Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

मुंबई, ठाण्यात महिला राज

मुंबई, ठाण्यात महिला राज स्लग- मुंबई महानगरपालिकेत रितू तावडे भाजपाच्या पहिल्या महापौर तर शिंदेंच्या शिवसेनेचे संजय घाडी उपमहापौर ० ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेच्या  शर्मिला पिंपळोलकर महापौर तर भाजपाचे कृष्णा पाटील उपमहापौर ० मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महापौर-उपमहापौरांना दिल्या…

लोकसभेत राहुल गांधींचा रुद्रावतार: एपस्टीन फाईलवरून सभागृहात गोंधळ

लोकसभेत राहुल गांधींचा रुद्रावतार: एपस्टीन फाईलवरून सभागृहात गोंधळ नवी दिल्ली : एपस्टिन फाईलच्या दबावाखाली पंतप्रधान मोदी असून त्यामुळेच भाजपाने देश अमेरिकेला विकला असल्याचा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला…

भाजपाप्रवेशानंतरही पनवेलच्या जे.एम.म्हात्रेना ईडीचा दणका

भाजपाप्रवेशानंतरही पनवेलच्या जे.एम.म्हात्रेना ईडीचा दणका स्लग- एकुण ७० कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त वनविभागाची जमीन चढ्याभावाने शासनाला विकून रग्गड पैसा जमवला नवी मुंबई : पनवेलमधील प्रसिद्ध ठेकेदार जे एम म्हात्रे यांनी भाजपामध्ये प्रवेश…

– इन्शुरन्स शील्ड क्रिकेट स्पर्धा

– इन्शुरन्स शील्ड क्रिकेट स्पर्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा १४ धावांनी विजय मुंबई: ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी आयोजित इन्शुरन्स शील्ड क्रिकेट स्पर्धेत (२०२५-२६) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने इंडिया फर्स्ट लाइफ इन्शुरन्सवर…

म्हाडा फ्लॅट प्रकरणी आरोपीस कल्याण सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

म्हाडा फ्लॅट प्रकरणी आरोपीस कल्याण सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन कल्याण : म्हाडा अंतर्गत फ्लॅट मिळवून देण्याच्या उद्देशाने फसवणूक केल्याच्या प्रकरणात डोंबिवली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी दीपक विष्णू चव्हाण यास कल्याण…

