Category: ठाणे

Thane news

जिल्हा परिषद ठाणे कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

जिल्हा परिषद ठाणे कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी अनिल ठाणेकर ठाणे : १९ फेब्रुवारी रोजी टीएमसी पार्किंग प्लाझा, ८ वा मजला, लक्ष्मी नगर, ज्युपिटर हॉस्पिटलजवळ येथील प्रकल्प संचालक कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची…

 ठाणे बॅडमिंटन अकॅडमीची अभूतपूर्व ‘क्लीन स्वीप’

ठाणे जिल्हा ओपन सब-ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा ठाणे बॅडमिंटन अकॅडमीची अभूतपूर्व ‘क्लीन स्वीप’ गार्गी मोहितेला दुहेरी मुकुट, प्रत्येक गटात सुवर्ण वर्चस्व! कल्याण : कल्याण येथील गौतम सिंघानिया ग्लोबल स्कूल येथे ७ व ८ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या योनेक्स सनराईज ठाणे जिल्हा ओपन सब-ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या युवा खेळाडूंनी अत्यंत दर्जेदार व आत्मविश्वासपूर्ण खेळ सादर करत संपूर्ण स्पर्धेवर आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. जिल्ह्यातील विविध भागांतून सहभागी झालेल्या अनेक गुणवंत खेळाडूंमध्ये ठाणे अकॅडमीच्या प्रशिक्षणार्थींनी प्रत्येक वयोगटात सुवर्ण पदके जिंकत ‘क्लीन स्वीप’ साधली. या स्पर्धेतील सर्वात उजळ ठरलेली कामगिरी ठाणे बॅडमिंटन अकॅडमीची आशादायी खेळाडू गार्गी मोहिते हिने केली. तिने ११ वर्षांखालील तसेच १३ वर्षांखालील मुलींच्या एकेरी गटात सलग प्रभावी विजय मिळवत दोन्ही गटांची अजिंक्यपदे पटकावून ‘दुहेरी मुकुट’ आपल्या नावे केला. तिचा नेटवरचा संयम, कोर्ट कव्हरेज आणि आक्रमक खेळाने ती संपूर्ण स्पर्धेतील सर्वाधिक चर्चेत असलेली खेळाडू ठरली. इतर गटांमध्येही ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी आपल्या सातत्यपूर्ण प्रशिक्षणाची झलक दाखवली. ९ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत विहान अनिखेंडी याने उत्कृष्ट खेळ करत सुवर्ण पदक पटकावले. ११ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत योहान नायर याने सुवर्ण, तर वेद चौहान याने कांस्य पदक मिळवत अकॅडमीच्या यशात भर घातली. १३ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत अल्फी मेकाडाथ याने सुवर्ण पदक जिंकले, पीयूष सुतार याने रौप्य, तर यध्नेश वारघडे यांनी कांस्य पदक पटकावले. मुलींच्या गटात ११ वर्षांखालील एकेरीत गार्गी मोहिते हिने सुवर्ण पदक मिळवले, तर एहा दीक्षित आणि सान्वी वागळे यांनी कांस्य पदकांवर आपली मोहोर उमटवली. १३ वर्षांखालील मुलींच्या एकेरीत पुन्हा एकदा गार्गी मोहिते हिने सुवर्ण, तर अद्विका मोरे हिने रौप्य पदक मिळवत ठाणे अकॅडमीची पदकतालिका अधिक समृद्ध केली. या स्पर्धेतील यशामुळे ठाणे बॅडमिंटन अकॅडमीमध्ये सुरू असलेल्या शिस्तबद्ध प्रशिक्षण पद्धती, वैज्ञानिक सराव, मानसिक तयारी आणि दीर्घकालीन खेळाडू घडवण्याच्या दृष्टीकोनाची फलश्रुती स्पष्टपणे दिसून आली. लहान वयातच खेळाडूंमध्ये निर्माण होत असलेली स्पर्धात्मक धार, आत्मविश्वास आणि जिंकण्याची वृत्ती ही अकॅडमीच्या भक्कम पायाभरणीची साक्ष देणारी ठरली आहे. या अभूतपूर्व कामगिरीमागे ठाणे बॅडमिंटन अकॅडमीतील समर्पित व अनुभवी प्रशिक्षक संघाचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, शिस्तबद्ध प्रशिक्षण पद्धती आणि खेळाडू-केंद्रित दृष्टिकोन महत्त्वाचा ठरला आहे. अकॅडमीमध्ये प्रशिक्षक मयूर घाटणेकर, अक्षय देवलकर, श्रीकांत भागवत,  एकेंद्र दर्जी, फुलचंद पासी, सुरेंद्र दिवेकर, संजय कांबळे, नरेश गुंडले, नरेंद्र वर्मा, प्रसेनजीत शिरोडकर, देवांग दलाल आणि वेदांत जवंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंचे तांत्रिक कौशल्य, शारीरिक तयारी आणि मानसिक ताकद घडवली जात आहे. या सर्व प्रशिक्षण प्रक्रियेचे नेतृत्व प्रमुख प्रशिक्षक  श्रीकांत वाड करत असून, त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनामुळेच ठाणे बॅडमिंटन अकॅडमीतील ही नवी पिढी कमी वयातच जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवण्यास सज्ज होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.…

