Category: ठाणे

Thane news

ठाण्यात “जय श्रीराम” वाला महापौर बसवा नाहीतर, हिरवे गुलाल उधळतील – नितेश राणे

ठाणे: एकीकडे संविधानाच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे धर्माच्या नावाने मतदानाचे फतवे काढायचे, ह्या व्होट जिहादचा पर्दाफाश आम्ही केला आहे. तेव्हा, राष्ट्रभक्त हिंदु समाजाने १५ तारखेला जागरूक राहुन मतदान करावे, आणि ठाण्यात “जय श्रीराम” वाला महापौर बसवावा, नाही तर हे हिरवे गुलाल उधळतील. असा सावधानतेचा इशारा राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे. ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५ चे भाजप – शिवसेना – रिपाई महायुतीचे उमेदवार सीताराम राणे, परिषा सरनाईक आणि जयश्री डेव्हीड यांच्या प्रचारार्थ मंगळवारी काढण्यात आलेल्या भव्य रॅलीत मंत्री नितेश राणे सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शिवाईनगर येथील श्री संकटमोचक हनुमान मंदिर येथून ओपन जीपमध्ये सवार होऊन प्रारंभ झालेल्या ह्या रॅलीमध्ये महायुतीच्या तिन्ही उमेदवारांसह आमदार संजय केळकर, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करीत देवाभाऊ गीताने गुंजलेली ही रॅली तब्बल दोन तास चालली. रॅली दरम्यान माध्यमांशी बोलताना मंत्री नितेश राणे यांनी, व्होट जिहाद वर प्रखर भाष्य केले. आम्ही मुंबई – ठाणे या शहरांच्या विकासावर निवडणुका लढवतोय तर, दुसऱ्या बाजुला अजान बंद करणाऱ्याच्या विरोधात, मशिदी विरोधात बोलणाऱ्याच्या विरोधात मतदान द्या. असे धर्माच्या नावाने मतदान मागितलं जात आहे. याप्रकारे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान करण्याची मागणी करणे, हा एक प्रकारे व्होट जिहाद असुन हेच मी जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केल्याचे ना. राणे यांनी सांगितले. एका बाजुला हिंदु समाजाला डिवचायचे आणि दुसऱ्या बाजुला मशिद आणि अजानच्या नावाने मते मागायची, एकीकडे संविधानाच्या गोष्टी करायच्या दुसरीकडे धर्माच्या नावाने मतदानाचे फतवे काढायचे,असे यांचे कारनामे सुरू आहेत. तेव्हा, राष्ट्रभक्त हिंदु समाजाने जागरूक राहुन १५ तारखेला मतदान करावे. ठाण्यात “जय श्रीराम” वाला महापौर बसला नाही तर १६ तारखेला हिरवे गुलाल उधळतील. असा सावधानतेचा इशारा मंत्री राणे यांनी दिला. चौकट बोगस मतदारांना मारणार म्हणणाऱ्या मनसेला प्रत्युत्तर देताना मंत्री नितेश राणे यांनी, हिंमत असेल तर बेहरामपाडा, नळबाजार येथील मोहल्यामध्ये बुरखे घालुन मतदान करतात. तिथे जाऊन त्यांचे हातपाय तोडा. तेव्हा कळेल बाळासाहेबांच्या विचारांचे कोण? असे आव्हान दिले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जनतेने २०१४, २०१९ आणि २०२४ मध्ये कौल दिला आहे, मनसेसारखा शून्य मिळालेला नाही. अशी खिल्लीही त्यांनी मनसेची उडवली. ००००