  आमदार नरेंद्र मेहता आणि कंपनीच्या फसवणुकीविरुद्ध कोर्टाची कठोर कारवाई

आमदार नरेंद्र मेहता आणि कंपनीच्या फसवणुकीविरुद्ध कोर्टाची कठोर कारवाई बिल्डर मेहता यांच्या कंपनीविरुद्ध खरेदीदार मनोज दुबे यांच्या बाजूने मोठा निर्णय मिरा – भाईंदर/ अरविंद जोशी एका महत्त्वपूर्ण निर्णयात, महाराष्ट्र राज्य ग्राहक वाद निवारण कोर्टाने सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित एका प्रकरणात खरेदीदार मनोज दुबे यांच्या बाजूने निकाल दिला. कंपनीचे प्रवर्तक आणि जबाबदार अधिकारी आमदार नरेंद्र एल. मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कंपनीला कडक शब्दांत फटकारले. कोर्टाने या प्रकरणाला सेवेतील कमतरता, फसवणूक आणि अनुचित व्यापार असल्याचे म्हटले आहे. मनोज दुबे यांनी १२ फेब्रुवारी २०१३ रोजी भाईंदर (पूर्व) येथील सेव्हन इलेव्हन रेसिडेन्सीच्या ७ व्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक डी/७०६ साठी नोंदणीकृत करार केला आणि मोठी रक्कम जमा केली. उर्वरित रक्कम भरण्यासाठी त्याने इंडियाबुल्स फायनान्सकडून गृहकर्जासाठी अर्ज केला, परंतु बिल्डरकडे ७ व्या मजल्याच्या बांधकामासाठी मंजूर आराखडा नव्हता, कारण परवानगी फक्त ४ थ्या मजल्यापर्यंतच देण्यात आली होती. या कारणास्तव, बँकेने कर्ज रद्द केले. नंतर, बिल्डरने सुधारित परवानगी घेतली, परंतु मेहता अँड कंपनीने तरीही भरीव व्याज आणि दंडाची मागणी केली, पेमेंटमध्ये विलंब झाल्याचे कारण खरेदीदाराला जबाबदार धरले. कंपनीच्या मागणीबाबत, कोर्टाने म्हटले की बिल्डर स्वतःच्या चुकीचा फायदा घेऊ शकत नाही, कारण परवानगीशिवाय ७ व्या मजल्याचा फ्लॅट विकण्याचा करार करणे हा गंभीर गुन्हा आहे. रद्द करणे आणि धमकावणे वृत्ती खरेदीदार मनोज दुबे यांनी दुसऱ्या बँकेकडून कर्जाची व्यवस्था करून पेमेंट करण्याचा प्रयत्न केला, परंतु ९ जानेवारी २०१४ रोजी, बिल्डरने एकतर्फीपणे करार रद्द करणारे पत्र जारी केले आणि पेमेंट स्वीकारण्यास नकार दिला. मेहताच्या वर्तनाबाबत, कोर्टाने म्हटले की नोंदणीकृत करार केवळ पत्राद्वारे रद्द करता येत नाही आणि बिल्डरचे वर्तन स्पष्टपणे अन्याय्य होते. कोर्टाला असेही आढळून आले की वाटप पत्रात क्षेत्रफळ ५९० चौरस फूट असल्याचे नमूद केले आहे, तर करारात कार्पेट क्षेत्रफळ ४७२ चौरस फूट असल्याचे नमूद केले आहे. ही तफावत देखील बेकायदेशीर आणि अस्पष्ट आहे. कोर्टाचा आदेश आयोगाने बिल्डर, प्रवर्तक नरेंद्र एल. मेहता आणि रजनीकांत सिंग यांना संयुक्तपणे जबाबदार धरले आणि त्यांना फ्लॅटचा ताबा देण्याचे आदेश दिले. त्यांनी खरेदीदाराला मानसिक छळासाठी भरपाई म्हणून ₹२.५ लाख, खटल्याचा खर्च म्हणून ₹५०,००० आणि प्रत्यक्ष ताबा मिळेपर्यंत दररोज ₹१,००० देण्याचे आदेश दिले. आयोगाच्या या आदेशात स्पष्ट केले आहे की बांधकाम व्यावसायिक वैध परवानगीशिवाय करार करू शकत नाहीत आणि बांधकाम व्यावसायिकाच्या चुकीमुळे होणाऱ्या विलंबासाठी खरेदीदारांना दंड आकारला जाऊ शकत नाही. रिअल इस्टेट व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि निष्पक्षता आवश्यक आहे.…

`टीएमटी’ने डिजिटल ओळखपत्र अर्ज ऑनलाईन स्वीकारावेत : संजय वाघुले

`टीएमटी’ने डिजिटल ओळखपत्र अर्ज ऑनलाईन स्वीकारावेत : संजय वाघुले ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेने (टीएमटी) ज्येष्ठ नागरिकांना मोफत बसप्रवासासाठी जाहीर केलेल्या डिजिटल ओळखपत्र योजनेतील अर्ज `महा ई सेवा’ केंद्रांच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने स्वीकारावेत, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी केली आहे. महापालिकेचे आयुक्त सौरभ राव व `टीएमटी’चे व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांना पत्र पाठवून संजय वाघुले यांनी ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज दाखल करताना होणाऱ्या अतोनात हालाकडे लक्ष वेधले. तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची आग्रही मागणी केली आहे. `टीएमटी’ बसमधून ६० वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवासासाठी डिजिटल ओळखपत्र देण्यात येत आहेत. त्यासाठी ठाणे स्थानक, कोपरी आगार, आनंदनगर, वागळे आगार, वृंदावन सोसायटी, लोकमान्यनगर टर्मिनस, पवारनगर टर्मिनस आणि धर्मवीर चौक  येथे अर्ज स्वीकृती केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या ओळखपत्रासाठी ज्येष्ठ नागरिकांना स्वत: उपस्थित राहण्याची अट आहे. त्यात अचानक उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना उन्हामध्ये रांगेत उभे राहावे लागत आहे. सध्या ठाणे स्थानकातील केंद्रावर सर्वात जास्त गर्दी होत असून, एक ते दोन तास ज्येष्ठ नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागते, याकडे संजय वाघुले यांनी लक्ष वेधले आहे. ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २५ लाखांहून अधिक आहे. त्यात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांची संख्या ४ ते ५ लाखांपर्यंत असल्याचा अंदाज आहे. त्यातील निम्म्या ज्येष्ठ नागरिकांनी `टीएमटी’चे डिजिटल ओळखपत्र काढण्याचे ठरविल्यास केंद्रांवर मोठी गर्दी होईल. सध्या या योजनेसाठी केवळ ऑफलाईन अर्ज स्विकारले जात आहेत. त्याऐवजी महा ई सेवा केंद्रांच्या माध्यमातून परिवहन प्रशासनाने अर्ज स्विकारल्यास ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय टळू शकेल, याकडे लक्ष वेधून संजय वाघुले यांनी डिजिटल ओळखपत्र योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्याची मागणी केली आहे.