 अभिजित दिसलेची आक्रमक फलंदाजी

ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेत अभिजित दिसलेची आक्रमक फलंदाजी ठाणे : अभिजित दिसलेची आक्रमक फलंदाजी आणि गोलंदाजांनी त्याला तेवढीच तोलामोलाची साथ दिल्यामुळे मार्श संघाने स्पार्कलेक्स मशीन संघाचा ६४ धावांनी पराभव करत सुवर्णमहोत्सवी ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली. मार्श संघाच्या २३९ धावांचा पाठलाग करताना स्पार्कलेक्स मशीन संघाला १७५ धावा करता आल्या.  आपल्या ८१ धावांच्या झंझावती खेळीत सात षटकार आणि तीन चौकार मारणाऱ्या अभिषेकला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा कर्णधाराचा निर्णय अभिषेकने आपल्या फलंदाजीने सार्थ ठरवला. संघाच्या द्विशतकी धावसंख्येचा पाया रचताना अभिषेकने केवळ ५७ चेंडूत अर्धशतकी खेळी केली. अक्षय माजगावकरने ३५, आशुतोष घारगेने आणि आसिफ खानने ३१ धावांचे योगदान दिले. या डावात पराभूत संघाच्या करण चव्हाण, सनी जैस्वाल, जेमिन पांचाळ आत्मिक मॅथेलिया आणि प्रथमेश आंगणेने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. उत्तरादाखल मार्श संघाच्या केतन खरात आणि श्रेयस केसकरने नियंत्रित गोलंदाजी करत स्पार्कलेक्सच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला.  अर्शमित सिंग पराभूत संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. अर्शमितने ६८ धावा केल्या. तर दिव्यांश अरोराने २६ आणि सनी जैस्वालने २० धावा बनवल्या. केतन आणि श्रेयसने प्रत्येकी तीन गडी बाद केले. संक्षिप्त धावफलक – मार्श : ३५ षटकात ७ बाद २३९ ( अभिषेक दिसले ८१, अक्षय माजगावकर ३५, आशुतोष घारगे ३३, आसिफ खान ३१) विजयी विरुद्ध स्पार्कलेक्स मशीन : ३१.५ षटकात सर्वबाद १७५ ( अर्शमित सिंग ६८, दिव्यांश अरोरा २६, सनी जैस्वाल २०, केतन खरात ६-२४-३, श्रेयस केसकर ५.५-२५-३).