ठाण्यात महायुतीच्या विजयासाठी ‘निरहुआ’ चा संगीतमय प्रचार

अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजप – शिवसेना – रिपाई महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सोमवारी प्रसिद्ध भोजपुरी स्टार अभिनेता व खासदार दिनेशलाल यादव उर्फ निरहुआ आणि प्रसिद्ध अभिनेत्री आम्रपाली दुबे ठाण्यात आले होते. या दोन्ही कलाकारांनी ठाण्यातील विविध भागांना भेटी देऊन महायुतीच्या उमेदवारांचा संगीतमय प्रचार केला. निरहुआ याने तर देशभक्ती जागावत भोजपुरी गीतातून ‘कमळ’ आणि ‘धनुष्य बाण’ या चिन्हाला मत देण्याचे आवाहन करीत धमाल उडवून दिली. यावेळी मोठया संख्येने उपस्थित जनसमुदायानेही “भारत माता की जय” च्या घोषणा देत निरहुआला साथ दिली. ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून प्रचाराचे नवनवे फंडे राजकीय पक्ष तसेच उमेदवार अजमावत आहेत. सोमवारी तर ठाण्यात भोजपुरी स्टार निरहुआ आणि अभिनेत्री आम्रपाली दुबे यांनी संगीतमय प्रचाराची धुम उडवुन दिल्याने सर्वत्र “ठाणे” शहर चर्चेत आहे. भोजपुरी अभिनेता व मा खासदार दिनेशलाल यादव (निरहुआ) व अभिनेत्री आम्रपाली दुबे यांनी वागळे इस्टेट प्रभाग क्र. १५ मधील इंदिरा नगर नाका, कळवा प्रभाग क्रं. २५ आतकोनेश्वर नगर,  मफतलाल मैदान आणि प्रभाग क्रमांक ४ मधील गांधीनगर, नळपाडा, खेवरा सर्कल परिसरात भाजप महायुतीचा साग्रसंगीत प्रचार केला. निरहुआ याने अनेक भोजपुरी गीतांचा नजराणा पेश करून  मतदारांशी संवाद साधला. उपस्थितांनी, भारतमाता की जय च्या जयघोषात फेर धरला होता. यावेळी प्रभाग क्रं १५ मधील भाजप महायुतीचे उमेदवार सुरेश चंदू कांबळे, अनिता दयाशंकर यादव, अमित सरैया, प्रभाग क्रमांक ४ मधील भाजपच्या स्नेहा आंब्रे, मुकेश मोकाशी, सेनेच्या आशादेवी सिंह, सिद्धार्थ संजय पांडे तर प्रभाग क्रमांक २५ ड चे उमेदवार ॲड. दीनानाथ पांडे आदी महायुतीच्या उमेदवारांच्या पारडयात भरभरून मतांचे दान टाकण्याचे आवाहन निरहुआ यांनी केले.

कल्याण पश्चिमेतील जनता शिवसेना–भाजप युतीच्या पाठीशी ठामपणे उभी राहील –विश्वनाथ भोईर

कल्याण: कल्याण पश्चिमेत शिवसेना आणि भाजप महायुतीला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, संघटनात्मक ताकद आणि अनुभवी नेतृत्वाच्या जोरावर विजयाचा विश्वास आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला आहे. आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने आमदार भोईर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना हा विश्वास व्यक्त केला आहे.  आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेतील आमदार विश्वनाथ भोईर यांनी शिवसेना–भाजप युतीच्या विजयाबाबत ठाम विश्वास व्यक्त केला आहे. ठाकरे गट आणि मनसे यांना विधानसभा निवडणुकीतच पराभवाचा सामना करावा लागला असल्याने त्यांचा धोका आता कमी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत “आव्हान असल्याचे कुठेही वाटत नाही. काही प्रभागांत अपवादात्मक परिस्थिती असू शकते; मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे कल्याण डोंबिवलीवर बारीक लक्ष आहे. आमची टीम अत्यंत तगडी असून मैदानात पूर्ण ताकदीने उतरली आहे. त्यामुळे कोणाचेही आव्हान वाटत नाही,” असेही आमदार भोईर यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, “गेली अनेक वर्षे शिवसेनेवर प्रेम करणारे मतदार आमच्यासोबत आहेत. आम्ही त्यांच्याशी कधीही अंतर ठेवलेले नाही. मतदार आमच्यापासून लांब नाहीत. इतकी वर्षे तुम्ही आमच्या पाठीशी उभे आहात, आताही तीच साथ द्या असे आवाहन करतानाच कल्याण पश्चिमेतील जनता शिवसेना–भाजप युतीच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.”

