Category: ठाणे

Thane news

महाराष्ट्राला सागरी जलतरण,कबड्डी, सॉकरमध्ये कांस्य

२ री खेलो इंडिया बीच स्‍पर्धा, दीव २०२६ महाराष्ट्राला सागरी जलतरण,कबड्डी, सॉकरमध्ये कांस्य दिक्षा यादवला रौप्‍यपदकाची हुलकावणी, कबड्डीत निसटता पराभव, सॉकरमध्ये अपयशी झुंज दीव:  खेलो इंडिया बीच स्‍पर्धेत महाराष्ट्राच्‍या खेळाडूंनी सागरी जलतरण, कबड्डी व सॉकरमध्येही कांस्यपदकांची लयलुट केली आहे. सागरी जलतरणात साताऱ्याच्‍या दिक्षा यादवचे रौप्‍यपदक  अवघ्या ७ दशांश सेकंदाने हुकले. पुरूषाच्‍या बीच कबड्डीत केवळ ३ गुणांनी महाराष्ट्र उपांत्‍य फेरीत पराभव स्‍वीकारावा लागला. दीवमधील अरबी समुद्रात सकाळच्‍या सत्रात १० कि.मी. सागरी जलतरणाचा थरार रंगला. महिलांच्‍या गटात सुरूवातीपासून महाराष्ट्राच्‍या २० वर्षीय  दिक्षा यादवे मुसंडी मारली होती. दुसऱ्या फेरीत ती मागे पडली. अखेरच्‍या टप्‍प्‍यात २.४८.०४ वेळ नोंदवून तीने कांस्य पदकाचा पल्‍ला गाठला. अवघ्या ७ दशांश सेकंदाने कर्नाटकच्‍या असरा सुधीरने रौप्‍य पदक तर २.४६.३४ वेळेत कर्नाटकच्‍याच अश्मिता चंद्राने सुवर्णपदकावर नाव कोरले. गतवर्षी याच प्रकारात दिक्षाने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. साताऱ्यातील दिक्षा ही  पुण्यातील शासनाच्‍या क्रीडा प्रबोधिनीत सराव करते. खेलो इंडिया विद्यीपीठ स्‍पर्धा, खेलो इंडिया युवा स्‍पर्धा तर खेलो इंडिया बीच स्‍पर्धेत १६ पदके जिंकण्याचा पराक्रम तीने केला आहे. महाराष्ट्रातील विजेत्‍यांची भेट घेत पथकप्रमुख नवनाथ फडतरे यांनी अभिनंदन केले आहे. घोघला समुद्र किनाऱ्यावर रंगलेल्‍या बीच सॉकर मैदानात महाराष्ट्राच्‍या मुलांनी साखळी लढतीत चमकदार कामगिरी करत उपांत्‍य फेरीत मुसंडी मारली होती. उपांत्‍य लढतीत बलाढय केरळकडून १६-१  गोलने महाराष्ट्र पराभूत झाला. या कामगिरीमुळे सलग दुसऱ्या वर्षी कांस्य पदकावर महाराष्ट्राला समाधाव मानावे लागले. बीच कबड्डीतील पुरूषांची महाराष्ट्र विरूध्द हरियाणा लढत लक्षवेधी ठरली. पूर्वार्धात अभिषेक गुंगेसह सुरज दूंदळे यशस्‍वी चढाय्या करीत लढतीत चुरस कायम राखली होती. पूर्वार्धात १५ -१७ गुणांनी हरियाणा आघाडीवर होता. हीच आघाडी निर्णायक ठरली. उत्तरार्धात तुल्‍यबळ खेळाचे प्रदर्शन करीत शेवटच्‍या मिनिटापर्यंत ३०-३० बरोबरी करण्यात महाराष्ट्र यशस्‍वी ठरला होता. शेवटच्‍या मिनिटाला हरियाणाने यशस्‍वी चढाई करीत महाराष्ट्राला ३ गुणांनी पराभूत करीत ३३-३० गुणांनी बाजी मारली. महिलांच्‍या उपांत्‍य सामन्‍यात राजस्‍थानकडून महाराष्टाला ५६-२८ गुणांनी पराभूत व्‍हावे लागले. उपांत्‍य फेरीतील अपयशामुळे महाराष्ट्राच्‍या दोन्‍ही संघाला कांस्यपदकावरच खेलो इंडिया मोहिमाचा समारोप करावा लागला आहे.