शिवाजी पार्क जिमखाना कॅरम स्पर्धेत मिताली – घुफ्रान जेते

शिवाजी पार्क जिमखाना कॅरम स्पर्धेत मिताली – घुफ्रान जेते मुंबई : शिवाजी पार्क जिमखाना आयोजित महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने तसेच सारस्वत बँक पुरस्कृत १७ व्या शिवाजी पार्क जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या गटाच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या महम्मद घुफ्रानने पुण्याच्या अभिजित त्रिपनकरला २५-१४, २५-० असे सरळ आणि सहज दोन सेटमध्ये हरवून विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीच्या या सामन्यात घुफ्रानने सुरुवातीपासूनच सामन्यावर आपली पकड ठेवली होती. तर महिला एकेरीच्या अंतिम लढतीत मुंबईच्या मिताली पाठकने मुंबईच्या रिंकी कुमारीला २५-१२, २१-९ असे सहज पराभूत करून विजयावर आपले नाव कोरले. पुरुषांच्या तिसऱ्या क्रमांकासाठीच्या लढतीत ठाण्याच्या झैद अहमद फारुकीने पुण्याच्या सागर वाघमारेला २५-०, २३-७ असे हरवले. तर महिलांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत ठाण्याच्या समृद्धी घाडिगावकरने बाजी मारली. तिने ठाण्याच्याच चैताली सुवारेला १७-१५, २५-११ असे सहज चीत केले. प्रमुख अतिथी लोकमतचे संपादक अतुल कुलकर्णी यांच्या शुभहस्ते विजेत्या खेळाडूंना चषक, प्रमाणपत्र व रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी शिवाजी पार्क जिमखान्याचे विश्वस्थ श्रीमती लता देसाई, प्रकाश नायक, महेंद्र ठाकूर, दीपक विश्वासराव, व्हाईस चेअरमन विश्वास नेरुरकर, सरचिटणीस संजीव खानोलकर, सह चिटणीस सुनील रामचंद्रन, इनडोअर खेळ सचिव सनिल समेळ, खजिनदार सी ए विलास सोमण, कार्ड सचिव अजय पाटणकर, कॅन्टीन सचिव आशुतोष जोगळेकर व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार आणि सहसचिव केतन चिखले व डॉ अनिल नेरुरकर उपस्थित होते. पुरुष एकेरी उपांत्य फेरीचे निकाल पुढील प्रमाणे. महम्मद घुफ्रान ( मुंबई ) वि वि सागर वाघमारे ( पुणे ) २५-१७, २५-२ अभिजित त्रिपनकर ( पुणे ) वि वि झैद अहमद फारुकी ( ठाणे ) २३-१९, २५-० महिला एकेरी उपांत्य फेरीचे निकाल पुढील प्रमाणे. रिंकी कुमारी ( मुंबई ) वि वि चैताली सुवारे ( ठाणे ) २५-२, २५-३ मिताली पाठक ( मुंबई ) वि वि समृद्धी घाडीगावकर ( ठाणे ) २५-१०, ५-२५, २१-८

  अमर हिंद मंडळात ‘डायनॅमिक’ खो-खोचा महासंग्राम!