२०१५ रोजी निवडून दिलेल्या सर्व नगरसेवकांविरोधात एल्गार 

२७ गाव सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीचा २७ गावांचा मुद्दा न मांडणाऱ्या उमेदवारांना मतदानादिवशी अद्दल घडविणार कल्याण : २७ गाव सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने २०१५ रोजी निवडून दिलेल्या सर्व नगरसेवकांविरोधात एल्गार पुकारला असून २७ गावांचा मुद्दा न मांडणाऱ्या उमेदवारांना मतदानादिवशी अद्दल घडवणार असल्याची भूमिका मांडत स्वतंत्र नगरपालिकेचा मुद्दा उचलणाऱ्या मनसे, शिवसेना(उबाठा), काँग्रेस, एनसीपी (एसपी) पक्षाला पाठिंबा दिला असल्याचे जाहीर केले आहे. २७ गाव सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीची बैठक पार पडली यावेळी त्यांनी हा निर्णय घेतला. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीबाबत २७ गावांतील नागरिकांची भूमिका सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने मांडली आहे. काही दिवसांपूर्वी जो पर्यंत या २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका होत नाही तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार विरोधी पक्षांनी पाठींबा दिला होता. मात्र सत्ताधार्यांनी निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने विरोधकांनी देखील आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. आज प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत कोणकोणत्या पक्षांनी २७ गावांच्या अस्मितेचा प्रश्न घेतला आहे हे समितीने पहिले आहे. यामध्ये प्रामुख्याने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेचा मुद्दा प्रचारात मांडला आहे. मात्र सत्ताधारी पक्षांना याबाबत गांभीर्य नसून, त्यातल्या त्यात मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच कल्याण येथे झालेल्या सभेत २०१५ साली २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेच्या दिलेल्या आश्वासनाची पुनरावृत्ती केली असून एकाच गोष्टीसाठी दहा वर्षे पाठपुरावा करावा लागत आहे हि खेदाची बाब आहे. निवडणुकीनंतर संघर्ष समितीच्या वतीने त्यांच्यावर दबाव आणू, मात्र हा विषय नगरविकास खात्याकडे प्रलंबित असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या खात्याचे मंत्री आहेत. हा चेंडू त्यांच्या कोर्टात असून याबाबत शून्य टक्के समर्थन त्यांच्याकडून येत आहे. प्रचारात शिवसेनेचे उमेदवार २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेच्या विरोधात होते. त्यामुळे ज्या ज्या पक्षांनी स्वत्तान्त्र नगरपालिकेबाबत समर्थन दिले आहे त्यांच्या पाठीशी संघर्ष समिती आणि २७ गावांतील नागरिक उभे असून ज्यांनी हा मुद्दा घेतला नाही त्यांना मतदानाच्या दिवशी अद्दल घडविणार असल्याची भूमिका २७ गाव सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने मांडली आहे.

पाथरवट समाज उन्नती मंडळ, कल्याण क्रिकेट चषक २०२६ उत्साहात संपन्न

कल्याण : पाथरवट समाज उन्नती मंडळ, कल्याण यांच्यावतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही क्रिकेट चषक २०२६ चे आयोजन मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात करण्यात आले. समाजबांधवांना एकत्र आणणे, सामाजिक बांधिलकी जपणे आणि सकारात्मक…

मतदाराचे नाव व मतदान केंद्र शोधण्यासाठी  मिरा – भाईंदर महापालिकेची Voter Help Desk सुविधा