आनंद भारती, महाराष्ट्र लोककलावंततर्फे राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा

आनंद भारती, महाराष्ट्र लोककलावंततर्फे राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ठाणे : श्री आनंद भारती समाज आणि महाराष्ट्र लोककलावंत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने निमंत्रितांच्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री आनंद भारती समाजाचे सचिव संदिप कोळी…

 मतधिकार ॲपच्या प्रचारासाठी नौपाडा प्रभाग समितीची जोरदार मोहीम

मतधिकार ॲपच्या प्रचारासाठी नौपाडा प्रभाग समितीची जोरदार मोहीम ठाणे :  लोकशाही अधिक सक्षम, पारदर्शक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी सुलभ व्हावी, या उद्देशाने राज्य निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या निवडणूक मतधिकार ॲपचा व्यापक…

वंदे मातरम आता ‘व्होट बँक मातरम’ बनलंय – शहजाद पूनावाला

वंदे मातरम आता ‘व्होट बँक मातरम’ बनलंय – शहजाद पूनावाला अनिल ठाणेकर ठाणे, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेले “वंदे मातरम” आता व्होट बँक मातरम बनले आहे. काही लोकांकरीता ही व्होट…

निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांचा टपाली मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद

निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांचा टपाली मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद अनिल ठाणेकर ठाणे: राज्यातील सर्वच महानगरपालिकांच्या निवडणुका एकाच दिवशी होत असल्याने निवडणूक कर्तव्यावर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता…

आज कळवा-मुंब्र्यात सुप्रिया सुळेंची तोफ धडाडणार – मनोज प्रधान

आज कळवा-मुंब्र्यात सुप्रिया सुळेंची तोफ धडाडणार – मनोज प्रधान अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून…

प्लॅस्टिक व चिनी मांजाविरोधात ठाणे महापालिकेची कडक कारवाई

प्लॅस्टिक व चिनी मांजाविरोधात ठाणे महापालिकेची कडक कारवाई ६ दिवसांत ५३,५०० रुपयांचा दंड ठाणे:  पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणारा चिनी मांजा, चिनी दोरा तसेच नायलॉन व प्लास्टिकपासून (सिंथेटिक) तयार करण्यात आलेला…

नवी मुंबईत सानपाडा येथे मराठा समाज वधु-वर मेळावा

नवी मुंबईत सानपाडा येथे मराठा समाज वधु-वर मेळावा नवी मुंबई: नवी मुंबईत सानपाडा येथे मराठा विकास प्रतिष्ठान ही संस्था २००६ पासून सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात गेली २० वर्षे सातत्याने…

मुख्य निवडणूक निरीक्षक निलेश गोरख सागर यांनी घेतला केडीएमसी निवडणूकीचा आढावा

मुख्य निवडणूक निरीक्षक निलेश गोरख सागर यांनी घेतला केडीएमसी निवडणूकीचा आढावा कल्याण: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६साठी नियुक्त करण्यात आलेले मुख्य निवडणूक निरीक्षक निलेश गोरख सागर यांनी महापालिका सार्वत्रिक निवडणूकीचा सर्वंकष आढावा…

साबे गावात प्रभाग क्र. २९ महायुतीच्या उमेदवारांसाठी सुभाष भोईर यांचा झंझावाती प्रचार

साबे गावात प्रभाग क्र. २९ महायुतीच्या उमेदवारांसाठी सुभाष भोईर यांचा झंझावाती प्रचार आमदार निरंजन डावखरे उपस्थित (आरती परब): ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठामपा प्रभाग क्र. २९ मध्ये महायुतीच्या तीन उमेदवारांच्या…