कै. उमेश शेणॉय स्मृतीप्रित्यर्थ पुरुष व महिला व्यावसायिक स्पर्धा-२०२६ अमर हिंद मंडळात ‘डायनॅमिक’ खो-खोचा महासंग्राम! क्रीडांगणाला ‘अजितदादा पवार क्रीडा नगरी’ नाव शुक्रवार पासून रंगणार खो-खो क्रीडा जल्लोष मुंबईतील क्रीडाप्रेमींसाठी पर्वणीच! अमर हिंद मंडळाच्या वतीने, मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने, १३ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत अमर हिंद मंडळाच्या क्रीडांगणावर कै. उमेश शेणॉय यांच्या स्मरणार्थ डायनॅमिक प्रायोगिक व्यावसायिक पुरुष व महिला खो-खो स्पर्धा-२०२६ आयोजित करण्यात आली आहे. वेग, डावपेच, चपळाई आणि व्यावसायिक दर्जाचा थरार अनुभवण्यासाठी ही स्पर्धा क्रीडारसिकांसाठी मोठे आकर्षण ठरणार आहे. ‘अजित दादा पवार क्रीडा नगरी’चे नामकरण या प्रतिष्ठित स्पर्धाकालावधीत अमर हिंद मंडळाच्या क्रीडांगणाला ‘अजित दादा पवार क्रीडा नगरी’ असे नामकरण करण्यात येणार आहे. या नामकरणामुळे स्पर्धेला अधिक भव्य आणि ऐतिहासिक स्वरूप प्राप्त होणार असून, क्रीडा क्षेत्रात नव्या पर्वाची नोंद होणार आहे.…

  दुर्गाडी किल्ला सर्कलजवळ खड्ड्यांचा प्रश्न मार्गी

शहर अभियंता अनीता परदेशी यांच्या तत्परतेमुळे दुर्गाडी किल्ला सर्कलजवळ खड्ड्यांचा प्रश्न मार्गी कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शहर अभियंता अनीता परदेशी यांच्या तत्परतेमुळे कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ला सर्कलजवळ खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे. कल्याण पश्चिमेकडील दुर्गाडी किल्ला सर्कल परिसरातील रस्त्यावर निर्माण झालेल्या धोकादायक खड्ड्यांमुळे वाहनचालक व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. विशेषतः भिवंडी–कल्याण महामार्गावरील दुर्गाडी पुलाच्या उतारालगतच हे खड्डे असल्याने कोणत्याही क्षणी मोठा अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जात होती.  हजारो वाहने ये-जा करणाऱ्या या मार्गावर खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावून वाहतूक कोंडी होत असे. दुचाकीस्वार, रिक्षाचालक तसेच पादचाऱ्यांचे जीव अक्षरशः धोक्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालगतच आणि शहराच्या प्रवेशद्वारावरच अशी अवस्था असणे हे प्रशासनाच्या दुर्लक्षाचे उदाहरण असल्याचे लक्षात येताच या परिस्थितीची कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या शहर अभियंता अनीता परदेशी यांनी तात्काळ दखल घेत परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. कोणताही विलंब न करता त्यांनी संबंधित विभागाला त्वरित सूचना देत युद्धपातळीवर दुरुस्तीचे आदेश दिले. जागरूक नागरिकांनी याबाबत परदेशी यांना सूचित करून वस्तूस्थितीकडे लक्ष वेधले होते. परदेशी यांच्या प्रभावी हस्तक्षेपामुळे अवघ्या २४ तासांत पुलाच्या उतारालगत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या भोवती असलेले सर्व खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीस सुरक्षित करण्यात आला आहे. वेळेत ही कारवाई झाली नसती, तर गंभीर अपघात अटळ होते, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. वेळेवर आणि संवेदनशीलपणे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे संभाव्य अपघात टळले असून नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाली आहे. प्रशासनाच्या या जलद प्रतिसादाबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत शहर अभियंता अनीता परदेशी यांच्या कार्यतत्परतेचे विशेष कौतुक केले आहे.