 श्री गणेश आखाड्याच्या ४ पैलवानांचा दिमाखदार विजय

महाराष्ट्र केसरी निवड चाचणी श्री गणेश आखाड्याच्या ४ पैलवानांचा दिमाखदार विजय १८ फेब्रुवारी रोजी भिवंडी तालुक्यातील सरवली येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने व ठाणे जिल्हा कुस्ती तालीम संघ आयोजित महाराष्ट्र केसरी व…

छत्रपती शिवरायांना प्रतिमापूजन यातून महापालिका मुख्यालयात मानवंदना

छत्रपती शिवरायांना प्रतिमापूजन यातून महापालिका मुख्यालयात मानवंदना अशोक गायकवाड नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील अॅम्फिथिएटर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला तसेच पाचव्या मजल्यावरील राजमाता जिजाऊ सभागृहाच्या प्रवेशव्दाराजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपमहापौर दशरथ भगत, आयुक्त डॉ.कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व डॉ.राहुल गेठे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, प्रशासन विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे, परिमंडळ १ विभागाचे उपायुक्त सोमनाथ पोटरे, मालमत्ताकर विभागाचे उपआयुक्त डॉ.अमोल पालवे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे, अति. शहर अभियंता अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे, सहा. आयुक्त अनुराधा बाबर आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे विनम्र अभिवादन महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पमालिका अर्पण

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे विनम्र अभिवादन महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पमालिका अर्पण अशोक गायकवाड नवी मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आज विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रथमत: सकाळी ९ वा. वाशी येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांच्या शुभहस्ते, उपमहापौर दशरथ भगत व आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पमालिका अर्पण करण्यात आली. त्यानंतर नेरूळ सेक्टर १ येथील राजीव गांधी उड्डाणपूलाजवळील चौकात स्थापित शिवरायांच्या सिंहासनारूढ पुतळ्याला महापौर महोदयांच्या हस्ते पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी महापौर तथा नगरसेवक जयवंत सुतार, नगरसेवक रविंद्र इथापे, सुरेश शेट्टी, अंजली वाळुंज, भाऊ भापकर, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड, प्रशासन विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे, परिमंडळ १ विभागाचे उपायुक्त सोमनाथ पोटरे, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, वाशी विभागाचे सहा.आयुक्त सुखदेव येडवे, नेरूळ विभागाच्या सहा.आयुक्त अनुराधा बाबर, कार्यकारी अभियंता अजय संख्ये, उमेश पाटील, प्रवीण गाडे,पंढरीनाथ चौडे आणि इतर मान्यवर आणि शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन्ही चौकात शिवरायांच्या पुतळ्याभोवताली आकर्षक पुष्पसजावट करण्यात आलेली होती. तसेच जयंतीच्या आदल्या दिवसापासूनच चौकांच्या चारही बाजूंना विद्युत दीपमाळांची रोषणाई करण्यात आलेली आहे. पुतळ्यांच्या सभोवताली लक्षवेधी रोषणाई करण्यात आलेली आहे. वाशी येथे पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन झाल्यानंतर महाराष्ट्राचे राज्यगीत प्रसारित करून मानवंदना देण्यात आली. पारंपारिक वेशभूषेत विद्यार्थ्यांची तसेच युवक – युवतींची लक्षणीय उपस्थिती होती. विविध शाळांनी तसेच शिवप्रेमी संघटनांनी आपल्या परिसरापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत शिवज्योतीसह पदयात्रा काढून, शिवरायांचा जयजयकार करीत अनोखी मानवंदना अर्पण केली. ‘जय भवानी, जय शिवाजी’ च्या नामघोषात सारा परिसर निनादला होता. रंगावलीकार श्रीहरी पवळे यांनी चौकात काढलेली छत्रपती शिवरायांची रांगोळी लक्षवेधी होती. अनेकांनी रांगोळी समवेत सेल्फी छायाचित्रे काढली. विशेषत्वाने तरूणाईने चौकातील शिवचरित्रशिल्पकृतींना भेट देऊन शिवरायांचा चरित्रपट जयंतीनिमित्त अनुभवला. शिल्पाकृती वास्तूच्या वरील बाजूस असलेल्या घुमटांवर लावलेल्या शिवरायांच्या विविध भावमुद्रा असणा-या छायाचित्रांमुळे चौकातील वातावरण भारलेले होते. नेरूळ येथील चौकात नुकताच नोव्हेंबर २०२५ मध्ये शिवप्रभूंचा सिंहासनारूढ पुतळा स्थापित करण्यात आलेला असून त्याठिकाणी यावर्षी पहिल्यांदाच शिवजयंती उत्सव साजरा होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह होता. शिवरायांच्या पुतळ्यावर असलेल्या मेघडंबरीला केलेली आकर्षक पुष्पसजावट लक्षवेधी होती. दोन्ही ठिकाणी दिवसभर शिवचरित्रावर आधारित गीते, पोवाडे यांचे ध्वनीक्षेपकाव्दारे सादरीकरण होत असल्याने शिवरायांच्या नावाचा गजर नवचैतन्य निर्माण करणारा आहे.

शिवकालीन इतिहासाचा जागर आणि ‘शिव शंभू गाथा’च्या गजराने दुमदुमले ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय

शिवकालीन इतिहासाचा जागर आणि ‘शिव शंभू गाथा’च्या गजराने दुमदुमले ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय अनिल ठाणेकर ठाणे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिवजयंती उत्सव २०२६’ अत्यंत उत्साहात आणि भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. “निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू” या उक्तीप्रमाणे महाराजांच्या आदर्श प्रशासकीय आणि शौर्यशाली वारशाचे स्मरण या निमित्ताने करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या उपस्थितीत सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि शिवगर्जना देऊन महोत्सवाचा प्रारंभ झाला. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेली भव्य पदयात्रा सकाळी ८:३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून निघाली. केंद्र सरकारच्या ‘माय भारत, मेरा युवा भारत’ या उपक्रमांतर्गत आयोजित या पदयात्रेतून शिवरायांनी दाखवून दिलेल्या सुशासन आणि राष्ट्रनिर्माणाच्या आदर्शांचा जागर करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात आणि भगव्या ध्वजांच्या उपस्थितीत ही रथयात्रा ठाणे शहरातून मार्गक्रमण करीत पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली. यादरम्यान तलाव पाळी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला.या कार्यक्रमाच्या निमित्ताने नियोजन भवन प्रांगणात ‘अश्वमेध प्रतिष्ठान इंटक ठाणे चॅप्टर’ यांच्या सौजन्याने शिवकालीन शस्त्रास्त्रांचे आणि वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी या प्रदर्शनातील प्रत्येक वस्तूची बारकाईने माहिती घेतली आणि या ऐतिहासिक ठेव्याचे जतन केल्याबद्दल अश्वमेध प्रतिष्ठानचे कौतुक केले. या प्रदर्शनामुळे उपस्थित विद्यार्थी आणि नागरिकांना प्रत्यक्ष शिवकालीन युद्धनीती आणि साहित्याचा अनुभव घेता आला.नियोजन भवन येथे पार पडलेल्या मुख्य सांस्कृतिक सोहळ्यात ‘शिव शंभू गाथा’ या टीमने आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सादरीकरणाने उपस्थितांना इतिहासात नेले. पोवाडे, गोंधळ, जागरण आणि विविध शौर्यगीतांच्या माध्यमातून शिवरायांच्या जीवनपटातील महत्त्वाचे प्रसंग जिवंत करण्यात आले. सादरीकरणातील जिवंतपणा पाहून उपस्थित अधिकारी आणि नागरिक भारावून गेले होते. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य केवळ युद्धापुरते मर्यादित नसून ते एक उत्तम व्यवस्थापक आणि रयतेचे राजे होते. आज आपण शॉर्ट नोटीसवर आणि काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाचे नूतनीकरण सुरू असतानाही नियोजन हॉलमध्ये इतका सुंदर कार्यक्रम करू शकलो, हे टीम वर्कचे यश आहे. शाहीर आणि कलाकारांनी मांडलेला अफजलखान वध आणि शाहिस्तेखानाची फजिती हे प्रसंग बघताना जुन्या आठवणी ताज्या झाल्या.या प्रेरणादायी सोहळ्यासाठी अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रूपाली भालके, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सर्जेराव म्हस्के पाटील, शशिकांत गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर व उर्मिला पाटील, पोलीस उपआयुक्त (वाहतूक विभाग) पंकज शिरसाठ, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, जिल्हा खनिकर्म अधिकारी विवेक घुले, तहसिलदार सचिन चौधर, रेवण लेंभे, संदीप थोरात, उमेश पाटील, अमोल कदम, प्रदीप कुडाळ, नायब तहसिलदार दत्तात्रय बेर्डे, तालुका क्रीडा अधिकारी सायली जाधव, लेखाधिकारी उमेश कुमावत, जिल्हाधिकारी महोदयांचे स्वीय सहायक गिरीश काळे, सागर यादव तसेच इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांसह भारत स्काऊट, गाईड, राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी चे विद्यार्थी, विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी, अंगणवाडी सेविका, पोलीस दल आणि ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवरायांना अभिवादन केले.कार्यक्रमाची सांगता शिवगर्जना आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने करण्यात आली.

