्रात लोकोपयोगी उपक्रम हे कॉरपोरेट सामाजिक जबाबदारी निधी मधून कामे हाती घेण्यात यावी व त्यासाठी महापालिका अधिकारी यांनी पाठपुरावा करावा, असे महापालिका आयुक्त यांचे धोरण आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सहजानंद चौक कल्याण (प) येथे तिसरा सोलार हायमास्ट हा मे. बजाज इलेक्ट्रिकल या कंपनीने कॉरपोरेट सामाजिक बांधिलकी निधीतून उपलब्ध करुन दिला असून सोलार हायमास्ट फिटींग्सचे लोकार्पण सोमवारी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्याहस्ते संपन्न झाले. उदघाटनावेळी विद्युत यांत्रिकी विभागाचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत, कार्यकारी अभियंता जितेंद्र शिंदे, उप अभियंता भागवत पाटील व मे. बजाज इलेक्ट्रिकल कंपनीचे रिजनल हेड सरोज कुमार व ओरीया हेड तरण कोहली उपस्थित होते. महापालिका क्षेत्रात आतापर्यंत तीन सोलार हायमास्ट कॉरपोरेट सामाजिक जबाबदारी निधी मधून उभारण्यात आलेले आहेत. कल्याण (प) गणपती चौक गांधारे, इंदिरानगर चौक डोंबिवली (पूर्व) व सहजानंद चौक, कल्याण (प) या ठिकाणी सोलार हायमास्ट उभारण्यात आले आहेत. सोलार हायमास्ट हे सुर्याच्या किरणांवर कार्यान्वित होणार असून त्यास विजेची गरज नाही तसेच महावितरण कंपनीची विज खंडीत झाल्यानंतर सुध्दा हे सोलार हायमास्ट कार्यान्वित राहतील, त्यामुळे चौकात प्रकाश राहणार असल्याने नागरीकांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ होणार आहे. तसेच महापालिका क्षेत्रातील १४४ हायमास्ट पैकी उर्वरीत १४१ हायमास्ट हे सोलार हायमास्ट करण्यासाठी नगरविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडे प्रस्ताव पाठविले असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.
डोंबिवली पश्चिमेतील कमी दाबाच्या पाणी पुरवठ्याकडे भाजपाने वेधले लक्ष
डोंबिवली पश्चिमेतील कमी दाबाच्या पाणी पुरवठ्याकडे भाजपाने वेधले लक्ष पाणीपुरवठा नियमित करण्याची प्रकाश भोईर यांची मागणी कल्याण : डोंबिवली पश्चिमेतील काही प्रभागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून याकडे भारतीय जनता पार्टीने लक्ष वेधले आहे. माजी नगरसेवक तथा भाजपाचे प्रकाश भोईर यांनी केडीएमसी आयुक्तांना पत्र देऊन जास्त दाबाने आणि नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. डोंबीवली पश्चिमेतील प्रभाग क्र २२ सहयाद्री नगर, राजूनगर, सरोवर नगर, गरिबाचा वाडा, साई नगर, शंकेश्वर नगर तसेच महालक्ष्मी चौक, या परिसरामध्ये बऱ्याच प्रमाणावर पाणी पुरवठा कमी दाबाने येत असून काही ठिकाणी दिवसातून एका तासापेक्षा कमी पाण्याचा वेळ मिळत असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई आहे. तसेच केडीएमसीचा टैंकर पुरवठा वेळेवर व पुरेसा होत नसल्याने दोन-अडीच हजार रु. देऊन खाजगी टैंकर आणावे लागतात. काही ठिकाणी दुपारच्या वेळेत पाणी असल्याने गृहिनींना घरची काम आटपून मुलांना शाळेत सोडणे तसेच बाकीच्या दैनंदीन कामातून वेळ काढणे कठीण होते. शासनाच्या माध्यमातून अमृत योजनेतून राजू नगर व गरिबाचा वाडा या ठिकाणी पाण्याच्या टाक्या बांधण्याचे काम अत्यंत प्रकाश धिम्या गतिने सुरू असल्याने भविष्यात हे काम कधी होईल हे सांगता येत नाही. तसेच हे झाले तरी डोबिंवली पश्चिमेला ह्या टाक्या भरण्यासाठी माझ्या माहिती प्रमाणे तशी वितरण व्यवस्थेला डोंबिवली पश्चिमेला अधिकची व्यवस्था करण्यासाठी जल वाहिन्यांची वितरण व्यवस्था दिसून येत नाही. तरी या परिसरातील पाणी पुरवठा व्यवस्थित होई पर्यंत नागरिकांना त्यांच्या मागणी नुसार पिण्याच्या पाण्याचे टँकर जास्त वाढवून नियमित व महापालिकेच्या दरात देण्याची व्यवस्था करावी शक्य असल्यास मोफत देण्याची मागणी भोईर यांनी केली आहे.
