Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

अजित दादांच्या मृत्यूस कारणीभूत व्हिएसआरच्या विमानांस उड्डाण बंदी

अजित दादांच्या मृत्यूस कारणीभूत व्हिएसआरच्या विमानांस उड्डाण बंदी  रोहीत पवारांनी पहिली लढाई जिंकली.0 चार लिअरजेट विमानांच्या उड्डाणांना बंदी नवी दिल्ली : अजित पवार यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या व्हिएसआरच्या विमानांना केंद्र सरकाराने दणका दिला आहे.…

भुमरेंचा ‘समृद्ध’ घोटाळा

भुमरेंचा ‘समृद्ध’ घोटाळा  समृद्धी महामार्गात ११५० कोटींचा महाघोटाळा ० ड्रायव्हरच्या नावे हिबानामा ० अंबादास दानवेंचा पुराव्यानिशी आरोपाने खळबळ छत्रपती संभाजीनगर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांचा समृद्ध घोटाळ्याचा आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते…

केरळ नव्हे आता केरळम म्हणा !

केरळ नव्हे आता केरळम म्हणा ! नवी दिल्ली : भारताच्या दक्षिणेकडील केरळ राज्याला आता यापुढे केरळम म्हणावे लागणार आहे. केळरचे नाव बदलून ‘केरळम्’ करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात…

रविंद्र देवधर यांना बलराज साहनी पुरस्कार घोषित

रविंद्र देवधर यांना बलराज साहनी पुरस्कार घोषित पुणे : बलराज साहनी – साहिर लुधियानवी फाऊंडेशनतर्फे  देण्यात येणारा प्रतिष्ठेचा बलराज साहनी पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ रंगकर्मी रविंद्र देवधर यांना घोषित झाला असून,…

मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक म्हणून अरविंद मालखेडे यांनी पदभार स्विकारला

मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक म्हणून अरविंद मालखेडे यांनी पदभार स्विकारला ( राजेंद्र साळसकर ) मुंबई -अरविंद मालखेडे यांनी मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांनी रेल्वे बोर्डात…

 वैनगंगा-नळगंगा महत्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी

वैनगंगा-नळगंगा महत्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी जल अभ्यासक डॉ.प्रवीण महाजन यांच्या प्रयत्नाला मोठे यश  राजेंद्र साळसकर मुंबई : पश्चिम विदर्भाला सुजलाम-सुफलाम करणाऱ्या आणि १४ वर्षांपासून मजुरीच्या प्रतीक्षेत असलेला महत्वाकांक्षी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता देऊन विदर्भवासियांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विदर्भाचे सुपुत्र देवेंद्र फडणवीस यांनी मोठी भेट दिली. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच नागपूर भेटीत जल अभ्यासक डॉ. प्रवीण महाजन यांनी ३ नोव्हेंबर २०१४ रोजी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाबाबत मागणी केली. वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प नकाशा नसल्याने सातत्याने होणाऱ्या शेतकरी आत्महत्या व नापिकीमुळे शेतकऱ्यांचे, कामकऱ्यांचे जगणे कठीण झाले होते. यावर उपाय म्हणून वैनगंगा नदीतून आपल्या हिश्यातील वाहून जाणारे पाणी नदीजोडद्वारे वळविल्यास पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या शेतीकरिताया पाण्याचा उपयोग करून त्यांचे जीवनमान उंचावल्या जाऊ शकते. याकरता डॉ. महाजन यांनी ही मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद देत मुख्यमंत्री फडणवीसांनी जलसंपदा विभागाला सदर विषयाबाबतचा स्थितिदर्शक अहवाल शासनास त्वरित सादर करण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार जलसंपदा विभागाने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांनी यावर अभ्यास करून अहवाल सादर करण्यात यावा,या आदेशाद्वारे त्यांनी अहवाल तयार केला. यानंतर राज्य तांत्रिक सल्लागार समिती,जल विदन्यान व धरण सुरक्षितता विभाग,राष्ट्रीय  जल विकास प्राधिकरण,  महाराष्ट्र जल संपत्ती नियमन प्राधिकरण ( MWRRA ), या सर्वांनी नदीजोड प्रकल्पाच्या अहवालाची छाननी करून मागील आठवड्यात प्रशासकीय मान्यतेसाठी मंत्रिमंडळासमोर सादर केला होता.त्यानंतर मंत्रिमंडळाने आज झालेल्या बैठकीत मंजूरी प्रदान करत या नदीजोड प्रकल्पाला हिरवी झेंडी दाखवून  विदर्भपुत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ वासियांचे स्वप्न पूर्ण केले आहे. प्रसिद्ध जल अभ्यासक डॉ.प्रवीण महाजन यांनी वैनगंगा – नळगंगा या नदीजोड प्रकल्पाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सन २०१४ साली लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती.तसेच  गेली १२ वर्षे म्हणजे एक  तप या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला होता.या मान्यतेमुळे डॉ.प्रवीण महाजन यांच्या एक तपाच्या या  तपश्चर्येला मोठे यश मिळाले असून त्यांची तपश्चर्या फळाला आल्याचं बोललं जात आहे.

