Category: ठाणे

Thane news

रविवारी डोंबिवलीत नवतरुण सुधागड तालुका रहिवासी सेवा संघातर्फे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन

रविवारी डोंबिवलीत नवतरुण सुधागड तालुका रहिवासी सेवा संघातर्फे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीत वास्तव्यास असलेल्या सुधागड तालुका रहिवाशांच्या विकासासाठी कार्य करणार्या नवतरुण सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाच्यावतीने रविवार…

ठाणे महापौर उपमहापौर पदासाठी आज नामनिर्देशन अर्ज दाखल

ठाणे महापौर उपमहापौर पदासाठी आज नामनिर्देशन अर्ज दाखल ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी शिवसेनेकडून एक तर उपमहापौरपदासाठी भारतीय जनता पक्षाकडून एक असे उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती महापालिका…

त्या चार जागांवर पोटनिवडणूक लागण्याची शक्यता

त्या चार जागांवर पोटनिवडणूक लागण्याची शक्यता पक्षाचा आदेश न मानणाऱ्या ठाकरे गटातील त्या चार नगरसेवकांविरोधात पक्ष आक्रमक बेपत्ता ४ नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू कल्याण : पक्षाचा आदेश न…

बांदोडकर महाविद्यालयात उपयोजित प्राणीशास्त्रावरील आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न

बांदोडकर महाविद्यालयात उपयोजित प्राणीशास्त्रावरील आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न ‘भविष्यासाठी शाश्वत प्रगती’ या संकल्पनेवर दोन दिवसीय शास्त्रीय मंथन ठाणे – विद्या प्रसारक मंडळ संचलित बा. ना. बांदोडकर स्वायत्त विज्ञान महाविद्यालय, ठाणे…

मिरा -भाईंदरमध्ये गुजराती महापौर

मिरा -भाईंदरमध्ये गुजराती महापौर मिरा – भाईंदर महापालिका निवडणुकीनंतर काल महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज भरण्यात आले. भाजपाकडून डिंपल मेहता तसेच उपमहापौर पदासाठी ध्रुव किशोर पाटील यांनी अर्ज भरला. महाविकास…

ट्रॅक अँड फिल्ड मास्टर्सची विजेतेपदाची हॅटट्रिक

ट्रॅक अँड फिल्ड मास्टर्सची विजेतेपदाची हॅटट्रिक ठाणे: ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटना आयोजित सब ज्युनिअर गटाच्या ठाणे जिल्हा अजिंक्यपदाच्या मैदानी स्पर्धेत तीन नवीन जिल्हा विक्रमासह ट्रॅक अँड फिल्ड मास्टर्स संघाने सर्वसाधारण…

मोजणी अर्जासाठी ‘हेल्प डेस्क’स्थापन 

मोजणी अर्जासाठी ‘हेल्प डेस्क’स्थापन ठाणे: ठाणे शहरातील नागरिकांसाठी मोजणी अर्ज दाखल करण्यासाठी ‘मदत कक्ष’ नगर भूमापन अधिकारी ठाणे भूमी अभिलेख विभागामार्फत सुरू करण्यात आले आहेत. यासह नागरिकांना मोफत तांत्रिक सहाय्य कार्यालयांमध्ये मोजणी प्रकरणे “ई-मोजणी आज्ञावली व्हर्जन २.० स्वीकारली जात आहेत. या प्रक्रियेबाबत सर्वसामान्य नागरिकांना पुरेशी माहिती नसल्याने अर्ज भरताना अनेक अडचणी येतात. नगर भूमापन कार्यालय ठाणे येथे नागरिकांसाठी ‘मदत कक्ष’ स्थापन करण्यात आला असल्याची माहिती नगर भूमापक अधिकारी सिद्धेश्वर घुले यांनी दिली. या प्रणालीत नागरिकांना अर्जासोबत जमिनीचा  मालमत्ता पत्रक, संबंधित अभिलेख, बिनशेती मोजणीसाठी मंजर रेखांकन आराखडा, पोटहिस्सा मोजणीसाठी (आवश्यक असल्यास स्थानिक स्वराज्य संस्था अथवा नियोजन प्राधिकरणाकडील रेखांकन व ना हरकत दाखला, ओळखीचा पुरावा आदी कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात अपलोड करावी लागतात. मोजणी शुल्काचे चलन करून त्याची पीडीएफ फाईल अपलोड करणे आवश्यक आहे. या मदत कक्षामधून मोजणी अर्ज भरण्यापासून ते प्रकरण निकाली निघेपर्यत आवश्यक असलेली सर्व मदत नागरिकांना मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. या सुविधेमुळे खाजगी यंत्रांकडून नागरिकांना होणारा त्रास कमी होणार आहे. त्यामळे नागरिकांनी मदत कक्षाचा लाभ घेऊन आपले मोजणी अर्ज मोफत भरून घ्यावेत व येणाऱ्या तांत्रिक अडचणींवर मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन नगर भूमापन अधिकारी ठाणे कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जिल्हाधिकारी कार्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जिल्हाधिकारी कार्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली ठाणे :  राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ठाणे जिल्हा समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात आयोजित शोकसभेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या सेवाकाळात नेहमी प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कर्तव्यभावनेने शासकीय कर्तव्य पार पाडले. त्यांच्या निधनाने राज्य शासनाने एक कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि वक्तशीर नेतृत्व गमावले आहे, अशी भावना जिल्हाधिकारी डॉ. कृष्ण पांचाळ यांनी उपस्थितांच्या वतीने यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारीप डॉ.संदिप माने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, उपजिल्हाधिकारी (रोहयो) शशिकांत गायकवाड, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सर्जेराव म्हस्के-पाटील, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप, जिल्हा हिवताप नियंत्रण अधिकारी डॉ. संतोषी शिंदे, तहसिलदार सचिन चौधर, रेवण लेंभे, उमेश पाटील, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक आनंद पाटील यांच्यासह उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना व्यक्त करण्यात येवून त्यांना हे दु:ख सहन करण्याचे बळ लाभो, अशी प्रार्थना करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील  मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दोन मिनिटे मौन पाळून दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.

