Category: ठाणे

Thane news

मेट्रो दुर्घटनेत मृताच्या मदतीसाठी यादव समाज एकवटला

मेट्रो दुर्घटनेत मृताच्या मदतीसाठी यादव समाज एकवटला कल्याण: मुलुंडमध्ये मेट्रोच्या सुरु असलेल्या कामाचा एक स्लॅब कोसळला, ज्यामुळे घटनास्थळीच एकाचा मृत्यू झाला आणि इतर दोघांवर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या रामधन यादव यांना मदत मिळवून देण्यासाठी रविवारी आर. एन. यादव यांच्यासह संपूर्ण यादव समुदायाचे सदस्य दिवसभर जबाबदार अधिकाऱ्यांकडून भरपाईच्या मागणीबाबत लेखी आश्वासन मागत राहिले, परंतु एमएमआरडीए किंवा उपकंत्राटदाराचा कोणताही अधिकारी प्रतिसाद देण्यासाठी उपलब्ध नव्हता. अखेर, दुपारी ४ वाजता, समुदायाच्या एका वरिष्ठ सदस्याने निर्णय घेतला की जर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ठोस निकाल लागला नाही तर त्यांना रस्त्यावर उतरून निषेध करण्यास भाग पाडले जाईल. ही माहिती माध्यमांना आणि पोलिस ठाण्याला मिळाल्यावर, एक अधिकारी पीडितेच्या कुटुंबाशी बोलण्यासाठी पोलिस ठाण्यात पोहोचला. रात्री १० वाजेपर्यंत निकाल लागला, परंतु रात्री धनादेशावर स्वाक्षरी न झाल्यामुळे, अधिकारी लेखी आश्वासन देऊन निघून गेले. रात्री धनादेश न मिळाल्याने, कुटुंब रुग्णालयातून मृतदेह घेऊ शकले नाही. आज सोमवारी धनादेश मिळाला आणि मृतदेह घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आणि पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी शंशिकांत यादव, ईश्वर देव यादव, पारस यादव, मोतीलाल यादव, राम यादव, जितेंद्र यादव, कमलेश यादव, आर.डी. यादव, राम झलक यादव, पप्पू यादव, जयसिंग यादव, कीर्ती यादव, रमेश यादव, सुरेश यादव, सुनील यादव, ईश्वर देव यादव आणि पारस यादव यांच्यासह सुमारे २०० समुदायाचे सदस्य उपस्थित होते. या सर्वांचे आर.एन. यादव यांनी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली आणि सांगितले की पीडितेला न्याय समुदायाच्या एकजुटीमुळे मिळाला.

टिटवाळ्यात रेल्वेच्या कारवाईत १९ बेकायदेशीर बांधकामे पाडली

टिटवाळ्यात रेल्वेच्या कारवाईत १९ बेकायदेशीर बांधकामे पाडली कल्याण: टिटवाळा परिसरातील रेल्वेच्या हद्दीत अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या बांधकामांवर आज रेल्वे प्रशासनाने निर्णायक कारवाई करत १९ अतिक्रमणे जमीनदोस्त केली. सकाळपासून सुरू झालेल्या या धडक तोडक मोहिमेमुळे परिसरात मोठी हालचाल निर्माण झाली असून नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. मध्य रेल्वेच्या भूमी व्यवस्थापन विभागाच्या सूचनेनुसार अप लाईनजवळील कि.मी. ६३/५-१८ परिसरातील रेल्वे मालकीच्या जागेवर उभारलेली कच्ची-पक्की दुकाने आणि काही निवासी बांधकामांचे भाग अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले होते. संबंधितांना यापूर्वी लेखी नोटिसा देऊन ठराविक मुदत देण्यात आली होती; मात्र त्यानंतरही अतिक्रमण कायम राहिल्याने प्रशासनाने थेट पाडकामाची कारवाई हाती घेतली. कारवाईदरम्यान कायदा-सुव्यवस्था बिघडू नये म्हणून टिटवाळा पोलीस ठाण्याकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकांसह मोठ्या संख्येने पुरुष व महिला पोलीस कर्मचारी तैनात होते. रेल्वे प्रशासन, स्थानिक पोलीस आणि रेल्वे पोलीस दल यांच्या समन्वयातून ही मोहीम सुरळीत पार पडली. मधुबन सोसायटीसमोरील रेल्वे पावर हाऊसजवळील रस्त्यालगतचा भाग असल्याने पाडकामाची कारवाई पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. काही ठिकाणी रहिवाशांमध्ये भावनिक प्रतिक्रिया उमटल्या; मात्र प्रशासनाने संयम राखत परिस्थिती नियंत्रणात ठेवली आणि कारवाई कोणताही अनुचित प्रकार न घडता पूर्ण केली. रेल्वे मार्गांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ नये आणि सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण व्हावे, या दृष्टीने अतिक्रमण हटविण्याची मोहीम सातत्याने राबविली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी  सूत्रांनी  स्पष्ट केले. या कारवाईनंतर रेल्वेच्या जागेवर अनधिकृत बांधकामे उभारणाऱ्यांना स्पष्ट संदेश मिळाला असून, पुढील काळात अशा प्रकारांवर प्रशासन अधिक कठोर भूमिका घेणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. टिटवाळ्यातील या मोहिमेमुळे रेल्वे हद्दीतील अतिक्रमणांबाबत प्रशासनाचा निर्धार अधोरेखित झाला आहे.

 आरोग्य सेवेसाठी आशा वर्कर्स यांचे योगदान अमूल्य

आरोग्य सेवेसाठी आशा वर्कर्स यांचे योगदान अमूल्य महापौर शर्मिला पिंपळोलकरांचे वक्तव्य अनिल ठाणेकर ठाणे, तळागाळात जाऊन वर्षानुवर्षे लोकसेवा आणि रुग्णसेवा बजावणाऱ्या आशा वर्कर्स या आरोग्यव्यवस्थेचा कणा आहेत, त्यांचे योगदान हे अमूल्य असल्याचे वक्तव्य महापौर शर्मिला पिंपळोलकर येथे केले. आज ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे विशेष सन्मान करण्यात आला. संशयित क्षयरुग्णांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करताना अपेक्षेपेक्षा अधिक कामगिरी करणाऱ्या प्रतिनिधीक स्वरुपात २० आशा वर्कर्संना महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. ठाणे महानगरपालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम यांसह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते. घराघरांत जाऊन नागरिकांशी संवाद साधत, आरोग्य तपासणीसाठी प्रोत्साहन देत आणि आजारांबाबत जनजागृती करत आशा वर्कर्स आरोग्य यंत्रणेचा भक्कम आधारस्तंभ ठरत आहेत. संशयित क्षयरुग्ण शोधून त्यांची नोंदणी करणे ही अत्यंत जबाबदारीची भूमिका त्यांनी प्रभावीपणे पार पाडली आहे. अनेक आशा वर्कर्सनी निर्धारित उद्दिष्टांपेक्षा जास्त रुग्णांची नोंदणी करून आपली कर्तव्यनिष्ठा सिद्ध केली असल्याचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी नमूद केले. तर उपमहापौर कृष्णा पाटील यांनी देखील आशा वर्कर्सच्या कामाचे कौतुक करीत ठाणे महापालिका त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.तर प्रास्ताविकपर भाषणात मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी आशा वर्कर्सच्या कामाचे कौतुक केले. संशय‍ित क्षयरुग्णाच्या नोंदणी  कामात आशांनी सक्रिय सहभागी घेतला. तसेच १० दिवसांत १५० जणांची नोंदणी करण्याचे उद्द‍िष्ट दिले असताना हजारहून अधिक संशयित रुग्णांची नोंदणी त्यांनी केली, त्यामुळेच त्यांचा सन्मान करण्यात आला असल्याचे त्यांनी नमूद महानगर गॅस लिमिटेड यांनी ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागासाठी ₹१.२५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे दोन अ‍ॅडव्हान्स सोनोग्राफी मशीन आणि एक २D इको मशीन उपलब्ध करण्यात आली आहे.या अत्याधुनिक यंत्रसामग्रीचे लोकार्पण महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते करण्यात आले. रेडिओलॉजी विभागाचे बळकटीकरण करण्यासाठी या मशीन महत्त्वपूर्ण ठरणार असून विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे. अत्याधुनिक तपासण्या स्थानिक पातळीवर उपलब्ध झाल्याने रुग्णांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार आहेत. यावेळी ‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखले जाणारे शीख धर्मातील नववे गुरु गुरूतेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दीनिमित्तच्या कार्यक्रमाच्या फलकाचे अनावरणही महापौरांच्या हस्ते करण्यात आले. गुरु तेग बहादूर साहिबजी यांनी धर्मस्वातंत्र्य आणि मानवतेच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान आजही समाजाला प्रेरणा देणारे आहे. या शताब्दी वर्षानिमित्त आरोग्य विभागाच्या माध्यमातून सर्व आरोग्य केंद्रात आरोग्‌य शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी नमूद केले.

 महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीच्या माध्यमातून दिला देशभक्तीचा संदेश

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे ३५० वे शहिदी समागम शताब्दी वर्ष महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीच्या माध्यमातून दिला देशभक्तीचा संदेश ठाणे : ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक २५ तसेच शाळा क्रमांक ५४, पातलीपाडा…

 ठाणे जिल्ह्यात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

ठाणे जिल्ह्यात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा सनातन संस्थेच्या ग्रंथ प्रदर्शन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची सदिच्छा भेट कल्याण : ठाणे जिल्ह्यात मोठ्या उत्साहात महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला. डोंबिवली…

दीड वर्षाच्या बलात्कार पीडित चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी घेतली दखल

दीड वर्षाच्या बलात्कार पीडित चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी घेतली दखल अनिल ठाणेकर ठाणे : समाजाच्या काळ्याकुट्ट बाजूचे दर्शन घडवणारी एक हृदयद्रावक घटना दहिसर रेल्वे स्थानकाजवळ १० फेब्रुवारीच्या…

शस्त्राच्या बळापेक्षा आत्मबळ महत्त्वाचे – डॉ. अवनीश पाटील

शस्त्राच्या बळापेक्षा आत्मबळ महत्त्वाचे – डॉ. अवनीश पाटील ठाणे : बॉम्ब व बंदुकीच्या बळावर मिळवलेला न्याय भीतीवर आधारित असल्याने तो फार काळ टिकत नाही. शस्त्रापेक्षा आत्मबळ महत्वाचे असे मत बीजभाषक…

 मदरसा-मशिदीच्या बेकायदेशीर बांधकामाने अडवली रहिवाशांची वहिवाट

मदरसा-मशिदीच्या बेकायदेशीर बांधकामाने अडवली रहिवाशांची वहिवाट पोलिसांकडून तक्रारदारांनाच इशारा अनिल ठाणेकर ठाणे, इंदिरा नगर, रुपादेवी पाडा नंबर २, रोड नंबर ३३/३४, मशिदीजवळ वागळे इस्टेट, ठाणे येथे शासकीय भूखंडाबर नवाबी इन्तेजामियाँ…

हर हर महादेव…

हर हर महादेव… महाशिवरात्रीच्या निमित्ताने ठाण्यातील किसननगर २ विभागातील प्राचीन गंगेश्वर महादेव मंदिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवशंकराचे भक्तिभावाने दर्शन घेत विधिवत पूजा करून दुग्धाभिषेक केला. यावेळी शिवसेना सचिव राम रेपाळे, नगरसेवक…

भस्मासूर, बकासूर, महाराष्ट्राचे लुटारू

भस्मासूर, बकासूर, महाराष्ट्राचे लुटारू स्लग – गणेश नाईकांची शिंदे पितापुत्रांवर पुन्हा टिका नवी मुंबई : भस्मासूर, बकासूर, महाराष्ट्राचे लुटारू असे जहरी शब्द वापरत भाजपा आमदार गणेश नाईक यांनी आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे…