Category: ठाणे

Thane news

ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात संत रविदास महाराज यांच्या जयंती दिनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर, नगरसेविका एकता भोईर, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, प्र. उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर, माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी व मोठया संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

`नृत्यविविधा’ या विशेष नृत्य कार्यक्रमाचे आयोजन

श्री गणराज नृत्य कला निकेतन, ठाणे या संस्थेच्या २५ व्या वर्धापन दिननिमित्त `नृत्यविविधा’ या विशेष नृत्य कार्यक्रमाचे आयोजन ठाणे – भारतीय शास्त्रीय नृत्य परंपरेचे जतन व संवर्धन करणाऱ्या श्री गणराज नृत्य कला निकेतन, ठाणे या नामांकित संस्थेचा २५ वा रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या निमित्ताने संस्थेतर्फे `नृत्यविविधा’ हा विशेष नृत्य कार्यक्रम शनिवार, ७ फेब्रुवारी, सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे (प.) येथे आयोजित करण्यात आला आहे. नृत्यालंकार मनाली मुकुंदराज देव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या या संस्थेच्या संचालिका मनाली देव या प्रसिद्ध कथ्थक गुरू डॉ.  मंजिरी देव व सुप्रसिद्ध तबला वादक तालमणी पं. मुकुंदराज देव यांच्या शिष्या आहेत. या दोन्ही गुरूंचे मोलाचे मार्गदर्शन पण संस्थेला लाभत आहे. गुरु–शिष्य परंपरेच्या माध्यमातून कथ्थक नृत्यकलेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य संस्था सातत्याने करत आहे. या रौप्य महोत्सवी सोहळ्यास डॉ.  मंजिरी देव, पं. मुकुंदराज देव, प्रख्यात कथ्थक नर्तक पं. नंदकिशोर कपोते, खासदार नरेश म्हस्के, तसेच ज्येष्ठ शास्त्रीय गायिका श्रीमती आशाताई खाडिलकर यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढणार आहे. या महोत्सवात संस्थेच्या १५० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग असून कथ्थक नृत्याच्या विविध बंदिशी, भावप्रधान व कथानकात्मक सादरीकरणे, रंगतदार मराठी लोकनृत्ये तसेच “शक्तिरूपेण संस्थिता” या दिव्य स्त्रीशक्तीला अर्पण केलेल्या विशेष नृत्यनाट्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. २५ वर्षांचा हा प्रवास म्हणजे केवळ काळाची गणना नसून, शिस्त, साधना आणि परंपरेत रुजलेली संस्कारमूल्ये जपणाऱ्या अनेक पिढ्यांच्या घडणुकीचा उत्सव असल्याची भावना संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आली. या सांस्कृतिक महोत्सवाला कला रसिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर तसेच माध्यम प्रतिनिधींनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमात पारिवली जिल्हा परिषद शाळा अव्वल

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमात पारिवली जिल्हा परिषद शाळा अव्वल कल्याण : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या राज्यस्तरीय उपक्रमात जिल्हा परिषद…

आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन व पोस्टर्स स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन व पोस्टर्स स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कल्याण : विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी २०१४ पासून डावखर इन्फ्रा, रिजन्सी ग्रुप, समर्थ पेट्रोलियम, एनए सोल्युशन, डावखर फाउंडेशन, डावखर फिल्म…

डोंबिवलीत भव्य राज्यस्तरीय गुलाब प्रदर्शन

डोंबिवलीत भव्य राज्यस्तरीय गुलाब प्रदर्शन भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे आयोजन आरती परब डोंबिवली :  डोंबिवलीकरांना वर्षभर प्रतीक्षा असलेले डोंबिवली रोझ फेस्टिवल हे भव्य गुलाब पुष्प प्रदर्शन शनिवार ३१ जानेवारी…

केडीएमसी क्षेत्रात पसरलेल्या धुळीबाबत उपायोजना करण्याची सहयोग सामाजिक संस्थेची मागणी

केडीएमसी क्षेत्रात पसरलेल्या धुळीबाबत उपायोजना करण्याची सहयोग सामाजिक संस्थेची मागणी कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले असून या धुळीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. धुळीमुळे…

३५ वर्षांनी पुन्हा भरली मित्रांची शाळा

३५ वर्षांनी पुन्हा भरली मित्रांची शाळा केईएस हंस भुग्रा मराठी माध्यम शाळेतील १९८१-१९९० या बॅचचे विद्यार्थी जमले एकत्र कल्याण: मैत्री ही आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर होते किंबहुना व्हायलाच हवी, शाळेतली मैत्री…

 जिद्द व चिकाटीने घेतली गरुड भरारी…

जिद्द व चिकाटीने घेतली गरुड भरारी… दिव्यांग मुलगी झाली लिपिक ठाणे: घरची परिस्थिती हालाखीची आई गृहिणी तर वडील  मोलमजूरी करुन आपल्या कुटुंबाचा गाढा चालवितात.अगदी हातावर पोट असलेल्या या कुटुंबातील गरीबीचे…

करुना फाऊंडेशनतर्फे प्रधानपाडा शाळेला शैक्षणिक साहित्य भेट

करुना फाऊंडेशनतर्फे प्रधानपाडा शाळेला शैक्षणिक साहित्य भेट ठाणे : धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती निमित्ताने शहापूर तालुक्यातील प्रधान पाडा शाळेला करूना फाउंडेशन तर्फे स्मार्ट टीवी तसेच आउटडोर गेम्स,इंडोर गेम्स चे…

संत रविदास महाराज” यांच्या जयंती दिनी केडीएमसीतर्फे अभिवादन

संत रविदास महाराज” यांच्या जयंती दिनी केडीएमसीतर्फे अभिवादन कल्याण: “संत रविदास महाराज” यांच्या जयंतीदिनी आज कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात त्यांच्या प्रतिमेस महापालिका उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन…