Category: ठाणे

Thane news

डोंबिवलीत बेसमेंट पार्किंगमध्ये आग

डोंबिवलीत बेसमेंट पार्किंगमध्ये आग २९ दुचाकी जळून खाक  पाच जण जखमी डोंबिवली : डोंबिवली पूर्वेयेथील चेडा नगरातील रविकिरण सोसायटीतील राज अपार्टमेंट, जय भारत स्कूलजवळील बेसमेंट पार्किंगमध्ये पहाटे सुमारे सव्वाचार वाजता अचानक भयानक आग लागली. या आगीत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एकूण २९ दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या. आग लागल्यानंतर काही मिनिटांतच धुराचा प्रचंड लोट इमारतीत पसरला. यामुळे झोपेत असलेले रहिवासी घाबरून उठले आणि भीतीच्या वातावरणात इमारतीबाहेर धाव घेतली. आगीचा भडका उडाल्याने पाच जण किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या पथकाने काही वेळातच आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत बेसमेंटमधील बहुतेक दुचाकींचे मोठे नुकसान झाले होते. आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत अद्याप स्पष्ट कारण समोर आलेले नाही. ही आग शॉर्ट सर्किट की इतर कोणत्या कारणानी लागली याचा तपास सुरु आहे. पोलिस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आग विझवल्यानंतर घटनास्थळाची कसून पाहणी केली. पहाटेच्या वेळी मोठी दुर्घटना टळली असली, तरी या आगीत मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

राज्यशास्त्राच्या जेन झी विद्यार्थ्यांनी केलं “पॉलिटिका २०२६” या उपक्रमाचे आयोजन

राज्यशास्त्राच्या जेन झी विद्यार्थ्यांनी केलं “पॉलिटिका २०२६” या उपक्रमाचे आयोजन मिरा -भाईंदर : अभिनव महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित “पॉलिटिका २०२६” हा उपक्रम विद्यार्थी शिक्षकांनी उत्साहात साजरा केला. विभागाने “आम्ही…

क्लस्टर प्लॅन रद्द करणे आणि नवीन विकास आराखडा

क्लस्टर प्लॅन रद्द करणे आणि नवीन विकास आराखडा 18 तारखेची पहिली महासभा वादळी होणार मिरा – भाईंदर मिरा -भाईंदर शहरात राबविण्यात येणारा क्लस्टर प्लॅन रद्द करण्याचा एक मोठा आणि महत्त्वाचा…

ठाण्यातील मालवणी महोत्सवात ‘डबलबारी’ भजनाची रंगत

ठाण्यातील मालवणी महोत्सवात ‘डबलबारी’ भजनाची रंगत बुवा संतोष जोईल विरुद्ध श्रीकांत शिरसाट यांच्यात रंगला सुरेल सामना अनिल ठाणेकर ठाणे,शिवाई नगर येथील उन्नती गार्डन मैदानात कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने आणि आयोजक…

कल्याणच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईत 2 कोटींचे एमडी जप्त

कल्याणच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईत 2 कोटींचे एमडी जप्त ॲक्टीव्हाच्या वाकवलेल्या नंबरप्लेटमुळे ड्रगडिलरचे नेटवर्क उद्ध्वस्त कल्याण : कल्याणच्या पोलीस उपआयुक्त,परिमंडळ 3 मधील अंमली पदार्थ विरोधी पथकाने अंमली पदार्थ तस्करीविरोधात…

  प्रभातफेरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी दिला एकात्मतेचा संदेश

श्री गुरु तेग बहादूर साहिब यांचे 350 वे शहीदी समर्पण वर्ष प्रभातफेरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी दिला एकात्मतेचा संदेश ठाणे: श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी समर्पण वर्षानिमित्त “हिंद…

गणेश नाईक यांना खुमखुमी असेल तर येत्या लोकसभा निवडणुकीत आमच्यासमोर निवडणूक लढवा -डॉ.श्रीकात शिंदे

गणेश नाईक यांना खुमखुमी असेल तर येत्या लोकसभा निवडणुकीत आमच्यासमोर निवडणूक लढवा -डॉ.श्रीकात शिंदे अनिल ठाणेकर ठाणे, गणेश नाईक यांना एवढीच खुमखुमी असेल तर पुढील लोकसभा निवडणुकीत गणेश नाईक यांनी…

  मुलुंड मेट्रो दुर्घटना: कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे निलंबित

मुलुंड मेट्रो दुर्घटना: कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे निलंबित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कारवाई अनिल ठाणेकर ठाणे, मेट्रो लाईन ४ (वडाळा-कासारवडवली) मार्गावर मुलुंड येथे झालेल्या दुर्घटने प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकारी…

ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात ‘संत सेवालाल महाराज’ जयंती निमित्त त्यांचे प्रतिमेस महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन अभ‍िवादन केले. यावेळी उपायुक्त जी.जी. गोदेपुरे,…

ॲड. रमाकांत ओवळेकर चषक श्री माँ विद्यालयाने पटकावला

ॲड. रमाकांत ओवळेकर चषक श्री माँ विद्यालयाने पटकावला ठाणे: मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने युनायटेड क्रिकेटर्स व सूर सुदान शौर्या स्वर संस्था आयोजित १४ वर्षाखालील मुलांसाठी ठाणे जिल्हा आंतरशालेय क्रिकेट सामना…