  नगरसेविका नीला सोन्स यांच्याकडून महासभेत प्रश्नांची सरबत्ती

नगरसेविका नीला सोन्स यांच्याकडून महासभेत प्रश्नांची सरबत्ती भाजपला घरचा आहेर मिरा – भाईंदर महानगरपालिकेच्या काल झालेल्या महासभेत अनेक ठराव पास करण्यात आले. मिरा-भाईंदरमधील भाडेतत्त्वावर दिलेल्या खासगी मालमत्तांवर कर आकारणीसंदर्भातील प्रस्ताव भाजपच्या मागणीनुसार महासभेपुढे चर्चेला आला होता. यावेळी नक्की कोणत्या मालमत्तांकडून कर वसूल केला जाणार? त्यावर नियंत्रण कसे ठेवले जाणार? नागरिकांना दिलासा न देता पहिल्याच महासभेत कराचा बोजा टाकणे योग्य आहे का? असे प्रश्न नगरसेविका नीला सोन्स यांनी उपस्थित केले. नवीन घर घेणारे तसेच नवे गाळे घेणारे व्यापारी हे या शहराचे रहिवासी आहेत त्यांच्यावर हा बोजा टाकणे ठीक होणार नाही असे मत त्यांनी मांडले, तसेच या प्रस्तावाच्या बाजूने मतदान न करता तटस्थ राहण्याची भूमिका त्यांनी मांडली. १ एप्रिल २०२६ पासून नवे घर, दुकाने घेण्याऱ्यांवर कराचा बोजा वाढणार आहे. नागरिकांना काही दिलासा मिळणार नाही हे स्पष्ट झाले. बहुमताच्या जोरावर भाजपा नगरसेवकांनी सगळे ठराव पास करून घेतले, नागरिकांसाठी पुढे काही होणार का?  हे येणाऱ्या काळात बघावं लागेल.