मिरा-भाईंदर : राज्य निवडणूक आयोग यांच्या आदेशानुसार मिरा-भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ करीता सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत आहे. महापालिकामार्फत एकूण ९५८ मतदान केंद्र उभारण्यात आले असून मतदारांना मतदान प्रक्रियेबाबत सुलभ, पारदर्शक व अचूक माहिती मिळावी, निवडणूक विभागामार्फत मतदारांना मतदार यादीतील नाव व मतदान केंद्राची माहिती सहज शोधता यावे, यासाठी Voter Help Desk सुविधा तसेच QR कोड आधारित सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल आहे. या सुविधेमुळे नागरिकांना आपल्या मोबाईल फोनवर दिलेला QR कोड स्कॅन करून थेट मतदार यादी शोध पृष्ठावर जाता येणार आहे. याशिवाय, नागरिक https://mahasecvoterlist.in/ObjectionOnClick/SearchVoterName या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, तसेच मतदान केंद्राची माहिती सहज  तपासू  शकतात.  यामुळे मतदानाच्या दिवशी  होणारी गैरसोय टाळण्यास मदत होणार आहे. मतदान केंद्र तपासण्यासाठी मार्गदर्शक सूचना : दिलेला QR कोड मोबाईलवर स्कॅन करा किंवा लिंकवर क्लिक करून अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. आवश्यक माहिती (नाव / EPIC क्रमांक) भरा. मतदार यादीतील नाव व मतदान केंद्राची माहिती तपासा. मतदार यादीत नाव आणि मतदान केंद्र शोधण्यासाठी तांत्रिक अडचण येत असल्यास खालील निवडणूक निर्णय अधिकारी किंवा मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालयाच्या मतदार हेल्प डेस्क क्रमांकावर संपर्क साधावा. मतदाराचे नाव व मतदान केंद्र शोधण्यासाठी- whatsup chatbot क्र.: ९९६७६ ११२३४

प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची भव्य बाईक रॅली

मिरा भाईंदरच्या नागरिकांशी थेट संवाद मिरा-भाईंदर : निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मिरा भाईंदर शहरात शिवसेनेच्या वतीने भव्य बाईक रॅली आयोजित करण्यात आले होते. या रॅलीचे नेतृत्व परिवहन मंत्री  प्रताप सरनाईक यांनी केले, ज्यामुळे रॅलीला विशेष उत्साह लाभला आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परिवहन मंत्री  प्रताप सरनाईक यांनी नागरिकांशी संवाद साधताना विकासाभिमुख धोरणे, महापालिकेतील योजनेतील पारदर्शकता आणि जनहिताला प्राधान्य देण्याची भूमिका मांडली.  नागरिकांनी सरनाईक यांना प्रतिसाद देत “मिरा भाईंदरच्या कारभारात बदल हवा” अशी भावना उघडपणे व्यक्त केली.