  महानिर्यात इग्नाईट कन्व्हेंशन-२०२६ कार्यशाळा संपन्न

महानिर्यात इग्नाईट कन्व्हेंशन-२०२६ कार्यशाळा संपन्न जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे विशेष मार्गदर्शन  अशोक गायकवाड   अलिबाग :विकास आयुक्त (उद्योग) यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या एमएसएई क्षेत्रावर अधिक भर देऊन त्यांची…

 बीपीएमसी कायद्यानुसार कर व दर निश्चित करण्यासाठी तातडीने महासभा बोलवा

बीपीएमसी कायद्यानुसार कर व दर निश्चित करण्यासाठी तातडीने महासभा बोलवा भाजपा नगरसेवक दिपेश म्हात्रे यांची केडीएमसी महापौरांकडे मागणी कल्याण : बीपीएमसी कायद्यानुसार कर व दर निश्चित करण्यासाठी तातडीने महासभा बोलवण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी केली असून याबाबत त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर हर्षाली चौधरी यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे १२२ नगरसेवक दिनांक १६ जानेवारी रोजी निवडून आले असून, ३ फेब्रुवारी रोजी महापौरपदी नियुक्ती हर्षाली चौधरी यांची नियुक्ती झाली आहे. तथापि, बीपीएमसी कायद्या  मधील तरतुदीनुसार  महानगरपालिकेचे कर व दर हे दिनांक २० फेब्रुवारीपूर्वी निश्चित करणे अत्यावश्यक आहे. मात्र, आजपर्यंत यासंदर्भात कोणतीही महासभा घेण्यात आलेली नाही, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. गेल्या पाच वर्षांपासून महानगरपालिकेचा कारभार प्रशासकांच्या माध्यमातून चालू होता. नागरिकांनी व लोकशाही प्रक्रियेद्वारे निवडून दिलेल्या १२२ नगरसेवकांच्या अस्तित्वातही जर अशा महत्त्वाच्या विषयांवर महासभा होत नसेल, तर पुन्हा प्रशासनाचा कारभार प्रशासकांच्या हातीच राहणार का, असा प्रश्न सर्वसामान्य नगरसेवकांच्या मनात निर्माण होत आहे. महासभा ही लोकशाही व्यवस्थेतील सर्वोच्च निर्णयप्रक्रिया असून, तिच्यामार्फतच कर व दर निधित होणे अपेक्षित आहे. यामध्ये विलंब होणे हे नागरिकांच्या हिताच्या दृष्टीनेही योग्य नाही. त्यामुळे तातडीने महासभा बोलवून कर व दर निश्चित करण्याचा विषय मांडण्यात यावा. महानगरपालिकेच्या आगामी अर्थसंकल्पासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात. निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना त्यांच्या अधिकारानुसार निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात यावे अशी मागणी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी महापौरांकडे केली आहे.

केडीएमसीतर्फे महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

केडीएमसीतर्फे महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान कल्याण : ८ मार्च २०२६ रोजीच्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कर्तृत्वान महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमा करिता कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्य क्षेत्रातील सर्व महिलांनी आपण केलेल्या कामगिरी बाबतची संपूर्ण माहिती कागदपत्रे अर्जा सहित महिला व बालकल्याण विभाग, कल्याण डोंबिवली महानगपालिका येथे दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत जमा करण्याचे आवाहन महिला व बालकल्याण विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड यांनी केले आहे.

भटक्या कुत्र्यांसंदर्भात उपायोजना करण्याची राहुल काटकर यांची मागणी

भटक्या कुत्र्यांसंदर्भात उपायोजना करण्याची राहुल काटकर यांची मागणी कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव अत्यंत चिंताजनक बनला असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांसंदर्भात उपायोजना करण्याची मागणी कल्याण पूर्वेतील सामाजिक कार्यकर्ते राहुल काटकर यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी कल्याण (पूर्व) येथे राहणारे आयेश अमीन या युवकाला भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. त्यानंतर रेबिजची भीती मनात निर्माण झाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. महानगरपालिका रुग्णालयांमध्ये रेबीज लसीचा तुटवडा असल्याची माहिती समोर आली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून संबंधित विभागाच्या नियोजनातील त्रुटी व निष्काळजीपणा स्पष्ट दिसून येतो. कुत्रा चावल्यानंतर तात्काळ व पूर्ण लसीकरण होणे आवश्यक असताना लसीची अनुपलब्धता नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणारी आहे. तरी परिसरात तातडीने कुत्रे पकड मोहीम राबवावी. सर्व भटक्या कुत्र्यांचे लसीकरण व नसबंदी मोहिम युद्धपातळीवर राबवावी. महानगरपालिका रुग्णालयांत रेबीज लस कायमस्वरूपी उपलब्ध ठेवावी. संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी. नागरिकांसाठी जनजागृती मोहीम व आरोग्य शिबिरे आयोजित करावीत. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून भविष्यात अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी तात्काळ ठोस उपाययोजना करण्याची मागणी राहुल काटकर यांनी केडीएमसी आयुक्तांकडे केली आहे.