  शहापूरातील नामपाडा धरणाचा खर्च ६६ कोटी ३२ लाखांच्या घरात

शहापूरातील नामपाडा धरणाचा खर्च ६६ कोटी ३२ लाखांच्या घरात प्रशासकीय मान्यतेसाठी सुधारीत प्रस्ताव सरकारला सादर  अविनाश उबाळे ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील नामपाडा धरणाचे काम सुरू झाले असून या धरणाचा सरकारी अंदाजपत्रकीय खर्च सुरुवातीला ९ कोटींवरून ३८ कोटींवर तर आता या प्रकल्पाचा खर्च तब्बल ६६ कोटी ३२ लाख रुपयांवर पोहोचला आहे.या नामपाडा धरणाच्या कामासाठी सुधारीत प्रशासकीय मान्यता व वाढीव निधी मिळावा यासाठी जलसंपदा विभागाने राज्य सरकारला प्रस्ताव सादर केला आहे. शहापूरपासून ४० किलोमीटर अंतरावर किन्हवली जवळ नामपाडा नावाचा धरण प्रकल्प राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने २००९ सालापासून हाती घेतला आहे.संपूर्ण मातीचे काम असलेल्या या धरणाला केवळ स्थानिक शेतकर्‍यांच्या शेतीसाठी सिंचन म्हणून पाणी मिळावे यासाठी जलसंपदा विभागाने प्रशासकीय मान्यता दिली होती,परंतु सुरुवातीला कासव गतीने सुरू असलेले धरणाचे काम वर्षभरातच रखडून पडले.वन विभागाच्या परवानग्या अपूर्ण राहिल्याने वन विभागाने धरणाचे काम बंद पाडले होते.आजमितीस या धरणाचे फक्त ४० टक्केच काम पूर्ण झाल्याचे दिसत आहे.या धरणाची पाणी साठवण क्षमता एकूण ३ हजार ५३३ दशलक्ष घनमीटर इतकी आहे.हे धरण पूर्ण झाल्यास धरणाच्या डाव्या कालव्यातून २५५ हेक्टर क्षेत्रात सिंचन होणार आहे.सुरुवातीला केवळ ९ कोटी १५ लाख रुपये खर्च अपेक्षित असलेल्या नामपाडा धरण प्रकल्पाचा खर्च ३८ कोटी ९८ लाख त्यानंतर सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार आता तब्बल ६६ कोटी ३२ लाखांच्या घरात नामपाडा धरण प्रकल्पाचा खर्च पोहोचला आहे.आजमितीला या धरण प्रकल्पासाठी १७ कोटी ७२ लाख रुपये एवढा खर्च करण्यात आला असून गेल्या १७ वर्षांपासून रखडलेल्या या बहुचर्चित नामपाडा प्रकल्पाला राज्य सरकारने पुन्हा एकदा हिरवा कंदील दाखवला आहे.सध्यास्थितीला धरण प्रकल्पाचे काम जलसंपदा विभागाच्या पाटबंधारे बांधकाम विभागाकडून युध्दपातळीवर सुरु आहे.नामपाडा धरण प्रकल्प पुर्ण झाल्यानंतर या धरणातून शहापूर तालुक्यातील किन्हवली जवळील सावरोली,कानडी,नांदगाव,खरीवली,आपटे या गावांसह वेलकड़ी,गांगणवाडी,वडाची वाडी,हिरव्याची वाडी,नामपाडा,टाकीची वाडी,मधली वाडी,रिकाम वाडी,उंबरवाडी,डोंगरी,कातकर वाडी या आदिवासी पाड्यांवरील शेतकऱ्यांना बारमाही शेतीसाठी सिंचन म्हणून पाणी उपलब्ध होणार आहे.असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात येत आहे.यंदा मे महिन्याच्या अखेरीस धरणाच्या मुख्य बांधावरी मातीचा भराव करणे व तलावाच्या बाजूकडीलदगडी पिंचिगचे काम पुर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे या प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता अ.सु.शहाणे यांनी माहिती देताना सांगितले.

ठाणे महानगरपालिकेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

ठाणे महानगरपालिकेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी अनिल ठाणेकर ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभ‍िवादन करण्यात आले. तद्नंतर मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.  यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी सर्व ठाणेकरांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच कळवा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी  अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, शिवसेना गटनेते पवन कदम, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, उमेश बिरारी, दीपक झिंजाड, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे, सहायक आयुक्त ललिता जाधव, सोपान भाईक, प्र.उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.