माजी नगरसेवक आणि शिवसेना उपशहर प्रमुख मोहन उगले यांच्या जीवाला धोका

 पोलीस सरंक्षण देण्याची पोलीस उपायुक्तांकडे केली मागणी  कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतांनाच माजी नगरसेवक तथा  शिवसेनेचे उपशहर प्रमुख यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत पोलीस सरंक्षण देण्याची मागणी परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्याकडे केली आहे. मोहन उगले हे माजी नगरसेवक तसेच शिवसेना पक्षाचे उपशहर प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. केडीएमसी निवडणुकीसाठी त्यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र पक्षाच्या आदेशांनंतर त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली होती. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर देखील काही समाजकंटक व राजकीय विरोधक हे जीवे ठार मारण्याचा उद्देशाने रेकी करून ठीक ठिकाणी घेराव घालण्याचा प्रयत्न करीत आहेत.  त्यामुळे त्यांच्याकडून आपल्या जीवितास धोका निर्माण झाला असल्याचा आरोप मोहन उगले यांनी केला आहे. त्यामुळे या गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ २४ तास दोन पोलीस अंगरक्षक १६ जानेवारी पर्यंत पुरविण्यात यावेत. यासाठी जो काही शासकीय रक्कम भरणा असेल तो भरण्यास तयार असल्याचे मोहन उगले यांनी सांगितले. ००००० बिनविरोध निवडणुकांबाबत मुंबई उच्च न्यायालयात PIL स्वीकारली ठाणे : सामाजिक कार्यकर्ते अजय जेया यांनी दाखल केलेली जनहित याचिका (PIL) बॉम्बे उच्च न्यायालयाने सुनावणीसाठी स्वीकारली आहे.  न्यायालयाने या प्रकरणी १४ जानेवारी रोजी सर्क्युलेशन मंजूर केले आहे. महानगरपालिका निवडणुकांमध्ये मतदान न घेता उमेदवारांना बिनविरोध निवडून घोषित करण्याच्या पद्धतीला ही जनहित याचिका आव्हान देते. केवळ एकच उमेदवार शिल्लक राहिला तरीही मतदान घेणे बंधनकारक करावे, जेणेकरून नागरिकांना NOTA (नोटा) या पर्यायासह आपला लोकशाही हक्क बजावता येईल, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेत सहा महानगरपालिका प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर निवडणुका बिनविरोध घोषित करण्यात आल्याचा मुद्दा मांडण्यात आला असून, अशा प्रकारांमुळे पारदर्शकता, जबाबदारी आणि मुक्त व निष्पक्ष निवडणुकांवर परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ही जनहित याचिका अ‍ॅड. विनोद उतेकर, अ‍ॅड. श्वेता सराफ व इतर यांच्या मार्फत दाखल करण्यात आली आहे. अजय जेया यांनी सांगितले की, ही PIL लोकशाही मूल्ये बळकट करण्यासाठी आणि नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे.

डोंबिवलीत पैसे वाटपावरून भाजप – शिंदे सेनेत रक्तरंजित  राडा 

 शिंदेसेनेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक,  डोंबिवलीत तणाव कल्याण : डोंबिवली पूर्वेत प्रभाग क्रमांक २९ मध्ये तुकारामनगर, सुनीलनगर भागात शिवसेना (शिंदे) आणि भाजपचे उमेदवार  समोरासमोर उभे ठाकले आहेत. या प्रभागात गेल्या काही दिवसांपासून तणावाचे वातावरण असून  दोन दिवसापूर्वी भाजप उमेदवाराच्या प्रचारकांनी प्रभागात प्रचारपत्रकांसोबत पैसे वाटप केल्याचा आरोप या प्रभागातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील,  यांनी केला होता. ही घटना ताजी असतानाच, पुन्हा याच वादातून  सुनीलनगर भगतवाडी भागात शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नितीन मट्या पाटील, रवी मट्या पाटील आणि इतर आठ जणांनी भाजप महिला उमेदवाराचे पती ओमनाथ नाटेकर (४७) यांच्यावर जीवघेणा  हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात भाजपच्या ओमनाथ नाटेकर यांच्या तक्रारीवरून शिंदे गटाच्या उमेदवारासह इतर कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करत पाच शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना अटक केल्याची माहिती एसीपी सुहास हेमाडे यांनी दिली आहे. तर शिंदेसेनेचे उमेदवार नितीन पाटील हेही जखमी झाले असून त्यांचावर पोलिसांच्या नजरकैदेत उपचार सुरु असून इतर अरीपोचा शोध पोलीस घेत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.  या राड्यात भाजपचे २ तर शिवसेनेचे २ पदाधिकारी जखमी झाले आहे. दुसरीकडे शिंदेसेनेच्या उमेदारालासह राड्यात सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांनाही अटक करण्याच्या मागणीसाठी आज भाजपच्या वतीने रामनगर पोलीस ठाण्यावर मूक मोर्चा काढण्यात आला. महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून अवघ्या दोन दिवसांत मतदान होणार आहे. मात्र प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यातच केडीएमसी निवडणुकीला हिंसक वळण लागल्याचं चित्र पाहायला मिळाले आहे.

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहिलेल्या पवार पब्लिक शाळेतील ८० कर्मचारी वर्गावर गुन्हा दाखल

कल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६चे कामकाज पारदर्शक रितीने व सुरळीतपणे व विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी यांनी शासकीय, निमशासकीय अधिकारी कर्मचारी, शाळा, महाविद्यालय यांच्या…