केडीएमसी महापौर पदासाठी शिवसेनेच्या वतीने हर्षाली चौधरी थविल यांचा उमेदवारी अर्ज दाखल

केडीएमसी महापौर पदासाठी शिवसेनेच्या वतीने हर्षाली चौधरी थविल यांचा उमेदवारी अर्ज दाखल तर उपमहापौर पदासाठी भाजपाच्या वतीने राहुल दामले यांनी दाखल केला अर्ज कल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीनंतर महापौर निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले असून महापौर पद अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले आहे. या महापौर पदासाठी शिवसेनेच्या वतीने नगरसेविका हर्षाली चौधरी थविल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर उपमहापौर पदासाठी भाजपाच्या वतीने नगरसेवक राहुल दामले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांसाठी मंगळवारी 3 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात पालिका सचिव किशोर शेळके यांच्याकडे हे दोन्ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. कांत शिंदे, आमदार राजेश मोरे, मनसेचे माजी आमदार राजू पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष नंदू परब, नरेंद्र सूर्यवंशी आदी पदाधिकारी उपस्थित होते. महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. मात्र दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकाच उमेदवाराचे अर्ज दाखल झाल्याने, या महत्त्वाच्या पदांवरील निवडणुकीचा निकाल जवळपास निश्चित झाला आहे. त्यामुळे येत्या ३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेतील निवडणूक प्रक्रिया ही केवळ औपचारिकता ठरणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागून असून, नव्या महापौर आणि उपमहापौरांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासाला आणखी गती मिळेल, असा विश्वास खासदार डॉ कांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान ॲड.हर्षाली चौधरी थविल या प्रभाग क्र. 3 ब मधून निवडून आल्या असून त्या उच्चशिक्षित वकील आहेत. यंदाची त्यांची नगरसेवक पदाची दुसरी टर्म असून मागील नगरसेवक कारकिर्दीचा अनुभव आहे.  मुंबई हायकोर्ट येथे, 1० वर्षांपेक्षा अधिक वकिली अनुभव, नगरसेवक म्हणून स्थायी समिती सदस्यां म्हणून कामकाज केले आहे. तर उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केलेले भाजपाचे जेष्ठ नगरसेवक राहुल दामले हे उच्चशिक्षित असून बांधकाम व्यावसायिक आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  सक्रिय सदस्य आहेत. राहुल दामले विधानसभा निवडणूक लढण्यासाठी दावेदार होते. २००५ साली स्विकृत नगरसेवक होते. २०१०, २०१५ आणि २०२६ साली नगरसेवक पदी निवडून आले. २०१३ -१४ साली उपमहापौर पदी होते. २०१८ साली स्थायी समिती सभापती पदी होते. २०१९ साली विरोधी पक्ष नेते पदी होते. आत्ता पुन्हा त्यांच्या गळयात दुसऱ्यांदा उपमहपौर पदाची माळ पडली आहे.…

 दुर्गाडी किल्ल्याच्या पायऱ्यांवर आढळलेल्या कोब्रा नागास सर्पमित्राने दिले जीवनदान

दुर्गाडी किल्ल्याच्या पायऱ्यांवर आढळलेल्या कोब्रा नागास सर्पमित्राने दिले जीवनदान कल्याण : कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी माता मंदिराकडे जाणाऱ्या मध्यभागातील पायरी परिसरात आढळलेल्या कोब्रा नागास सर्पमित्राने पकडून जीवदान दिल्याची घटना गुरूवारी दुपारी घडली. सर्प मित्र दत्ता बोंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार दुर्गाडी माता मंदिराकडे जाणाऱ्या मध्यभागातील पायरी परिसरात गुरुवारी दुपारी साडेपाच फुटी लांब कोब्रा नागाची आणि मुंगूस यांची झुंज रंगली होती. दरम्यान तिथे किल्ले दुरुस्ती काम करणारे कामगार पोहचले त्यांची चाहूल लागल्याने मंगूस पळून गेले. त्या नागाचा रूद्र अवतार पाहता मंजुराची भितीने त्रेधातिरपीट उडाली. प्रसंगावधान पाहत सुरक्षा कर्मचारी मोरे यांनी सर्पमित्र दत्ता बोंबे यांच्याशी संपर्क साधला असता तातडीने घटनास्थळी पोहचत सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी साडेपाच फुटी लांब विषारी कोब्रा नागास पकडून जीवदान दिल्याचे पाहता उपस्थितांनी सुटकेचा निश्वास टाकला. सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी सांगितले की, गारव्यामुळे साप उन्हाची तिरिपसाठी दगडी पायरी परिसरात उबीसाठी आला असावा. संदर्भीत पकडलेल्या विषारी नागास जीवनदान देत नैसर्गिक अधिवासात सोडले. ही घटना पाहता भक्तांनी देखील मंदिर परिसरात जाता येताना लक्ष देत मार्गाक्रमण गरजेचे आहे