केडीएमसीच्या महापौर पदी हर्षाली चौधरी थाविल तर उपमहापौरपदी राहुल दामले
केडीएमसीच्या महापौर पदी हर्षाली चौधरी थाविल तर उपमहापौरपदी राहुल दामले अखेर ६ वर्षाची प्रतीक्षा संपली कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाची आज निवड झाली असून ६ वर्षापासून असलेली राजकीय राजवट आज संपुष्टात आली आहे. महापौर पदासाठी ऍड. हर्षाली चौधरी – थवील आणि उपमहापौर पदासाठी राहुल दामले यांची निवड करण्यात आली आहे. महापौर पदासाठी ऍड. हर्षाली चौधरी थविल आणि उपमहापौर पदासाठी राहुल दामले यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झालीच होती. मात्र आजच्या महासभेत मुंबई जिल्हाधिकारी आचल गोयल या पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित होत्या, त्यांनी औपचारिक घोषणा केली. यावेळी व्यासपीठावर केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल, सचिव किशोर शेळके उपस्थित होते. कोरोना काळात नोव्हेंबर २०२० रोजी नगरसेवकांचा कार्यकाल संपल्याने राजकीय राजवट सुरु झाली होती. कोरोना तसेच विविध कारणांमुळे महानगरपालिकांच्या निवडणुका लांबणीवर गेल्या होत्या. गेल्या महिन्यात निवडणुका संपुष्टात येऊन अखेर ६ वर्षानंतर प्रतीक्षा संपली आहे. आज महापौर, उपमहापौर पदाची निवड झाली आहे. १९८३ नंतरची सर्वात मोठी असणारी प्रशासकीय राजवटही आता संपुष्टात आली आहे. १९८३ मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर लागू झालेली प्रशासकीय राजवट तब्बल १९९५ पर्यंत म्हणजेच तब्बल १२ वर्षे होती. त्यानंतर कोविडमुळे २०२० मध्ये कार्यकाळ संपल्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर प्रशासकीय राजवट लागू झाली होती. मात्र आता कल्याण डोंबिवलीच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवड झाल्याने गेल्या ६ वर्षांपासून असलेली ही प्रशासकीय राजवटही संपुष्टात आली आहे. या निवड प्रक्रियेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सभागृहाद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली. दरम्यान या महापौर आणि उपमहापौर पद निवडीच्या विशेष सभेमध्येच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमधील टोलवा टोलवी दिसून आली. आपल्या हजरजबाबीपणासाठी प्रसिद्ध असणारे शिवसेनेचे नगरसेवक सचिन पोटे यांनी शिवसेना उबाठाचे गटनेते यांना जोरदार टोला लगावला. “तुम्ही निवडून आले तेव्हा क्रिकेटची टीम होती, मात्र इकडे सभागृहात येईपर्यंत ती कबड्डीची झाली” या शब्दांत सचिन पोटे यांनी शाब्दिक कोटी केलेली पाहायला मिळाली. त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला होता.
महात्मा गांधींचा देशाच्या फाळणीला विरोधच होता -डॉ. विवेक कोरडे
राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त, ठाण्यात ‘हुतात्मा दिन’ संपन्न महात्मा गांधींचा देशाच्या फाळणीला विरोधच होता -डॉ. विवेक कोरडे अनिल ठाणेकर ठाणे : महात्मा गांधी हे कधीही देशाची फाळणी व्हावी या विचाराचे नव्हते, उलट त्यांचा देशाच्या फाळणीला विरोधच होता. ज्या आरएसएसने कधीही राष्ट्रध्वज स्विकारला नाही, त्यांचाच द्विराष्ट्रवादाला पाठिंबा होता आणि विनायक दामोदर सावरकर हे त्यांचे म्होरके होते. गांधीजी हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे एकमेव पुरस्कर्ते होते, अहिंसेचे पुजारी होते, अशा शब्दांत ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. विवेक कोरडे यांनी आपले परखड मत मांडले. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७८व्या पुण्यतिथीनिमित्त, धर्मराज्य पक्ष, ठाणे काँग्रेस आणि मूलभूत अधिकार संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने, ३० जानेवारीला, ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात ‘हुतात्मा दिन’ साजरा करण्यात आला. ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. विवेक कोरडे व डाव्या चळवळीतील विद्रोही नेते कॉ. आनंद तेलतुंबडे यांनी, “गांधीहत्या आणि आपण…” या विषयावर आपले मनोगत व्यक्त करुन, उपस्थितांना मार्गदर्शन केले.’धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते राजन राजे यांच्या पुढाकाराने संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी काँग्रेसच्या अर्थ विभागाचे अध्यक्ष विश्वास उटगी, आयटकचे काॅ. उदय चौधरी, वंदना शिंदे, मूलभूत अधिकार संघर्ष समितीचे डॉ. जावळे, समाजवादी नेते संजय मं. गो., जगदीश खैरालिया, आंबेडकरवादी विचारवंत आनंदा होवाळ, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे उपजिल्हाप्रमुख प्रदीप शिंदे, काँग्रेसचे ठाणे जिल्हा सरचिटणीस महेंद्र म्हात्रे, काँग्रेस ठाणे सचिव राहुल पिंगळे, ॲड. नाना अहिरे आदी मान्यवर मंडळींची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. विवेक कोरडे यांनी, आपल्या भाषणात उपस्थितांना संबोधित करताना, गांधी हत्येमागील कारणे विषद करताना तथाकथित हिंदुत्ववादी व आरएसएसवर एकच शरसंधान साधले. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात आनंद तेलतुंबडे यांनीदेखील आरएसएसच्या विचारांवर एकच प्रहार केला. सद्यस्थितीत भारतातील जी राजकीय व सामाजिकव्यवस्था ढासळलेली आहे, त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाची जातीयवादी विचारसरणीच कारणीभूत असल्याचे स्पष्ट करुन ते पुढे म्हणाले की, “पुढील एकहजार वर्षे तरी भारतातून भाजपची सत्ता जाणार नाही, जोपर्यंत ते ठरवत नाहीत”, असा अपप्रचार होत असला; तरी त्यात बिलकूल तथ्य नाही…आपण सारे एकत्र आलो आणि त्यांचं सगळं साम्राज्य, हे फक्त आणि फक्त, खोटारडेपणाच्याच पायावर उभारलेलं आहे, हे ध्यानात घेऊन त्यावर एकत्रित व सनदशीर मार्गाने प्रहार केला; तर, ते सहजशक्य आहे. आज त्यांनी सर्व शासकीय व प्रशासकीय व्यवस्था ताब्यात घेतलेल्या आहेत. राजन राजे यांच्यासारखी जी काही हाताच्या बोटावर काम करणारी मोजकी माणसं समाजात आहेत, त्यामुळेच भाजप-आरएसएससारख्या धर्मविद्वेशीशक्तींवर काही प्रमाणात का होईना, अंकुश आहे यातच समाधान असल्याचे प्रतिपादन आनंद तेलतुंबडे यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, विद्रोही शाहीर संभाजी भगत यांनी खास उपस्थिती लावून आपल्या पहाडी आवाजात कविता सादर केळी. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिरीष ढवळे यांनी केले तर, कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
जागतिक कर्करोग दिन
जागतिक कर्करोग दिन ‘जागरूकता, प्रतिबंध आणि वेळेवर उपचार हेच कर्करोगावरचे प्रभावी शस्त्र’ अनिल ठाणेकर ठाणे-दरवर्षी ४ फेब्रुवारी हा दिवस जगभरात जागतिक कर्करोग दिन म्हणून पाळला जातो. कर्करोगाबाबत जनजागृती वाढवणे, प्रतिबंधात्मक उपायांवर भर देणे तसेच वेळेवर निदान व उपचारांचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवणे…
ऐरोली विभागात अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई
ऐरोली विभागात अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई नवी मुंबई : महानगरपालिका विभागामार्फत मा.आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त (२) डॉ.राहुल गेठे व उप आयुक्त (अतिक्रमण) डॉ.कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली…
केडीएमसी प्रशासनाने आश्वासनांची पुर्तता न केल्याने आझाद मैदानात उपोषणाचा इशारा
केडीएमसी प्रशासनाने आश्वासनांची पुर्तता न केल्याने आझाद मैदानात उपोषणाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते नोवेल साळवे यांचे मुख्य सचिवांना पत्र कल्याण: नागरिकांच्या सुविधांच्या प्रश्नांवर १२ डिसेंबर २०२२ आणि १४ जानेवारी २०२५ रोजी आंदोलन दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या…
